जागतिक महिला दिन जवळ आला आहे त्यानिमित्ताने काहीतरी लिहू असे वाटत होते!! म्हणून स्त्रीवाद म्हणजे फ़ेमिनिझम वर काहीतरी लिहावे असे ठरवले. विषयाला अनुसरून निरीक्षण करायला मी चालू केले आणि प्रश्न पडला की स्त्रीवादाचा झेंडा मिरविणाऱ्या आम्ही शहरी आधुनिक स्त्रिया खरोखरच स्त्रीवादी आहोत का? आम्ही खूप खूप शिकलो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागलो, पुरुषांना मिळणारे स्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हालाही मिळायला लागले (हॉटेलात जेवणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, रात्रीच्या पार्ट्यांना जाणे, डिस्कोमध्ये नाचणे, इत्यादी), पारंपारिक साडी किंवा पंजाबी ड्रेस बासनात गुंडाळून आम्ही जीन्स-टीशर्ट, स्कर्ट वैगेरे घालायला लागलो. पुष्कळ घरातील पुरुषसुद्धा घरगुती कामामध्ये मदत करायला लागले. झालो की आम्ही स्त्रीवादी!!! काय राहिले अजून?………………… खरेच?
"घरीच बसलेली असते ती. तिला काय उद्योग आहे!!"
"किती जाड आहे ना ती!!"
"दिसायला यथातथाच आहे"
"लग्न होऊन एवढी वर्षे झाली तरी अजून मूल नाही"
"लग्न जमतच नाहीये तिचे एवढे वर्ष"
"शिक्षण कमीच आहे तसे"
"अगदी काकूबाई आहे ती!!"
"कसे कपडे घालते ती!!"
अशी आणि अजून कितीतरी उपहासात्मक वाक्ये अगदी आपल्यासारख्याच शहरी आधुनिक स्त्रियांच्या तोंडी मी सर्रास ऐकली आहेत. पुष्कळ वेळा स्त्रिया बोलत नाहीत पण त्यांच्या वागण्यातून आणि देहबोलीमधून भेदभाव सतत जाणवत राहतो. ह्यातील काही वाक्ये मीसुद्धा बोललेली आहेतच. कितीतरी वेळा मीसुद्धा जजमेंटल झालेच आहे. मग मी खरेच स्त्रीवादी आहे का? मला स्त्रीवादाचा खरा अर्थ कळला आहे का? मी खूप शिकलेली आहे, मी काम करून पैसे कमावते, मी उत्तम स्वयंपाक करते, मी आधुनिक आहे, मी स्वतंत्र आहे, हे म्हणताना इतर स्त्रिया कमी आहेत असे का म्हणावेसे वाटते? स्वत:च्या कर्तुत्वाचा अभिमान बाळगताना इतर स्त्रिया कशा कर्तुत्ववान नाहीत हे सिद्ध का करावेसे वाटते? ह्याचा अर्थ आत्मविश्वासाची कमी असा घ्यावा की अहंकारी वृत्ती असा घ्यावा?
प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. काय शिकावे, नोकरी करावी की नाही, लग्न करावे की नाही आणि केले तर कोणाशी करावे, मूल होऊ द्यावे की नाही आणि कधी होऊ द्यावे, काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे, हे सगळे प्रश्न तिचे वैयक्तिक प्रश्न नाहीत का? मग त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा कोणालाच काय अधिकार आहे? तिच्याकडे असलेल्या किंवा नसलेल्या गोष्टींवरून तिच्याशी भेदभावाने वागण्याचा काय अधिकार आहे? ज्याप्रमाणे वैयक्तिक निर्णय घायचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे त्याप्रमाणे तिचे अनेक प्रश्नसुद्धा आहेत. त्या प्रश्नांशी कदाचित ती एकटीच लढा देत असेल. तिचे प्रश्न माहित नसतानाच जजमेंटल होण्याचा तरी कोणाला काय अधिकार आहे?
