रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहनिल च्या वरच्या (मला आवडलेल्या) रांगोळीत सुपारीची आयडीया वापरलीये का?>>> अगदी बरोबर रिया Happy

घरी पाहुणे असल्या मुळे सध्या रांगोळ्यांचे फोटो काढायला वेळ मिळत नाहीये..
लंच टाईम मधे कागदावरच काढलेली २१ ते १ हत्तीची रांगोळी.. रंग भरल्यावर खुप भारी दिसते..
पहिली ओळ २१ थेंबांची मग दोन्ही बाजुनी एक एक थेंब सोडुन कमी करत करत १ वर आणायची. असे दोन्ही बाजुनी
करायचे.. म्हणजे पहिली ओळ २१ थेंबांची, दुसरी १९ ची तर तीसरी १७ ची अस...
rangoli1_1.jpgrangoli2 001_0.jpg

नलिनी छान रांगोळी, अजुन येऊ देत...

धन्यवाद टिना..
आशिका मस्तच..

मला थेंबांच्या रांगोळ्या खुप जास्त आवडतात..
ही रांगोळी मी बहुतेक सोमवारी काढते... शिवलींग आणि बेल पानं.. तुम्ही पण काढुन बघा...

१२ ते १२ च्या ४ ओळी, मग एक एक थेंब कमी करत ४ पर्यंत (दोन्ही बाजुनी)

rangoli2 002.jpg

सायली... छानच रेखाटने.

रांगोळी संदर्भात, विजया मेहता यांनी " झिम्मा" पुस्तकात लिहिलेला किस्सा.
केरळमधे भद्रकाली देवीची रांगोळी सर्व पुजारी मिळून काढतात. तिची पूजा झाली कि सर्व पुजारी पायाने ती रांगोळी विस्कटून टाकतात आणि ती मिश्र रांगोळी भक्तांना प्रसाद म्हणून देतात... या रुढीचा विजयाबाईंच्या नाटककलेच्या
विचारात महत्वाचे स्थान आहे.

तिबेट मधेही अत्यंत किचकट अशा तांत्रिक रांगोळ्या काढतात.

अनेक जून्या मराठी चित्रपटात नायिका रांगोळी काढताना दाखवतात.. पण ती आधीच कुणीतरी काढलेली असते ते सहज जाणवते... ! ( वहिनीच्या बांगड्या, संत ज्ञानेश्वर, भाभी की चूडीयाँ..... )
देव दिनाघरी नाटकातही, उठी उठी गोपाळा या गाण्यात, " रांगोळ्यांनी सडे सजवले" या ओळीच्या वेळी रांगोळी
काढताना दोन अभिनेत्री दिसत.... हे सगळे असेच, अवांतर बरं का Happy

धन्यवाद दिनेश दा... अवांतर वगैरे काही नाही हो.. उलट मी तुमची विचार सरणी आणि ध्न्यान बघुन नेहमीच अचंबीत होते..

मी आजही जुने फोटो (आई , बाबंच्या लग्नातले, बाबांच्या मौंजीतले ब्लॉक अन्ड व्हाईट,तो एक एक फोटो बटर पेपेर च्या खाली ठेवलेले असतो तो अल्बम नाही का) त्यात सुद्धा पंगतीत काढलेल्या, आंगणातल्या, हळदी कुंकाला काढलेल्या रांगोळ्या बघते आणि काढण्याचा प्रयत्न करते... आणि खुप चकीत होते पणजी आजी, आजी, आत्या कीत्ती हुषार होत्या,अगदी बारिक रेघा, काय रांगोळ्या असायच्या त्यावेळी, वेल तर इतके सुबक... आहाहा!

