मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनी कूकिंग ऑइल आणि फेविकॉल च्या नवीन एड्स मस्त आहेत.

सनी ऑइल च्या नवीन ऍड स्त्रियांना वेगवेगळ्या सिचुएशन कश्या हॅन्डल करायच्या हे स्वतःच ठरवा अश्यावर बेस्ड आहेत. आईला समजले की तिचा किशोरवयीन मुलगा त्याच्या ममाच्या सेलफोनवर अश्लील पहात आहे. ऍड मध्ये एक आई मोबाईल शोधत येते मुलगा मोबाईल बघत असतो ती म्हणते बेटा रेसिपी देखनी है मोबाईल देना आणि मुलाच्या हातून मोबाईल घेते मुलाचा चेहरा घाबरलेला आणि कॅमेरा आईच्या हातातील मोबाईल च्या स्क्रीन वर पॉर्न साईटवर पॉर्न पाहत असतो (हे ब्लर दाखवले आहे) आणि मग व्हॉईसओव्हर लाईन येते इस सिचुएशन को कैसे हॅन्डल करना है ये आप डिसाईड किजीये "लाईफ आपकी, रेसिपी आपकी"
ऍड आणखी एक स्पॉट अशा महिलेचे प्रदर्शन करते जी गर्भधारणेच्या गुंतागुंतातून जात आहे आणि तिला निवड करावी लागेल - तिने बाळाला ठेवले पाहिजे की नाही.
फेविकॉल ची ऍड एक लाकडी सोफा जो वर्षानुवर्षे चालतो यावर आहे.

बिकाजी च्या अमिताभला घेउन केलेल्या 'अमितजी, लव्ह्ज बिकाजी' जाहिराती मस्त आहेत.

लव्ह फॉर बिकाजी 'इज इन द एअर'
https://www.youtube.com/watch?v=89VEWPvvAyo

आज तो हॅटट्रिक पक्की!
https://www.youtube.com/watch?v=weMXJSGXOno

मला आवडलेल्या काही:
थँक्यू मॉम - पी अ‍ॅन्ड जी
https://www.youtube.com/watch?v=BnBvlz8EaZ0

लाइक अ गर्ल - ऑल्वेज
https://www.youtube.com/watch?v=XjJQBjWYDTs

डंब वेज टू डाय - पब्लिक सर्विस अनाउन्समेन्ट (मेट्रो ट्रेन्स मेलबर्न)
https://www.youtube.com/watch?v=IJNR2EpS0jw

१९९५ च्या आसपास कॅसेट्स बाजारातून हळूहळू गायब होऊन त्यांची जागा सीडीज् घेत होत्या असा एक कालखंड होता. आता तर सीडीज सुद्धा आउटडेट झाल्या हा भाग वेगळा. पण ती काहीच वर्षे अशी होती जेंव्हा गाण्यांच्या कॅसेट्स आणि सीडीज् दोन्ही मार्केट मध्ये होत्या. त्या काळात रेडिओवर कशा जाहिराती असायच्या, ते आज सहज आठवले. सीडी मधल्या एखाद्या गाण्याची एकच ओळ प्ले होत असे आणि पाठोपाठ तीच ओळ जाहिरात करणारा एकदम स्टाइलीश बोलायचा. उदाहरणार्थ:

१. तुम्हे याद करते करते जाएगी रैन सारी... तुम्हे याद करते करते... कॅसेट्स अँड सीडीज

२. दिल ढूँढता है फिर वही, फ़ुरसत के रात दिन... दिल ढूँढता है फिर वही... कॅसेट्स अँड सीडीज

३. होठोंसे छू लो तुम.... कॅसेट्स अँड सीडीज

इत्यादी इत्यादी

शाळेचे दिवस होते. ते सतत ऐकल्याने त्याच टोन मध्ये आम्ही भाऊ भाऊ घरी काहीही बडबडायचो.