स्त्रियांनीच स्त्रियांना जर असे कमी लेखले तर मग खरा स्त्रीवाद कधीच रुजणार नाही. मग पुरुषांकडून तरी स्त्रियांनी का म्हणून अपेक्षा ठेवायची? सर्व स्त्रिया समान आहेत मग त्यांचे गुण-अवगुण तितकेसे महत्वाचे नाहीत ही भावना जेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजेल तेव्हाच स्त्रीवादाचे खरे सौंदर्य कळायला मदत होईल. स्त्रीवादाची व्याख्या केवळ स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता मिळालेल्या/दिलेल्या संधीच नव्हे तर स्त्रियांनी(आणि पुरुषांनीसुद्धा) स्त्रीत्वाचा आणि इतर स्त्रियांचा केलेला सन्मानसुद्धा ह्या व्याख्येमध्ये अध्यारुत असायला हवा.
करण्यासारखे खूप काही आहे.ज्या स्त्रियांपर्यंत स्त्रीमुक्ती चळवळ पोहोचालेलीच नाही अशा स्त्रियांना मदत करणे हे तर आहेच. पण ते खूप मोठे काम आहे. आपल्या आजूबाजूच्या इतर स्त्रियांचा (नातेवाईक, शेजारपाजारच्या आणि इतरही ओळखी-अनोळखीच्या) अनादर होणार नाही असे वागणेबोलणे जमले तरीही आपण खूप काही साध्य करू शकतो. पुरुषांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपापसातली ही स्पर्धा आणि तेढ मिटविणे अधिक गरजेचे आहे. स्त्री हिच स्त्रीची शत्रू असते हे वाक्य खोटे करून दाखवायला हवे.
जागतिक महिला दिन खऱ्या अर्थानी साजरा करायचा असेल तर महिलांनी महिलांनाच कमी लेखून भेदभाव करणे सोडून द्यायला हवे. स्वत:ला आधुनिक स्त्रीवादी म्हणविणाऱ्या माझ्यासारख्या सर्वच स्त्रियांनी आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या बोलाण्यातून आणि वागण्यातूनसुद्धा चुकून किंवा मुद्दामून आपण इतर स्त्रियांचा उपहास तर करत नाही ना, आपल्यासारख्या नसणाऱ्या (मग ते कोणत्याही बाबतीत असो) स्त्रियांना जज करून भेदभावाची वागणूक तर देत नाही न हे वारंवार तपासायला हवे. मी ठरविले आहे…मी प्रयत्न करणार आहे.
======
तळटीपः जजमेंटल साठी मराठी शब्द माहित नाहीत म्हणून इंग्रजी शब्दच वापरला आहे. कोणाला माहित असेल तर कृपया सांगवा
स्वाती२, एखाद्या व्यक्तीने
स्वाती२,
एखाद्या व्यक्तीने अश्यावेळी कसे वागावे ह्यासाठी तुमची पोस्ट चांगली आहे.
पण पुन्हा, तुम्ही जे लिहिले आहेत ते 'साधारण ह्या खालच्या प्रश्नाचे उत्तर' आहे:
एखाद्या ग्रूपमध्ये आपले वर्तन कसे असावे व पटत नसल्यास आपण काय करावे व कसे करावे?
पण प्रश्न वेगळा आहे, हा वरचा प्रश्न नाही आहे.
कोणता प्रश्न आहे हे आता (आणखीनच) वेगळ्या प्रकारे मांडायचा प्रयत्न करतो.
खरे तर 'कोणते प्रश्न' म्हणावे लागेल आता.
(ह्याचा अर्थ असा अजिबात घेऊ नयेत की प्रश्न बदलले वगैरे, वर जे प्रश्न मी विचारलेले होते त्यांचे हे सार आहे केवळ).
