ऑफिस व्हॉट्सप ग्रूप - एक डोके दुखी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 July, 2016 - 17:01

कुठल्या कुमुहुर्तावर हि दुर्बुद्धी सुचली देवास ठाऊक पण आमच्या ऑफिसमधील बेचाळीस कर्मचार्‍यांच्या व्हॉट्स्सपग्रूपचा मी एकमेव अ‍ॅडमीन आणि निर्माता आहे. आमची टीम सुद्धा बेचाळीसचीच आहे. हा कसलाही योगायोग नसून आमच्या टीममधील एकूण एक मेंबरला ऑफिस व्हॉट्स्सपग्रूप मध्ये भरती होणे कंपलसरी आहे हा त्याचा अर्थ झाला.

हल्ली एम्पलॉयी म्हटले की मोबाईल आला. मोबाईल म्हटले की तो स्मार्टफोनच झाला. आणि स्मार्टफोन काही व्हॉट्स्सपशिवाय वसूल होत नाही. त्यामुळे सारेच व्हॉट्स्सपधारी आहेत आणि पर्यायाने ग्रूपमध्येही आहेत.

पण या ग्रूपचा जहापनाह मीच का? हा ग्रूप काढायचा शहाणपणा माझाच का? तर मी ऑफिसमधील एक अतिमहत्वाची आणि हरहुन्नरी व्यक्ती आहे, असे काही नाही. मूळ कल्पनेत आमच्या लंचग्रूपचा एक व्हॉटसपग्रूप काढायचा, जेणेकरून दुसर्‍या दिवशी कोण काय भाजी आणणार, कोणाचा डब्बा असणारेय की नसणारेय, त्यानुसार बाहेर जायचा प्लान करायचाय की आहे तोच पालापाचोळा खायचाय हे आदल्या रात्रीच ठरवता येईल. तसेच आज पुढे काय ताट वाढून ठेवले आहे हे सकाळीच समजेल. एवढाच शुद्ध हेतू होता... पण दुर्दैवाने तो गंडला!

सकाळीच पडणारे गूडमॉर्निंग मेसेजेस आणि जोक्स बाय जोक्स ग्रूप रंगात आला,. ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी प्रवासात आणि रात्री झोपण्यापूर्वी पडल्यापडल्या बिछान्यात, ग्रूपवर चर्चा झडू लागल्या,. ग्रूपवरचे किस्से ऑफिसमध्येही चवीचवीने याला त्याला सांगितले जाऊ लागले. तसे ‘याला घे, त्याला घे’ म्हणत एकेक जण ग्रूपमध्ये वाढू लागला. आणि बघता बघता ४१ जणांची पुर्ण टीम कसं काय म्हणत एका छत्रीखाली जमा झाली. त्याचवेळी दुसर्‍या डिपार्टमेंटच्या कोणालाही ग्रूपमध्ये घ्यायचा नाही हा नियमही पाळला गेला. मात्र त्याच नियमाअंतर्गत बय्येचाळीसवा सभासद म्हणून अखेर आमच्या बॉसनेही ग्रूपमध्ये एंट्री मारली.

आता बॉसने स्वत:च इच्छा जाहीर केल्यावर त्याला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मी साहजिकच तो देऊ शकलो नाही आणि पुढे उद्भवलेल्या परीस्थितीचा सारा रोष ठपका माझ्यावर येऊन पडला.

तर आता कसे फसलो आहोत ते पहा,

१) ग्रूपचे मनोरंजन मूल्य शून्य झाले आहे. सर्व प्रकारची फालतूगिरी जपून करावी लागते.

२) ज्याचा सकाळी लेटमार्क होतो त्याचा आदल्या रात्री बारानंतर ग्रूपवर मेसेज असेल तर त्याची कसलीही चौकशी न करता किंवा त्याने दिलेल्या कारणांवर विश्वास न ठेवता त्याची हजामत करण्यात येते.

३) ऑफिसटाईममध्ये ग्रूपवर मेसेज टाकणे अलाऊड आहे. फक्त जो हे धाडस करेल त्याला त्या दिवशी कामात काही चूक करणे अलाऊड नाही. तरीही केलीच, तर त्याची तासली जाते हे वेगळे सांगायला नको.

४) एखादे काम वेळेत पुर्ण झाले नाही आणि त्या काम करायच्या कालावधीत त्या कर्मचार्‍याचा व्हॉटस्सपवर लास्ट सीन दिसला तर त्याची चंपी केली जाते.

