रेल्वेमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: आपल्या सूचना व सल्ले. "विनंती स्वीकरली आहे"

Submitted by ऋग्वेद on 20 November, 2014 - 07:49

भारताच्या इतिहासात दुसर्यांदा महाराष्ट्राकडे देशाचे एक महत्वाचे असे "रेल्वे मंत्रीपद" मिळाले आहे. ( राम नाईक यांच्याकडे एनडीएच्या काळात आलेले होत परंतु ऑगस्ट ते ऑक्टोंबर १९९९ असे अवघे ३ महिनेच होते ) माननिय श्री. सुरेश प्रभुंसारख्या हुशार आणि कल्पक नेतृत्वाकडे हे पद गेल्याने नक्कीच अपेक्षा वाढली आहे. भारतीय अर्थकारणात रेल्वेचा सहभाग महत्त्वाचा आहे. रेल्वे ही भारताच्या नसनसातुन वाहत आहे. एक प्रमुख दळणवळणाचे साधन म्हणुन तसे स्वस्त आणि जलद मालवाहतुक साधन म्हणुन देखील रेल्वेचे भारतात मुख्य योगदान आहे.
आजपर्यंत जास्त रेल्वेमंत्रीपद हे उत्तर भारतात असणार्या नेत्यांनाच मिळत होती. त्यामुळे महाराष्ट्रामधुन भरघोस उत्पन्न मिळुन सुध्दा योग्य म्हणावे असा परतावा मिळाला नाही. महाराष्ट्रातुन एकुण उत्पन्ना पैकी जवळापास ५०% पेक्षा जास्त उपन्न रेल्वेला मिळते पण दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाच्यावेळी महाराष्ट्राच्या तोंडाला पानेच पुसली जातात. अर्थात दरवेळेला महाराष्ट्रालाच वाटा मिळाला पाहिजे अशी मागणी नाही पण इमानदारीने पुढच्या स्टेशनवर जाण्याकरीता देखील रांग लावुन तिकिट काढणार्याला योग्य मोबदला मिळावा इतकी तरी रास्त अपेक्षा ठेवणे वागवे ठरणार नाही. सगळ्यांच सरकारांनी रेल्वे वाढवली तिचे उत्पन्न वाढवले बरीच कामे केली तरी लोकांच्या अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत. बर्याच जणांच्या अपेक्षा अवास्तव वगैरे असतील. रेल्वेखात्याने देखील स्वतःतर्फे बरीच अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असेलच. अश्या प्रयत्नातुनच आजची रेल्वे आपल्याला अनुभवायला मिळते हे खरे आहे. इंटरनेट ई - तिकिट वगैरे सुविधा अश्याच कल्पनेचा जन्म त्यातुन झाला. अश्या विविध कल्पनेतुन सुचनेतुन त्याप्रत्यक्षात उतरतील की नाही याची चाचपणी करता येईल. नुसते डब्बे वाढवुन फेर्‍यावाढवुन समस्येतुन समाधान मिळत नसते. बर्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्यातुन चांगले उत्तम परिणाम येउ शकतात.
कोणी मुंबई लोकल ट्रेन बद्दल सल्ले देतील तर कोणी ज़ळगाव, कोल्हापुर स्टेशन वरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांबाबत सल्ले सांगतील तर कोणी स्टेशन बद्दल तर कोणी रेल्वे रुळांबद्दल अश्या विविध उत्तम सल्ले गोळा करुन रेल्वेमंत्र्यांना देण्याचा मानस आहे ( त्यावर किती अंमलबजावणी होईल? , सल्ल्यांना गंभीरपणे घेतील का? वगैरे बद्दल सांगता येणार नाही परंतु मी स्वतः तरी सुरेश प्रभुं यांच्या पर्यंत पोहचतील या प्रयत्नात असणार आहे. )

