माणुसकीचा येता गहिवर

Submitted by कोकणस्थ on 19 December, 2014 - 21:29

माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार

युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार

ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार

काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार

समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार

शरीरात आजही काचा
शस्त्रक्रियांनी आजही बेजार
तुमच्या फुकाच्या गहिवराने
जखमा मनाच्याही नाही भरणार

चालवली बस आम्ही तेव्हा
कवितांमधुनीही दाखविले प्यार
सुरा खुपसला पाठीमध्ये
कारगिलचा तो आठवा वार

मग आले दहा नराधम
बरसल्या पुन्हा गोळ्या फार
लहानगे कोवळी जीवही होते ना
झेलत रक्तरंजित अत्याचार?

लहान, तरूण, वृद्ध, आणि महिला
क्षणात संपले इहलोकी अवतार
नाही दिसल्या मेणबत्त्या तेव्हा
पण वाटले पेढे कुंपणा पार

डोळे सातत्याने होती ओले
फुलतो रोमरोमात अंगार
आठवता ते अकाली मृत्यू अन्
अगणित झालेले बलात्कार

त्यांच्या शाळा त्यांचे शिक्षण
शिकवित नाहीत भारतप्यार
तयार होती तिथे निरंतर
सैनिक जिहादी करण्या अत्याचार

येतोच कसा तुम्हा उमाळा
विसरुन ते जहरी फुत्कार
माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार

आतापर्यंत सहन करित आलो
हाच संयम आणि हेच संस्कार
अस्थानी गहिवराच्या शब्दांचे भाले
आम्ही आता नाही झेलणार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणुसकीच्या नात्याने विचार केला तर लहान मुलांवर गोळ्या चालवणं हे केव्हाही निषेधार्हच आहे. परंतु त्याचं भांडवल पाकीस्तानने करावं हा सर्वात मोठा विनोद आहे. भारतभर पसरलेल्या दहशतवादाचा उगम ज्या देशातून होतो त्या देशाला आज दहशतवादाचा चेहरा किती भयानक असू शकतो हा धडा मिळाला आहे. अर्थात यातून पाकीस्तान काहीही धडा घेईल अशी अपेक्षा करणं व्यर्थच आहे.

बेफ़ी मी नुसते विचारले आहे निषेध म्हणजे नेक्की काय आणि कोणत्या गोष्टीचा.

खरे तर निषेध व्यक्त करणे म्हणजे सामान्य नागरीक म्हणुन आपण या परिस्थितीत काहीही करु शकत नसल्याची अगतिकता व्यक्त करणे या पलीकडे काहीच नाही.

पगारे, सुरेख सारख्यांनी आता मुक्ताफळे उधळणे थांबवावे अशी एक भारतीय म्हणून विनंती!>>>> पाकिस्तानात लहान मुलांची हत्या केली गेली त्याचा निषेध करणे हे तुमच्या मते मुक्ताफळ असेल तर आम्ही मुक्ताफळे उधळतो बेफिकीर. मला कुठल्याही धर्माशी काही घेणे देणे नसते. हि घटना कुठेही घडली असती तरी त्याचे वाईटच वाटले असते. धर्म सारख्या पोकळ गोष्टीमुळे हत्या होणे हे दुख:दायी आहे. वरती तुम्ही पाकिस्तानी नागरिकांचे स्ततेमेंट दिलेले आहे तीच त्यांची पातळी आहे. त्यांच्यातली माणुसकी संपली आहे नि उरलाय फक्त धर्मांधपणा. आता आपण त्यांच्या लेवेलला जावून त्या हत्याकांडाचे समर्थन करावे असे तुमचे म्हणणे आहे काय ?

सर्व (रॅशनल) प्रतिसादकांचे (समर्थनाबद्दल) आभार .

मिडीयाने निर्माण केलेल्या कृत्रीम भावनिक लाटेत आपली सारासार विचार करण्याची शक्ती गमावून त्या लाटेत वाहून न जाता तार्किकता व उच्च कोटिचा स्वार्थी राष्ट्रवाद उरी बाळगा, असे मी इतरांना सुचवेन.
धन्यवाद.

look who's talking
मिडियाच्या भावनिक आणि "कृत्रिम लाटेत" कोण वाहुन गेले आणि सारासार विचार करण्याची शक्ती गमावली आहे हे काही दिवसांपुर्वीच दिसुन आले आहे. त्याचे फळ आज भारत भोगत आहे.

