आधुनिक स्त्रियांचा स्त्रीवाद

Submitted by सुमुक्ता on 20 February, 2015 - 03:29

जागतिक महिला दिन जवळ आला आहे त्यानिमित्ताने काहीतरी लिहू असे वाटत होते!! म्हणून स्त्रीवाद म्हणजे फ़ेमिनिझम वर काहीतरी लिहावे असे ठरवले. विषयाला अनुसरून निरीक्षण करायला मी चालू केले आणि प्रश्न पडला की स्त्रीवादाचा झेंडा मिरविणाऱ्या आम्ही शहरी आधुनिक स्त्रिया खरोखरच स्त्रीवादी आहोत का? आम्ही खूप खूप शिकलो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागलो, पुरुषांना मिळणारे स्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हालाही मिळायला लागले (हॉटेलात जेवणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, रात्रीच्या पार्ट्यांना जाणे, डिस्कोमध्ये नाचणे, इत्यादी), पारंपारिक साडी किंवा पंजाबी ड्रेस बासनात गुंडाळून आम्ही जीन्स-टीशर्ट, स्कर्ट वैगेरे घालायला लागलो. पुष्कळ घरातील पुरुषसुद्धा घरगुती कामामध्ये मदत करायला लागले. झालो की आम्ही स्त्रीवादी!!! काय राहिले अजून?………………… खरेच?

"घरीच बसलेली असते ती. तिला काय उद्योग आहे!!"
"किती जाड आहे ना ती!!"
"दिसायला यथातथाच आहे"
"लग्न होऊन एवढी वर्षे झाली तरी अजून मूल नाही"
"लग्न जमतच नाहीये तिचे एवढे वर्ष"
"शिक्षण कमीच आहे तसे"
"अगदी काकूबाई आहे ती!!"
"कसे कपडे घालते ती!!"

अशी आणि अजून कितीतरी उपहासात्मक वाक्ये अगदी आपल्यासारख्याच शहरी आधुनिक स्त्रियांच्या तोंडी मी सर्रास ऐकली आहेत. पुष्कळ वेळा स्त्रिया बोलत नाहीत पण त्यांच्या वागण्यातून आणि देहबोलीमधून भेदभाव सतत जाणवत राहतो. ह्यातील काही वाक्ये मीसुद्धा बोललेली आहेतच. कितीतरी वेळा मीसुद्धा जजमेंटल झालेच आहे. मग मी खरेच स्त्रीवादी आहे का? मला स्त्रीवादाचा खरा अर्थ कळला आहे का? मी खूप शिकलेली आहे, मी काम करून पैसे कमावते, मी उत्तम स्वयंपाक करते, मी आधुनिक आहे, मी स्वतंत्र आहे, हे म्हणताना इतर स्त्रिया कमी आहेत असे का म्हणावेसे वाटते? स्वत:च्या कर्तुत्वाचा अभिमान बाळगताना इतर स्त्रिया कशा कर्तुत्ववान नाहीत हे सिद्ध का करावेसे वाटते? ह्याचा अर्थ आत्मविश्वासाची कमी असा घ्यावा की अहंकारी वृत्ती असा घ्यावा?

प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. काय शिकावे, नोकरी करावी की नाही, लग्न करावे की नाही आणि केले तर कोणाशी करावे, मूल होऊ द्यावे की नाही आणि कधी होऊ द्यावे, काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे, हे सगळे प्रश्न तिचे वैयक्तिक प्रश्न नाहीत का? मग त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा कोणालाच काय अधिकार आहे? तिच्याकडे असलेल्या किंवा नसलेल्या गोष्टींवरून तिच्याशी भेदभावाने वागण्याचा काय अधिकार आहे? ज्याप्रमाणे वैयक्तिक निर्णय घायचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे त्याप्रमाणे तिचे अनेक प्रश्नसुद्धा आहेत. त्या प्रश्नांशी कदाचित ती एकटीच लढा देत असेल. तिचे प्रश्न माहित नसतानाच जजमेंटल होण्याचा तरी कोणाला काय अधिकार आहे?

