माणुसकीचा येता गहिवर

Submitted by कोकणस्थ on 19 December, 2014 - 21:29

माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार

युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार

ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार

काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार

समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार

शरीरात आजही काचा
शस्त्रक्रियांनी आजही बेजार
तुमच्या फुकाच्या गहिवराने
जखमा मनाच्याही नाही भरणार

चालवली बस आम्ही तेव्हा
कवितांमधुनीही दाखविले प्यार
सुरा खुपसला पाठीमध्ये
कारगिलचा तो आठवा वार

मग आले दहा नराधम
बरसल्या पुन्हा गोळ्या फार
लहानगे कोवळी जीवही होते ना
झेलत रक्तरंजित अत्याचार?

लहान, तरूण, वृद्ध, आणि महिला
क्षणात संपले इहलोकी अवतार
नाही दिसल्या मेणबत्त्या तेव्हा
पण वाटले पेढे कुंपणा पार

डोळे सातत्याने होती ओले
फुलतो रोमरोमात अंगार
आठवता ते अकाली मृत्यू अन्
अगणित झालेले बलात्कार

त्यांच्या शाळा त्यांचे शिक्षण
शिकवित नाहीत भारतप्यार
तयार होती तिथे निरंतर
सैनिक जिहादी करण्या अत्याचार

येतोच कसा तुम्हा उमाळा
विसरुन ते जहरी फुत्कार
माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार

आतापर्यंत सहन करित आलो
हाच संयम आणि हेच संस्कार
अस्थानी गहिवराच्या शब्दांचे भाले
आम्ही आता नाही झेलणार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि मग काय करणार? खूप सिरीयसली विचारते आहे. त्या तस्लिमा नसरीनच्या कादंबरीतल्या नायकासारखा बदला घेणार का? की सैन्यात भरती होणार? सांगा खरंच. कळू द्या तरी! खूप वैताग आलाय! अति करणाऱ्यांचा! १४२ लोकं गेली त्यात ९०% लहान मुलं होती पण त्यावर दुखः व्यक्त केलं की सेक्युलर, देशद्रोही अशी लेबलं! तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांचं काही सोयरसुतक नाही असा ठपका! तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? स्टाईलचे सवाल! कंटाळा आला आहे मला ह्या सो कॉल्ड देशभक्तांचा!
पाकिस्तानचा विनाश होवो, हे मुसलमान आपल्या कर्माने मरतील, आपल्या आर्मीने सरळ युद्ध करून हा प्रश्न कायमचा निकाली लावावा, पाकिस्तान आर्मीवाल्यांनी स्वतःच त्या शाळेवर हल्ला करवला म्हणजे त्या निमित्ताने पुन्हा भारतात दहशदवादी कारवाया करता येतील अशा अ आणि अ conspiracy theories तावातावाने मांडायच्या आणि वर सईद हफीज जे बोलतो त्यावरून समस्त पाकिस्तानी लोकांची नियत ठरवायची (तुमच्या वक्तव्यावरून कोणी भारतीय लोकांची नियत ठरवली तर ती काय असेल याचा विचार न करता)!

मला मोदींच्या शाळेतून मुलांनी दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्याच्या आवाहनाचे फार कौतुक वाटले! त्यासाठी त्यांना खरोखर सलाम!

होय, मला पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याचे मनापासून दुखः झाले. पण माझे भारतावर मनापासून प्रेम आहे.आणि ह्या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी आहेत असे मला बिलकुल वाटत नाही. कारण मी सर्वात प्रथम एक माणूस आहे आणि मग भारतीय आहे. आणि दुसऱ्याच्या वेदनेशी सहवेदना बाळगण्याची शिकवण देणाऱ्या संस्कृतीमध्ये वाढले आहे. आणि घटना केवळ पाकिस्तान मध्ये घडली आहे म्हणून त्याबद्दल दुखः झाले याचा अर्थ मला भारतावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांबद्दल काहीही वाटत नाही ह्यामागे असलेले तर्कशास्त्र माझ्या आकलनाच्या पलीकडले आहे.

कोणत्याही "दुसऱ्याचा" सरसकट द्वेष करण्याआधी P.G. Wodehouse चे एक वाक्य आठवावे. दुसऱ्या महायुद्धात नाझींच्या छळाचा सामना करून देखिल जेव्हा नाझींविषयी काय वाटते ह्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले - I do not hate in plural. योग्य त्या लोकांचा निषेध/तिरस्कार/राग आहेच. पण सरसकटीकरण नाही.

ही पूर्ण प्रतिक्रिया अवांतर असेल पण हे कुठेतरी लिहायचंच होतं ते कविता वाचून बाहेर आलं.

