१२ आवळे, १ चमचा मोहोरी, २ चमचे मोहोरी डाळ, पाव चमचा मेथ्या पावडर, चिमूटभर हळद, मीठ, १ चमचा साखर, अर्धी वाटी पाणी, तेल, अर्धा चमचा हिंग.
आधीची थंडीतली लोणची
http://www.maayboli.com/node/31214
http://www.maayboli.com/node/31215
http://www.maayboli.com/node/31216
आवळे धुवून कुकरमध्ये डायरेक्ट अर्धी वाटी पाण्यात शिजवून घ्या. मात्र १ शिट्टी झाली की गॅस बंद करा. आवळे अगदी मेण होणे अपेक्षित नाही. उलट किंचित कच्चट चांगले लागतात.
झाकण पडल्यावर आवळे कुकरमधून काढावेत. त्यातले पाणी नीट बाजूला ठेवावे. आवळ्यातल्या बीया काढूल्यावर त्याच्या आपोआपच फाकळ्या (फोडी) होतील. आता आवळे ज्या पाण्यात शिजवले त्याच पाण्यात आपल्याला १ चमचा मोहोरी फेसून घ्यायची आहे. त्यासाठी कोरड्या मिक्सरमधून आधी मोहोरी थोडी वाटा. नंतर त्याच्यातच हे पाणी घालून परत मिक्सरमधे फिरवा. झाकण काढल्यावर नाकाला झिणझिण्या आल्या पाहिजेत. म्हणजेच मोहोरी चांगली चढली पाहिजे.
त्या नाही आल्या(...त्या म्हणजे झिणझिण्या हो....:फिदी:) तर परत फिरवा.
नंतर आवळ्याच्या फोडींवर हे मिश्रण ओता. चवीप्रमाणे मीठ घाला. थोडी साखर घाला. गोड चव आवडत नसल्यास साखर वगळा.
नंतर पाव वाटी तेलात थोडी मोहोरी, पाव चमचा मेथ्या पावडर, भरपूर हिंग, चिमूटभर हळद असं घालून छान फोडणी करा. नंतर ही फोडणी व्यवस्थित गार झाल्यावर लोणच्यावर ओता.
लोणचं खायला तय्यार!
माझ्या थंडीतल्या लोणच्यात हे एक राहिलं होतं ते आत्ता लिहिते.
मी भरपूर मेथ्या थोड्या भाजून (म्हणजे मेथ्या इतपतच भाजायच्या की त्या मिक्सरवर दळायला सोपं जाईल.) एकदमच बारीक पावडर करून ठेवते. आणि रोजच्या स्वयंपाकात फोडणीत चिमूट चिमूट वापरते(हे हेल्दी असतं हे आता मी सांगण्याची गरज नाही.). कारण मग अश्या लोणच्यांना घालायला कमी प्रमाणात मेथ्या वाटणं हे जरा कटकटीचं काम होऊ शकतं. ही पावडर तयार असली की डायरेक्ट फोडणीत टाकता येते.
या लोणच्याची आणखी एक गंमत म्हणजे ते खूप मुरलं की काळं पडतं आणि आणखीनच चविष्ट लागतं. पण नंतर ते कोरडंही पडतं. मग ताज्या दह्यात या काळ्या फोडी कुस्करायच्या. त्यात थोडं मीठ चिमूटभर साखर घातली की इन्स्टन्ट "डावीकडंचं" तयार. डावीकडचं हा शब्द खूपजणांना (नव्या पिढीतल्या) माहिती नसण्याची शक्यता. म्हणजेच ताटातल्या डाव्या बाजूस जे वाढतो ते....चटणी लोणचं कोशिंबीर इ.इ.
आज डावीकडे काय आहे? असा प्रश्न असू शकतो!
आता इतकी उरणेबल लोणची घातलीच जात नाहीत. पण माझ्या लहानपणी असं बरणीतलं जुनं काळं लोणचं काढ्लं गेलं की त्याचं असं चविष्ट दह्यातलं "डावीकडलं" बनायचं!