स्त्रियांनीच स्त्रियांना जर असे कमी लेखले तर मग खरा स्त्रीवाद कधीच रुजणार नाही. मग पुरुषांकडून तरी स्त्रियांनी का म्हणून अपेक्षा ठेवायची? सर्व स्त्रिया समान आहेत मग त्यांचे गुण-अवगुण तितकेसे महत्वाचे नाहीत ही भावना जेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजेल तेव्हाच स्त्रीवादाचे खरे सौंदर्य कळायला मदत होईल. स्त्रीवादाची व्याख्या केवळ स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता मिळालेल्या/दिलेल्या संधीच नव्हे तर स्त्रियांनी(आणि पुरुषांनीसुद्धा) स्त्रीत्वाचा आणि इतर स्त्रियांचा केलेला सन्मानसुद्धा ह्या व्याख्येमध्ये अध्यारुत असायला हवा.

करण्यासारखे खूप काही आहे.ज्या स्त्रियांपर्यंत स्त्रीमुक्ती चळवळ पोहोचालेलीच नाही अशा स्त्रियांना मदत करणे हे तर आहेच. पण ते खूप मोठे काम आहे. आपल्या आजूबाजूच्या इतर स्त्रियांचा (नातेवाईक, शेजारपाजारच्या आणि इतरही ओळखी-अनोळखीच्या) अनादर होणार नाही असे वागणेबोलणे जमले तरीही आपण खूप काही साध्य करू शकतो. पुरुषांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपापसातली ही स्पर्धा आणि तेढ मिटविणे अधिक गरजेचे आहे. स्त्री हिच स्त्रीची शत्रू असते हे वाक्य खोटे करून दाखवायला हवे.

जागतिक महिला दिन खऱ्या अर्थानी साजरा करायचा असेल तर महिलांनी महिलांनाच कमी लेखून भेदभाव करणे सोडून द्यायला हवे. स्वत:ला आधुनिक स्त्रीवादी म्हणविणाऱ्या माझ्यासारख्या सर्वच स्त्रियांनी आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या बोलाण्यातून आणि वागण्यातूनसुद्धा चुकून किंवा मुद्दामून आपण इतर स्त्रियांचा उपहास तर करत नाही ना, आपल्यासारख्या नसणाऱ्या (मग ते कोणत्याही बाबतीत असो) स्त्रियांना जज करून भेदभावाची वागणूक तर देत नाही न हे वारंवार तपासायला हवे. मी ठरविले आहे…मी प्रयत्न करणार आहे.

======

तळटीपः जजमेंटल साठी मराठी शब्द माहित नाहीत म्हणून इंग्रजी शब्दच वापरला आहे. कोणाला माहित असेल तर कृपया सांगवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण माझी पोस्ट अगदीच न समजण्यासारखी आहे असे मला वाटत नाही. असो. >> +१. फक्त बेफिकिर नताशाचे (नि पर्यायाने तिला सपोर्ट करणार्‍यांचेही) म्हणणे "लेखिकेने फक्त 'स्त्रीवाद' ह्या संकल्पनेला केंद्रस्थानी मानूनच 'फक्त स्त्रियांनी स्त्रियांना कमी लेखणे' हा विषय चर्चेला घेतला गेला आहे असे म्हणायचे आहे." ह्यापलीकडे जाऊन बघण्याबद्दल निगडीत वाटतेय.

तुमच्या प्रतिसादात योग्य जागी विरामचिन्हे आहेत की नाहीत हे न समजल्यामुळे:

मला असे वाटत आहे की तुम्हाला असे म्हणायचे आहे की:

नताशा व त्यांना सपोर्ट करणार्‍यांचे असे म्हणणे आहे की:

लेखिकेने फक्त 'स्त्रीवाद ह्या संकल्पनेला गृहीत धरून स्त्रीने स्त्रीला कमी लेखणे' ह्या बाबीच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे असे इतरांचे म्हणणे आहे.

हे असे असले तरः

होय! (माझा पहिला प्रतिसाद अगदी तोच आहे).

