Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी मिडल ऑर्डरला एकच जागा
असामी मिडल ऑर्डरला एकच जागा नसते. क्रमांक ४ आणि ५ या दोन जागा आपण हव्या तश्या धोनी आणि पांडे वा आणखी कोणी यात फिरवू शकतो.
तसेच क्रमांक ६ साठीही धोनी अगदीच अनफिट नाही झालाय. किंबहुना तुम्हाला त्या क्रमांकावर त्याची जागा घेणारा फिनिशर मिळेपर्यंत तर हे बोलायलाच नको. सध्या त्याने पुढे येत ती जागा खाली केलीय असे समजा. तर केदार जाधव वा पांड्या वगैरेंनी ती भुमिका सक्षमपणे पेलून दाखवावी. अन्यथा वय वाढलेला धोनीही त्या भुमिकेत त्यांच्यापेक्षा सरस वाटू लागायचा. कारण फिटनेस आणि धडाकेबाज फटके तर तुम्ही आणाल. पण ते चेसिंगचे प्रेशर झेलायचे आणि पेलायचे कसब कुठून आणाल
. क्रमांक ४ आणि ५ या दोन जागा
. क्रमांक ४ आणि ५ या दोन जागा आपण हव्या तश्या धोनी आणि पांडे वा आणखी कोणी यात फिरवू शकतो. >> हि चर्चा झालेली तेंव्हा धवन ओपन करायचा नि रहाणे होता मिडल ऑर्डर मधे आधीच. तीन जण नि दोन जागा.
"तसेच क्रमांक ६ साठीही धोनी अगदीच अनफिट नाही झालाय. " .धोनी स्वतः ति जबाबदारी स्वतःपासून इतरांना handover करायला बघतोय हे तुझ्या लक्षात येतेय का ?. तिथे पांड्या कि पांडे कि रैना कि केदार जाधव कि अजून कोणी ह्याचे उत्तर लगेच मिळणार नाही. पांडे सारखा तरूण, जास्त full fledged player जो सगळे फटके खेळू शकतो, mentally strong, domestic cricket च्या rigor मधून सुलाखून निघालेल्या खेळाडूला तिथे ग्रूम करणे मस्त ठरेल असे माझे वैयक्तिक मत आहे.
धोनी स्वतः ति जबाबदारी
धोनी स्वतः ति जबाबदारी स्वतःपासून इतरांना handover करायला बघतोय हे तुझ्या लक्षात येतेय का ?
>>>
हा त्याचा दूरद्रूष्टीपणा आणि पर्यायाने मोठेपणा झाला.
हि चर्चा झालेली तेंव्हा धवन ओपन करायचा नि रहाणे होता मिडल ऑर्डर मधे
>>>>>
रहाणेला अजून एकदिवसीयमधील जागा फिक्स करायची आहे. त्याच्या कसोटी क्लासबद्दल जराही शंका नाही. माझ्याच ईथे कौतुकाच्या कित्येक पोस्ट सापडतील. मात्र एकदिवसीय मध्ये रहाणे अजून तसाच आहे जसे कसोटीमध्ये रोहीत शर्मा.
"हा त्याचा दूरद्रूष्टीपणा आणि
"हा त्याचा दूरद्रूष्टीपणा आणि पर्यायाने मोठेपणा झाला." - वयाचा मोठेपणा? आणी दूरदृष्टी की निरूपाय?
हा त्याचा दूरद्रूष्टीपणा आणि
हा त्याचा दूरद्रूष्टीपणा आणि पर्यायाने मोठेपणा झाला. >> चर्चेचा विषय तो नव्हता नि नाहि आहे हे लक्षात घे प्रामाणिकपणे तो दूरद्रूष्टीपणा किंवा मोठेपणा नसून खेळाच्या, स्वतःच्या बदलत्या क्षमतेची नि बॉडीची जाणीव नि ते ओपनली मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आहे असे माझे मत आहे.
रहाणेला अजून एकदिवसीयमधील जागा फिक्स करायची आहे. >> आपण भूतकाळात झालेल्या चर्चेबद्दल बोलत होतो जेंव्हा राहाणे IPL form वरून एक आशा होती. तुझ्या-माझ्याकडे crystal ball नव्हता राहाणे कसा खेळेल नि कुठे जाईल हे गेस करायला.