काही सल्ले:-

१) जुलै महिन्यात रेल्वेखात्याने स्टेशन वर ट्रेन (लांबपल्ल्याची) येण्याच्या ३० मिनीट अगोदर रिझर्वेशन करण्याची सोय रद्द केली होती. ( चौकशी काउंटर वर अश्या प्रकारची तिकिटे मिळत होती हे बर्‍याच कमी जणांना माहीत असेल ) ती पुन्हा चालु केली पाहिजे. रिझर्वेशन मधुन रेल्वेला जास्त उत्पन्न मिळते तसेच ग्राहकाचे समाधान देखील होते. डब्ब्यात असणार्या मोकळ्या सीटचा काळाबाजार कमी प्रमाणात होतो. कारण पुढच्या स्टेशनवर त्या रिकाम्या असणार्या सीटचे रिझर्वेशन देखील होउ शकत असल्याने ती सीट दुसर्याला देउ शकत नाही. या सुविधेचा वापर जास्त लोकांनी करावा या करिता माहीती जनमानसांना योग्य माध्यमातुन देण्यात यावी.

२) मुंबईच्या लोकल ट्रेनचे डब्बे एकमेकांना आतुन जोडण्यात यावे. लांब पल्ल्यांच्या गाड्या या आतुन जोडलेल्या असतात. त्यामुळे गाडीतली गर्दी विभागली जाते लोक मोक़ळ्या जागेकडे धाव घेतात. परंतु लोकल ट्रेन मधे डब्बे जोडलेले नसल्याने गर्दी विशिष्ट डब्ब्यांमधेच खच्चुन राहते. याचे कारण रेल्वे स्टेशन्स वर असणारे पादचारी पुल. बर्याच स्टेशन्सवर पादचारीपुल हे सुरुवातीला आणि शेवटी असतात त्यामुळे त्यावरुन येणारी लोक स्टेशन वर आल्यावर तिथेच रेंगाळत राहतात ( ऑफिस मधुन व्यवसायमधुन काम करुन दमलीभागलेली लोक बर्याचदा असेच करतात हा अनुभव देखील आहे.) अश्यामुळे १२ डब्ब्याच्या गाडीमधले पहिले ३ आणि शेवटचे३ या डब्ब्यांमधे गर्दी अतिप्रचंड असते. मधल्या डब्यांमधे इतकी गर्दी नसते वर फर्स्ट क्लासचा मोठा डब्बा देखील मधे येत असल्याने त्याबाजुला लोक कमीच जातात. हेच जर डब्बे मधुन जोडले गेल्यास गाडी चालु झाल्यावर आपोआपच लोक मोकळ्या जागेकडे जातील. महिलांचा डब्बे आणि फर्स्ट क्लासचे डब्बे हे शेवटी आणि सुरुवातीला ठेवल्यास मधले जनरल डब्बे जोडु शकतात. उदा. १५ डब्ब्यांची गाडी मधे दोन्ही बाजुचा दीड डब्बा जर महिलांसाठी आरक्षित ठेवला आणि उरलेला अर्धा डब्बा महिलांकरीता फर्स्टक्लासचा ठेवल्यास सध्या असलेल्या जागेपैकी जास्त जागा महिलांना आणि फर्स्टक्लासवाल्यांना मिळेल. त्यानंतरचा १ डब्बा पुरुष फर्स्टक्लास साठी ठेवावा म्हणजे दोन्ही बाजुंनी ३-३ असे ६ डब्बे महिला आणि फर्स्टक्लास यांच्या वाटणीला येतील आणि त्या मधले ९ डब्बे जनरल होतील ते आतुन एकमेकांना जोडावे म्हणजे गर्दीची विभागणी होउन डब्ब्यांमधे जास्त गर्दी होणार नाही.