तर प्रश्न असे:
स्त्रियांमध्ये जर दोन परस्परविरोधी भूमिका असतील तर:
१. आपल्या कंफर्ट झोनमध्ये राहून दुसरीला लेबल लावणे हा सोपा उपाय सहसा अवलंबिला जाईल की दुसरी विचारसरणी समजून घेण्याचा उपाय केला जाईल?
२. समजा विचारसरणी समजली व पटली व त्यानुसार प्रयत्न करून ती अंगी बाणली तर ती जिची मूळ विचारसरणी होती ती स्त्री ह्या बदललेल्या स्त्रीला (किंवा स्त्रियांचा तो ग्रूप ह्या बदललेल्या स्त्रीला) मधले सगळे विसरून मनमोकळेपणाने स्वीकारेल का? 'आमच्यामुळे ही बदलली' ही टिमकी वाजणे थांबेल का?
३. मुळात स्त्रीस्वातंत्र्यासाठी आपण जे करतो आहोत ते योग्य नसून ती दुसरी जे करते आहे ते योग्य आहे असे कधी जाणवलेच तर स्वतःत बदल केले जातील का? की दुसरीचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी सेटिंग केले जाईल?
४. एक स्त्री स्वतंत्र होऊ पाहात आहे व तसे करताना ती बदलत आहे हे पूर्णपणे स्वीकारले जाईल का?
ह्या प्रश्नांची उत्तरे 'तुम्ही काय केले असतेत' ह्या शैलीने देण्याऐवजी 'सहसा काय होईल' अश्या प्रकारे दिलीत तर कदाचित योग्य राहील.
बेफिकीर, "तुम्ही वर
बेफिकीर, "तुम्ही वर विचारलेल्या प्रश्नांचा अन स्त्रीवादाचा काय संबंध?" असं विचारायचा अतिशय मोह होत असुनही तुमच्या त्यावर येणार्या अजुन एका हातभर, माझ्या डोक्यावरुन जाणार्या पोस्टला/टिप्पणीला घाबरुन तो प्रश्न विचारत नाही.
बाकी सविस्तर उत्तर स्वाती२ देतीलच पण माझ्यामते हे जेनेरिक प्रश्न आहेत आणि कोणत्याही हेटेरोजिनिअस ग्रुप मध्ये जे वर्तन घडेल, तेच इथेही घडेल. घडावे.
नताशा अहो त्याचाच
नताशा
अहो त्याचाच स्त्रीवादाशी (जेवढा काही) संबंध आहे त्यावर मूळ लेख आहे.
बाकी माझ्या प्रतिक्रियांमुळे ज्यांना काही वैयक्तीक मनस्ताप होत असेल त्यांच्यासमोर दिलगीर आहे. पण ही चर्चा व काही विचार समजून घेण्याच्या प्रयत्नांत मला थोडे विस्तृत प्रतिसाद लिहावे लागत आहेत. तेवढे कृपया अॅकोमोडेट व्हावे.
बेफी, हे वर्तन व्यक्तीनुसार
बेफी, हे वर्तन व्यक्तीनुसार बदलेलना. शेवटी समोरची व्यक्ती कशी वागेल हे आपल्या हातात नाही. आपण कसे वागायचे, कसे रिअॅक्ट करायचे तेवढेच आपण ठरवू शकतो. मला तरी ६०% व्यक्ती इगो न कुरवाळता पुढे जायची तयारी असलेल्या भेटल्या. बरेचदा तुम्ही तुमचा इगो मधे आणत नाही हे लक्षात आले तर समोरची व्यक्ती देखील कालांतराने स्वतःचा इगो हळू हळू बाजूला ठेवू लागते. हे परीवर्तन झटपट होत नाही. त्या व्यक्तीला आधीचा अनुभव वाईट असेल तर तो कडवटपणा लगेच जात नाही. बरेचदा तुमच्या मुळे मला ही नवीन गोष्ट कळली अशी कृतज्ञता दाखवली तरी पुरेसे असते. शेवटी नुसताच स्त्रीवादी म्हणून इगो कुरवाळायचाय की स्वतःसाठी आणि समाजासाठी खरेच काही चांगले घडवून आणायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे.