फॉर्म येत जात राहतो. क्लास
फॉर्म येत जात राहतो. क्लास पर्मनंट असतो. पण शैली बदलणे शक्य असले तरी तितकेसे सोपे नसते. रहाणेला मी त्यावरून जोखत आहे. तुर्तास एकदिवशीयमध्ये यशस्वी व्हायला त्याची फलंदाजीची शैली पूरक नाहीये. आयपीएलमध्येही एका विशिष्ठ भूमिकेत तो फिट बसतो, तसेच टीम कॉम्बिनेशन असले तर. भारतीय संघात त्या भुमिकेची गरज नसल्याने तिथे तो सध्या तरी फीट नाहीये. मग ते २०-२० असो वा ५०-५० .. इम्प्रूव्हमेंट आणि इम्प्रोव्हाईज करेल तर ते आवडेलच मला. माझ्याही आवडीचा प्लेअर आहे. खेळला तर हायलाईटस मध्ये काही कडक शॉट बघायला मिळतात
अरे, मी म्हणालो "राहाणे IPL
अरे, मी म्हणालो "राहाणे IPL form वरून एक आशा होती."
त्या नंतर तू म्हणतोयस "फॉर्म येत जात राहतो. क्लास पर्मनंट असतो." नि पुढे मग हे शेपूट "पण शैली बदलणे शक्य असले तरी तितकेसे सोपे नसते. रहाणेला मी त्यावरून जोखत आहे." इथे क्लास नि शैलीचा काय संबंध आहे एकमेकांशी ? राहाणे संघात मिडल ऑर्डर मधे असण्याचा मुद्दा जेंव्हा आला होता तेंव्हा तू फॉर्म, शैली नि क्लास ह्यातल्या कुठल्याही मुद्द्यावरून त्याला विरोध केला नव्हतास हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो.
IPL मधे राहाणे एका विशिष्ट भूमिकेत बसतो नि त्याला तीच भूमिका करायची आहे तिथे. त्याच्याकडून कोणी किपिंग किंवा बॉलिंग करण्याची अपेक्षा करत नाहिये नि तीच अपेक्षा ODI मधे त्याच्याकडून केली जात आहे. रोहित ला सेट होऊन फटके मारायला वेळ लागतो जेंव्हा राहाणे ने हार्ड बॉल बॅटवर येत असताना, fielding restrictions असताना score board हलता ठेवणे हि एव्हढीची सध्याची अपेक्षा आहे.
जाता जाता : "फॉर्म येत जात राहतो. क्लास पर्मनंट असतो." हे शास्त्री नि गावस्करचे पेटंट वाक्य आहे ज्याला उत्तर हे फक्त टाळ्याखाऊ वाक्य आहे असे देता येईल. निव्वळ क्लास वर कोणी कोणाला संघात कायमचे (पर्मनंट) उभे करत नाही. डीन जोन्स सारखा खेळाडू जो क्लास च्या आसपास सुद्धा नव्हता संघात असे नि किम ह्ञुजेस सारखा क्लासी पण दीर्घ काळ फॉर्म गमावलेला खेळाडू संघाबाहेर होता. वॉर्नरचे उदाहरण घे. अजीबात क्लासी नसूनही फॉर्मच्या जोरावर संघात जागा टिकून आहे.
फॉर्म येत जात राहतो. क्लास
फॉर्म येत जात राहतो. क्लास पर्मनंट असतो. >>.
हे वाक्य ९०ज च्या क्रिकेटर्ससाठी होते. २०१६ मध्ये बेंच खूप मोठा असल्यामुळे फॉर्म मध्ये रहाणे ( पन इंटेडेड) च आवश्यक आहे.
अगदी वाक्यात उपयोग हवा असेल तर ..
रोहितमध्ये क्लास आहे, पण कसोटी खेळायचा फॉर्म नाही, त्यामुळे तिथे तो चालत नाही.
अन्यथा युवराज कधीच बाहेर गेला नसता. वा धोणीला टेस्ट क्रिकेट सोडावे लागले नसते. वा .. .. असो !