दिदे,

>> मुल गेलीत तर दुसर्यांची जावीत तेव्हढेच शत्रु कमी होतात हे वाक्य गामा कंपुचेच आहेत.

तुम्ही माझ्या विधानाला अनावश्यक हेतू चिकटवत आहात. माझं विधान शोक करण्यासंबंधी होतं. मुलं ठार मारण्यासंबंधी नव्हे. आणि हो, ते शत्रू नसून संभाव्य शत्रू असं होतं. संभाव्य हा शब्द तुम्हाला दिसणार नाहीच म्हणा!

आ.न.,
-गा.पै.

बेफी,

त्या XXX ला काय सांगताय, काहीही फरक पडणार नाही,

चिखलातच लोळत असतो सदा न कदा !!

भारतातली मुल संभाव्य खुनी बलात्कारी देखील असु शकतात. मग त्यांच्याबद्दल काय म्हणणार आपण ?
दररोज भारतात बलात्कार खुन होतात ते काय बाहेरच्या देशातुन आलेले लोक करतात? भारतातलेच असतात ना?
कि तिथे देखील तुम्हाला "विशिष्ट लोक" दिसतात ?>

बेफी डुआयडीने लिहु नका Wink

दिदे,

>> भारतातली मुल संभाव्य खुनी बलात्कारी देखील असु शकतात. मग त्यांच्याबद्दल काय म्हणणार आपण ?

भारतातलीच मुले कशाला जगातले सगळे पुरूष संभाव्य बलात्कारी असू शकतात. जरा जाणीवा व्यापक करा की! जागतिक पातळीवर तुम्ही काय प्रयत्न करणार ते सांगा पाहू चटकन.

आ.न.,
-गा.पै.

okari.jpg

पाकिस्तानात सैनिकीशाळेत गोळीबार करुन दहशतवाद्यांनी निष्पाप कोवळे जीव क्षणार्धात ठार केले, त्या अश्राप जीवांचा काय दोष होता??
घडलेली घटना खरचं दुर्दैवी आहे, परंतु अशा घटनेचे समर्थन करणारी मानसिकता मायबोलीवर आहे याचे सखेद आश्चर्य वाटले.
@admin, कृपया मंदार जोशी उर्फ कोकणस्थ याच्या या आगलाव्या व हलकट प्रवृत्तीचे प्रदर्शन घडवणार्या कवितेला अप्रकाशीत करण्यात यावे अशी मी नम्र विनंती करतो.

धिका,

>> परंतु अशा घटनेचे समर्थन करणारी मानसिकता मायबोलीवर आहे याचे सखेद आश्चर्य वाटले.

बालकांच्या खुनाचे समर्थन कोणीही केलेले नाहीये. त्याबद्दल किती शोक करावा यासंबंधी मतप्रदर्शन चालले आहे. माझा (वा मायबोलीवरील कोणाचाही) या खुनाखुनीत सहभाग नाही व/वा भविष्यात घेण्याची इच्छाही नाही. केवळ शोक आणि निषेध एव्हढेच आपल्या हातात आहेत. Sad शोकप्रदर्शन यथोचित असावे इतकीच अपेक्षा आहे.

आ.न.,
-गा.पै.

कविता सोप्या भाषेत व self-explanatory अशीच आहे. मात्र उलटसुलट प्रतिक्रिया व वैय्यक्तिक हल्ल्यांचे धनी होऊ नये म्हणून काही लोकांनी इथे प्रतिसाद दिलेले नाहीत - अशाच पैकी काही लोकांनी व इतरांनीही "तू इथे काहीतरी भूमिका मांड" असा आग्रह मला केल्याने इथे लिहीत आहे:

(१) (अ) मी कवितेत कुठेही लहान मुलांच्या हत्येचे समर्थन केलेले नाही. किंवा तशी हत्या व्हावी असे म्हटलेलेही नाही.