३) इंटरनेटचे युगः- आजकालच्या जमान्यात इंटरनेटचा वापर जास्त होउ लागला आहे. तिकिटघरांसमोर इतक्या रांगा लागलेल्या असतात की बारशाला जायचे असल्यास लग्नालाच पोहचतो की काय असे वाटु लागते. त्या मधे देखील सणावारांना आणि महिन्याच्या १-१० तारखेला जास्तच गर्दी असते. मासिक पास काढायचा राहुन जातो. मग सकाळी होणारी धावपळ होतच असते. एक तर ऑफिस मधुन २ तास गर्दीत उभे राहुन आल्यावर पासच्या रांगेत उभे राहण्याचे त्राण नसते तर सकाळी लोकल ट्रेन सुटु नये म्हणुन होत असलेली धावपळ दोन्ही ठिकाणी वेळ काही जमत नाही. मग लेटमार्क वगैरे वगैरे बर्याच गोष्टी घडतात. म्हणुन रेल्वेने मुंबई लोकल साठी वेगळी वेबसाईट सुरु करुन तिथे ई-पास / ई-तिकिट काढण्याची सोय ठेवावी. मोबाईल मधुन कंम्पुटर मधुन लोक हव्या त्यावेळी तिकिट्स पासेस काढु शकतात त्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचेल. त्याचबरोबर "पेपर"ची बचत देखील मोठ्या प्रमाणात होईल तिकिट छपाईचा खर्च कमी होईल. मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर देखील उपयोगी होउ शकतो.

आपले योग्य आणि अमुल्य कल्पना, सल्ले आणि सुचना नक्कीच विचारात घेतल्या जातील.

धन्यवाद

------------------------------------------------------------------------------------

काही दिवसांपुर्वी श्री. सुरेश प्रभु यांना संपर्क केला होता आणि त्यांना एक विनंतीपत्र पाठवण्यात आले होते. त्यात या धाग्याचा आणि मायबोलीचा संदर्भ देउन इथे आलेल्या सुचना आणि सल्ल्यांना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा मानस व्यक्त केला होता.
त्यानुसार श्री. सुरेश प्रभु यांच्याकडुन सुचना आणि सल्ले पाठवण्याचे उत्तर आले आहे.

आपल्या सुचना आणि सल्ले यांचे वर्गीकरण, मुद्देसुद आणि नीटनेटके करण्याचे काम चालु आहे. ते झाल्यानंतर ईमेल द्वारे आणि पत्राद्वारे त्यांच्यापर्यंत या मागण्या पोहचवण्यात येतील. आशा आहे की आपल्या सर्व सुचना मागण्यांची श्री. सुरेश प्रभु नक्कीच दखल घेतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसे ही करा. प्रश्न विचारला. उत्तराच्या ऐवजी भलतेच ऐकायला मिळाले. असो शेवटी मायबोलीवर असल्याने सवय असणारच हे गृहित धरायला पाहिजे होते Happy

मी नाईज्जा करत फुगून थोडीच बसतो?>> Lol
वेळ अ‍ॅड्जस्ट करायची म्हणजे काय करायचं? काही लोकल रद्द, काहींची वेळ मागे-पुढे हे तर होणारच ना वेळ अ‍ॅड्जस्ट करण्यासाठी?

दिवाकरा, वर उत्तरं नाही तर काय लिहिलंय? Uhoh आणि वेळापत्रक आपण नाही ना बनवत? मग मायबोलीकर कसे एक्झॅक्ट उत्तर देणार? तुम्ही अंदाज करताय तसेच तेही करणार Happy

विरोध नाही हो. मी आधीपासूनच अ‍ॅडजस्ट हा शब्द बोलतेय Happy कदाचित टोटली अ‍ॅडजस्ट म्हणजेच पुर्ण नविन वेळापत्रक Happy

चालु झाल्यावरच कळेल >>> तेच तर Happy

केश्विनी, मंजूडी, वेळ जात नाहिये का? Light 1

एसी लोकलची संकल्पना आवडली. पीक अवर्सच्या व्यतिरीक्त जेव्हा जास्त सामान वगिअरे घेऊन प्रवास करायचा असेल तेव्हा अशा लोकल्स बर्‍या पडतील. टॅक्सी किंवा कारने मुंबईत फिरायला अजिबात आवडत नाही.

