माणुसकीचा येता गहिवर

Submitted by कोकणस्थ on 19 December, 2014 - 21:29

माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार

युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार

ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार

काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार

समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार

शरीरात आजही काचा
शस्त्रक्रियांनी आजही बेजार
तुमच्या फुकाच्या गहिवराने
जखमा मनाच्याही नाही भरणार

चालवली बस आम्ही तेव्हा
कवितांमधुनीही दाखविले प्यार
सुरा खुपसला पाठीमध्ये
कारगिलचा तो आठवा वार

मग आले दहा नराधम
बरसल्या पुन्हा गोळ्या फार
लहानगे कोवळी जीवही होते ना
झेलत रक्तरंजित अत्याचार?

लहान, तरूण, वृद्ध, आणि महिला
क्षणात संपले इहलोकी अवतार
नाही दिसल्या मेणबत्त्या तेव्हा
पण वाटले पेढे कुंपणा पार

डोळे सातत्याने होती ओले
फुलतो रोमरोमात अंगार
आठवता ते अकाली मृत्यू अन्
अगणित झालेले बलात्कार

त्यांच्या शाळा त्यांचे शिक्षण
शिकवित नाहीत भारतप्यार
तयार होती तिथे निरंतर
सैनिक जिहादी करण्या अत्याचार

येतोच कसा तुम्हा उमाळा
विसरुन ते जहरी फुत्कार
माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार

आतापर्यंत सहन करित आलो
हाच संयम आणि हेच संस्कार
अस्थानी गहिवराच्या शब्दांचे भाले
आम्ही आता नाही झेलणार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> साती | 26 December, 2014 - 23:55 नवीन

अय्या शांताबाई,
तू अजून माझी विपूतच ठाण मांडून बसलीयस का?
डोळा मारा
<<<

प्रशासकांच्या उथळ वागणुकीवर संतापून घेतलेला 'माबोलेखनसंन्यास' सोडल्याबद्दल अभिनंदन!

उथळ हा शब्द कुणाचा आहे?
तुमचा शब्दं माझ्या घशात घातलाय का?

लेखनसंन्यास बरिक सोडावा लागला , शांता आहेच बाई इतका खोडकर!
त्याला दिवसभरातून माझी इतक्यांदा आठवण झाली की मला बाई उचक्यांनी हैराण व्हायला झालं.

असो.
कोकणस्थांच्या गहिवरावर ही अवांतर चर्चा नको उगाच.

स्वयंसंपादीत व क्षमस्व

(सातींसारख्या सदस्याशी बोलताना टीकात्मक सूर लागल्याबद्दल क्षमस्व! क्षमस्व म्हंटल्याचा इतर कोणताही अर्थ घेऊन काही सदस्यांनी उधळू नये ह्यासाठी हे स्पष्टीकरण!)

>>>उथळ हा शब्द कुणाचा आहे?<<<

"जोपर्यंत अ‍ॅडमीन माबोचा टी आर पी वाढवण्यातच इन्टरेस्टेड आहेत आणि जोवर त्यांना खरोखर काहीही चांगले करायचे नाही तोवर माबोलेखनसंन्यास घेत आहे."

हे विधान कोणाचे?

टी आर पी साठी लढणार्‍यांना उथळ असा एक पर्यायी शब्द आहे.

म्हणून तुम्ही लिहिलेले सगळे टायपण्याऐवजी मी तो शब्द वापरला इतकेच!

असो!

वाद पुरेत. तुमच्यासारखे खणखणीत प्रतिसाददाते, प्रामाणिक सदस्य आणि महत्वाचे म्हणजे डॉक्टर असलेले आय डी कोणाला नको असणार साती? Happy

तुमचे इतर पाठीराखे जसे वाक्यावाक्याला औकाद गाठतात तसे तुमच्यासारख्या जुन्या आणि चांगल्या आय डी सोबत अजिबात करावेसे वाटत नाही.

हॅपी माबोईंग!

काय माहिती कसे, पण मला गहिवर किंवा उन्माळा नाही आला. फक्त वाईट वाटले अन डोळे ओलावले. कदाचित त्यांच्या इथल्या कारवायांमुळेही झाले असेल. पण मनस्थिती द्विधा झाली हे खरे.

माउली तेराव्या शतकात म्हणून गेल्या: दुरितांचे तिमिर जावो. पण वाटत नाही इतक्यात तिमिर जाइल. मी अजूनतरी आशा सोडलेली नाहीये.

Pages