शीर पारा / शीर प्यारा ( अफगाणी फज )

Submitted by दिनेश. on 15 March, 2015 - 15:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
कपाच्या आकारानुसार दहा ते बारा फज होतील.
माहितीचा स्रोत: 
अफगाणिस्तानमधला पारंपरीक प्रकार आहे. नेटवर आहेच.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती मस्त दिसतोय शीरपारा.
याचा रंग मला वाटतं मिल्कपावडरीच्या रंगावरून येत असावा.

वेका, ग्लुकोज पावडर मिळते ( पुर्वी ग्लुकॉन डी हा ब्रांड होता ) बाजारात. पिठीसाखरेसारखी दिसते पण लवकर विरघळते. लिक्वीड ग्लुकोझ हा आणखी वेगळा प्रकार. तो साखरेच्या पाकासारखाच असतो. लहान बाटल्यांत मिळतो.

मंजूडी, हो तसेच. भारतात मी कधीच मिल्क पावडर वापरली नाही. सध्या कुठली चांगली आहे बाजारात ?
पुर्वी अनिकस्प्रे नावाचा एक ब्रांड होता.

माझ्याकडे स्नेह्यांनी दिलेली नेस्लेची निडो आहे. ही मिपा पिवळसर रंगाची चांगली रवाळ आहे.
पण निडो मुंबईत तरी सहज मिळत नाही. इकडे अमूलचा अमूल्या आणि नेस्लेचा एव्हरीडे ब्रँड सहज उपलब्ध आहे. ह्या दोन्ही पावडरी पांढर्‍याशुभ्र रंगाच्या आणि अगदी पीठूळ असतात.
पण लोकल चहावाल्यांकडे जी मिपा मिळते ती जास्त चांगली असते असं मला वाटतं. मला गिरनारकडे मिळणारी मिपा आवडते.

अमूलने सुरवातीला बाजारात आणली होती, तिला भयानक वास असायचा. ती गरम पाण्यातही लवकर विरघळायची नाही.
म्हशीच्या दूधाची पावडर करणे कठीण असते, पण ते अमूलने साध्य केले होते, असा रिपोर्ट मी वाचला होता.

निडो, गायीच्या दूधाची असते पण तिची क्वालिटी उत्तम. आखाती देशात तिच लोकप्रिय आहे. तिथले लोक लहान मुलांना भारतात घेऊन येतात, त्यावेळी निडोचे डबे आणतात. एअरपोर्टच्या ड्यूटी फ्री दुकानात पण ती असते.

लोकल चहावाल्यांकडे जी मिपा मिळते ती जास्त चांगली असते असं मला वाटतं. मला गिरनारकडे मिळणारी मिपा आवडते.

हीच खरी मिल्क पावडर. नेस्ले आणि एवरीडे डेरी व्हाईटनर म्हणुन जे विकतात त्यात मिल्क पावडर कमी आणि कॉर्न फ्लोअर व साखर जास्त असते. चहावाल्याचा दुकानात जाऊन घ्यायची. शुभ्र, भरभरीत असते, पाण्यात टाकल्यावर अगदी अस्सल दुध तयार होते.

वरची रेसिपी साखरेमुळे करावीशी वाटत नाहीय पण डोळे हटतही नाहीत फोटोवरुन... Happy

वेका, दवाबाजारात मिळेल ग्लुकोज पावडर नेहमीच्या वापरासाठी हवी असेल तर. रोजच्या चहामध्ये, भाजी आमटीमध्ये, पक्वान्नांमध्ये घालू शकतो आपण. फक्त ग्लूकोज चवीला कमी गोड असतं, त्याची सवय करुन घ्यावी लागेल. पण मन मारण्यापेक्षा बरं Wink Glucose वापरायचा फायदा हा की Fructose चा तोटा कमी होतो. Fructoseचे तोटे नेटवर माहित पडतील.

पण डोळे हटतही नाहीत फोटोवरुन <<<<< +१, माझ्याकडे एवरीडे डेरी व्हाईटनर आहे. करु की नको विचारात आहे. Happy
अश्विनी, ग्लुकोज पावडर मुंबईत कुठे मिळेल आणि ब्रान्डही सांग.

हा मी केलेला अफगाण फज. आज गुढी पाडव्या चे औचित्य साधून केला.

सुकामेव्याची अगदी बारीक पावडर झाली म्हणून वेगळा दिसत नाही.

साखरेऐवजी ग्लुकोज वापरले म्हणून जरा निगोड लागले. मला वाटते की रवा - खोबर्‍याच्या लाडवाना लागतो तसा पाक यालाही करावा.

Faj.png

Pages