पण त्यानंतर, लेखिकेला जे स्वातंत्र्य हवे आहे त्या परिघात राहून चर्चा करण्यास प्रिन्सिपली विरोध करणे हे संकेतस्थळावरील विचारस्वातंत्र्यास मर्यादीत करणे आहे असे मला वाटते.

ह्यापेक्षा वेगळे आपल्याला काही म्हणायचे असल्यास त्याबद्दल कल्पना नाही.

बेफी, माझ्या लेखन क्षमतेचा दोष. अजून एक प्रयत्न करते.
मला एवढेच म्हणायचे आहे की कितीही चुकीचे आहे असे म्हटले तरी वेगवेगळे ग्रुप्स एकमेकांना जज करत असतात. हे असे जज करणे सोकॉल्ड पुढारलेलेही करतात आणि परंपरावादीही. अशा वेळी आपल्यासाठी योग्य काय ते शेवटी आपल्याला स्वतःलाच ठरवावे लागते. प्रसंगी पुढाकार घेवून आपल्यासारखे प्रश्न असलेल्या लोकांचा सपोर्टग्रुप बनवावा लागतो. आधार मिळवणे आणि त्यासाठी आधार बनणे हे त्या अर्थाने.

सिमंतिनी, लढत एकाकी नसावी हे खरे पण त्याच बरोबर कुणीतरी सुरवात करेल म्हणून वाट बघत बसणे हे ही नसावे असे मला वाटते. बरेचदा आपण पहिले पाऊल टाकले तर हळूहळू मदतीची देवाणघेवाण करायला अनेक हात पुढे येतात.

मी याआधीही मायबोलीवर लिहिले होते, माझ्या साठी स्त्रीवाद हा मानवतावादाचा एक भाग आहे. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर, न्याय्य वागणूक ही त्यात अपेक्षित आहे.

स्वाती२,

ह्या अतीउद्धटपणाबद्दल माफ करा. पण मला उद्देशून तुम्ही लिहिलेला पॅरा हे निव्वळ एक अवांतर भाषण आहे. ते सुमुक्तांच्या लेखाचे उत्तर नव्हे.

>>>मी याआधीही मायबोलीवर लिहिले होते, माझ्या साठी स्त्रीवाद हा मानवतावादाचा एक भाग आहे. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर, न्याय्य वागणूक ही त्यात अपेक्षित आहे.<<<

प्लीज एलॅबोरेट इन टर्म्स ऑफ द क्रायटेरिअन मेन्शन्ड बाय सुमुक्ता!

फक्त बेफिकिर नताशाचे (नि पर्यायाने तिला सपोर्ट करणार्‍यांचेही) म्हणणे "लेखिकेने फक्त 'स्त्रीवाद' ह्या संकल्पनेला केंद्रस्थानी मानूनच 'फक्त स्त्रियांनी स्त्रियांना कमी लेखणे' हा विषय चर्चेला घेतला गेला आहे असे म्हणायचे आहे." ह्यापलीकडे जाऊन बघण्याबद्दल निगडीत वाटतेय.>>>>>>> ह्या पलिकडे जेव्हा स्वतः लेखिका ते मुद्दे मांडेल तेव्हा जाऊ. जेव्हा लेखातच त्या "पलिकडे" काही नाहीये मग आपण पोस्ट करत्यांनी पलिकडे जाऊन काय उपयोग?
टायटल पासून ते लेख संपेपर्यंत त्यातून काही अभिप्रेत होत असेल तर ते म्हणजे स्त्रीयांनी दुस्र्या स्त्रीयांना कमी लेखले म्हणजे स्त्रीवाद नसून तसे जर नाही केले तर स्त्रीवादाचे खरं सौंदर्य दिसेल हा ओवरॉल आशय आहे.

>>>ह्या पलिकडे जेव्हा स्वतः लेखिका ते मुद्दे मांडेल तेव्हा जाऊ. जेव्हा लेखातच त्या "पलिकडे" काही नाहीये मग आपण पोस्ट करत्यांनी पलिकडे जाऊन काय उपयोग?<<<

पूर्ण सहमत आणि हेही मी आधी म्हणालेलो आहे. Happy

पण रार आणि सीमंतिनी त्या पलीकडे आधीच पोचलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रतिसादांवर भरपूर प्रतिसादही आलेले आहेत. Happy

मग आता चर्चा करायची की नाही?