ती मेट्रो फारच भारीये.. मी मुंबईत होतो तेव्हा चालू झाली असती तर सीप्झला जाताना कसली सोय झाली असती.. एकदम फास्टात सीप्झ गाठता आले असते.. घाटकोपर ते साकीनाका प्रवास केला त्यातून.. जेमतेम १२ का १३ मिनिटांत पोचलो. तेच जर बसनी किंवा रिक्षानी गेलो असतो तर वाट लागली असती.. आणि ती तर पूर्ण एसी गाडी आहे.. लोकल पण एसी झाल्या तर मस्त होईल.. बंदिस्त प्रवास.. बाहेरचा दगड लागून अपघात होणे.. लोंबकाळत जाणे असले प्रवास निदान एसी लोकलमधून तरी बंद होतील.

मुंबई मेट्रो १

मस्तच, गारेगार प्रवास,

त्या जिवघेण्या चिकट बाहेरच्या वातावरणातुन स्टेशनला पोहोचल्यावर जेंव्हा मेट्रोत चढतो तेंव्हा कळत आंतर राष्ट्रिय प्रवास कसा असत असेल. दिल्लीची मेट्रोतर सर्वात चांगलीय ! दिल्ली सेंट्रल स्टेशन ते दिल्ली एअरपोर्ट
डायरेक्ट मेट्रो ते ही एसी कारच्या भाड्याच्या अर्ध्या किमतीत !

कोच्चीला मेट्रो बांधण्याची प्रगती खुपच फास्ट आहे, तिथे श्रीधरनच मेट्रोचे चिफ आहेत.

मुंबई दिल्ली केरळ तिन्ही कडेची मेट्रो काँग्रेससरकारनेच उभी केली आहे.
व्वा काय विकासाची दृष्टी आहे. Happy नाहीतर इतरत्र काहीजण नुसती तोंडाची वाफच घालवण्यात धन्यता मानत आहेत

कृपा करून इथे राजकारण आणि सरकारांची चर्चा नको.>>> +१ खरंच.

तरीही तशी चर्चा त्या शेपटाला लोंबकाळत धागाभर पसरु नये म्हणून हे लिहितेय.

मुंबई दिल्ली केरळ तिन्ही कडेची मेट्रो काँग्रेससरकारनेच उभी केली आहे. >>> मान्यच. त्याही पुढे जाऊन सांगते, जे काही बरे, वाईट, चांगले, उत्तम होईल ते भारत सरकारनेच केलेलं असेल. मग ते कुठल्याही पक्षाचं असो. कायबी असूद्यात, जेव्हा 'भारत सरकार' हे नाव कुठेही येतं तेव्हा माझ्यासाठी ते कुठल्या पक्षाचं आहे हा विचार गौण ठरतो. माझ्यासाठी ते माझा देश चालवणारी यंत्रणा असते, जी कधी चुकीचे तर कधी बरोबर ठरणारे निर्णय घेते. बरोबर निर्णयांचा फायदा जर मी घेत असते तर चुकांनाही एका मर्यादेपर्यंत पोटात घालायची माझी तयारी असते. त्याबरोबरच ती यंत्रणा जेव्हा माझ्या देशाला जगामध्ये रिप्रेझेंट करत असते तेव्हा त्या यंत्रणेचे जगासमोर वाभाडे काढणे हे मला शोभत नाही.

मुंबई दिल्ली केरळ तिन्ही कडेची मेट्रो काँग्रेससरकारनेच उभी केली आहे.>> True. That's why in Delhi congress was in power for 15 years. Infact first first 10 Yrs congrss govt was doing good. Only last 5 years they lost it. Commonwealth games etc. Even in Maharashtra cong was their for long. So people also supported good work of Congress. Let's see how Modi is doing. Right now most of their policies are just carry forward of UPA govt. Let's hope this year budget will be different. Happy

>>केश्विनी, मंजूडी, वेळ जात नाहिये का? <<
वेळ सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाहि. जिथे-तिथे नसलेली अक्कल पाजळणार्‍यांची हवा जाहिररित्या काढ्लीच पाहिजे... Happy

एसी लोकल बेस्ट कल्पना आहे. अंधेरी मेट्रो मध्ये एसी कसा जोरदार असतो त्याचा अनुभव घेतलाय, आणि भरपूर पब्लिक मिळेल हे तर नक्कीच. मुंबईत रस्ते आणि ट्राफिक इतकं मेटाकुटीला आलंय.
मंजूडी, कळवा ऐरोली मार्ग करून व्हीटी- ठाणे गर्दी नाही कमी होणार ना? ठाणे -वाशी च्या ८-९ नंबरची गर्दी फक्त कमी होईल.