As expected Wink

जिद्न्यासा, अगदी अगदी. मलाही असच वाटतं. माणुसकीच हरवून जातेय का कुठेतरी?
मंदार खरच एकदा सगळी कवचकुंडलं उतरवून शांतपणे विचार कर रे. नक्की कुठेतरी गफलत तर होत नाहीये ना? देश, धर्म सगळं नंतर. आधी माणुसपण हवं बघ. लहान मुलांशीही आपण भेदभावानेच जोडले जाणार का? नाही, नाहीच पटलं....

Only a grown up can think like what I have written.
We as a nation have lost our rational thinking.

Take a chance to bash me here.continue.

कारण मी सर्वात प्रथम एक माणूस आहे आणि मग भारतीय आहे. पण पाकिस्तानी लहान मूल सुद्धा आधी पाकिस्तानी आहे, नि त्याच्यात माणूस उरला आहे कि नाही हे समजणे अति अवघड झालेय

Rational thinking? This whole poem is rational? Okay! Nothing personal here..माझ्या सख्ख्या नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी ह्याच विषयावर आणि ह्याच मुद्द्यांवर मी माझी बाजू मांडली आहे. सुदैवाने कोणीही personally घेऊन दुखावले गेलेले नाही. अर्थात त्या घमासान चर्चेअंती कोणाचे मतपरिवर्तन देखिल झालेले नाही. So the disclaimer!

पेशावरमधल्या घटनेचे दुखः झालेल्या व्यक्तिंना पाकिस्तानधार्जिणे ठरवणाऱ्या rational व्यक्तिंना अमेरिकेत असलेल्या Apple company चा iphone चालतो, तिथली डॉलर देणारी नोकरी चालते, फेसबूक चालते, किंवा तिथेच सुरु झालेली मायबोली देखिल चालते. मग तेव्हा अणुचाचण्या केल्यावर अमेरिकेने भारताची कशी कोंडी केली, सतत पाकिस्तानला युद्धसामग्री पुरवली हे आठवत नाही, तसंच १५० वर्षे भारताला लुटणाऱ्या ब्रिटनमधली नोकरी चालते, क्रिकेट आवडतं! शिवाय made in China माल देखिल चालतो जरी त्या चीनने दोनदा भारताला युद्धात हरवलं, पाठीत खंजीर खुपसला वै.वै. पण त्यावेळी हे असं logic/rationale चालत नाही. मात्र, तुम्ही पाकिस्तानचा विषय काढा फक्त की हेच सगळे logic चे दिवे पेटायला लागतात. आमच्या सगळ्या जखमांवरचा एकमेव उपाय पाकिस्तानला नेस्तनाबूत करणं. त्या देशात अशांती आहे, अतिरेकी कारवाया चालतात म्हणून भारताला आपल्या सुरक्षेवर अमाप खर्च करावा लागतो आहे. जर ह्या क्रूर घटनेमुळे का होईना तिथल्या सुजाण जनतेला जाग आली तर भारताच्या सीमेवर कदाचित काही वर्षांनी शांतता नांदेल. जितका काळ पाकिस्तान मध्ये अराजक असेल तितका काळ भारतातदेखिल शांतता नांदणार नाही. हे rational व्यक्तिंना समजेल तो सुदिन! आणि पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नाहीसा करणे ही केवळ एक कविकल्पना आहे. ते नजीकच्या भविष्यात होणे शक्य वाटत नाही. आणि होऊ ही नये. त्याचे परिणाम अधिक भयंकर असतील.
आतातरी सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेला जाग यावी आणि तिथे सद्बुद्धी असलेल्या लोकांचे राज्य यावे अशी इच्छा करणे भारताच्या हिताचे आहे आणि हे माझ्यामते rational thinking आहे.

पाकिस्तानात घडलेल्या घटनेवर उचित ठिकाणी मनातील खरेखुरे दु:ख व्यक्त केल्यानंतर उरलेल्या भावनांच निचरा जर एखाद्याने अश्या प्रामाणिक ओळींच्या शृंखलेतून केला तर तेथे तरी निदान आपल्यातील 'ओरिजिनल माणूसपण' यायच्या क्षणभर आधी 'आपले राष्ट्रीयत्व' आणून बघायला काय हरकत आहे?

नेहमी माणूस, माणूस म्हणूनच जगण्याची पूजा मांडण्याच्या उत्साहात आपल्याकडील ज्या 'माणसांची' कत्तल केवळ एका पाशवी विचारांच्या लोकसमुहाकडून झाली, होते आहे, तिचे कधीच स्मरण करायचे नसते का?