स्वाती२, वर्तन व्यक्तीनुसार
स्वाती२,
वर्तन व्यक्तीनुसार बदलते हे उघड आहेच.
मूळ लेखातील हे दोन छोटे पॅरा मात्र असे दर्शवत आहेत की प्रत्येक व्यक्ती वेगळी असली तरी सहसा दिसणार्या वर्तनाचे (काही प्रमाणात) सरसकटीकरण शक्य आहे. त्यामुळे, सर्वसामान्यपणे जे वर्तन आढळते त्या अनुषंगाने तुमचे काय मत असेल ह्याची उत्सुकता आहे. लेखातील ते पॅरा कृपया बघा:
हा एक पॅरा:
>>>अशी आणि अजून कितीतरी उपहासात्मक वाक्ये अगदी आपल्यासारख्याच शहरी आधुनिक स्त्रियांच्या तोंडी मी सर्रास ऐकली आहेत. पुष्कळ वेळा स्त्रिया बोलत नाहीत पण त्यांच्या वागण्यातून आणि देहबोलीमधून भेदभाव सतत जाणवत राहतो. ह्यातील काही वाक्ये मीसुद्धा बोललेली आहेतच. कितीतरी वेळा मीसुद्धा जजमेंटल झालेच आहे. मग मी खरेच स्त्रीवादी आहे का? मला स्त्रीवादाचा खरा अर्थ कळला आहे का? मी खूप शिकलेली आहे, मी काम करून पैसे कमावते, मी उत्तम स्वयंपाक करते, मी आधुनिक आहे, मी स्वतंत्र आहे, हे म्हणताना इतर स्त्रिया कमी आहेत असे का म्हणावेसे वाटते? स्वत:च्या कर्तुत्वाचा अभिमान बाळगताना इतर स्त्रिया कशा कर्तुत्ववान नाहीत हे सिद्ध का करावेसे वाटते? ह्याचा अर्थ आत्मविश्वासाची कमी असा घ्यावा की अहंकारी वृत्ती असा घ्यावा?<<<
आणि हा दुसरा:
>>>त्रियांनीच स्त्रियांना जर असे कमी लेखले तर मग खरा स्त्रीवाद कधीच रुजणार नाही. मग पुरुषांकडून तरी स्त्रियांनी का म्हणून अपेक्षा ठेवायची? सर्व स्त्रिया समान आहेत मग त्यांचे गुण-अवगुण तितकेसे महत्वाचे नाहीत ही भावना जेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजेल तेव्हाच स्त्रीवादाचे खरे सौंदर्य कळायला मदत होईल. स्त्रीवादाची व्याख्या केवळ स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता मिळालेल्या/दिलेल्या संधीच नव्हे तर स्त्रियांनी(आणि पुरुषांनीसुद्धा) स्त्रीत्वाचा आणि इतर स्त्रियांचा केलेला सन्मानसुद्धा ह्या व्याख्येमध्ये अध्यारुत असायला हवा. <<<
बेफिकीर, वैयक्तिक मनस्ताप
बेफिकीर, वैयक्तिक मनस्ताप वगैरे नाही. यापेक्षा खूप जास्त मनस्ताप आमचा बॉस देतो.
बाकी मूळ लेखच पटला नाहिये, त्यामुळे त्या लॉजिकवर बेस्ड अजुन कितीही प्रश्न, कशाहीप्रकारे विचारले तरी माझं उत्तर तरी नक्कीच बदलणार नाही. माझे मुद्दे मांडून झाले आहेत. त्यामुळे आता मला कोणी स्पेसिफिक प्रश्न विचारल्याशिवाय मी इथे पुन्हा लिहायचं नाही असं ठरवलंय.