>>>टायटल पासून ते लेख संपेपर्यंत त्यातून काही अभिप्रेत होत असेल तर ते म्हणजे स्त्रीयांनी दुस्र्या स्त्रीयांना कमी लेखले म्हणजे स्त्रीवाद नसून तसे जर नाही केले तर स्त्रीवादाचे खरं सौंदर्य दिसेल हा ओवरॉल आशय आहे.<<<

होय आणि त्यावर मी असे लिहिलेले होते:

>>>पण ह्याचा फक्त स्त्रीवादाशीच संबंध आहे असे वाटत नाही व फक्त ह्याचाच स्त्रीवादाशी संबंध आहे असेही वाटत नाही. सर्व स्त्रियांनी भेदभाव करणे, अपेक्षा / टीका / निंदा / मत्सर / थट्टा करणे सोडले तर अचानक स्त्रीवाद सत्यात उतरेल असे काही नाही, असे वाटते.<<<

आपल्याला आवश्यक तो आधार शेवटी आपणच मिळवावा लागतो. त्यासाठी आपण आधी कुणाचे तरी आधार व्हावे लागते.<<< >>> स्वाती२, स्वतः सक्षम असल्याशिवाय कुणाचे तरी आधार कसे होणार? आणि सक्षम असेल तर आपल्याला आधार मिळावा/मिळवावा याची अपेक्षा/आशा का?

वाक्य छान असले तरी पटले नाही. अर्थातच हेमावैम.

पण माझी पोस्ट अगदीच न समजण्यासारखी आहे असे मला वाटत नाही. असो. >> मला पोस्ट पटल्या.

ओके बेफिकिर. त्या पुढे जरी पोहोचल्या असतील तरी मी माझ्या पुरते त्यांना उत्तर दिले आहे आणि माझ्यामते सीमंतिनी, रार आणि मी "सेम पेज" वर आहोत. सेम पेज म्हणजे मला काय म्हणायचय ते त्यांच्या लक्षात आलय ह्या अर्थानी.

चर्चेचं म्हणाल तर तो आपापला प्रश्न आहे, ज्यांना करायची ते करु शकतात. Happy

स्वाती२,

दहापैकी एका काकूबाईला इतर कोठेही काकूबाई दिसली नाही (म्हणजे ग्रूपबाहेरही) आणि तिला बाय चॉईस (तथाकथित) काकूबाईच व्हायचे असले तर तिने ग्रूप कसा फॉर्म करावा?

नाही करता आला तर काय करावे?

करता आला तर आधीच्या ग्रूपला दूषणे जाहीररीत्या द्यावीत का?

दिली तर त्यावर व्यवस्थित विचारविनिमय होईल की वादावादी होईल?

दुसर्‍या ग्रूपमधील किंवा नव्या काकूबाई ग्रूपमधील स्त्रिया दुसर्‍यांचे म्हणणे विचारात घेतील की टीकेस पात्र आहे असा सोपा निर्णय करतील?

एवढे करून तथाकथित काकूबाई आणि तथाकथित आधुनिक स्त्रिया ह्या सगळ्या (रिस्पेक्टिव्हली) एकमेकींना पूर्णपणे मॅच होणार्‍या असतील का?

>>>सेम पेज म्हणजे मला काय म्हणायचय ते त्यांच्या लक्षात आलय ह्या अर्थानी.<<<

ह्या अर्थाने सेम पेजवर असणे हे चमत्कारीक वाटत आहे मला.