(१) (ब) किंवा, उद्या आपल्या सैन्याने किंवा नागरिकांनी तिथे जाऊन अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य करावे किंवा आतापर्यंत झालेल्या कृत्यांचा अशाप्रकारे बदला घ्यावा असेही म्हटलेले नाही. तसे झाले किंवा होऊ घातले तर ते चूकच ठरेल. त्यामुळे बलात्काराला उत्तर म्हणून बलात्कार वगैरे जी काही आचरट उदाहरणे आली आहेत ती संपूर्णपणे अस्थानी आहेत.

(२) (अ) लहान मुले, मग ती कोणत्याही राष्ट्राची असो, अशा प्रकारे मेली म्हणून पहिलेछूट दु:खाची प्रतिक्रिया उमटणे व त्यांच्यासाठी कळवळणे हे नैसर्गिक आहे व माणुसकीला धरुन आहे. माझा आक्षेप या भावनिक प्रतिक्रियेच्या अतिरेकाला मात्र निश्चितपणे आहे. आपल्या घरातली व्यक्ती गेली तर दोन दिवसात माणूस ताळ्यावर येऊन कामाला लागतो. मात्र आज बघायला गेलं तर आठवडा झाला तरी सोशल मिडियावर जी रडारड चालू आहे ती पाहून माझे परदेशी पत्रमित्रही स्तिमित झाले आहेत. "रात्री झोप लागत नाही" काय, "जेवण जात नाही" काय, डिस्प्ले/प्रोफाईल पिक्चर काळे करणे काय, एक ना दोन असंख्य आचरटपणाचे नमूने दिसत आहेत.

(२) (ब) या घटनेच्या दोन-तीन दिवस नंतर ISIS च्या अतिरेक्यांशी लग्न करायला नकार दिला म्हणून त्यांनी १५० महिला व मुलींना ठार मारले, ही बातमी आजही कुणाच्या गावीच नाही. त्याबद्दल कुणालाही दु:खच नाही असे दिसत आहे. इराक व परिसरात अशा हत्या रोज होत आहेत, त्यात लहान कोवळी मुले देखील आहेत. येझदी नामक जमात आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पण मेणबत्त्या सोडा कुणाला पत्ताच नाही. याचे एक कारण म्हणजे आपल्याला रडारड करायला किंवा द्वेष करायला एखादं ग्लॅमरस कारण लागतं. हिटलर हे त्याचं अगदी ढळढळीत उदाहरण आहे. ज्युंच्या हत्या व द्वेष हे युरोपातल्या प्रत्येक देशात झालेले आहे, पण त्याबद्दल कुणीही फारसे लिहीताना व बोलताना दिसत नाही. तसे बोलणे गैरसोयीचे आहे हा भाग सोडा, पण शेवटी ग्लॅमराइज कोण तर हिटलरच झाला. लोकांना शिव्याशाप द्यायला एक ग्लॅमरस टार्गेट मिळाले. तर या बाबतीत बाकी सगळे विसरुन लोक पाकिस्तानात घडलेल्या गोष्टीवर गळे काढू लागले, तर ते असो.

(३) या रडारड करणार्‍या मंडळींनी भानावर आल्यावर मात्र काही गोष्टींचा विचार करणे भाग आहे.
(३) (अ) वर आणि बाहेरही काही चुकीची उदाहरणे आणि कारणमिमांसा देण्यात आली. एक ही की काही लोकांच्या उदाहरणावरुन तुम्ही संपूर्ण राष्ट्राची नियत जोखू शकत नाही. हे एरवी बरोबर असेल पण पाकिस्तानच्या बाबतीत हे साफ खोटे आहे. तिथे मूल जन्माला आल्याच्या दिवसापासून त्याला भारतद्वेषाचे डोस दिले जातात. शिवाय २६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्यांचे हॅन्डलर्स हे पाकिस्तानी सैन्यातले अधिकारीच होते. मग ही मुले मोठी होऊन अतिरेकी किंवा सैनिक नाही झाले, तरी त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निश्चितपणे नसते. तेव्हा गामा जे म्हणतात ते एक भारतीय नागरिक म्हणून मला तरी मान्य करणे किंवा सहमत होणे नाईलाजाने भाग पडते.

