रेल्वेमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: आपल्या सूचना व सल्ले. "विनंती स्वीकरली आहे"

Submitted by ऋग्वेद on 20 November, 2014 - 07:49

भारताच्या इतिहासात दुसर्यांदा महाराष्ट्राकडे देशाचे एक महत्वाचे असे "रेल्वे मंत्रीपद" मिळाले आहे. ( राम नाईक यांच्याकडे एनडीएच्या काळात आलेले होत परंतु ऑगस्ट ते ऑक्टोंबर १९९९ असे अवघे ३ महिनेच होते ) माननिय श्री. सुरेश प्रभुंसारख्या हुशार आणि कल्पक नेतृत्वाकडे हे पद गेल्याने नक्कीच अपेक्षा वाढली आहे. भारतीय अर्थकारणात रेल्वेचा सहभाग महत्त्वाचा आहे. रेल्वे ही भारताच्या नसनसातुन वाहत आहे. एक प्रमुख दळणवळणाचे साधन म्हणुन तसे स्वस्त आणि जलद मालवाहतुक साधन म्हणुन देखील रेल्वेचे भारतात मुख्य योगदान आहे.
आजपर्यंत जास्त रेल्वेमंत्रीपद हे उत्तर भारतात असणार्या नेत्यांनाच मिळत होती. त्यामुळे महाराष्ट्रामधुन भरघोस उत्पन्न मिळुन सुध्दा योग्य म्हणावे असा परतावा मिळाला नाही. महाराष्ट्रातुन एकुण उत्पन्ना पैकी जवळापास ५०% पेक्षा जास्त उपन्न रेल्वेला मिळते पण दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाच्यावेळी महाराष्ट्राच्या तोंडाला पानेच पुसली जातात. अर्थात दरवेळेला महाराष्ट्रालाच वाटा मिळाला पाहिजे अशी मागणी नाही पण इमानदारीने पुढच्या स्टेशनवर जाण्याकरीता देखील रांग लावुन तिकिट काढणार्याला योग्य मोबदला मिळावा इतकी तरी रास्त अपेक्षा ठेवणे वागवे ठरणार नाही. सगळ्यांच सरकारांनी रेल्वे वाढवली तिचे उत्पन्न वाढवले बरीच कामे केली तरी लोकांच्या अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत. बर्याच जणांच्या अपेक्षा अवास्तव वगैरे असतील. रेल्वेखात्याने देखील स्वतःतर्फे बरीच अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असेलच. अश्या प्रयत्नातुनच आजची रेल्वे आपल्याला अनुभवायला मिळते हे खरे आहे. इंटरनेट ई - तिकिट वगैरे सुविधा अश्याच कल्पनेचा जन्म त्यातुन झाला. अश्या विविध कल्पनेतुन सुचनेतुन त्याप्रत्यक्षात उतरतील की नाही याची चाचपणी करता येईल. नुसते डब्बे वाढवुन फेर्‍यावाढवुन समस्येतुन समाधान मिळत नसते. बर्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्यातुन चांगले उत्तम परिणाम येउ शकतात.
कोणी मुंबई लोकल ट्रेन बद्दल सल्ले देतील तर कोणी ज़ळगाव, कोल्हापुर स्टेशन वरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांबाबत सल्ले सांगतील तर कोणी स्टेशन बद्दल तर कोणी रेल्वे रुळांबद्दल अश्या विविध उत्तम सल्ले गोळा करुन रेल्वेमंत्र्यांना देण्याचा मानस आहे ( त्यावर किती अंमलबजावणी होईल? , सल्ल्यांना गंभीरपणे घेतील का? वगैरे बद्दल सांगता येणार नाही परंतु मी स्वतः तरी सुरेश प्रभुं यांच्या पर्यंत पोहचतील या प्रयत्नात असणार आहे. )