नुसते माझे म्हणणे काय आहे हे इतरांना समजले आहे ह्यावर समाधानी कोण असते वैद्यबुवा आजकाल? Happy

अहो त्यातच समाधान मानावं लागतं कधी कधी कारण एखाद्याचा विचार/मुद्दा पटला आणि असं समोरच्या एखाद्यानी येऊन मान्य केलं आणि स्वतःचे विचार बदलले असं तरी होतं का कधी?
दर वेळेस चर्चे मध्ये तुम्ही बरोबर, माझे चुकले असं सहसा येऊन कोणी म्हणत नाही पण शेवटी बॅक ऑफ द माईंडला विचार सुरु असतो आणि फक्त आपापले मुद्दे रेटत न राहता कुठे जर अंडरस्टँडिंग दिसलं तर ते चांगलच आहे.
मी वर दोन वेळा तरी लिहिले आहे सीमंतिनी आणि रार ला की तुम्ही प्रस्तुत करता आहात ते विचार म्हणून मनुष्य स्वभाव म्हणून योग्य आहेत पण त्यांची सांगड मूळ लेखात लेखिकेकी घातलीये तशी स्त्रीवादाशी घालता येत नाही. नताशा पण सुरवातीपासून हेच म्हणत आहे.
बाकी ते कमी लेखण्याभोवतालीचे मुद्दे कितीही चर्चिले तरी ते जस्ट रियॅलिटी ऑफ लाईफ आहेत, त्या करता स्त्रीयांनी फार एक स्त्री म्हणून वेगळा विचार करायची काही गरज नाही अन त्यानी स्त्रीयांचे प्रोबधन वगैरे तर आजिबातच होत नाही.

स्वतःचे विचार बदलले असं तरी होतं का कधी? >> विचार करण्याची दिशा बदलू शकते, बदलते.

स्वतःचेच विचार फॉर्म्युलेट करता येतात.

>>>एखाद्याचा विचार/मुद्दा पटला आणि असं समोरच्या एखाद्यानी येऊन मान्य केलं आणि स्वतःचे विचार बदलले असं तरी होतं का कधी?<<<

व्हायला पाहिजे ही अपेक्षा तरी आहेच की ज्या मुद्यात! असो.

सुमुक्तांचा मूळ लेख अर्धवट आहे हे पुन्हा नोंदवावे लागत आहे.

किंबहुना, प्रतिसादांमार्फत तो अधिकाधिक परीपूर्ण होत आहे आणि हे एक लेखिका म्हणून थोडेसे अपयशाचे चिन्ह आहे ही दुर्दैवी बाब आहे. आशा आहे की त्या अधिक तगडे लिहितील. Happy

विचार करण्याची दिशा बदलू शकते, बदलते.>>>>> मुद्दा विचार बदलले, दिशा बदलली तरी ते स्पष्ट पणे कोणी येऊन तसं सांगता का? हा आहे.

दर वेळेस चर्चे मध्ये तुम्ही बरोबर, माझे चुकले असं सहसा येऊन कोणी म्हणत नाही पण शेवटी बॅक ऑफ द माईंडला विचार सुरु असतो<<<

उदाहरणार्थ असे जर ह्याच चर्चेत झालेले असले तर प्रतिसादांमध्ये तसे दिसले नाही व त्यामुळे तुम्ही म्हणत आहात तेच सिद्ध झाले. हे एक दुर्दैवही आहे.

आणि फक्त आपापले मुद्दे रेटत न राहता कुठे जर अंडरस्टँडिंग दिसलं तर ते चांगलच आहे.<<<

अनुमोदन!

मी वर दोन वेळा तरी लिहिले आहे सीमंतिनी आणि रार ला की तुम्ही प्रस्तुत करता आहात ते विचार म्हणून मनुष्य स्वभाव म्हणून योग्य आहेत पण त्यांची सांगड मूळ लेखात लेखिकेकी घातलीये तशी स्त्रीवादाशी घालता येत नाही. <<<<

ह्यावर अनेकदा लिहून झाले आहे की (बहुधा) लेखिकेला फक्त तितकेच म्हणायचे आहे आणि जर तितकेच म्हणायचे असेल तर आपण तितक्यावरच चर्चा करणे(ही) अभिप्रेत आहे.

नताशा पण सुरवातीपासून हेच म्हणत आहे.<<<ह्यावर जे म्हणायचे ते वर म्हणून झालेले आहे.