मस्त... मला आवळ्याचे लोणचे
मस्त...
मला आवळ्याचे लोणचे आवडते त्यामुळे करुन पाहिनच.
काल शेजारणीने दोन लोणची दिली. एक होते जे आम्हाला तोंडलीचे वाटले कारण फोडी तोंडलीसारख्या दिसत होत्या. पण ती तोंडली नव्हती. बेळगाव भागात माइनकाई का असेच कायसेसे नाव असलेले एक फळ मिळते या दिवसांत. त्याचे ते लोणचे होते.
दुसरे लोणचे लिंबाचे होते. ते मात्र अप्रतिम होते. खरे तर तो लिंबाचा जॅम होता. सालासकट लिंबे बारिक कापुन, बिया काढुन मिक्सरमधुन फिरवुन घ्यायचे. मग त्यात हिंग, हळद, लाल मिरची पावडर, गुळ/साखर घालुन गॅसवर ठेवायचे आणि साखरेचे पाणी आटेपर्यंत ढवळत बसायचे. आधी थोडे कडसर लागते पण मुरले की अप्रतिम.
आता मला आवऴ्याचे आणि लिंबाचे लोणचे करणे मस्ट झाले
मस्त. माझं आवडतं . करायला
मस्त. माझं आवडतं . करायला पाहिजे.
साधना ते पहिले माईनमुळांचे
साधना ते पहिले माईनमुळांचे लोणचे असेल. माझी आई करायची. सांगलीला माइनमुळं मिळायची थंडीत.

आणि लिंबाचा जॅम तो तर अहाहा........
आवळ्याचे लोणचे.
तों पा सु. मस्तच!
तों पा सु.
मस्तच!
अरेव वा फोटो पण आले की...
अरेव वा फोटो पण आले की... आता तर तोंपासु झाले.
अगं मी म्हटले ती माईनमुळे नाहीयेत. परवलासारखं काहीतरी आहे, पण साधारण पाऊण इंच लांब, हिरवट पट्टे असलेली जाड साल, आत मऊ गर आणि बारिक बिया. चटकन पाहिले तर तोंडली वाटतील पण चव घेतली की क़ळते ही तोंडली नाहीत ते. याची वेगळी चव ओळखता येत नाहीय कारण लसुणही घातलाय आणि त्याची चव लागतेय. मी आज डब्यात थोडेसे आणलेय आणि तेच खातेय थोडे थोडे, तुझे फोटो पाहात.
मस्त दिसत आहे लोणचे. माझी
मस्त दिसत आहे लोणचे.
माझी बहिण आवळा किसून त्यात वेलची आणि साखर घालते. उन्हात ठेवते आणि तो काळा झाला की कापडाने ती बरणी बांधून काळोखी ठिकाणी घरात ठेवते. तो किसलेला मुरब्बा जीभेवर असा मुरतो ना.. त्याची चव अप्रतिम लागते. रोज सकाळी एक चमचा असा मुरब्बा खाणे खूप चांगले.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
लोणच्याइतकंच चविष्ट आणि
लोणच्याइतकंच चविष्ट आणि मनापासून आवडणारं तुझं लेखन!!............. मस्त मस्त!!... (दोन्ही..लेखन आणि लोणचं)
सेम प्रतिसाद दोनदा पडला..
सेम प्रतिसाद दोनदा पडला..
मस्त लोणचे.. नगरला आवळ्याचे
मस्त लोणचे.. नगरला आवळ्याचे छान पिक येते. पण हे बहुतेक मलेशियाहून आलेले वाण आहे. आपले डोंगरी आवळे आकाराने लहान असतात.. चवीला छानच असतात. ( गर थोडा घट्ट असतो. )
मस्त.........
मस्त.........
माईनमुळे नाहीयेत. परवलासारखं
माईनमुळे नाहीयेत. परवलासारखं काहीतरी आहे, >>>>>ओह असं होय.
