ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2014 - 02:49

माझ्या "फ्रेंडस अ‍ॅण्ड कलीग्ज" या धाग्यावर `बेफिकीर' यांनी सुचवल्याप्रमाणे "ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव" हा वेगळा धागा काढत आहे.

धाग्याचा फायदा सर्वांनाच, खास करून माझ्यासारख्या ४-५ वर्षांचा अनुभव असलेल्या आणि तुलनेत मॅनेजमेंटच्या लोअर लेव्हलला असलेल्यांसाठी येथील अनुभवी लोकांचे अनुभव, त्याचे विश्लेषण आणि एक्स्पर्ट टिप फार मोलाचे ठरतील.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगी भारी, एखादी स्टोरी असावी तसा अनुभव आहे Happy

ईथले अनुभव रिलेट होत आहेत, तसेच त्यातून काही टिप्सही मिळत आहेत..

धन्यवाद सर्वांना...

बापरे योगी. असे अगदी होते. माझ्याक डे खूप अनुभव आहेत पण लिहू शकत नाही.
@अमा तुमचे पण अनुभव लिहा हो...आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल.

ऋन्मेष, भरत, अनेक वेळा ऑफिस मध्ये किंवा इतरत्र व्यवसायिक नीतिमूल्य, आर्थिक फायदा हे सोडून राजकारण महत्वाचे असते असे वाटू शकते. परंतू हा एक काही विशिष्ट अनुभवातून निर्माण झालेला नकारात्म द्रुष्टीकोन असू शकतो.

बहुसंख्य कर्म क्षेत्रांमध्ये बहुसंख्य व्यक्तींच्या हिताचे निर्णय घेतले जातात. हे निर्णय आपल्या द्रुष्टीकोनातून व्यवहार्य किंवा व्यावसायिक नीतीमत्ते ला धरून अथवा आर्थिक शिस्तीला धरून असतीलच असे नाही त्यामुळे
हे राजकारण वाटू शकते. त्यामुळे बहुजन हिताय काय आहे याचा विचार करावा. मग ते व्यावसायिक क्षेत्र असो किंवा वैयक्तिक आयुष्य. ज्या क्षेत्रात बहुसंख्य व्यक्ती कमी सुखासीन आहेत त्या क्षेत्रामध्ये सकारात्मक गोष्टी करायचा प्रयत्न करावा.

अंतरंगी, भगवद्गीते च्या संदर्भा वरून आठवले, गीते मध्ये सुध्दा अशा स्त्रीयांना आणि क्षुद्रांना कमी लेखले आहे असे वाटेल असे श्लोक आहेत. वस्तुतः गीतेचे तत्वज्ञान पाहिले तर ते संकुचित विचारांना पाठींबा देणारे असेल असे वाटत नाही. या वर एका अभ्यासकाने असे मला सांगितले कि, जर त्या काळाचा बहुसंख्य समाज स्त्री यांना आणि क्षुद्रांना दुय्यम स्थान देणारा असेल आणि त्याला गीतेमध्ये विरोध केला आहे असे त्यांना वाटले असते तर त्या समाजाने गीतेचे इतर तत्वज्ञानाही स्विकारले नसते आणि ख्रिस्ता प्रमाणे व्यासांनाही क्रुसावर चढवले असते.

आपल्या संदर्भात बोलायचे तर, बहुजनास जे योग्य वाटेल ते व्यवसायिक नीती मत्ता किंवा अर्थिक शिस्त यापेक्षा अधिक प्रमाणात स्विकारले जाते.

वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवावे .

हा धागा बर्‍याच वर्षांनी वाचला. इकडे अजून अनुभव यायला हवेत खरं तर. ऋन्मेष ने धागा काढला पण स्वतःचा अनुभव मांडला नाही, असे कसे?

अजून १- कलिग्स ना कधीच फेबू/पर्सनल फोरम वर मैत्री ठेवण्यास अ‍ॅड करू नये. पर्सनल लाईफ दुर ठेवावे.

आशू,
माझा एक अनुभव इथे लिहिलेला. राजकारणाबद्दल असा नसून ऑफिसमध्ये कसे मित्र सुद्धा आधी कलीग असतात यावर होता.
https://www.maayboli.com/node/50993

मग या धाग्यावर जी चर्चा झाली त्यातून या वेगळ्या धाग्याचा प्रस्ताव आला.

अजून १- कलिग्स ना कधीच फेबू/पर्सनल फोरम वर मैत्री ठेवण्यास अ‍ॅड करू नये. पर्सनल लाईफ दुर ठेवावे.
>>>>>

ही घोडचूक फार पुर्वी करून झाली आहे,
त्यावर धागा सुद्धा होता.
ऑफिस व्हॉट्सप ग्रूप - एक डोके दुखी !
https://www.maayboli.com/node/59277

आई ग.. मी सुद्धा आज संध्याकाळीच ही बातमी वाचली.. तेव्हा हाच विचार मनात आला की चार लोकांना सांगावे की नका असा अविचारीपणा करू.. तसेच प्रेशर असेल तर जॉब सोडा, जग नाही Sad

कायदा बदलून असा केला पाहिजे की कामाच्या अती तणावामुळे कुणीही आत्महत्या केली तर त्या व्यक्तीच्या मॅनेजरला ताबडतोब non-bailable अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे (काहीसे हुंडाबळीप्रमाणे). आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीकडे किती वर्कलोड आहे हे प्रत्येक मॅनेजरला माहिती असलेच पाहिजे आणि त्यासाठी तो/ती जबाबदार ठरवली गेली पाहिजे. जोपर्यंत मॅनेजरच्या अंगाला बुडाला थेट धग लागत नाही तोपर्यंत ते सुधारणार नाहीत. हा प्रॉब्लेम अपर मॅनेजमेंटकडून सुरू होतो (नारायण मूर्ती आणि L&T चेअरमन SN Subrahmanyan सारखे दीड शहाणे लोक त्यात अजून भर घालतात) आणि मग हा प्रकार चिघळत कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे पोहोचतो. अतीकामामुळे तणाव व आत्महत्या हा प्रकार ( Karoshi) जपानमध्ये कुप्रसिद्ध आहे.

देशी कंपन्यांमध्ये मिड ल मॅनेजमेंट स्वत:च पिचलेली आहे.
पॉवर नाही आणि काम करून घ्यायचं आहे अशी परिस्थिती आहे.
ते स्वतः:च जबाबदारी मुळे नोकरी सोडण शक्य नाही आणि कामानं पिचलेले कॅटेगरी आहेत.

उबो सहमत. हे असं काही वाचलं की पुढच्या पिढीचं जरा टेंशन च येतं.
नानबा, मिडल मॅनेजमेंट पिचलेलं असणे हे काही कनिष्ठ कर्मचार्याचं शोषण किंवा आत्महत्येचं जस्टीफिकेशन होऊ शकतच नाही. प्लीज.

Pages