>>>बाकी ते कमी लेखण्याभोवतालीचे मुद्दे कितीही चर्चिले तरी ते जस्ट रियॅलिटी ऑफ लाईफ आहेत, त्या करता स्त्रीयांनी फार एक स्त्री म्हणून वेगळा विचार करायची काही गरज नाही अन त्यानी स्त्रीयांचे प्रोबधन वगैरे तर आजिबातच होत नाही.<<<

धिस सेन्टेन्स अगेन प्रूव्ह्ज दॅट समवन मिस्ड द होल पॉईंट! Happy

जाऊ द्या. लेख अर्धवट आहे किंवा काम करायची गरज आहे हे दिसतच आहे त्यामुळे अजून परत त्याच मुद्द्यांवर चर्चा करुन उपयोग नाही.

धिस सेन्टेन्स अगेन प्रूव्ह्ज दॅट समवन मिस्ड द होल पॉईंट!>>>>>> Well I chose to miss it (read: disregard it) as that was trivial. That's exactly why I said I don't get your posts sometimes. There needs to be a coherent line of thinking in one's posts. You twist and turn and play with the words because most of the times your motive is to just keep writing.

>>>मुद्दा विचार बदलले, दिशा बदलली तरी ते स्पष्ट पणे कोणी येऊन तसं सांगता का? हा आहे.<<<

असा कुठे मुद्दा आहे? हा मुद्दा प्रतिसादांमधून निघालेला असेल. लेखातून असा मुद्दा निघत आहे की स्त्रीने स्त्रीला कमी लेखणे ह्याचा स्त्रीवादावर काय प्रभाव पडतो? (किंवा पडतो की नाही)

जिज्ञासा,

तुमची साचेबंधांची उदाहरणं वाचली. त्याबद्दल धन्यवाद. Happy

तुमचं एक विधान लक्षात घेण्याजोगं वाटलं :

>> माझ्या आजूबाजूला फार झपाट्याने ह्या stereotypes ना मोडताना मी बघते आहे पण अनेक ठिकाणी अजूनही
>> फार conservative विचाराने वागतात. आणि त्यासाठी ह्या set stereotypes चा आधार घेतला जातो.

हे बंध मोडण्यामागील प्रमुख कारण म्हणजे एकाच्या पगारात भागंत नाही हे आहे. पूर्वी असे साचेबंध होते तेव्हा एकत्र कुटुंबपद्धती होती. नंतरच्या काळात एकाच्या उत्पन्नात गुजराण होई. हल्ली ते दुरापास्त होऊ घातलंय. पण जिकडे शक्य आहे तिकडे पुरूष आणि स्त्री आपल्या पारंपारिक भूमिका निभावतांना मला दिसून आल्या आहेत. इतरांचा अनुभव माहीत नाही. यासंदर्भात स्त्रीवादी भूमिका काय आहे किंवा काय असावी?

एक उदाहरण द्यावंसं वाटतं ते जपानचं. तिथे मुलं वाढवणं हे सन्मानाचं कार्य समजलं जातं. अपत्यसंगोपक गृहिणीस अतिशय मानाची वागणूक मिळते. याला साचेबंधात अडकणं म्हणावं का? भारतात स्त्रीला अशी वागणूक मिळाली तर कदाचित खूपशा स्त्रिया परत घराकडे पूर्णवेळ लक्ष द्यायला उद्युक्त होतीलही.

आ.न.,
-गा.पै.

>>> You twist and turn and play with the words because most of the times your motive is to just keep writing.<<<

हे पुन्हा वैयक्तीक आहे.

>>>Well I chose to miss it (read: disregard it) <<< ही तुमची निवड आहे.

>>>That's exactly why I said I don't get your posts sometimes.<<< हे सत्य आहे.

>>>There needs to be a coherent line of thinking in one's posts<<< दुसर्‍याची विचारसरणी पटत नाही हे अश्या पद्धतीने लिहिले जाऊ नये असे मला वाटते

>>>that was trivial.<<< इट इज जस्ट लाईक मेनी पीपल'स आय डी ज ऑन मायबोली. ट्रिव्हिअल!

बेफिकिर Lol
अहो तुमच्या विषयीच बोलतोय मी. आता जे काही वाटलं ते नीट भाषेत सांगायला काय हरकत आहे? मी काय शिव्या वगैरे थोडीच दिल्या आहेत?