मला भूक लागली आहे... कॅसेट्स अँड सीडीज
चल बाहेर खेळायला जाऊ... कॅसेट्स अँड सीडीज

Lol

फिट तरुणी आणि गब्दुल तरुण शर्यत पूर्ण करतात ती जाहिरात गोड आहे. पण कसली जाहिरात आहे, तो काय म्हणतो काही कळत नाही Lol

जाहिरात गोड आहे. पण कसली जाहिरात आहे, तो काय म्हणतो काही कळत नाही >> मीही आजच पहिली
घड्याळाच्या बेल्ट ला अडकवायची ज्वेलरी आहे

सध्या कोलगेटची आजीबाईंची ऍड आली आहे , दात आहेत की नाही नक्की समजत नाही पण दात नसते तर पेस्टच्या ऍड मध्ये कसं घेतील .. अगदी बघवत आणि ऐकवत नाही . व्हिडिओवर आली आणि स्किप होत नसेल तर झटकन व्हिडीओ बंद करून टाकते .

सध्या कोलगेटची आजीबाईंची ऍड आली आहे , दात आहेत की नाही नक्की समजत नाही पण दात नसते तर पेस्टच्या ऍड मध्ये कसं घेतील .. अगदी बघवत आणि ऐकवत नाही . व्हिडिओवर आली आणि स्किप होत नसेल तर झटकन व्हिडीओ बंद करून टाकते . >>>>> कटिंग मशीन वाली ना......मला अजिबात आवडत नाही. मुलगी म्हणाली म्हातारी आज्जी आहे अशी का रागावतेस तर तिला म्हटलं तेच तर तोंडात कवळी सुद्धा नाही तर का करतेय हि ऍड ????

येता जाता एफ एम रेडीओ ऐकावा तर जाहीराती ऐकवत नाहीत. शाळेतली मुलं गॅदरींगला नाटक बसवताना तरी मेहनत घेतात.
या जाहीराती अगदी रद्दड असतात.
https://www.youtube.com/watch?v=Ri53V0jVaVw

चुकीचे ऐकू येण्यासाठी ना यमक ना प्रास !

दुसरी एक आर बी आय लोकपालची जाहीरात आहे.
यातला आवाज अमिताभच्या शैलीत मराठीतून बोलत असतो. मुळात पातळ आवाज, त्यात अमिताभचा आवाज काढण्यासाठी ढेकर देताना गळ्यात आवंढा आणून बोलले कि झाले अशा थाटात तो माणूस पूर्ण जाहीरातीत बोलतो आणि शेवटी त्याच आवाजात अमिताभ प्रमाणे हसतो सुद्धा..
https://www.youtube.com/watch?v=B5uAN5icep8

हे दोन्ही व्हिडीओ बघताना एव्हढे खटकत नाहीत. इथे रेडीओच्या जाहीरातीची लिंक देता येते का म्हणून शोधले तेव्हां हे व्हिडीओ मिळाले. मूळ हिंदी जाहीरातीचे मराठी डबिंग आहे. व्हिज्युअल्स प्रमाणे डबिंग इतपत ठीक आहे. पण रेडीओ साठी तोच ऑडीओ त्रासदायक वाटतो. नवीन ऑडीओ जाहीरात बनवणे अवघड नव्हते.

हो… त्या इंदिरानगर का गुंडा ॲडस् खतरनाक होत्या. इतक्या गाजल्या की इतर ब्राण्ड्सनी त्यावर पिगीबॅक केलं होतं.
बिईंग राहूल द्रविड त्याने अलिकडेच कबूल केलं की या ॲडस् पाहून त्याची आई त्याला ओरडली Bw

धमाल आहे.. दोनदा पाहिली दोघांची अदाकारी बघायला
या आधी कधी आलेले का हे एकत्र जाहिरातीत?

धोनीची नवी ऍड
https://youtu.be/pa3UKc18A-U?si=YOFe2qKmN84oUol2
धोनीचं ऐकायचं झालं तर माबोवरचे सगळे क्रिकेटचे धागे ओस पडतील. Proud
पण धोनी बोलतोय त्यात तथ्य आहे माझा नजर बीजर वर विश्वास नाही तरीही नायतर आपण 2003 लाच गांगुलीच्या हातून सचिनला वर्ल्ड कप जिंकून दिला असता .पण ते 2011ला धोनीच्याच नशिबात होत.

ही अजून एक रनवीरची
https://youtu.be/xjNnqRngdzs?si=rnBiMcsDKknYLhNK

ती एक कशाची जाहिरात होती..
ज्यात त्याची ट्रेन हुकते पण ती ट्रेन थांबवते
शेवटी lucky guy की असेच कायतरी बोलते..