बी.......तुझ्या ताईच्या रेस्पीने पण करून बघीन.
शांकली ठांकू गं!
आरती मंजू धन्यवाद.
दिनेश सध्या हेच आवळे आहेत बाजारात. पहिला लॉट तुम्ही म्हणता ते डोंगरी आवळे येऊन गेले.
हे मलेशियन असतात हे नव्हतं माहिती.
तों पा सु! इथे फ्रोजेन आवळे
तों पा सु!
इथे फ्रोजेन आवळे मिळतात त्याचे लोणचे केल्यास टिकेल का? (घरी फ्रोजन आवळे आहेत)
आवळ्याला इंग्रजीत काय म्हणतात?
मलेशियात आवळे पिकवतात का?
वत्सला फ्रोजन आवळे जरा ३/४
वत्सला फ्रोजन आवळे जरा ३/४ तास पाण्यात घातले तर? म्हणजे आपण कडधान्ये कशी भिजत घालतो.
आवळ्याला गूजबेरी म्हणत असावेत.
प्रयोग करून बघते. gooseberry
प्रयोग करून बघते.
gooseberry अशी सर्च दिली असता आवळ्या सारखेच दिसणारे फळ सापडले पण चिरल्यानंतरचा एक फोटो आहे त्यात ते वेगळेच दिसते.
तिखट नाही का घालायचं यात? की
तिखट नाही का घालायचं यात? की मोहरीचा झणझणीतपणा पुरेसा होतो?
फ्रोजेन आवळे मिळतात त्याचे
फ्रोजेन आवळे मिळतात त्याचे लोणचे केल्यास टिकेल का?>> इथल्या इं ग्रो मधले तरी एकदम बेक्कार लागतात फ्रोझन आवळे. मी दोन तीनदा आणुन पस्तावले आहे .
साधना, त्याला छन्न्याचे लोणचे
साधना, त्याला छन्न्याचे लोणचे असे म्हणातात. छन्न्याला मराठीत काय नाव ते माहीत नाही.
हे लोणचं आजी नेहेमी करायची.
हे लोणचं आजी नेहेमी करायची. भारी लागतं. मानुषी, तुम्ही चढलेलं म्हटलंय पण घरी तितकं चढलेलं नाही आठवते.
गुसबेरी म्हणजे आवळे नाही. ते हिरव्या/ पोपटी रंगाचे बारीक बोर/ क्र्यान्बेरी आकाराचे एका बाजून थोडे टोकदार असतात. महाभयंकर आंबट आणि फक्त आंबटच तुरट नाही. (माझ आंबट थ्रेशोल्ड बरंच हाय आहे तरी गुसबेरी २-३ च्यावर नाहीच खाववत) टार्र्ट करतात. पिकिंग फार्मवर अगदी १-२ आठवडे मिळतात.
साधना , मानुषी तुम्ही जे
साधना , मानुषी तुम्ही जे तोंडल्यासारखे लोणचे म्हणत आहात ते छन्ने किवा मॅकिकाई चे लोणचे.
सांगली , कोल्हापुर, बेळगाव भागात शेताच्या बांधावर जनरली वेल असतो याचा.
आमच्याकडे याच लोणच घालतात किंवा मीठ लाऊन वाळवुन सांडग्या बरोबर तळायचे. याची अंगभुत चव इतकी सुंदर असते कि तेल वगैरे घालुन लोणच न करता फक्त मोहरी, जी,मीठ, लिंबु रस घालुन केलेले लोणचे खुप मस्त लागते.
फ्रोझन आवळ्यांचंही होतं
फ्रोझन आवळ्यांचंही होतं चांगलं. लवकर संपवावं लागतं मात्र.
एकदम तोंपासु फोटो आहेत ,
एकदम तोंपासु फोटो आहेत , मानुषीताई.
मी फ्रोझन आवळ्यांचंच लोणचं करते नेहमी स्वातीच्या रेसिपीने.
wow... slurrrrrrrrrp....
wow...
slurrrrrrrrrp....