कळवा ऐरोली मार्ग करून व्हीटी- ठाणे गर्दी नाही कमी होणार ना?>> थोड्या प्रमाणात तरी गर्दी कमी होईल. सकाळच्या वेळी ठाण्याला उतरणार्‍यांची आणि संध्याकाळी ठाण्याला चढणार्‍यांची महाझुंबड विभागली जाईल. कारण डोंबिवली, मुंब्रा, दिवा इथले प्रवासी बहुतेक तरी कळव्याहून प्रवास करणं स्वीकारतील.

थोड्या प्रमाणात तरी गर्दी कमी होईल. सकाळच्या वेळी ठाण्याला उतरणार्‍यांची आणि संध्याकाळी ठाण्याला चढणार्‍यांची महाझुंबड विभागली जाईल. कारण डोंबिवली, मुंब्रा, दिवा इथले प्रवासी बहुतेक तरी कळव्याहून प्रवास करणं स्वीकारतील.>>> अगदी अगदी. खर तर त्या सर्वांना चढता उतरताना बघुन जीव दडपतो. कसे रोज जाये करतात काय माहिती. फारच वाईट अवस्था असते संध्याकाळी तर. एक - एक अल्टरनेट लोकल कल्याण सोडली पाहिजे वाशी व पनवेलहुन आता. ती व्हाया पनवेल - दिवा अशी जाईल नाहितर ऐरोली - कळवा.

Railways starts first train that chugs on CNG

EW DELHI: In significant step towards adopting green fuel, the railways have launched their first CNG train. Railway minister Suresh Prabhu flagged off the train, run on dual fuel system — diesel and CNG — on the Rewari-Rohtak section of northern zone.

An official said introduction of CNG trains will reduce greenhouse gas emission and also cut the transporter's fuel bill by reducing consumption of diesel.

The minister, who has opened a separate environment directorate in the railway board, has stressed on the use of alternative fuel, including use of solar and wind power, to reduce dependence on conventional energy.

The railways have modified the 1,400 HP engine to run on dual fuel - diesel and CNG - through fumigation technology.

The passenger train would consume over 20% of CNG, covering a distance of 81km in about two hours.

"Gradually, CNG usage will be increased to around 50%. Currently, test trials are being conducted for increased usage of CNG," said an official.

A senior official said there are plans to run more such CNG trains to reduce diesel consumption.

अमितव,

>> कळवा ऐरोली मार्ग करून व्हीटी- ठाणे गर्दी नाही कमी होणार ना? ठाणे -वाशी च्या ८-९ नंबरची गर्दी फक्त
>> कमी होईल.

पहिले तशीच योजना होती. ऐरवली - कळवा मार्ग पुढे खाजणीच्या जमिनीतून नेऊन दिवा वसई मार्गास भिडवण्याचं ठरलं होतं. वाशीवाल्यांना बोरीवली/वसई कडे जायला ठाण्याला यायची गरज पडणार नव्हती. त्यामुळे ठाण्यावरील प्रचंड गर्दी कमी होणार होती. सगळा बेत ठिक्क जमून आला होता. पण ऐन वेळी माशी शिंकली.

पहिले शिसेतून नंतर रावात गेलेले एक नेते आहेत. त्यांचा हक्काच्या मतदारसंघातल्या झोपड्या (मुकंद ते कळवा रेल्वे आगार या पट्ट्यातल्या) हटवल्या जाणार होत्या. अवघ्या दोनचारशे मीटर्सचाच प्रश्न होता. पण या नेत्यांनी काम होऊ दिलं नाही. Sad

आ.न.,
-गा.पै.

Pages