क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, स्टेनबद्दल मीही हेच लिहिणार होतो, पण कंटाळा केला. २-२ मॅचेसच्या तर सिरीज होत्या, त्यामुळे कदाचित पर्सेप्शनही असे खूप विकेट्स घेण्याचे झाले नाहीये.

इंग्लंडने ४०० केल्या, हे तर अधिकच उल्लेखनीय, गिव्हन हाऊ दे 'वेअर' सपोझ्ड टू बी इन लिमिटेड ओव्हर्स.

सध्यां सुरूं असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीवर माबोचा बहिष्कार आहे का ?

नाही बुवा, बघतो आहोत स्पिनविरुद्ध न्यूझीलंडच्या बॅट्समेनची लढाई. मस्त चालू आहे खेळ.

भाऊ, बरं झालं हा धागा वर काढला. मला पण तीच शंका आली होती आणी ह्या धाग्याच्या शोधात निघालो होतो. पहिले २ दिवस तरी भारतासाठी डिप्रेस्ड गेले आहेत असं स्कोअरबोर्ड बघून वाटतय. प्रत्यक्षदर्शींचं काय मत आहे?

हायलाईट्स बघताना जाणवलं की विल्यमसन चं फूटवर्क आणी लॅथम चे स्वीप्स मुबलक प्रमाणात होते.

ही जोडी फुटली पाहीजे. खाली राँकी / राँची आणी टेलर चा अपवाद वगळता फार कुणी नाहीये आणी हे दोघं सुद्धा बर्यापैकी हीट अँड मिस आहेत.

<< प्रत्यक्षदर्शींचं काय मत आहे? >> माझं मत -
१] न्यूझीलंडचे फलंदाज आपल्या फलंदाजांपेक्षां फिरकी अजूनपर्यंत तरी अधिक चांगल्या पद्धतिने खेळले;
२] पाहुण्यानी तेज व फिरकी गोलंदाजीची अधिक प्रभावीपणे अदलाबदल केली;
३] विकेट अधिकाधीक फिरकीला साथ देईल तस तसे आपले फिरकी गोलंदाज अधिकाधीक प्रभावी ठरतील व पाहुण्यांचं शेवटच्या डावांत खेळण्याचं टेन्शन वाढत जाईल; व
४] आपले फलंदाज मर्यादित सामन्यांच्या मानसिकतेतून अजून पूर्णपणे बाहेर आलेले नाहीत, हें जाणवतं. आपला ३१८ स्कोअर तरीही ह्या विकेटवर फार वाईट म्हणतां येणार नाही.

आज ४ विकेट गमावून भारताने पहिल्या सत्रापर्यंत ३०८ धावांची एकंदर आघाडी घेतलीय. आपले फलंदाज आतां कसोटी क्रिकेटच्या 'मूड'मधे आले आहेत. विकेट आतां फिरकीलाच भुकेलेली आहे. पावसाची लहर [ किंवा क्रिकेटची 'ग्लोरिअस अनसर्टनटी' ] मधे आली नाही तर निकाज जवळ जवळ निश्चित आहे.
मला क्रेगची 'ऑफ-स्पीन' गोलंदाजी खूप आवडली. 'फ्लाईट'चा सफाईदारपणे फारच छान उपयोग करणारा तो दुर्मिळ शैलीदार 'ऑफ-स्पीन' गोलंदाज वाटला.
संघ निवडीत कदाचित वाव नसला तरीही फिरकीला साथ देणार्‍या विकेटवर खेळणार्‍या भारतीय संघांत पारंपारिक लेग-स्पीनर नसावा , हें खटकतंच !

<< ह्यावेळी आपली सगळी दाढीधारी टीम का!!?? >> 'जिलेट मार्क-३'ने मालिकेची स्पॉन्सरशिप घ्यावी म्हणून ! Wink

भाउ, एक व्यंगचित्र काढायला छान विषय आहे, एक का, दोन तीन, जेव्हढी कलपनाशक्ति लढवाल तेव्हढी चित्रे.
तर होऊन जाउ द्यात दोन चार तरी.

हायलाइट्स पाहिले. त्यात विजय आणि पुजारा चांगले खेळत होते. राहुल मात्र अजून आयपीएल मोड मधे असल्यासारखे पहिल्यापासून इम्प्रॉव्ह शॉटस मारायचा प्रयत्न करत होता. असे खेळून भारतात थोडेफार यशस्वी झालेले पण बाहेर सपशेल फेल गेलेले अनेक खेळाडू गेल्या काही दशकांत होते. त्यांच्याकडून जरा धडा घे म्हणावं Happy

रहाणेने दुसर्‍या डावाट ४० धावा केल्या, पण अपेक्षेपेक्षा मधली फळी - रहाणे, कोहली केवळ पूर्वप्रसिद्धीवर खेळताहेत.