शिल्पा शेट्टीची एक जाहिरात आहे. किसान कनेक्टची.
त्यात ती एका अगम्य शेतात उभी आहे. शेतात एका बाजूला थबकून हात किंचित ऊंचावून म्हणते
"ओ पाटील भाव ( भाउ पण नाही बरं का), जरा पालक द्या की"
ते पाटील भाऊ शुभ्र सदरा, शुभ्र टोपी आणि त्यावर शुभ्र उपरणं (ते ही बंगाली पद्धतीने खांद्यावर बसवून) म्हणतो, " अभी अभी ताजा ताजा निकाला है"

लगेच शिशे डावीकडे वळून म्हणते "कसं काय सावित्रीताई, रत्नागिरी के आम है ना? "
सावित्रीबाईंनी काठापदराची नऊवारी नेसलीये जणू काही आत्ताच बालगंधर्व किंवा कट्यारच्या शूटींगला निघाल्यात. चेहऱ्यावर कुठेच उन्हाचा राप नाही. शैतकरी मेकअप केलेला आणि आसामात असते तशी बांबूची टोकरी कमरेवर तिरकी ठेवून डाव्या हाताने आधार दिलाय. त्यात आंबे भरलेत.
" खाऊन तर बघा, अगदी गोड आहेत तुमच्या सारखे"
आता शिशे गोल फिरते.
"ओ जाधव भाव, टमाटर खत्म हो गये (इथे लाडीक सुर),"
जाधव भाव ने आकाशी रंगाचा चांदोबा मधला सदरा घातलाय जो कॉलेजमधे मुलं ट्रेडिशनल डे ला घालतात. स्वच्छ घडीचा फिटिंगचा पाजजमा + टोपी. आणि गळ्यात घडीचं उपरणं गळ्याभोवती दोन्ही बाजूनं घेतलेलं. नाना पाटेकर स्टाईल.
"अब बस ऑर्डर करो (यातल्या रो वर आलाप), फार्मर्स एक्स वाय है ना"

असं कोणतः शेत असतं जिथे एका बाजूला कोकणातला रत्नागिरीचा आंबा, एका बाजूला पुणे नाशिकचे टमाटर आणि एका बाजूला कोल्हापूरची पालक लावलेली असते? ते ही किंचितसं वळलं कि दिसतं. गिरकी पण घ्यावी लागत नाही.

उपरणं घेऊन शेतीची कामं करताना बहुतेक घाम पुसता येत असेल. तरी ते उपरणं स्वच्छच राहतं, घडी सुद्धा मोडत नाही.

टोकरी काखेत धरूनच आंबे वेचतात. चहाची पानं आणि आंब्याची शेती अगदी सेमच. वाकून आंबे खुडायचे कि टोकरीत टाकायचे.

टोमॅटोची झाडं डोक्याच्या वर वाढतात. उभ्याने टमाटर काढायला लागतात.

पालक कशी काढायची हे दिसलं नाही. पण बहुतेक झाडावर चढून कोयत्याने काढत असतील.

त्यात शिल्पा शेट्टीच्या महागुरूस्टाईल विस्मयकारी भुवया + बसका गोल चेहरा आणि बांबू सारखी उंची, म्हशीने पाय दिल्याने वाट सोडून शेंड्यापर्यंत घाटरस्त्याने घरःगळलेलं नाक आणि दुष्काळात तेरावा म्हणून गांव कि गोरीचा मैखितूअ मोड. बरं एव्हढी शेतमॉल मधे फिरते, खरेदी करते तर साधी पिशवी पण नाही हिच्या कडं. आम्ही सासवडच्या शेतकरी बाजारात किती पिशव्या नेतो. किती फिरावं लागत. हिच्या कडे हिने बोट केलेला शेतमाल कृषी मंत्री डोक्यावर घेऊन घरी येत अशतील.

अविस्मरणीय जाहीरात आहे . केव्हढा अभ्यास केलाय शेतीचा.
https://m.youtube.com/watch?v=vkglmulZRXY&pp=ygUfa2lzc2FuIGNvbm5lY3Qgc2h...

रानभुली,
अगदी भारी लिहिलंय Rofl
त्या बाईने नथ घातली आहे, ते टोपलं म्हणजे दिवाळीत चॉकलेट भेट देतात तसलं वाटतंय. त्याला बंद आहेत.
टोमॅटोची १५ फुटी रोपं पाहून मी सुद्धा अवाक् झालो. कोणतं वाण हे Lol

Pages