५) कोणी भावनेच्या भरात एखादा कॉर्पोरेट लाईफवर किंवा बॉस या प्रकाराबद्दल विनोद टाकला तर त्याची त्यालाही समजणार नाही अश्या पद्धतीने मारली जाते.

६) ग्रूप सोडून कोणालाही जाता येत नाही. गेलेच तर अतिशय साधेपणाने त्याला पुन्हा ग्रूपमध्ये घ्यायचे फर्मान सोडले जाते. तसेच नंतर त्या ईसमाचा कोंबडा बनवला जातो ते वेगळेच.

७) आम्हाला वेगळा ग्रूप काढायचीही सोय उरली नाही. काढलाच तर ईतर सर्व राहिले बाजूला, ज्याने तो ग्रूप काढला त्याचीच सर्वात पहिले ठासण्यात येईल हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे हे धाडस कोणीही करू ईच्छित नाही.

सर्वांचा सर्व प्रकारे विचार करून झालाय. व्हॉट्स्सपच्या माध्यमातून ही वॉचमनगिरी आता बस्स झाली हे बॉसला खडसावून सांगणे हाच एक उपाय समोर दिसत आहे. अर्थात तो करणे शक्य नाही. एकंदरीत वाईट फसलो आहोत. ‘व्हॉटस्सप वरदान की शाप’ असा निबंध लिहायला सांगितला तर डोक्याला ताप असेच सारे लिहून येतील. यात मी दुर्दैवाने बॉसचा लाडका असल्याने लोकांचे शिव्याशाप अन तळतळाट सर्वात जास्त मलाच खावे लागतात. तेच कमी करायला, काही उपाय मिळतो का बघायला, आपल्यासारखे ईतर कोणी समदुखी असतील तर त्यांचे अनुभव ऐकायला हा धागा काढला आहे. फक्त कृपया ‘ऋन्मेष एक डोकेदुखी’ असा प्रतिसाद टाळा. त्याला पाचपंधरा लाईक पडतील पण धाग्यात भर नाही. सहकार्य अपेक्षित. एक पिचलेला कर्मचारी Sad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वाना किंवा खुप जणांना आधी अ‍ॅड्मिन करा.
नंतर ग्रुप 'चुकुन' डिलीट करा. कळणार नाही कोणी केला ते. रात्री घरुन करा.

आमचे पण ऑफिस ग्रुप आहेत, पण त्यावर ऑफिसात असताना काही टाकलेले चालते, फॉरवर्डिंग हे वेस्ट ऑफ़ टाईम मानत नाहीत.सुट्या, ट्रॅफिक ई चर्चा पण होते.३ हॉबी ग्रुप आहेत ऑफिस चे, आर्ट क्राफ्ट लिटरेचर आणि मदरहुड, त्यावर आता कोणीही काहीही टाकत नाही.
सर्वाना एडमिन करणे ही कल्पना चांगली आहे.
असा ग्रुप म्यूट करुन तो नाहीच असं समजून इग्नोर मारा.

मस्त लिहिले आहेत. समस्या वरवर गंमतीशीर वाटली तरी तशी गंभीरच आहे. एक प्रकारचा वॉचच ठेवला जाऊ शकतो असल्या ग्रूपमुळे! वर सुनिधींनी लिहिले आहे तो उपाय पटलाच. शिवाय बॉसला अ‍ॅडमीन करून स्वतः नम्रपणे अ‍ॅडमीनपद सोडून देता येईल. मग सगळीच जबाबदारी बॉसवर येईल. 'लास्ट सीन' ही सोय रद्द करता येते. सायंकाळी साडे आठनंतर ग्रूपवर काहीही हालचाल करू नका. देवादिकांची स्मरणे, निरुपद्रवी मेसेजेस हे मात्र सकाळी नित्यनेमाने पाठवत राहा. ही नुसतीच समस्या नसून एक संधीही आहे हे आधी लक्षात घ्या. ऑनलाईन वावरामुळे बॉसला खुष करता येते हे विसरू नका. बॉसचे लाडके आहातच तर ते लाडकेपण अधिक वाढत जाईल हे बघा. येणार्‍या प्रत्येक मेसेजला एक संधी माना.