काही सल्ले:-

१) जुलै महिन्यात रेल्वेखात्याने स्टेशन वर ट्रेन (लांबपल्ल्याची) येण्याच्या ३० मिनीट अगोदर रिझर्वेशन करण्याची सोय रद्द केली होती. ( चौकशी काउंटर वर अश्या प्रकारची तिकिटे मिळत होती हे बर्‍याच कमी जणांना माहीत असेल ) ती पुन्हा चालु केली पाहिजे. रिझर्वेशन मधुन रेल्वेला जास्त उत्पन्न मिळते तसेच ग्राहकाचे समाधान देखील होते. डब्ब्यात असणार्या मोकळ्या सीटचा काळाबाजार कमी प्रमाणात होतो. कारण पुढच्या स्टेशनवर त्या रिकाम्या असणार्या सीटचे रिझर्वेशन देखील होउ शकत असल्याने ती सीट दुसर्याला देउ शकत नाही. या सुविधेचा वापर जास्त लोकांनी करावा या करिता माहीती जनमानसांना योग्य माध्यमातुन देण्यात यावी.

२) मुंबईच्या लोकल ट्रेनचे डब्बे एकमेकांना आतुन जोडण्यात यावे. लांब पल्ल्यांच्या गाड्या या आतुन जोडलेल्या असतात. त्यामुळे गाडीतली गर्दी विभागली जाते लोक मोक़ळ्या जागेकडे धाव घेतात. परंतु लोकल ट्रेन मधे डब्बे जोडलेले नसल्याने गर्दी विशिष्ट डब्ब्यांमधेच खच्चुन राहते. याचे कारण रेल्वे स्टेशन्स वर असणारे पादचारी पुल. बर्याच स्टेशन्सवर पादचारीपुल हे सुरुवातीला आणि शेवटी असतात त्यामुळे त्यावरुन येणारी लोक स्टेशन वर आल्यावर तिथेच रेंगाळत राहतात ( ऑफिस मधुन व्यवसायमधुन काम करुन दमलीभागलेली लोक बर्याचदा असेच करतात हा अनुभव देखील आहे.) अश्यामुळे १२ डब्ब्याच्या गाडीमधले पहिले ३ आणि शेवटचे३ या डब्ब्यांमधे गर्दी अतिप्रचंड असते. मधल्या डब्यांमधे इतकी गर्दी नसते वर फर्स्ट क्लासचा मोठा डब्बा देखील मधे येत असल्याने त्याबाजुला लोक कमीच जातात. हेच जर डब्बे मधुन जोडले गेल्यास गाडी चालु झाल्यावर आपोआपच लोक मोकळ्या जागेकडे जातील. महिलांचा डब्बे आणि फर्स्ट क्लासचे डब्बे हे शेवटी आणि सुरुवातीला ठेवल्यास मधले जनरल डब्बे जोडु शकतात. उदा. १५ डब्ब्यांची गाडी मधे दोन्ही बाजुचा दीड डब्बा जर महिलांसाठी आरक्षित ठेवला आणि उरलेला अर्धा डब्बा महिलांकरीता फर्स्टक्लासचा ठेवल्यास सध्या असलेल्या जागेपैकी जास्त जागा महिलांना आणि फर्स्टक्लासवाल्यांना मिळेल. त्यानंतरचा १ डब्बा पुरुष फर्स्टक्लास साठी ठेवावा म्हणजे दोन्ही बाजुंनी ३-३ असे ६ डब्बे महिला आणि फर्स्टक्लास यांच्या वाटणीला येतील आणि त्या मधले ९ डब्बे जनरल होतील ते आतुन एकमेकांना जोडावे म्हणजे गर्दीची विभागणी होउन डब्ब्यांमधे जास्त गर्दी होणार नाही.

३) इंटरनेटचे युगः- आजकालच्या जमान्यात इंटरनेटचा वापर जास्त होउ लागला आहे. तिकिटघरांसमोर इतक्या रांगा लागलेल्या असतात की बारशाला जायचे असल्यास लग्नालाच पोहचतो की काय असे वाटु लागते. त्या मधे देखील सणावारांना आणि महिन्याच्या १-१० तारखेला जास्तच गर्दी असते. मासिक पास काढायचा राहुन जातो. मग सकाळी होणारी धावपळ होतच असते. एक तर ऑफिस मधुन २ तास गर्दीत उभे राहुन आल्यावर पासच्या रांगेत उभे राहण्याचे त्राण नसते तर सकाळी लोकल ट्रेन सुटु नये म्हणुन होत असलेली धावपळ दोन्ही ठिकाणी वेळ काही जमत नाही. मग लेटमार्क वगैरे वगैरे बर्याच गोष्टी घडतात. म्हणुन रेल्वेने मुंबई लोकल साठी वेगळी वेबसाईट सुरु करुन तिथे ई-पास / ई-तिकिट काढण्याची सोय ठेवावी. मोबाईल मधुन कंम्पुटर मधुन लोक हव्या त्यावेळी तिकिट्स पासेस काढु शकतात त्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचेल. त्याचबरोबर "पेपर"ची बचत देखील मोठ्या प्रमाणात होईल तिकिट छपाईचा खर्च कमी होईल. मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर देखील उपयोगी होउ शकतो.

