फ्रेंन्ड अ‍ॅण्ड कलीग्ज !

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 September, 2014 - 16:13

साधासाच किस्सा. पण तुमच्या आमच्या रोजच्या कॉर्पोरेट जीवनातही घडत असेल. तुमच्याशी बोलून मोकळे व्हावे आणि यासंदर्भात तुमचेही विचार आणि अनुभव समोर यावेत या हेतूने शेअर करतोय.

__________________________________________________

मी आणि माझा ऑफिस मधील मित्र रौनक (अर्थातच नाव बदलून). आम्हा दोघांचाही कामाचा अनुभव, शारीरीक वय, कंपनीतील पोस्ट वगैरे साधारणपणे एकाच लेव्हलचे. फरक इतकाच त्याचे आणि माझे डिपार्टमेंट वेगळे. आम्हा समवयीन आणि समविचारी मुलांचा कट्टा कॅंटीनमध्ये एकाच ठिकाणी भरत असल्याने आमचा ऑफिसमध्ये बरेपैकी मोठा ग्रूप आहे. ग्रूपमधील इतर मुलांशी जसे चांगले मैत्रीचे संबंध तितकेच रौनकशी देखील आहेत. जेवणाचा डब्बा शेअर करायचा असो वा कोणाच्या वाढदिवसाची पार्टी असो, आम्ही सारे एकत्रच साजरे करणार. कधी एकमेकांना मस्करीत चिडवणार, तर कधी एकत्र येत तिसर्‍या कोणाला गिर्हाईक बनवून त्याची खेचणार. ऑफिसमधील कोणती मुलगी आवडते हे बिनधास्तपणे एकमेकांना सांगणार. कॉलेजसारखाच एक कट्टा आमच्या ऑफिसातही भरतो असा एक विश्वास ....... जो या छोट्याश्या प्रसंगाने डळमळीत झाला.

आम्हा दोघांचे, म्हणजे माझे आणि रौनकचे डिपार्टेमेंट वेगळे असले तरी कनेक्टेड आहेत. कामानिमित्त संबंध येतोच. ढोबळमानाने सांगायचे तर त्यांच्या डिपार्टमेंटकडून निघणारे आऊटपुट हे आमच्यासाठी ईनपुट असल्याने आम्हाला आमच्या डेडलाईन फॉलो करण्यासाठी त्यांच्याकडूनही वेळीच इनपुट येणे गरजेचे असते. ते तसे ठरल्या वेळी नाही आले आणि आमच्याकडेही एक्स्ट्रा रिसोर्स प्लान नसतील वा फारशी मार्जिन नसेल तर आमच्याही डेटस चुकण्याची शक्यता असते. अश्यावेळी मग आम्हाला या उशीराचे कारण म्हणून रौनकच्या डिपार्टमेंटकडून इनपुट उशीरा आले हे नमूद करावेच लागते. अर्थात, त्यांच्याकडेही जर या उशीराचे कारण वा स्पष्टीकरण असेल तर ते देखील या प्रकारात लटकत नाहीत. पण जर उशीराचे कारण त्यांचाच हलगर्जीपणा असेल तर त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांनीच भोगणे क्रमप्राप्त आहेच.

नुकतेच माझ्या जॉब प्रोफाईलचे स्वरूप बदलल्याने हल्ली मला त्यांच्या डिपार्टमेंटशी को-ऑर्डिनेट करत, माझे रिसोर्स प्लान करावे लागतात. सध्या मी ज्या प्रोजेक्टवर काम करतोय त्याच प्रोजेक्टवर रौनकही काम करत असल्याने मला त्याच्याशीच को-ऑर्डिनेट करावे लागते. तर हि साधारण महिन्याभरापुर्वीची गोष्ट. त्याच्याकडून जे इनपुट ठरलेल्या तारखेला किंवा त्याच्या आधी अपेक्षित होते ते ऐनवेळी चार दिवस पुढे ढकलायची मागणी तो करत होता आणि या उशीराला तोच जबाबदार असल्याने आम्ही आमचे काम वेळेतच पुर्ण करावे हि अपेक्षाही सोबत होती. मी माझ्या बॉसची चर्चा करून स्वतातर्फेही सारे पर्याय चाचपून पाहिले. फार फार तर दोन दिवस आम्ही मॅनेज करू शकत होतो. त्याला तसे प्रामाणिकपणे सांगितले. त्यावर तो, "हम्म बघतो" एवढेच म्हणाला.

खरे तर त्याची अपेक्षा अशी होती की मी माझ्या काही रिसोर्सना संध्याकाळी थोडेफार अतिरीक्त थांबवून किंवा शनिवारी बोलवून काम वेळेत करून घ्यावे. अर्थात हि ऑथोरटी खरे तर माझी नसून माझ्या बॉसची आहे याची कल्पना त्याला असल्याने स्पष्ट बोलत नव्हता इतकेच. जरी दोन दिवसांची मुदत त्याला दिली तरी त्यानंतरही आमची घाईघाईच होणार होती. गणपतीचे दिवस चालू असल्याने काही जण सुट्ट्यांवर होते, तर जे थोडेथोडके हजर होते त्यांना रोजचे वेळेवरच घरी निघायचे असायचे. त्यामुळे ऐनवेळी काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून साहजिकच माझ्या बॉसने मला या दोन दिवसांच्या उशीराचाही मेल टाकायला सांगितले. मेलचा आशय आणि हेतू साधारण असा होता की आधीच दोन दिवस उशीर झाला आहे आणि आता दोन दिवसांने तरी संध्याकाळीच दे रे बाबा. नाहीतर आणखी तिसर्‍या दिवशी सकाळी तासाभरात देतो म्हणत त्या दिवसाचाही फर्स्ट हाल्फ खाल्ला असता. मेल मधील शब्द न शब्द हा माझ्या बॉसने सांगितल्याप्रमाणेच होता कारण माझ्यासाठी हा रोल नवीन आणि त्यानुसार हा माझा पहिलाच प्रोजेक्ट होता म्हणून हे मार्गदर्शन वेळोवेळी असतेच.