एखाद्यावर 'राजकीय रंग लावणारा, धार्मिक पताका झळकवणारा' अशी टीका करून स्वतःमधील 'जाज्वल्य' (?) माणूसकी मिरवणार्‍यांना येथे घडलेल्या अतिरेकी कृत्यांच्यावेळीही फक्त निषेधच नोंदवताना पाहिलेले आहे. येथे ह्या माणसाने निदान जमेल तशी कविता तरी रचली आहे.

डीविनिता - >>>पण पाकिस्तानी लहान मूल सुद्धा आधी पाकिस्तानी आहे, नि त्याच्यात माणूस उरला आहे कि नाही हे समजणे अति अवघड झालेय<<< योग्य विधान!

बेफ़िकीर
<<नेहमी माणूस, माणूस म्हणूनच जगण्याची पूजा मांडण्याच्या उत्साहात आपल्याकडील ज्या 'माणसांची' कत्तल केवळ एका पाशवी विचारांच्या लोकसमुहाकडून झाली, होते आहे, तिचे कधीच स्मरण करायचे नसते का?>>

हे तुम्ही दबंग हिंदू नी जातियतेच्या नावावर द्लित हिंदूवर केलेल्या कत्तली बद्दल बोलत आहात ना?

बेफिकीर, मान्य आहे. मला देखिल कवितेवर काहीही टीका करायची नव्हती. पण कोकणस्थ यांनी आतंकवाद- जागतिक संकट ह्या धाग्यावर ह्या कवितेच्या पानाची लिंक दिली (ज्यावरून मी इथे आले). ती द्यायला नको होती. माणुसकी दाखवताना देखिल सात पिढ्यांचे हिशोब लावण्याचे rationale पचनी पडत नाहीये. हे अवांतर आहे हे पटतंय पण अति झालंय सगळंच आणि ती चिडचिड बाहेर आली Sad

>>>हे तुम्ही दबंग हिंदू नी जातियतेच्या नावावर द्लित हिंदूवर केलेल्या कत्तली बद्दल बोलत आहात ना?<<<

तुमच्याशी संवाद साधण्याची बौद्धिक कुवत माझ्याजवळ नसल्याने मी कालपासून तुमच्या ह्या मताचा अनुल्लेख करण्याचा जोरकस प्रयत्न करत आहे. पण आता अगदी नाव घेऊन मला जाब विचारत आहात म्हणून सांगतो.

हिंदू हे नावच कोणत्याही पौराणिक ग्रंथात नाही हे तुम्हीच त्या दिवशी तिकडे लिहीत होतात ना? मग आता हे दबंग हिंदू आणि दलित हिंदू कुठून आले? हिंदू हा धर्मच नाही, ती एक विचारसरणी आहे असे काहीतरी तुमचे आणि काहींचे म्हणणे आहे ना? मग इथे प्रतिसादात हिंदू हा शब्द का वापरला आहे? आणि मुख्य म्हणजे, राष्ट्रीयत्वाशी संबंधीत असलेल्या ह्या कवितेच्या खाली प्रथम हिंदू धर्माचा उल्लेख कोणी आणला आहे? तुम्ही की कोकणस्थांनी? कवितेत हिंदू शब्द दिसत आहे का? माझ्या प्रतिसादात दिसत आहे का? मग येथे हिंदू हा शब्द आणून वाद निर्माण करण्याची खुमखुमी कोणात आहे हे सिद्ध होत आहे?

तेव्हा कृपया मला उद्देशून ह्यापुढे प्रतिसाद लिहू नयेत. तुमच्याइतके माझे चौफेर वाचन, चौफेर पर्यटन आणि चौफेर बहुरुपीत्व नाही.

जाईन त्या ठिकाणी मी बाळबोध ठरतो
चौफेर ह्या जगाचे वाचन असेल बहुधा

-'बेफिकीर'!

>>>ह्या धाग्यावर ह्या कवितेच्या पानाची लिंक दिली (ज्यावरून मी इथे आले). ती द्यायला नको होती.<<<

ह्याच्याशी मात्र सहमत आहे.

हिंदू शब्द तुम्हाला कळण्यासाठी वापरला आहे.साध्या प्रशाच उत्तर द्यायच सोडुन भलतिच पोस्ट लिहलिय.

कविता आवडली.

नामदेव ढसाळ ह्यांनीही अशाच त्वेषाने 'माणूस' हि कविता लिहिली होती ती आठवली.माणूस हि कविता जिज्ञासूंनी नक्की वाचावी ह्याच अर्थाची आहे फक्त संदर्भ नि अत्याचारी बदलतात.

आत्ता पाकिस्तानी नागरिकांचे स्टेटमेंट आले.