(३) (ब) स्वतःचे मूल गमावल्याच्या दु:खावेगात माणूस कधी कधी वाहवत जाऊन चार शब्द अधिक-उणे बोलतो हे मान्य. पण तुमचे लहानगे मूल गेलेले असताना अतिरेक्यांना शिव्याशाप देतानाही त्या अम्मी-अब्बांच्या डोस्क्यात "ही आपलीच मुले होती ना, अमेरिका किंवा भारतातली मुले तर नव्हती ना" अशा प्रकारचे शब्द जेव्हा येतात, तेव्हा हे उदाहरण (३) (अ) बरोबर किंवा वेगळे घेतल्यासही अपवादात्मक नव्हे तर प्रातिनिधिक ठरते. त्यामुळे या घटनेबाबत सुरवातीला निर्माण झालेले दु:ख व सहानुभूती नष्ट होते.

(४) वुडहाऊसचे ते लोकप्रिय वाक्य जिकडे तिकडे उधृत करुन people have started losing their knowledge of the difference between apples and oranges. संपुर्णपणे वेगळ्या परिस्थितीत, वेगळ्या शत्रूच्या संदर्भात घडलेल्या घटना आणि बोललेली गेलेली वाक्ये बाकी काहीही लक्षात न घेता या घटनेबाबत ते वाक्य फेकणे हे अधिकच वैतागवाणे आणि अप्रस्तुत आहे.

(५) या घटनेची तूलना २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याशी करणार्‍यांची कीव करावीशी वाटते. तो हल्ला एका शांतताप्रिय देशावर पाकिस्तानपुरस्कृत अतिरेक्यांनी केलेला हल्ला होता. तर पेशावरच्या शाळेत झालेला हल्ला हा पाकिस्ताननेच निर्माण केलेला भस्मासूर त्यांच्यावरच उलटलेला असल्याने असली तूलना संतापजनकच नव्हे तर आचरट आणि बालीशही आहे.

(६) (अ) मी काही फार मोठा कवी नाही. तात्पर्य हे की बाकी जे काही आहे, इतिहासाचे संदर्भ वगैरे, ते वर कवितेत आलेलेच आहेत. कवितेवर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या, त्या यायलाच हव्या होत्या. कारण काही का असेना, पण या निमित्ताने काही विचार केला लोकांनी हे ही नसे थोडके. कदाचित पुढे जाऊन काही बदल होईलही.

(६) (ब) असा बदल आधीच होऊ घातलेला आहे. कारण माझी ही कविता व्हॉट्सअ‍ॅप्प व फेसबुकवरुन सगळीकडे फिरत असल्याचे ती कविता मलाच पुन्हा आल्यावर समजले. नशीब माझे नाव त्यात होते म्हणून पाठवणार्‍याला समजले तरी. सांगायचा मुद्दा असा की ही कविता वाचल्यावर अनेकांनी मला "अरेच्या असा विचारही नव्हता केला, बरोबर वाटतंय तू लिहीलं आहेस ते" अशाही प्रतिक्रिया आल्या हेच या कवितेचे यश आहे.

वरची प्रतिक्रिया कुणाला काही पटावे म्हणून किंवा मतपरिवर्तन व्हावे म्हणून लिहीलेली नाही, तर निव्वळ काही गोष्टी स्पष्ट करायला लिहीलेली आहे.

कोकणस्थ,

एकमेकांत गुंतलेले मुद्दे मोकळे करून दिल्याबद्दल आभार! खुलासा वाचनीय आहे.

सकाळमध्ये एक कविता आलीये : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=QBEXW

आशयाने तुमच्या कवितेशी जुळत नाही. पण तिच्यात कृतीप्रवणता आहे म्हणून उद्धृत करतोय. शेवटी 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' हेच करावे लागेल.

आ.न.,
-गा.पै.

गामा, कवितेचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. अप्रतीम कविता. कवीचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
गामा व बेफिकीर, खुलासा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

Pages