आपले योग्य आणि अमुल्य कल्पना, सल्ले आणि सुचना नक्कीच विचारात घेतल्या जातील.

धन्यवाद

------------------------------------------------------------------------------------

काही दिवसांपुर्वी श्री. सुरेश प्रभु यांना संपर्क केला होता आणि त्यांना एक विनंतीपत्र पाठवण्यात आले होते. त्यात या धाग्याचा आणि मायबोलीचा संदर्भ देउन इथे आलेल्या सुचना आणि सल्ल्यांना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा मानस व्यक्त केला होता.
त्यानुसार श्री. सुरेश प्रभु यांच्याकडुन सुचना आणि सल्ले पाठवण्याचे उत्तर आले आहे.

आपल्या सुचना आणि सल्ले यांचे वर्गीकरण, मुद्देसुद आणि नीटनेटके करण्याचे काम चालु आहे. ते झाल्यानंतर ईमेल द्वारे आणि पत्राद्वारे त्यांच्यापर्यंत या मागण्या पोहचवण्यात येतील. आशा आहे की आपल्या सर्व सुचना मागण्यांची श्री. सुरेश प्रभु नक्कीच दखल घेतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशूचँप आणि दक्षिणा, <<विविध उत्तम सल्ले गोळा करुन रेल्वेमंत्र्यांना देण्याचा मानस आहे>> याला आक्षेप नाहीये.

<< आपले योग्य आणि अमुल्य कल्पना, सल्ले आणि सुचना नक्कीच विचारात घेतल्या जातील.>> याला आक्षेप आहे.

इथे लिहिलेलं योग्य व्यक्तीपर्यंत योग्य मार्गाने पोचणार असेल तर त्याबद्दल कौतुकच वाटेल.

मंजुडी योग्य प्रतिसाद यासाठी लिहिले आहे की जे प्रत्यक्षात येतील अश्या कल्पना. इथे सल्ले दिल्यावर मायबोलीकरांकडुन त्यावर चर्चा होणारच आहे त्यातुन कळेल तो सल्ला योग्य आहे की नाही. उदा. मी लोकल डब्बे जोडण्याचा सल्ला जो दिला आहे त्यात काय कमतरता अडचणी येतील हे देखील गामा. मयेकर इ. दाखवुन दिलेच आहे. यातुन ज्यात कमीत कमी अडचणी निर्माण होतील असे सल्ले आपण त्यांना देउ.
अजुन काही आक्षेप असल्यास नक्की सांगा

अगं पण ज्या वकयावर आक्षेप घेतलास त्या मागच्या भावना समजून घेतल्यास तर जास्त बरं होईल.
तुझी पोस्ट चांगल्यात वाईट शोधून खुसपट काढल्यासारखी आलिये इथे.

तुझी पोस्ट चांगल्यात वाईट शोधून खुसपट काढल्यासारखी आलिये इथे.>> बरं. तसं समजा.

म्हणुन रेल्वेने मुंबई लोकल साठी वेगळी वेबसाईट सुरु करुन तिथे ई-पास / ई-तिकिट काढण्याची सोय ठेवावी.>>> ही सोय अस्तित्वात आहे. मी स्वतः गेली किमान आठ वर्ष रेल्वेच्या IRCTC वरून लोकलचा पास काढते आहे.

मोबाईल मधुन कंम्पुटर मधुन लोक हव्या त्यावेळी तिकिट्स पासेस काढु शकतात त्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचेल. त्याचबरोबर "पेपर"ची बचत देखील मोठ्या प्रमाणात होईल तिकिट छपाईचा खर्च कमी होईल. मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर देखील उपयोगी होउ शकतो. >> ही सोयही गेली किमान ५ वर्ष तरी आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ई-तिकिट काढल्यावर तिकिटाची प्रिंट आऊट न काढता रेल्वेशी रजिस्टर्ड नंबरावर आलेला एसेमेस 'तिकिट' म्हणून दाखवता येतो.