धोनीने केलेला रन आऊट कसला
धोनीने केलेला रन आऊट कसला जबरदस्त होता. बॉल येण्याआधी त्याने किंचितसे मागे स्टंप कुठे आहेत ते पाहिलेले. अफलातून.
पण त्याने असे थ्रो मागेही
पण त्याने असे थ्रो मागेही केलेले आठवतात. इनफॅक्ट बरेचदा. आणि एकदा आउटही झालं आहे कुणीतरी. मॅच आठवत नाहीये ती.
बेसिकली राहुल / सचिनला जसा ऑफस्टम्प कुठे आहे हे झोपतही कळतं, तसंच धोणीला सहाही स्टम्प्स कुठे आहेत हे कळतं, म्हणूनच तो जबरदस्त किपर आहे. किपिगं मधलं तारतम्य पाहायचं तर भारत पाक टि २० मध्ये, जेंव्हा धोणी बरोबर स्टम्प मागे आणि पाकचा किपर ४थ स्टम्पच्या मागे. कुडोज टू हीम.
नाहि केदार मागचा थ्रो over
नाहि केदार मागचा थ्रो over handed होता, हा backward flick केलेला होता. स्टंप्स त्याच्या blind spot मधे आहेत त्यामूळे त्याला जबरदस्त जजमेंट ठेवावी लागली असणार. फूटबॉल खेळल्याचा परीणाम असेल का हा ?
<< स्टंप्स त्याच्या blind
<< स्टंप्स त्याच्या blind spot मधे आहेत त्यामूळे त्याला जबरदस्त जजमेंट ठेवावी लागली असणार. फूटबॉल खेळल्याचा परीणाम असेल का हा ? >> 'लिजंड' वर्गातल्या खेळाडूंबाबत करिअरच्या शेवटच्या कालखंडात टीकेचा वार पाठीमागूनही होवूं शकतो या सततच्या जाणीवेने त्या blind spotबद्दल हा sixth sense विकसित होतच असावा !!
मालिका जिंकून इतिहास घडवण्याचं व कसोटी मालिकेतल्या पराभवाचं उट्टं काढायचं स्वप्न टेलरच्या आजच्या विधानातून डोकावतंय. धोनीसाठी मालिका जिंकणं याला खास महत्व आहेच. शनिवारचा निर्णायक सामना चुरशीचा होणार , हें निश्चित.
दिवाळी पहाटा साजरी झाली. मस्त
दिवाळी पहाटा साजरी झाली. मस्त जिंकली ईंडिया. सगळ्यांना भारताच्या यशाच्या आणी दिवाळी च्या शुभेच्छा!!
अभिनंदन, धोनी अँड कंपनी ~ <<
अभिनंदन, धोनी अँड कंपनी ~
<< शनिवारचा निर्णायक सामना चुरशीचा होणार , हें निश्चित. >> न्यूझीलंडने हा आनंद मात्र दिला नाहीं !
भाऊ मिश्राने त्याची उपयुक्तता
भाऊ मिश्राने त्याची उपयुक्तता सिद्ध केली ह्याचा आनंद माना कि जाडेजा नि अश्व्नि परत आल्यावर दोन कि तीन स्पिनर नि नक्की ओणते ह्याबद्दल खरच धमाल असणार आहे. Problem of plenty !
<< भाऊ मिश्राने त्याची
<< भाऊ मिश्राने त्याची उपयुक्तता सिद्ध केली ह्याचा आनंद माना कि >> असामीजी, अगदीं जगजेत्ता संघ असला तरीही त्यांत लेग-स्पीनर नसेल तर तो मला अस्सल भारतीय संघ वाटतच नाही, ही माझी धारणा आहे व त्याबद्दल इथं व इतरत्र माझं भरपूर हंसंही झालेलं व होतही आहे . अश्विनच्या जोडीला लेग-स्पीनर आला तर मला आनंद होईल, हें मीं सांगण्याची गरजच नाहीं !! इतरांकडून हें ऐकण्यातच मला आनंद आहे !!
पुढची चर्चा आता
पुढची चर्चा आता http://www.maayboli.com/node/60723 येथे करता येईल.
Pages