हे अती होतंय. याची जाणीव करून द्या सगळ्यांना आणि सरळ डिलीट मारा. बॉस या कारणावरून नोकरीवरून काढू शकत नाही आणि apraisal त्याने कितीही बरे दिले तरी आपल्या मते तो वाईटच देतो, त्यामुळे यावर्षी आपल्यामुळे आपले apraisal बिघडले असे म्हणायचे.

आमचे ऑफिसचे दोन-तीन पातळ्यांवर ग्रूप आहेत. प्रोजेक्टप्रमाणे तात्पुरतेही ग्रूप बनतात आणि नंतर बरखास्त होतात. विनोद, फॉर्वर्ड्स इ. कटाक्षाने टाळलेच जातात. शक्यतो अतिनिकडीच्या कामासाठीच वापर होतो. वाढदिवस इ. शुभेच्छा वगळता ऑफिसवेळांनंतर हे ग्रूप थंड असतात. ऑफिसनंतर टाकलेल्या मेसेजवर लगोलग रिप्लाय मिळेल, अशी अपेक्षा नसते (जरी ती व्यक्ती ऑनलाईन दिसत असली तरी). थोडक्यात एखाद्याच्या वैयक्तिक मोबाईलवर फोन करताना जे तारतम्य बाळगले जाते त्याप्रकारे या ग्रूपचा वापर होतो.

माझाही ऑफिसचा ग्रुप आहे. रादर दोन आहेत . एक ज्यात मांजरीचा ( पक्षी : मॅनेजर , शब्द उधार - मी अनु ) समावेश आहे. आणि दुसरा आमचा सर्व कलीगचा . पहिला ग्रुप जवळपास डेड आहे . मांजरीने काहीही लिहिल तरीही त्यास फार किंमत द्यायची नाही हे सर्वानुमते ठरलेलं आहे. त्यामुळं तिच्या मेसेजसचा अनुल्लेख केला जातो . दुसरा ग्रुप आमचा स्वताचा आहे तिथे ट्रेक , लंच वगैरे धमाल चालू असते . पण तो ही सुट्टीच्या दिवशी बंद असतो

पहिल्या ग्रुप वर मांजरीने ऑफिस असाइनमेन्ट या गोंडस शब्दाखाली काम थोपवायचा प्रयत्न केलेला . पण तो हाणून पाडण्यात आलाय .

सो तात्पर्य हेच की ग्रुप मॅनेजमेन्ट महत्वाची . त्यात जर एकी असेल तर सोनेपे सुहागा . काही ग्रुप्स धमाल असतात तर काही वैतागवणे . दुसऱ्या कॅटेगरीमधल्या ग्रुप्सना सरळ म्यूट करून टाकावं .

तसे सारे व्हॉट्सॅप ग्रुप्स डोके दुखीच असून राहतात. तेच फॉर्वर्ड्स सारीकडे. क्वचित काही ग्रुप असतात जिथे वेगळं होते.
उपाय: समुह सोडायचा. परत अ‍ॅड केल का परत सोडायचा. परत अ‍ॅड केल का परत सोडायचा. आणि मंगल पांडेच्या आवेशात हिंमत असन तर माझा कित्ता गिरवा असं इतरास्नी सांगायच.

ऋंन्मेश भाई - खालील पॉईंट मला काही चुकीचे दिसत नाहीत. तुमच्या ग्रुप मधली लोक स्वतात सुधारणा करण्याचा विचार का नाही करत व्हॉट्स अप वर टाईम पास करण्यापेक्षा.

अजुन एक ऋन्मेश भाई, तुमचा मॅनेजर माबो वर पण असु शकतो हा विचार तुम्ही केला आहे का?

<<<<<<३) ऑफिसटाईममध्ये ग्रूपवर मेसेज टाकणे अलाऊड आहे. फक्त जो हे धाडस करेल त्याला त्या दिवशी कामात काही चूक करणे अलाऊड नाही. तरीही केलीच, तर त्याची तासली जाते हे वेगळे सांगायला नको.

४) एखादे काम वेळेत पुर्ण झाले नाही आणि त्या काम करायच्या कालावधीत त्या कर्मचार्‍याचा व्हॉटस्सपवर लास्ट सीन दिसला तर त्याची चंपी केली जाते.>>>>>>>>

सर्वाना किंवा खुप जणांना आधी अ‍ॅड्मिन करा.
नंतर ग्रुप 'चुकुन' डिलीट करा. कळणार नाही कोणी केला ते. रात्री घरुन करा.>>>>>>> +१.