दक्षिणा, खुसपटंच काढायची म्हणून नाही, पण जो आयडी मायबोलीवर रूमालांविषयी चौकशी करतो तोच आयडी केंद्रिय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोचण्याची आश्वासनं देतो त्याबद्दल कुतुहल वाटलं. म्हणून फक्त चौकशी केली. Happy

मंजूडे तो ऋन्मेष होता हा ऋग्वेद आहे गं हाहा>>> Uhoh

अर्रर्रर्रर्र!! सॉरी सॉरी सॉरी.... ऋग्वेद, त्रिवार सॉरी!
पण जो आयडी मायबोलीवर रूमालांविषयी चौकशी करतो तोच आयडी केंद्रिय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोचण्याची आश्वासनं देतो त्याबद्दल कुतुहल वाटलं. म्हणून फक्त चौकशी केली.>> हा आरोप सपशेल मागे घेत आहे.
आपण कैच्याकै आरोप केलेले खपवुन घेतले जाणार नाही>> नकाच खपवून घेऊ.
रोज नवीन लेखनात 'ऋ'ने चालू होणार्‍या आयडीने उघडलेले फुटकळ बाफ बघून वैताग येत होता. ते असं वड्याचं तेल वांग्यावर निघालं. खरंच क्षमा करावी.

मंजुडी,
याचा अर्थ इथे आपण धाग्याचे कंटेट काय आहे ते न बघता आयडीनाव बघून काय प्रतिसाद द्यायचा ते ठरवता.. Wink

असो Happy
येथील चर्चेला खीळ नको. वाचतोय.

IRCTC वरुन सिझन पास काढण्याची सुविधा बहुतेक कधीच बंद झालेली आहे. ( मला त्या साईटवर दिसली नाही ) आणि जेव्हा चालु होती तेव्हा तो पोस्टाने वगैरे यायचा असे काहीतरी होते. प्रिंट चालत नव्हती म्हणुन त्याचा वापर फारच कमी होता.

ऋग्वेद, धन्यवाद Happy

IRCTC वरुन सिझन पास काढण्याची सुविधा बहुतेक कधीच बंद झालेली आहे. ( मला त्या साईटवर दिसली नाही ) आणि जेव्हा चालु होती तेव्हा तो पोस्टाने वगैरे यायचा असे काहीतरी होते.>> चालू आहे. बूकिंग केल्याच्या दुसर्‍या दिवशी पास स्पीडपोस्टने येतो.

( मला त्या साईटवर दिसली नाही )>> IRCTC वर लॉगिन करायच्या आधी लॉगिन टॅबच्याखाली 'mumbai season ticket' दिसते त्यावर क्लिक करावे लागते.

१)कल्याण-डोंबिवली-दिवा -ऐरोली-तुर्भे असा रेल्वेमार्ग फास्ट लाईनकडून कित्येकवर्षे आहेच. लोकल का चालू करत नाहीत ?
२)नाशिक मनमाडला जाण्यासाठी सकाळी आणि येण्यासाठी संध्याकाळी अशी खास मेल हवी लांब पल्याच्या तपोवन /युपी /बिहार च्या गाड्या उपयोगाच्या नाहीत.
शुभेच्छा

टीसींची संख्या तीप्पट तरी करावी. फुकट्यांची संख्या कमी झाली तर रेल्वे चे बरेसचे प्रॉब्लेम संपतील आणि पैसे भरुन प्रवास करणार्‍या लोकांना चांगल्या सुविधा मिळतील.

रेल्वे पोलिसांची संख्या पण वाढवणे आणि त्यांचा प्लॅटफॉर्म वर वावर्/गस्त सक्तीचा करणे.

.

अजून एक लिहायचे राहिले.. प्रत्येक स्टेशनवर प्रत्येक फलाटावर येणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक दाखविणार्‍या स्क्रीन्स असाव्यात.

या रेल्वे मंत्र्यांच्या अखत्यारीत फक्त मुंबई लोकल येते का?