इट इज जस्ट लाईक मेनी पीपल'स आय डी ज ऑन मायबोली. ट्रिव्हिअल!>>>>> हे पण एक तुमच्या बर्याच पोस्टीत दिसून येते. अहो कोण कोणाला ट्रिवियल समजत असेल तर असू द्या ना? सगळ्यांनी सगळ्यांना कसं अगदी मानानी वागावलं पाहिजे ही कोणती अपेक्षा आहे?

गा. पै. Welcome Happy इथे साचा केवळ वाईट/impractical आहे म्हणून तो मोडावा असा अर्थ अपेक्षित नाहीये मला! लिंगाधीष्ठीत साच्याबाहेर जाऊन काही वेगळे करू पाहणाऱ्या स्त्री-पुरुषांना तसं जगण्याची मोकळीक मिळाली पाहिजे असं वातावरण तयार व्हायला हवं. आणि प्रत्येकाने साच्यात स्वतःला कोंबावं अशी अपेक्षा नसावी. तू मुलगा/मुलगी आहेस असं म्हणून वेगवेगळे जगण्याचे सामाजिक नियम लावण्यापेक्षा एक माणूस म्हणून समाजात कसं वावरावं यासाठीचे स्त्री/पुरुष दोघांनाही लागू होतील असे एकसारखे सामाजिक संकेत पाळणाऱ्या समाजाकडे आपण वाटचाल केली पाहिजे. Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls... Into that heaven of Freedom my Father let my country awake!- Tagore

बेफी,
यात अति उद्धटपणा कसला? मला लेखातून व्यापक काही तरी अपेक्षित होते.
सुमुक्तांचा मुद्दा स्त्रीने स्त्रीला कमी लेखणे हा आहे. मात्र यातही त्या फक्त आधुनिक, स्वतंत्र स्त्रीने इतर स्त्रीयांना कमी लेखणे याबद्दलच बोलतात. त्यामुळे मला लेख मुळात पटला नाही. कारण पारंपारीक स्त्रीया देखील आधुनिक स्त्रीयांना कमी लेखणे, पाय ओढणे करत असतात. जे काही कमी लेखणे वगैरे असते ते एकतर्फी नसते. हे सगळे व्यवहार खूप गुंतागुंतीचे असतात.
समोरच्या स्त्रीचे प्रश्न समजून न घेता, मदतीचा हात पुढे न करता नुसतेच जज करणे होणार असेल तर त्या व्यक्तीला मी स्त्रीवादी नाही म्हणू शकत. बरेचदा मदतीचा हात पुढे केला तरी तो हातात घ्यायचे धाडस समोरच्या स्त्रीत नसते. तिचं सोसणं, तिची भीती मान्य करुन मी आहे सोबत हे वारंवार सांगत रहावे लागते.

Requesting B and B to take their judgemental (of each other of course ) discussions elsewhere, as this is not part of feminism discussions author seems to have in mind Wink

ह्या पलिकडे जेव्हा स्वतः लेखिका ते मुद्दे मांडेल तेव्हा जाऊ. जेव्हा लेखातच त्या "पलिकडे" काही नाहीये मग आपण पोस्ट करत्यांनी पलिकडे जाऊन काय उपयोग? >> जर मूळ लेख चुकीचा संदेश देतो आहे आशी धारणा असेल तर तो कसा चूकीचा आहे हे सांगण्यापलीकडे स्त्रीवादाशी संबंधित मुद्दे मांडायला नको असे म्हणताय का ?

>>स्वाती२,

दहापैकी एका काकूबाईला इतर कोठेही काकूबाई दिसली नाही (म्हणजे ग्रूपबाहेरही) आणि तिला बाय चॉईस (तथाकथित) काकूबाईच व्हायचे असले तर तिने ग्रूप कसा फॉर्म करावा?

नाही करता आला तर काय करावे?

करता आला तर आधीच्या ग्रूपला दूषणे जाहीररीत्या द्यावीत का?

दिली तर त्यावर व्यवस्थित विचारविनिमय होईल की वादावादी होईल?