अवांतरः स्त्री-पुरुष समानते विषयी उलतसुलट चर्चा घडणे हे मला खरंच खूप गरजेचं वाटतं. इथे ज्या स्त्रीवाद्यांचे मत माझ्याशी जुळत नाही, त्याही त्यांच्या आयुष्यात या दिशेने काहीतरी पॉझिटिव्ह करत असतीलच आणि अशा वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळे विचार असुनही समान ध्येयासाठी काम करणारे सर्वच लोक महत्वाचे आहेत.
बाकी मूळ लेखच पटला
बाकी मूळ लेखच पटला नाहिये<<<
हो. मूळ लेख अपुरा व मर्यादीत आहे व लेखिकेने हे दिलखुलासपणे मान्य करून लेखात बदल करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. अजून लेख तसाच ठेवला आहे मात्र!
तुमच्या बॉसला ट्रेनिंग देईल का विचारा ना! आजवर विशेष प्रयत्न न करता इतरांना मनस्ताप देऊ शकण्याच्या क्षमतेत काही खास कौशल्ये अॅड करता येतील का ह्यावर मीही विचार करतच आहे.
(अर्थातच, पगार न देता)
सर्वांच्या प्रतिसादांबद्दल
सर्वांच्या प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!! सर्वांची मते जाणून घेताना खूप नविन विचारप्रवाह कळले.!!
हो. मूळ लेख अपुरा व मर्यादीत आहे व लेखिकेने हे दिलखुलासपणे मान्य करून लेखात बदल करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. अजून लेख तसाच ठेवला आहे मात्र!>>>>>> ह्याच विषयावर पुन्हा एकदा काम चालू केले आहे. विषय मोठा आहे. पण लवकरात लवकर नविन लेख प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन. थोडा वेळ लागल्यास कृपया समजून घ्यावे. धन्यवाद!!
स्वाती२ तुम्ही जो मुद्दा
स्वाती२ तुम्ही जो मुद्दा मांडताय तिथे त्या स्त्रीला सोडण्याचा चॉईस आहे किंवा सोडण्याची फारशी किंमत नाही अशा जागी ठीक आहे.
पण अनेक वेळा ऑफिस किंवा कुटूंबात किंवा हायस्कूलात असे प्रकार घडतात. एकट राहणे, ग्रूप सोडणे आर नॉट दि ऑप्शन्स. इफ दे आर - दॅट इज डेट्रीमेंटल टू एव्हरीबडी. उदा: कॉलेजातील सायन्स क्लब. एकच अस्तो. दुसरा सुरू होईपर्यंत तुम्ही ग्रॅजुएट व्हाल. सतावण्याच्या टॅक्टीक्स अशा असतात की त्या स्कूल अथॉरिटीज नियमात बसत नाहीत म्हणून का ही ही कारवाई करीत नाहीत. एखादी हळवी मुलगी सोडून जाते. आज मुलींची सायन्स मधील इंन्व्हॉल्व्ह्मेंट इन टर्मस ऑफ नंबर्स बघता अशी एकही मुलगी बाहेर पडणे योग्य नाही.
हे एन्व्हायर्नमेंटमधील बदल अचानक घडत नाही. जोवर प्रत्येक जण मनाशी ठरवत नाही की मी पॉझिटीव्हली वागेन तोवर बदल घडणार नाही. ह्यात ग्रूपशी सूर जुळ्णे , मैत्री होणे ह्या सगळ्यापेक्षा ही व्यक्ती पण क्लबमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकते (आज केल नाही तरी उद्या करू शकते). तिला असह्य वातावरण देण्यात माझे ही नुकसान आहे हे समजेल तो सुदिन.
>>>तिला असह्य वातावरण देण्यात
>>>तिला असह्य वातावरण देण्यात माझे ही नुकसान आहे हे समजेल तो सुदिन.<<<
व्वा!
पुन्हा एकदा एकाच वाक्यात सुमुक्तांच्या लेखाचे सार मांडलेत! फार आवडले हे वाक्य!