नसल्यास, माझे २ पैसे.

उत्तर महाराष्ट्र अर्थात धुळे व नंदुरबार जिल्हा, तसेच जळगावचे अमळनेर, चोपडा हे तालुके इथून दर-रोज किमान १००-१२५ लक्झरी बसेस भरून मुंबई व तितक्याच पुण्याला जात असतात.

धुळ्याहून मुंबईसाठी फक्त २ बोगी आहेत, ज्या चाळीसगावहून अमृतसर एक्स्प्रेसला लागतात, अन पहाटे साडेतीन-चारला कुर्ल्याला पोहोचतात. तिकडून निघणारी गाडी रात्री साडे १२ ला निघते. असे असूनही या बोगीत गच्च गर्दी असते.

मात्र, खासगी ट्र्यावल लॉबी तिथून मुंबईकरता ट्रेन निघू देत नाही, व सुमारे ३५० किमी प्रवासाला ६०० ते १००० रुपयांपर्यंत काय वाट्टेल ते भाडे आकारतात. शिवाय तितक्या गाड्या दररोज मुंबईत घुसून ट्र्याफिकची वाट लावतात ते वेगळेच.

सर्वे करणार्‍या टीमला लाच देवून, धुळे-चाळीसगाव पॅसेंजरच्या फुकट्या गिर्‍हाईकांची संख्या दाखवली जाते, व ही लाईन तोट्यात जाईल असे अहवाल पाठविले जातात. वास्तविक किमान १ रेल्वे भरून प्रवासी रोज मिळतील, व त्यातले निम्मे एसीचे तिकिट काढणारे असतील, अशी परिस्थिती आहे.

कालच धुळ्याचे नवे आमदार तेलगीफेम श्री गोटे मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे लाईनबद्दल रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करतानाचा फोटो पेप्रात दिसला. (असा फोटो ते गेली १५ वर्षे वेगवेगळ्या रेल्वेमंत्र्यांसोबत काढून प्रसिद्ध करीत असतात, ही बाब अलाहिदा Wink ) ह्या रेल्वेचे काम झाले तर चांगले होईल.

>>ऋग्वेद | 20 November, 2014 - 08:03
धन्यवाद त्यांचे नाव सापडले नव्हते

दुरुस्ती करतो <<

सुरेश प्रभुंपर्यंत पोचाल तेंव्हा पोचाल, आधि मधु दंडवत्यांचं नांव टाका...

(सवंग लोकप्रियतेच्या जमान्यात दंडवत्यांसारखी माणसं विसरली जातात, हे नविन नाहि) Sad

लोकहो,

वर इब्लिस यांनी एक रोचक विधान केले आहे.

>> या रेल्वे मंत्र्यांच्या अखत्यारीत फक्त मुंबई लोकल येते का?

उत्तर जरी नाही असलं तरी मुंबई लोकलसाठी वेगळा मंत्री नेमल्यास लोकल प्रवासी स्वागत करतील. मुंबई लोकल पद्धती नफ्यात असणारी (जगातली बहुधा एकमेव) उपनगरी रेल्वे प्रवासी वाहतूक आहे. स्वतंत्र राज्यमंत्री जरी नेमला तरी ते स्वागतार्ह ठरावं.

आ.न.,
-गा.पै.

राज मी श्रेयनामावली लिहीली नाही
राम नाईकांचा उल्लेख यासाठी केला कि कोणी तिसर्यांदा मिळाले म्हणू नये बस इतकेच

म्हणजे काय?

मधू दंडवतेंचं नांव धागा वाचल्यावाचल्या कालच सुचवणार होतो, पण ते कोणीतरी सुचवलेले दिसले. पण ते सुचवल्यावर ते समाविष्ट करण्यात काय अडचण येत आहे?

>>>सर्वे करणार्‍या टीमला लाच देवून, धुळे-चाळीसगाव पॅसेंजरच्या फुकट्या गिर्‍हाईकांची संख्या दाखवली जाते, व ही लाईन तोट्यात जाईल असे अहवाल पाठविले जातात. वास्तविक किमान १ रेल्वे भरून प्रवासी रोज मिळतील, व त्यातले निम्मे एसीचे तिकिट काढणारे असतील, अशी परिस्थिती आहे.<<<

हे सगळे १६ मे २०१४ पासून होत आहे ना?