दुसर्‍या ग्रूपमधील किंवा नव्या काकूबाई ग्रूपमधील स्त्रिया दुसर्‍यांचे म्हणणे विचारात घेतील की टीकेस पात्र आहे असा सोपा निर्णय करतील?

एवढे करून तथाकथित काकूबाई आणि तथाकथित आधुनिक स्त्रिया ह्या सगळ्या (रिस्पेक्टिव्हली) एकमेकींना पूर्णपणे मॅच होणार्‍या असतील का?>>

बेफी, तुमची ही पोस्ट आधी वाचली नव्हती. इतर कसे वागतील हे मी सांगू शकत नाही . मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून उत्तर द्यायचा प्रयत्न करते. दहाजणींच्या ग्रुपमधे एकीला बाकी नऊ जणींनी समजून न घेता फक्त सतावले असेल तर निव्वळ सहृदयता नाही म्हणून तो ग्रूप सोडणेच योग्य नाही का? काही काळ एकटे रहावे लागेलही. थोडे धीराने घ्यायचे. कालांतराने कुणीतरी समानधर्मी भेटते. किंवा अगदी समानधर्मी नाही भेटले तरी तुमचे वेगळेपण समजून घेणारे सहृदयी दुसरे कुणीतरी भेटते. मी काही काळ स्वतः अशी एकटी राहिलेय. आधीच्या ग्रुपमधे सह्रुदयीपणा नसल्याने तसाही तो ग्रूप त्रासदायक होता. कालांतरीने माझ्या मतांपेक्षा काही मते भीन्न असलेला पण एकमेकांच्या मतांचा आदर करायची तयारी असलेला दुसरा सहृदयी ग्रूप भेटला. मी काही काळ एकटी आणि काही काळ या ग्रूप बरोबर असायची. आधीच्या ग्रूपला दुषणे देण्यात मी वेळ घालवला नाही. आपले लाईफ चॉइसेस वेगळे आहेत म्हणून पुढे वाटचाल केली. काही काळाने मला माझ्या मतांसारखी मते असलेली अजून एक व्यक्ती भेटली. छोटासा ग्रुप झाला. दुसर्‍या सहृदयी ग्र्रूप मधेही मी जावून येवून असायचे. अजून काही काळ गेल्यावर आधीच्या त्रास दायक ग्रूप मधल्या काही व्यक्तींना जे अनुभव आले त्यामुळे त्यांना माझी मते अगदीच चूक नव्हती हे पटले. त्यांनी मला संपर्क करुन तसे सांगितले. मधल्या काळात दूषणे देणे वगैरे प्रकार मी केले नसल्याने, इट्स ओके म्हणून वाटचाल करणे त्यांनाही सोपे गेले नी मलाही.
१००% एकमत होइलच असे नाही पण ज्या गोष्टीत पटते त्यासाठी एकत्र काम केले एरवी एकमेकांच्या चॉइसेस आदर करुन वेगवेगळा काळ घालवला असा माझा अ‍ॅप्रोच असतो. काही वेळा कालांतराने, आलेल्या अनुभवाने माझे मत बदलले तर तसे कबुल करायला मला कमीपणा वाटत नाही.

स्वाती२, किती टाळ्या घेणार पोस्टींना? Happy

ही पोस्ट फक्त स्त्रीयांच्याच संदर्भात नाहीतर सतत दुसरे लोकं समजून घेत नाहीत, दुसरे लोकं सारखे कमी लेखतात, टारगेट करतात ह्या नावाची बोंब करतात त्या सगळ्यां करता इन्फॉर्मॅटिव ठरावी. ह्या आधी सुद्धा एकदा तो विषय आला होता नंदिनीच्या "इथे लक्ष द्या" बाफं वर तेव्हा हे लिहायची इच्छा होती पण नीट शब्द सापडले नाहीत. यु सम्ड इट अप वेल.
दर वेळेस एकाच गृपशी आपले सुर जुळायलाच हवे हा अट्टाहास आणि नाही जुळले की पुढे त्या गृपच्या लोकांच्या नावानी शंख करत राहणे ह्यात काही काही अर्थ नाही.

Pages