सुनिधी, धन्यवाद. बरेच लोकांनी लाईक ठोकलेय याचा अर्थ प्रभावी उपाय असावा. मला याबाबत नक्की कल्पना नव्हती की असे ग्रूप कोणी डिलीट केला हे न समजता डिलीट होतो.
तरी आधी एक आपसात प्रयोग करून बघायला हवे. अन्यथा व्हॉटस्सपच्या नवीन वर्जनमध्ये ग्रूप कोणी डिलीट केला याचे नोटीफिकेशन येऊ लागले असेल तर दुसर्‍या दिवशी मी स्वत:च कुठल्यातरी रिसायकल बिन मध्ये सापडायचो..

तसेच मुख्य अ‍ॅडमिन (ओनर) वगळता कोणीही ग्रूप डिलीट करू शकतो हे सुद्धा एकदा सेफ साइड चेक करायला हवे. अन्यथा आपल्या लाडक्यानेच असे केले हे बॉसला समजले तर माझ्यावर विश्वासघात आणि गद्दारीचे कलम लागेल.

बाकी हा उपाय कायमस्वरूपी टिकला तर बरे, अन्यथा मला पुन्हा ग्रूप तयार करायला सांगितले आणि ईतर कोणालाही अ‍ॅडमिन करू नकोस असेही सांगितले तर तेव्हा नवीन उपाय शोधावा लागेल. अर्थात तेव्हाचे तेव्हा बघू मग..

जाईचा पर्याय मस्त आहे दुसरा ग्रूप बनवा आणि त्याबद्दल बॉसला कळू देऊ नका..
>>>

हा पर्याय बाद आहे हे मी आधीच हेडरमध्ये लिहिले आहे. कारण किती काळ लपवणार तो ग्रूप. ऑफिसमध्ये कोण कोणाचा असतो हे कोणाला ठाऊक असते का. कसेही कोणाकडूनही कुठल्याश्या चमच्याकडून ते बॉसला कळणारच, आणि मरणार ते तो नवा ग्रूप बनवणारा..

टोचा, आपल्या मुद्द्यामागच्या भावनेशी सहमत आहे. पण कामात चूक कोणाचीही होते. नव्हे सर्वांचीच होते. बॉसचे काही लाडके असतात तर काही जणांवर चढायची तो संधीच शोधत असतो. याला खरे तर पार्शलिटी म्हणतात पण सगळीकडे हे असे असतेच, या केसमध्ये बॉसला अश्यांवर नजर ठेवायला एक व्हॉट्सप नावाचे हत्यार मिळाले आहे. उद्या ऑफिसमध्ये तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर एक सीसीटीवी कॅमेरा लावला, तसेच स्क्रीनवर काय चालू आहे हे देखील सतत टिपले, तर त्यावरही हा युक्तीवाद करता येईल की काही वावगे वागूच नका मग प्रश्नच येत नाही. पण मग हे चूक नाही का?

तुमचा मॅनेजर माबो वर पण असु शकतो हा विचार तुम्ही केला आहे का?
>>>>
शक्यता फारच कमी आहे. पण मी विचार वगैरे करून धागे काढू लागलो तर आजवर जे आलेत त्याच्या निम्मेही आले नसते Happy

हे सर्व खरं आहे असं का मानत आहेत सर्व लोक?
अरे हाही trp चा फालतू खेळ आहे!
आणि हा बॉसचा लाडका?
अशक्य!!!!!

ऑनलाईन वावरामुळे बॉसला खुष करता येते हे विसरू नका. बॉसचे लाडके आहातच तर ते लाडकेपण अधिक वाढत जाईल हे बघा.
>>>>

बेफिकिर, सल्याबद्दल धन्यवाद. यात काही गैर नाही. पण मी काही अमुकतमुक करून लाडका झालो नाहीये. उलट एकेकाळी बॉस या प्राण्याशी बंडखोरी करायला मला मजा यायची. कालांतराने हे आपले स्कूल कॉलेज नाही, इथे जरा थंड घेऊनच राहायचे असते हे शिकलो.
आजच्या तारखेला मात्र माझ्यातले काही विशिष्ट गुण वा वागण्याची पद्धती बॉस या प्राण्याचे मला लाडके बनवून जातात, मग तो कोणताही बॉस असो... असो, डिट्टेलवार लिहून स्वत:वर स्तुतीसुमने उधळायची नाहीयेत, आधीच इथे त्यासाठी बदनाम आहे Happy

व्हॉट्सॅपचं गोल्ड वर्शन डाउन्लोड कर, त्यात नावडत्या व्यक्तीला ग्रुपमध्ये ठेवुनच, फक्त त्याला सगळ्यांचे मेसेजेस दिसु नये असं करण्याची सोय आहे.