बेफिकीर,
१६ मे नंतर तेलगी घोटाळाफेम गोटे भाजपाचे आमदार झालेत, हे सत्य आहे.
पूर्वीदेखिल ते याच गमती करीत होते, अन त्याकाळच्या भाजपा पुढार्‍यांच्या व पोलिस अधिकार्‍यांच्या मालकीच्या ट्र्यावल्सविरुद्ध काहीही हलचाली करीत नव्हते, हे देखिल सत्य आहे.

नागपूरातून निघून, व पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्या ट्य्रावल कंपन्यांच्या मालकांची माहिती काढणार का जरा?

उदा. नीता ट्र्यावल्स

>>>नागपूरातून निघून, व पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्या ट्य्रावल कंपन्यांच्या मालकांची माहिती काढणार का जरा?<<<

नाही काढणार!

असले प्रवास कोळून प्यायलेलो आहे.

आज धागा निघाला म्हणून आक्रोश करणे ही एक बाब आहे, व्यवसाय ही दुसरी बाब आहे, 'आत्ता ह्या क्षणी आपली सोय कोण करतो आहे' हे पाहणे तिसरी बाब आहे आणि सर्वांसाठी भले असे काहीतरी करण्यात पुढाकार घेणे ही चौथी!

सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेसला पुणे - हैदराबाद प्रवास करण्यास पुणे-हैदराबाद व्होल्व्होपेक्षा अधिक वेळ का लागतो ह्याचा तपास (जरूर वाटल्यास) करा! किंवा, प्रामुख्याने 'ट्रेन'संदर्भात भारतीय संस्कृतीची भाषावार प्रांतरचना कशी बोंबलत जाते आणि नैतिकतेचे प्रमाण प्रादेशिकरीत्या का आणि कसे बदलते ह्याचा अभ्यास करा (आवश्यकता भासल्यास).

े. रेल्वे ही भारताच्या नसनसातुन वाहत आहे. <<<

एक आकर्षक विधान असणे ह्यापलीकडे काही समर्थनीय दाखले मिळू शकतील का ह्या विधानाचे?

नुसते डब्बे वाढवुन फेर्‍यावाढवुन समस्येतुन समाधान मिळत नसते. बर्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्यातुन चांगले उत्तम परिणाम येउ शकतात.<<<

सहमत आहे.

( त्यावर किती अंमलबजावणी होईल? , सल्ल्यांना गंभीरपणे घेतील का? वगैरे बद्दल सांगता येणार नाही परंतु मी स्वतः तरी सुरेश प्रभुं यांच्या पर्यंत पोहचतील या प्रयत्नात असणार आहे. )<<<

ह्या इनिशिएटिव्हसाठी अभिनंदन व शुभेच्छा! (ह्यात उपरोध अभिप्रेत नाही हे लिहावे लागणे हे दुर्दैव आहे).

काही सल्ले:-

रिझर्वेशन मधुन रेल्वेला जास्त उत्पन्न मिळते तसेच ग्राहकाचे समाधान देखील होते. डब्ब्यात असणार्या मोकळ्या सीटचा काळाबाजार कमी प्रमाणात होतो. कारण पुढच्या स्टेशनवर त्या रिकाम्या असणार्या सीटचे रिझर्वेशन देखील होउ शकत असल्याने ती सीट दुसर्याला देउ शकत नाही. <<<

असहमत! डब्ल्यू एल आणि आर ए सी ह्या सीट्स ऑक्युपाय करतात व त्यासाठी 'लाच' दिली, घेतली जाते.