तसेही, हे वाक्य स्त्रीवाद ह्या विषयाबाहेरही किती चपखलपणे लागू होते. एकुणच आयुष्यात!
An interesting
An interesting read
http://www.newyorker.com/science/maria-konnikova/lean-out-the-dangers-fo...
बेफी, एखाद्या व्यक्तीला आपण
बेफी,
एखाद्या व्यक्तीला आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवताना दुसर्याचे उणे दाखवायची सततच गरज भासत असेल तर कदाचित काहीतरी खूप दुखावलेले गेले असेल. काहींनी आसपास तसेच वर्तन बघितले असेल त्यामुळे त्यांना असे करणे योग्य आहे असे वाटत असेल. अशावेळी स्पष्टपणे असे वागणे योग्य नाही हे सांगणे, ज्या व्यक्तीबद्दल बोलले जात आहे त्या व्यक्तीची बाजू माहित असेल तर ती मांडणे , आपली नापसंती दर्शवणे , काही वेळा आपल्याला स्वतःलाही ती टीका लागू पडते असे सांगून स्टिरीओटाईप्स मोडायचा प्रयत्न करणे असे बरेच काही आपण निश्चितच करु शकतो. बाकी ती व्यक्ती स्वतःला स्वतंत्र वगैरे जे काय समजत असेल ते तिचे तिला.
दुसरा मुद्दा सन्मानाचा तर एक स्त्री दुसर्या स्त्रीला सन्मानाने वागवत नाही मग पुरुषांकडून कशी अपेक्षा करणार हे मला चुकीचे वाटते. स्त्रीला सन्मानाने वागवायचे एखादा पुरुष ठरवतो कारण तसे वागणे त्याच्या दृष्टीने योग्य असते. इतर स्त्रीया त्या स्त्रीशी कशा वागतात यावर तो स्वतःचे वर्तन ठरवत नसतो. माझ्या बघण्यात असे अनेक पुरुष आहेत जे स्त्रीला सन्मानाने वागवतात. त्यांच्या घरातील स्त्रीया इतर स्त्रीयांना सन्मानाने वागवत नाहीत तेव्हा ते आपली नापसंती व्यक्त करतात, प्रयत्न करुनही वर्तनात फरक नाही म्हणून दु:खीही होतात.
सीमंतिनी ,
मी आधीच्या पोस्ट मधे (२१ फेब्रुअरी ११: ४४) स्पष्टच लिहिलय की परंपरावादी किंवा आधूनिकपणाचा आव आणून कुणी बुलिंग करत असेल तर त्याचा त्या त्या वेळी प्रतिकार करावा. तुम्ही म्हणता तशा प्रकारचे बुलिंग जवळून बघितले आहे आणि त्याला विरोधही केला आहे. असे जेव्हा होते तेव्हा एक-दोन व्यक्ती बुलीज असतात आणि बाकीचे बघे . अशावेळी या बघ्याची भूमिका घेणार्यांनी फर्म स्टॅन्ड घेतला तर निश्चितच फरक पडतो. याबाबत सतत संवाद करणे, शक्य तिथे असे होवू नये म्हणून आपल्या परीने प्रयत्न करणे एवढे आपण करत रहायचे.
>>>>>तिला असह्य वातावरण देण्यात माझे ही नुकसान आहे हे समजेल तो सुदिन.>>> +१
पारंपारीक स्त्रीया देखील
पारंपारीक स्त्रीया देखील आधुनिक स्त्रीयांना कमी लेखणे, पाय ओढणे करत असतात. जे काही कमी लेखणे वगैरे असते ते एकतर्फी नसते. हे सगळे व्यवहार खूप गुंतागुंतीचे असतात. +१
भावना छान मांडल्या आहेत.
भावना छान मांडल्या आहेत.
स्त्रीयानी स्त्रीसत्ताक पद्धत
स्त्रीयानी स्त्रीसत्ताक पद्धत आणावी.
Pages