सगळयांच्या रांगोळ्या खूप छान आहेत. सायली, टिना तुमच्या रांगोळ्या खासच आहेत.
आंध्र आणि कर्नाटकातसुद्धा तांदूळाच्या पिठाच्या रांगोळ्या रोज सकाळ संध्याकाळ काढतात. आईला तां.पी. ची छान येते, मला अजून नाही जमत. मी खडूने काढते. जमिन ओली करुन त्यावर ओल्या खडूने रांगोळी काढते. कोणी पुसायचा प्रॉब्लेम नाही. Happy
http://kolangal.kamalascorner.com/ इथे पारंपारीक रांगोळ्या खूप छान आणि सोप्या पद्धतीने दिल्या आहेत. आवडता ब्लॉग आहे.

आभार सायली,

आरती. छान आहेत त्या रांगोळ्या.

बंगालमधे पण तांदळाच्या पिठाची रांगोळी काढतात.. बहुतेक अल्पना असे नाव आहे त्याला.

दिनेशदा मलापण दिवाळीला पणत्या लावताना आशा काळें यांच 'आली दिवाळी' गाणं हे हमखास आठवतं. कधीही हे गाणं लागलं की दिवाळी असलयाचा फील येतो. मस्त प्रसन्न वाटतं. Happy
मस्त स्केच रांगोळीचे आणखिन पारंपारिक व जुन्या स्केच बघायला आवडतील सगळ्यांचेच .आरती छान आहे ब्लॉग . तांदळाच्या पिठामागे एक कारण हेही वाचलं होतं की तांदळाच्या रांगोळ्या (कोलम)काढ्ल्यावर दुसर्या दिवशी पर्यंत ते पीठ मुंग्या खातात अश्या प्रकारे निसर्गाशी हानी न होता समतोल साधत असत.मुंग्याचंही पोट भरण्याच पुण्य मिळतं असं त्या ठिकाणची जुनीजाणती लोकं म्हणतात.

सायली, वरती धाग्याच्या मजकुरात आणि वसुबारस ची ठीपक्यांची रांगोळी आहे तीचे डिटेल्स लिही ना.

संस्कार भारती काय प्रकार आहे? >>>> इथे माहीती आहे.आठ भाग आहेत सगळे उघडुन बघा.

http://www.school4all.org/index.php?option=com_content&view=article&id=6...

आणि अदिति ,संस्कार भारती रांगोळ्यातर सगळ्यांच्या तुला या धाग्यावर आणखिण दिसतीलच. Happy .

आरती , सिनी मस्त साईट... वेल धन्यवाद..
हेमाताई खुप खुप धन्यवाद..:)

ही उदबत्तीच्या काडीनी काढलेली...
k.jpg

टिना, रिया... धन्यवाद

ही काल रात्री माझ्या धकट्या बहिणीनी कंगव्यानी काढलेली मेणबत्ती...
पहिले पांढर्‍या रंगानी जाड उलटा टी शेप काढुन घेतला, मग कंगवा एकदा उजवी कडुन एकदा डावी कडुन फिरवत आणला, खालच्या डीझाईन साठी बोटांचा वापर केला आहे... सगळ्यात शेवटी ज्योत काढली आहे... त्या साठी
एक एक चिमुट जवळ जवळ सगळेच रंग घेतले आहेत, नंतर त्या वेगवेगळ्या रंगाच्या ढीगावर खालपासुन वरच्या दिशेला एक टिचकी मारायची... (जशी आपण कॅरम खेळतांना मारतो तशी..) त्यामुळे ज्योत खुपच न्याचरल वाटते..
candle.jpg

लाईट मुळे फोटो धुसर आहे... तीनी सांगीतल की कंगव्याच्या ऐवजी कंगोर्‍याचा शिंपला पण वापरता येतो...

पेरु ही घ्या वसुबारस ची रांंगोळीचे डीटेल्स.. Happy
१५ ते १५ च्या ३ ओळी, मग एक एक थेंब कमी करुन दोन्ही बाजुनी ३ येई पर्यंत...
शींग अंदाजे काढायचे, तीथे थेंब नाहीयेत..

peru.jpg

खुपच छान सायली. सगळ्याच रांगोळी खुप खुप छान आहेत हं, मुलींनो. अगदी पहात रहावश्या वाटतात.

Pages