२) मुंबईच्या लोकल ट्रेनचे डब्बे एकमेकांना आतुन जोडण्यात यावे. लांब पल्ल्यांच्या गाड्या या आतुन जोडलेल्या असतात. त्यामुळे गाडीतली गर्दी विभागली जाते लोक मोक़ळ्या जागेकडे धाव घेतात. परंतु लोकल ट्रेन मधे डब्बे जोडलेले नसल्याने गर्दी विशिष्ट डब्ब्यांमधेच खच्चुन राहते. याचे कारण रेल्वे स्टेशन्स वर असणारे पादचारी पुल. बर्याच स्टेशन्सवर पादचारीपुल हे सुरुवातीला आणि शेवटी असतात त्यामुळे त्यावरुन येणारी लोक स्टेशन वर आल्यावर तिथेच रेंगाळत राहतात ( ऑफिस मधुन व्यवसायमधुन काम करुन दमलीभागलेली लोक बर्याचदा असेच करतात हा अनुभव देखील आहे.) अश्यामुळे १२ डब्ब्याच्या गाडीमधले पहिले ३ आणि शेवटचे३ या डब्ब्यांमधे गर्दी अतिप्रचंड असते. मधल्या डब्यांमधे इतकी गर्दी नसते वर फर्स्ट क्लासचा मोठा डब्बा देखील मधे येत असल्याने त्याबाजुला लोक कमीच जातात. हेच जर डब्बे मधुन जोडले गेल्यास गाडी चालु झाल्यावर आपोआपच लोक मोकळ्या जागेकडे जातील. महिलांचा डब्बे आणि फर्स्ट क्लासचे डब्बे हे शेवटी आणि सुरुवातीला ठेवल्यास मधले जनरल डब्बे जोडु शकतात. उदा. १५ डब्ब्यांची गाडी मधे दोन्ही बाजुचा दीड डब्बा जर महिलांसाठी आरक्षित ठेवला आणि उरलेला अर्धा डब्बा महिलांकरीता फर्स्टक्लासचा ठेवल्यास सध्या असलेल्या जागेपैकी जास्त जागा महिलांना आणि फर्स्टक्लासवाल्यांना मिळेल. त्यानंतरचा १ डब्बा पुरुष फर्स्टक्लास साठी ठेवावा म्हणजे दोन्ही बाजुंनी ३-३ असे ६ डब्बे महिला आणि फर्स्टक्लास यांच्या वाटणीला येतील आणि त्या मधले ९ डब्बे जनरल होतील ते आतुन एकमेकांना जोडावे म्हणजे गर्दीची विभागणी होउन डब्ब्यांमधे जास्त गर्दी होणार नाही.<<<

विशेष गर्दी नसलेला (अगदी फर्स्टक्लासचाही) डबा मुंबईत दिसणे ही लक्झरीच म्हणायला हवी. तसेही, सकाळी साडे सात ते रात्री नऊ हा कालावधी सोडला तर इतरही 'विशिष्ट गर्दीवाल्या' डब्यांमध्ये जागा मिळू शकेल. पण तेव्हा प्रवास करणार्‍यांसाठी हा धागा खचितच नसावा.

३) इंटरनेटचे युगः- आजकालच्या जमान्यात इंटरनेटचा वापर जास्त होउ लागला आहे. तिकिटघरांसमोर इतक्या रांगा लागलेल्या असतात की बारशाला जायचे असल्यास लग्नालाच पोहचतो की काय असे वाटु लागते. त्या मधे देखील सणावारांना आणि महिन्याच्या १-१० तारखेला जास्तच गर्दी असते. मासिक पास काढायचा राहुन जातो. मग सकाळी होणारी धावपळ होतच असते. एक तर ऑफिस मधुन २ तास गर्दीत उभे राहुन आल्यावर पासच्या रांगेत उभे राहण्याचे त्राण नसते तर सकाळी लोकल ट्रेन सुटु नये म्हणुन होत असलेली धावपळ दोन्ही ठिकाणी वेळ काही जमत नाही. मग लेटमार्क वगैरे वगैरे बर्याच गोष्टी घडतात. म्हणुन रेल्वेने मुंबई लोकल साठी वेगळी वेबसाईट सुरु करुन तिथे ई-पास / ई-तिकिट काढण्याची सोय ठेवावी. मोबाईल मधुन कंम्पुटर मधुन लोक हव्या त्यावेळी तिकिट्स पासेस काढु शकतात त्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचेल. त्याचबरोबर "पेपर"ची बचत देखील मोठ्या प्रमाणात होईल तिकिट छपाईचा खर्च कमी होईल. मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर देखील उपयोगी होउ शकतो. <<<

सजेशन फार आवडले.

चु भु द्या घ्या

>>राज मी श्रेयनामावली लिहीली नाही <<
कमाल आहे. झालेली चुक मान्य करुन (ती सुधारतो असं जाहिर करुन) ती न सुधारता भलतंच कारण पुढे करुन सारवासारव का करताय?