<< एक व्यंगचित्र काढायला छान विषय आहे, >> मलाही निमित्तच लागतं त्यासाठी -

अगदींच गयावया करत होते म्हणून घेतली त्यांची फिरकी. म्हटलं, ' ठीक आहे . पीचवर जराही गवत नाहीं ठेवणार जर तुम्ही सगळे थोबाडावरचं गवत तसंच ठेवलत तर ! पण झाले त्यालाही तयार !!Curetor2.JPG

चला, कसोटीच्या दुसर्‍या दिवसापासून [ किंबहुना, टॉस पासूनच ]अपेक्षित असलेलाच निकाल लागला ! अभिनंदन.
प्रत्येक देश आपल्याला सोईसस्कर अशाच विकेट बनवते या युक्तिवादाने एकतर्फी सामन्यांमुळे होणारी निराशा कांहीं मावळत नाहीं.
अतिशय कठीण असं यष्टीरक्षणाचं काम साहाने यशस्वीपणे हाताळलं, हें कौतुकास्पद.
पाहुण्यानी सकारात्मक भूमिका घेवून अत्यंत कठीण परिस्थितीत जी फलंदाजी केली, ती या कसोटीचा विशेष लक्षात रहाणारा भाग असावा.
अशा विकेटसवर खेळापेक्षां 'टॉस'ला खूपच प्रमाणाबाहेर महत्व येतं, हाही एक दुष्परिणाम.

भाऊ, Lol

प्रत्येक देश आपल्याला सोईसस्कर अशाच विकेट बनवते>>>

जर आम्हाला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आफ्रिकेत उसळत्या खळपट्ट्यांना कायम सामोरे जावे लागते तर आम्ही का नाही पाहुण्यांचे स्वागत फिरकी खेळपट्टीने करावे? आणि प्र्त्येक जण आपल्या बलस्थांनांच वाव देणार हे साहजिक आहे!

आणि तसेही खेळपट्टी फिरकीला अनुकुल म्हणजे अगदी आखाडा नव्हता झालेला.. काल ज्या पद्धतीने जडेजा / शर्मा खेळले ते पहाता...

<< तर आम्ही का नाही पाहुण्यांचे स्वागत फिरकी खेळपट्टीने करावे? >> माझा मुद्दा तो नसून, << या युक्तिवादाने एकतर्फी सामन्यांमुळे होणारी निराशा कांहीं मावळत नाहीं.>> हा आहे ! << फिरकीला अनुकुल म्हणजे अगदी आखाडा नव्हता झालेला >> नसेलही झालेला पण पाहुण्या संघाने भारताच्या पहिल्याच डावात दुसर्‍या नव्या चेंडूचं पहिलंच षटक फिरकी गोलंदाजाला देण्याइतपत तरी खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनच फिरकीला अनुकूल होतीच ना ?

पण हा सामना एकतर्फी झाला, असे बहुसंख्य लोकांना वाटते काय?! मला तरी तसे वाटत नाही. भारत आणि न्यूझीलंड दोघांनी सेशन्स जिंकलेले आहेत. भारताने ते जास्त कंसिस्टंटली, आणि जेव्हा जिंकले तेव्हा खूप मोठ्या फरकाने, जिंकले हा फरक आहे.

भाचा +१. भारताने अधिक सेशन्स जिंकली हा कळीचा मुद्दा आहे. दोन्ही डावांमधे लोअर ऑर्डरने अपेक्षेपेक्षा अधिक चांगला खेळ केला. पुढचे सामने अनिर्णित राहतील असे वाटते.

<< पण हा सामना एकतर्फी झाला, असे बहुसंख्य लोकांना वाटते काय?! >> भारताला पहिल्या डावात ३१८वर रोखूनही ह्या पीचवर शेवटचा डाव आपल्याला फलंदाजी करावी लागणार आहे, याचं दडपण न्यूझीलंडवर असल्याचं सतत जाणवत होत. मागच्या द. आफ्रिकेच्या इथल्या दौर्‍यापेक्षां न्यूझीलंडने हें दडपण बर्‍याच सकारात्मक वृत्तीने हाताळलं, हें खरं असलं तरीही त्याना हा निकाल अपरिहार्यच वाटत होता असं मला वाटतं. सामन्यावरच्या ह्या सावटामुळे न्यूझीलंड कांही सेशन्समधे सरस वाटली तरीही एकंदर सामना एकतर्फीच होता असं अजूनही मला प्रामाणिकपणे वाटतं.

"टेस्ट क्रिकेट मधे फक्त बॉलर्स च्या स्ट्राईक रेट विषयी चर्चा होते" - अनिल कुंबळे ची पुजारा च्या स्ट्राईक रेट विषयी टीप्पणी. Happy

पुजाराला वगळलं होतं तेंव्हांही आणि आतां सुद्धां मला हेंच वाटतं कीं पुजारा हा 'लंबे दौडका घोडा' आहे व त्याला नाउमेद न करतां प्रोत्साहन देणंच भारतीय क्रिकेटच्या हिताचं आहे.

भाऊ अनुमोदन ! लिमिटेड ओव्हर खेळत नसल्यामूळे तो खरच 'लंबे दौडका घोडा' असणार आहे हे लोकांच्या जितक्या लवकर लक्षात येईल तितके बरे.

Pages