आमच्या मुलांना का मारले? हिंदुस्तानी मुले मारली असती तर काहीतरी अर्थ होता.

एन डी टी व्ही वर दाखवत आहेत.

येथील काही जणांना आता आय सी यू मध्येही दाखल करून घेता येणार नाही अशी वेळ आलेली आहे.

पाकिस्तानी जनतेचा त्रिवार निषेध!

Angry

लोकहो,

आता तरी धारण केलेले मानवतेचे बुरखे स्वतःचे स्वतः फाडा! जरा धडपणे वागा आता तरी!

किळस आली.

पगारे, सुरेख सारख्यांनी आता मुक्ताफळे उधळणे थांबवावे अशी एक भारतीय म्हणून विनंती!

त्यांच्या कळपानेही आता जरा दुरुस्त पटरीवर येऊन मोदीद्वेष, भाजपद्वेष, हिंदूद्वेष वगैरे नेहमीची यशस्वी ठरणारी अस्त्रे त्यागून डोळसपणे ह्या घटनेकडे पाहावे असे आवाहन!

बेफी किळस खरतर या मानसिकतेची यायला हवी आणि तुम्ही याच मानसिकतेचे समर्थन करत आहे
द्वेष तुमच्याच मनात ठासुन भरलेला आहे दुसर्यांना काय सांगत आहेत

>>> दिवाकर देशमुख | 20 December, 2014 - 10:59 नवीन

पाकिस्तानात देखील गामासारख्या मानसिकतेचे लोक आहेत हे दिसुन आले.

निषेध
<<<

हे विधान तर वाचकाला स्वतःलाच आपण अश्या माणसांमध्ये जन्माला आलो ह्याची शरम वाटावी असे आहे.

दहशदवादाचा निषेध म्हणजे नक्की काय? दहशदवादी म्हणजे काय ४ वेडी माणसे आहेत ज्यांनी हे कृत्य केले आणि लोअकांनी निषेध केला म्हणुन त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होणार आहे. जगात कुठलाही दहशदवाद बघितला तरी त्याला बर्‍याच बाजु आहेत.

पेशावर मधिल घटना घेतली तरी ती अचानक घडलेली घटना नाही किंवा वेडाच्या भरात घडलेले काम नाही. याच्या मागे

त्या देशाची आणि शेजारच्या देशाची राजिय आणि आर्थिक स्थिति

जागतिक राज कारण,
त्या देशाचे परराष्ट्रीय धोरण
त्या देशाच्या लष्कराचे घोरण
त्या देशातिल संघटीत क्राईम सिन्डिकेट , त्या भागातुन होणारा मादक पदर्थांची तस्करि त्यातुन मिळणारा पैसा आणि त्यात गुंतलेले वेगवेगळ्या स्तरावरिल राजकिय आणि आर्थिक हित सम्ब्ध आणि इतर अनेक गोष्टी आहेत.

कृतीचा निषेध करतो तेव्हा अपोआपच या सगळ्या गोष्टीं चा निषेच होतोच नुसत्या तात्कालिक कृतीचा निषेध होउ शकत नाही.

फ़रक एवढाच आहे यातल्या कोणत्या गोष्टीवर कोणाला जास्त भर द्यावासा वाटतो.

दिवाकर देशमुख,

अड्ड्यावर स्वतःची पातळी दाखवण्यात धन्यता मानता तेवढे कृपया पुरे आहे. सर्वत्र विहार करून विष पसरवू नका. पाकिस्तानी नागरिकांमधील जहाल जहर बघायला मिळत आहे. तेच खूप झाले आजच्यासाठी! आपल्यांच्या मनातले त्याहून जहाल जहर बघण्याची कुवत राहिलेली नाही आता.

कृपया, ह्यापुढे मला उद्देशून केलेल्या प्रतिसादांचा आजवर करत आलो तसाच अनुल्लेख करेन हे लक्षात ठेवावेत. कितीही गलिच्छ भाषेत उचकवण्याचा प्रयत्न केलात तरीही!

आभार!

अहो युरो,

वरचे पाक नागरिकांचे स्टेटमेंट वाचलेत का?

की दुर्लक्ष केलेत?

मुल गेलीत तर दुसर्यांची जावीत तेव्हढेच शत्रु कमी होतात हे वाक्य गामा कंपुचेच आहेत. आता दुसर्‍याबाजुने तशीच वाक्य आलीत तर तुम्हाला निषेध नोंदवत आहेत ?

तुमची पातळी किती आहे हे दिसुन आले आहे बेफी
मुखवटा फाडला आहे
आनि हो शांतारामच्या डुआयडी वापरुन अड्ड्यावर येउ नका.

Pages