रांची ते धनबाद हा प्रवास ट्रेनच्या टपावरून करणार्‍या विनातिकीटवाल्यांचा आदर्श ठेवणे व त्यांचा तिरस्कार करत व्यवस्थित जागा मिळावी ह्यासाठी प्रयत्न करणे ह्या दोन विचारधारांचा रेशिओ मैलागणिक बदलत नागपूरपर्यंत येईस्तोवर 'ट्रेनकेलिये कौन रुकता बे, बर्डीसे जीप ले' ह्या 'लेव्हलला' येतो आणि कोण्या एका संकेतस्थळावर रेल्वेमंत्र्यांसाठी सजेशन्स मागवली जातात. (ह्या उल्लेखाबद्दल मनापासून क्षमस्व, हे विधान सरकारी खात्याच्या बंडल कारभाराबाबतचे उपरोधिक विधान आहे, इतर कोणताही अर्थ काढण्यात येऊ नये कृपया)

रेल्वेचा कारभार सुधारण्याची सजेशन्स सरकारला देणे हे स्तुत्यच, पण मिळालेल्या रिसोर्सेसचा वापर जबाबदारीने करणे ह्या विचारापासून (सुमारे) पन्नास टक्के जनता दूर आहे. निव्वळ बेकायदा वागणार्‍यांना अद्दल घडवली तर अनेक प्रवास सुलभ होतील. ह्या विधानात मुंबईतील लोकल ट्रेन्स अभिप्रेत नाहीत.

पुन्हा चूक भूल द्या घ्या

मुंबई आणि पुण्याच्या बाहेर महाराष्ट्र आहे ह्याचा विचार ठेवला तरी पुष्कळ झालं.
आधीचे रेल्वे मंत्री नाहीतर महाराष्ट्राला काही द्यायचं झाल तर मुंबईलाच काहीतरी. आणि राज्य सरकारकडून पण मागणी जास्तकरून मुंबईसाठी. मराठवाड्यात अजूनही रेल्वे नावालाच आहे. बर्याच जिल्ह्याच्या ठिकाणी अजूनही नाही.

मुंबई आणि पुण्याच्या बाहेर महाराष्ट्र आहे ह्याचा विचार ठेवला तरी पुष्कळ झालं. > धागा कृपया नीट वाचुन घ्यावे. मला जास्त करुन मुंबईचे माहीत असल्याने तिथले लिहिले आहे. आणि सगळ्यांना विनंती देखील केली आहे की महाराष्ट्राच्या इतर भागाचे देखील समस्या लिहा जेणे करुन आपल्याला सगळ्या समस्या सल्ले सुचना एकत्रित मिळतील.

सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेसला पुणे - हैदराबाद प्रवास करण्यास पुणे-हैदराबाद व्होल्व्होपेक्षा अधिक वेळ का लागतो ह्याचा तपास (जरूर वाटल्यास) करा! किंवा, प्रामुख्याने 'ट्रेन'संदर्भात भारतीय संस्कृतीची भाषावार प्रांतरचना कशी बोंबलत जाते आणि नैतिकतेचे प्रमाण प्रादेशिकरीत्या का आणि कसे बदलते ह्याचा अभ्यास करा (आवश्यकता भासल्यास). > बेफी सुचना स्पष्ट करा . असे काही असेल हे वर बहुतेक माहीती ही नसेल. त्यामुळे सविस्तर लिहिलात तर बर होईल.

सर्वे करणार्‍या टीमला लाच देवून, धुळे-चाळीसगाव पॅसेंजरच्या फुकट्या गिर्‍हाईकांची संख्या दाखवली जाते, व ही लाईन तोट्यात जाईल असे अहवाल पाठविले जातात. वास्तविक किमान १ रेल्वे भरून प्रवासी रोज मिळतील, व त्यातले निम्मे एसीचे तिकिट काढणारे असतील, अशी परिस्थिती आहे>
नक्कीच इब्लिस हे प्रोब्लेम्स खालच्या थरावरच जास्त असतात त्यामुळे वर इच्छित स्थळी पोहचण्याआधीच त्याचा सोक्षमोक्ष लावला जातो. असे वर डायरेक्ट पोहचायला पाहिजे.

Pages