होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल श्रीने इशारा दिला होता की त्या कळकटची मुलं पण कळकट होतीलं. पण त वरून ताकभात कळेल तर त्या श्रीच्या आया कुठल्या Wink

काल श्रीने इशारा दिला होता की त्या कळकटची मुलं पण कळकट होतीलं. पण त वरून ताकभात कळेल तर त्या श्रीच्या आया कुठल्या>>>>>>>>>>>>> हो हो. Lol

पण त वरून ताकभात कळेल तर त्या श्रीच्या आया कुठल्या >> नको तेव्हा सुतावरून स्वर्ग गाठतात ह्या बायका आणि गरज असेल तर त वरून ताकभात सुद्धा ओळखता येत नाही ह्यांना :(...आता काय 'काळजात खोल खोल' करत गोकुळात अश्रूंचा महापूर येणार...त्यात ते सगळेच वाहून गेले त फार बर होईल Proud

आयला ती बेबी तर तव्यावरच बसली होती. किती तो कजागपणा. मारामारी करायला तयार.... प्रसाद ओक उगाच नाक फेंदारत, फुस्कारत उभा होता. जरा ज्यास्तच ओवरअ‍ॅक्टींग झाली.

आणि श्री ची आई, हातात पदराचा बोळा घेवूनच तयार असते. आणि डोळ्यात टॅप बसवलेला. जरा काही झाले की, टॅप ऑन करायचा, पदराचा बोळा तोंडात आणि खाली मटकन बसणे. Proud
आणि ती मोठी आई म्हणजे डोक्यावर पडल्याप्रमाणे डोळे गरागरा फिरवणे, चोरून एकणे हे करायला तयार, बाकी अक्कल काही नाही.

सरू मावशी तर कहर आहे अडाणीपणाचा, अत्यानंद महाराजपुढे रडणं काय नी काय...

एकूणात सगळ्या बाया इतक्या अडाणी कश्या जर आईआजी इतकी शिकलेली, सुधारलेली विचारांची आहे तरी... काहीच वाण नाही घेतलं का?

कोणालाचा स्वतःची मतं नाहीत. सगळ्या मठठं.

जान्हवी उशी कधी बांधणार? Proud

एकताच्या क्यों की मध्ये वर्षभराने उशी बांधत बाया( सिरियलच्या एका वर्षाने) तोवर गरोदरच. म्हस परवडली आमची.

मला आपली 'कला" च आवडते. कुसके टोमणे मारत मस्त काम करते. Proud नवर्‍याला ढकलून पुन्हा शेपूट वाकडं.

जान्हवी उशी कधी बांधणार?>>:D

कला लोकांच्या कलाने घेऊन कालांतराने कलकलते. मधेच कलाकलाने वाढते व कमी होते.

जानीला फटाक फटाक फटकावल्यामुळे आम जनता खूश झाली मात्र. बेबोचा टीआरपी जबरी वाढला. बेबोचे संवाद मीच लिहिले होते की काय असे वाटले घरच्यांना.

एकदा चक्कर किंवा मळमळ होउन प्रेग्नंसी कन्फर्म झाली की नउ महीने एकदम ठणठणीत असतात.... तरीपण डिलीवरीच्या वेळेस प्रॉब्लेम व्हायला तयार असतात.. प्रॉब्लेम्स तरी काय थेट आई किंवा बाळ यांच्यातली एक चॉईस >> Rofl

आजकाल तर ज्या मैत्रीणींचे लग्न झाले त्यांच्यापैकी कुणी प्रेग्नेंट असल्यावर मी सुद्धा सांगु शकते त्यांच्या चेहर्‍यावरचा ग्लो बघुन .. Lol

आणि नका हो त्या आयांना बोल लावु..सारख सारख गोड खावून कस मळमळायला लागत तस जानीचं गोड गोड बोलण ऐकुन त्यांना पन ती असली कि मळमळायला होत असणार.. आता हित स्वतःला उलट्या होण्याच्या मार्गावर असताना कोई खाक दुसरे कि और देखके ," ए आयटम, तु प्रेग्नेंट है क्या ?" असं म्हणायला धजणारे Wink .. उगा बिचार्‍यांवर आळ.. आणि तसपन तिला पाहुन कुणीही सांगु शकत.. जानी प्रेग्नेंट..हो हि नही सकता .. कैच्याकै Lol

अगगां.. काय ते एक एक प्रतिसाद! Rofl
सिरीअल्च नाव बदला - येणार का बाळ या वर्षी!

ते सरु मावशीचं अत्यानंद महाराज मध्यंतरी बंद पडलेलं आता पुन्हा सुरु झालय. बहुदा जुयेरेगा मधल्या बाबाजींना कॉम्प्लेक्स आणायचा विचार दिसतोय तरीही टी आरपी काय वाढायचा नाही.

व्हॉट्सअप आणि फेबु वरच्या 'काहीही हां' सिरीज जोक्सच्या ओव्हरडोसमुळे की काय कुणास ठाऊक काल कांताही जानीला 'काहीही हां' वरुन चिडवत होता.
आता पब्लिक डिमांडवरुन एक आख्खा एपिसोड 'काहीही हां' आणि 'कलाsss गप्पsss बैस' ने भरलेला असल्यास आश्चर्य वाटायला नको Wink

कालचा एपिसोड - कार्ल्याची भाजी, मला कशी आवडत नाही, तब्येतीला कशी चांगली आहे, मग जेवण भरवणे, उलटी होणे, मग जॉगिंगला जाणे. तिथे एक काहीही हं. आणि ट्रॅक सूट मध्ये श्रीजानी!!! हताश होउन चॅनेल बदलले. तिकडे सोनी मॅक्ष २ वर चांदणी नाचत होती. ते बघितले.

परवा एका भागात बेबी अत्या रडत असते..आणि बडबडत असते..
." असा कसा ग वागला श्री माझ्याशी...एवढासा होता मी त्याला हातत घेतलं तेव्हा...रताळ्यासारखा लाल होता"

काय ही उपमा...रताळ्यासारखा ? येउनजाउन सफरचंदासारखा तरी म्हणायचं ना ?
अशक्य हासले मी या वाक्याला...

किती गरीबी झालीये शब्दांची

हो हो स्मिता.. नेमकी मी जेवत होते त्या सीनच्या वेळेस, फस्सकन हसु आल पण घास तोंडात असल्याने तोंड उघडता नाही आल..

रताळ्यासारखा म्हणूनच पुढे श्रीला दाढी फुटलेली दिसतेय. कन्दमूळ आहे ना शेवटी.खो खो>>>

अशक्य आहे ही कमेंट... Rofl

Pages