प्लॅटिनम वर्शनमध्ये तर वरची सोय प्लस त्याचे मेसेजेस फक्त त्यालाच दिसतील असं करण्याची पण सोय आहे... Proud

फारच बॉसूरवास बॉ! Biggrin

बॉस व्हॉट्सॅप नामक अनॉफिशिअल साधनाद्वारे मानसिक छळ करतोय अशी एचारकडे नोंद करा! Wink

गोल्ड वर्शन, प्लॅटीनम वर्शन..
राजभाई खरेच असे काही असते का..
के टिंगल उडवत आहात पोराची?
आणि असल्यास फ्री आहे का?

गजानन,
आमचा बॉस आणि एचार टीमचा बॉस दर बुधवारी आणि शुक्रवारी साडेसातनंतर शांता बारमध्ये मांडीला मांडी लावून दारू पिताना आढळतात. असे काही केले तर येत्या शुक्रवारी चखण्यासोबत आमचा विषय चघळायला मिळेल त्यांना.. बस्स एवढेच होईल.

(बारचे नाव बदलले आहे)

बॉसूरवास टाळायचा असेल तर सकाळ सकाळी बॉस ला ओनलाईन मिठी मारत जा .
जादूची झप्पी फार प्रभावी असते म्हणे Happy

सगळ्या मेंब्रांना अ‍ॅडमिन करा.. तुम्ही ग्रुप सोडल्यावर आपोआप तुम्ही अ‍ॅड केलेली पहिली व्यक्ती अ‍ॅडमिन होते..
दुसर्‍याला कळू न देता मेसेज कसा वाचायचा ह्याची कला अवगत करा, नेटवर योग्य पध्दतीत माहिती दिलेली आहे. आणि व्हॉअ‍ॅच्या privacy settings मधे जाउन सेटींग चेंग करा last seen चे..

इथे कसे भरपूर लोक इग्नोरास्त्र वापरतात, तसेच तिकडे व्हॉअ‍ॅवर वापरा..

लास्ट सीन सेटींग सिलेक्टेड लोकांना होत नाही ना.. सर्वांनाच गायब होते.. आणि माझ्या गर्लफ्रेंडला माझे लास्ट सीन नाही दिसले तर मीच तुम्हाला लास्ट सीन होऊन जाईल..

सोनाली नशीब माझ्या गफ्रेंडला मी माबो अकाऊंट उघडून नाही दिलेय. तरी तुम्ही अश्या जालीम आयडीया ईथे ईतर लोकांच्या गर्लफ्रेंडना देऊ नका.
संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर बिल्डींगच्या बाहेर पडल्यावर मेन गेट पर्यंत पोहोचेपर्यंत मी तिला फोन करून सुटले ऑफिस निघालो आता असे सांगावे लागते. जर तिला फोन करायला विसरलो आणि रस्त्यावर पोहोचलो, (जे तिला गाड्यांच्या आवाजावरून समजते) तर माझ्या आयुष्यात तिचे फारसे इम्पोर्टन्स नाही असा साधासोपा अर्थ काढून ती मला छळायला मोकळी होते.
आपण ज्याचे लाडके असतो तो बॉस परवडला. पण आपला जो लाडका असतो तो बॉस नाही परवडत Happy

डिलीट करुन टाका नाहीतर त्यात अ‍ॅक्टीव राहू नका. दुसरा ग्रुप फक्त तुमच्या भरवशाच्या लोकांचा काढा.

आपण ज्याचे लाडके असतो तो बॉस परवडला. पण आपला जो लाडका असतो तो बॉस नाही परवडत !
>>
हे व्हॉटसप स्टॅटस टाकायला मस्त आहे!

सोनाली नशीब माझ्या गफ्रेंडला मी माबो अकाऊंट उघडून नाही दिलेय. तरी तुम्ही अश्या जालीम आयडीया ईथे ईतर लोकांच्या गर्लफ्रेंडना देऊ नका.>>> मी तुला आयडीया दिली होती, ईतर लोकांच्या गर्लफ्रेंड कुठून आल्या मध्येच? Happy

दक्षिणा,
यात उंट पहाड आया कुठून आली? जे खरंय ते खरंय. फारसा विचार न करता जगणे हा आयुष्य आनंदी करायचा एक परिणामकारक मार्ग आहे. फक्त पुर्णता तसे वागायला जमणे अवघड..

सोनाली, अहो ईथून तिथून सर्वांच्या गर्लफ्रेंड सारख्याच

महेश, मी मुद्दाम ओढून ताणून काढतो का ते विषय? अहो एक गर्लफ्रेड, एक आई, एक तो शेजारचा पिंट्या, एक आपला शाहरूख, तर एक आपली सई, सोबतीला स्वजो आणि मी काम करतो ती एमेनसी.. छोटेसेच विश्व आहे हो माझे. त्यामुळे माझे अनुभव यांच्यापुरते मर्यादीत असतात, मी दिलेल्या भारंभार उदाहरणातही हे लोकं वारंवार येतात. पुढे मागे माझे लग्न होऊन दोनाचे चार हात झाले आणि आम्ही चाराचे आठ केले तर थोडे आणखी खुलेल माझे विश्व... तोपर्यंत झेला Happy

थोडे आणखी खुलेल माझे विश्व... तोपर्यंत झेला >>>>>> हा खरा ऋन्मेऽऽष.कोणीही कितीही,काहीही बोला , पण थंडपणे उत्तर देतो.

तुझ्या अविचारी पणाचा फटका विचारी लोकांना बसतो. उगिच बिनमहत्वाचे प्रश्न (तुझे) सोडवण्यात त्यांना डोकं गुंतवावं लागतं.

कोणासाठी काय महत्वाचे असेल या देशात हे सांगणे अवघड आणि जरी असली एखादी समस्या कमी महत्वाची तरी ती टाळून पुढे तर जाता येत नाही. माझी वैयक्तिक समस्याही एखाद्याशी रिलेट होऊ शकतेच. किंबहुना तसे होण्याची शक्यता लक्षात घेऊनच ती मांडतो.

आपला बॉस आणि त्याचे चेले मायबोलीवर येत नाहित याची खात्री आहे का?
आपला एखादा जबरा फॅन येत असेल तर प्लॅन आधिच बॉसला कळण्याची शक्यता आहे Happy

त्याचं कायेना लोकांना सल्ले द्यायला जाम आवडते. त्यामुळे बिन महत्वाच्या गोष्टीत लक्ष घालत बसतात.
असो,. तरी बरं तुच मान्य केलंस की तु अविचाराने धागे काढतोस.

मला तर लै कामं हैत बाबा.
हेमाशेपो..(थोडक्यात घाला गोंधळ आता :हाहा:)

निलिमा,
हो. हा धोका तर आहेच, पण जर माझ्या गर्लफ्रेंडला समजले की मी इथे माबोवर गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड करत तिला फेमस केले आहे, तर त्यात असलेल्या धोक्यापुढे हा काहीच नाही ..

दक्षिणा,
यात मान्य काय करायचे. काही गुन्हा किंवा अपराध नाही तो. पुराणकाळापासून आतापर्यंतचे कोणतेही उदाहरण घ्या. ईतिहास हा नेहमी अविचारी माणसांनीच घडवला आहे Happy
किंबहुना लोकांना सल्ले द्यायला आवडतात हे आपणच म्हणालात. आता जर माझ्यामुळे लोकांना त्यांची आवड जपता येत असेल तर आनंदच आहे मला Happy

कामावर उशीरा येणे, काम न करणे, नीट न करणे, अर्धवट करणे, चुकीचे करणे या acceptable गोष्टी असतात? या गोष्टींची जबाबदारी घ्यायला नको? या गोष्टींबद्दल जाब विचारणे म्हणजे तासणे?
ऑफीसच्या रुलप्रमाणे रहायला आवडत नसेल तर नोकरी सोडुन द्यावी आणि जिथे फालतुपणा चालतो अशी नोकरी शोधावी.

एक असतो ऑफिसचा रूल
एक असतो बॉसचा रूल

फरक आहे Happy

हा फरक लक्षात नाही आला तर यावर डिट्टेलवार नंतर लिहितो

हा फरक लक्षात नाही आला तर यावर डिट्टेलवार नंतर लिहितो
>>>
नाही लिहिलेत तरी च्यालेल...::फिदी:

Pages