आता यात प्रॉब्लेम झाला तो असा की मेल टाकल्याने त्याची कॉपी मला त्याच्या बॉसलाही मार्क करावी लागली. पण सध्या प्रकरण दोन डिपार्टमेंटमध्येच राहावे म्हणून आणखी इतर कोणाला कॉपी मार्क केली नव्हती. इथपर्यंत यात काही वेगळे विशेष असे नव्हते, निदान मला तरी वाटले नाही. रेग्युलर प्रॅक्टीस म्हणू शकतो. पण त्याच्या बॉसला या मॅटरची एकंदरीत किती कल्पना होती की काहीच नव्हती हे मात्र मला माहीत नव्हते. मी मेल टाकला आणि थोड्याच वेळात जेवायला उठलो. रौनक मात्र पाच-दहा मिनिटे उशीराने आला. कारण विचारले असता माझ्याकडे निर्देश करत, पटकन म्हणाला, "अरे याने मेल टाकला ना, आत जावे लागले." .. आत म्हणजे त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये. तिथे काय झाले त्यांचे त्यालाच ठाऊक. ईतरांनी एखाददुसरी कॉमेंट करत विषय सोडला, पण मला मात्र त्याचा चेहरा त्रासलेला आणि आवाजाचा टोन देखील वेगळाच भासला. जणू काही मीच त्याला लटकवले, मला मैत्री निभवता आली नाही, तू आपला माणूस असून मला विश्वासात न घेता मेल टाकलास, पाठीत खंजीर खुपसलास वगैरे वगैरे.. टाईपचे भासले.

पुढे बरोबर दोन दिवसांनी त्याच्याकडून इनपुट आले. थोडीशी मारामार झाली आमची, पण ‘ईटस पार्ट ऑफ वर्क’ म्हणत ना माझ्या बॉसने चीडचीड केली ना कोणत्या रिसोर्सने कूरबूर केली. दिलेल्या डेडलाईनला आमचेही डिलीवरेबल तयार होते. ऑफिसच्या कामासंदर्भात विचार करता हा किस्सा इथेच संपला.

पण त्या दिवसानंतर आमच्या मैत्रीच्या नात्यात दुरावा आला. प्रामुख्याने त्याच्याकडून बोलणे खुंटले वा त्यात केवळ औपचारीकताच शिल्लक राहिली. दोघांमधील एक मित्र जर मोकळेपणाने वागत नसेल तर दुसराही मग आपसूकच तेच तेवढेच अंतर ठेवत वावरू लागतो. माझेही तेच झाले. कॉलेजच्या मैत्रीत एकमेकांना चार शिव्या घालून प्रकरण मिटवले जायचे पण अश्या ऑफिशिअल मॅटरमध्ये कितीही जीवाभावाचे सहकर्मचारी असले तरी त्यात तसे करता येत नाही याचा अनुभव घेतला.

ऑफिसमध्ये कामाच्या स्वरुपानुसार आपल्याला एखाद्याच्या जवळ बसवले जाते आणि आपण त्यालाच आपला मित्र समजतो वा बनवतो. याउलट कॉलेजमध्ये आपल्या बेंचवर कोण बसणार हे आपण आपल्या मित्रांमधून निवडतो, याचा साक्षात्कार झाला आणि कॅंटीनमधील ज्या टेबलला आम्ही आमचा कट्टा म्हणतो त्यातील फोलपणा समजला.

असो, अजूनही ऑफिसमध्ये माझे कित्येक खास मित्र आहेत. चिक्कार आहेत. हक्क गाजवता यावा अशीही दोनचार टाळकी आहेत. काही नाजूक गोष्टीही बिनधास्त शेअर करू शकेन अश्या मैत्रीणीही आहेत. पण देवाकडे एकच प्रार्थना, उगीचच आमच्या मैत्रीची परीक्षा घ्यायच्या नादात कामानिमित्त आम्हाला एकमेकांच्या संपर्कात आणू नकोस. __/\__
खरेच आभारी राहील,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतांश वेळा मेल्स अनिवार्य असतात आणि तेे करावेच लागतात. पण ते pre-considered असतात.
प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ वेगळीच राहीली पाहिजे..

राहिली गोष्ट त्यामुृळे होणार्या त्रासाची, तर तो त्रास engineering मधे शिक्षक आणि सिनीयर्सच्या मानाने काहीच नसतो.
आणि खरंच, it's a part of work

पण तुम्ही ऑफिसात मैत्री फार करू नका. ती बरोबर जागा नाही. आपल्याला आप्ला पर्फॉर्मन्स नीट ठेवायचा असतो पर्सनल रिलेशनशिप मेंटेन करायची ही जागा नाही. कीप बिझनेस अँड प्लेझर सेपरेट ही म्हण माहीत असेलच. बरे ऑफीस ही पॉप्युलॅरिटी काँटेस्ट जिंकायची पण जागा नाही. त्यामुळे बोटचेपे धोरण उपयोगाचे नाही. ही बेटर डिलिवर. ऑर एल्स सफर. हे खास मित्र मैत्रीणी हपिसातले हे तुमचे मेंटल इल्युजन आहे. ते शक्य तो लवकर दूर करा. फोकस ऑन युअर पर्फॉर्मन्स अँड डिलिवरेबल्स.

व्यवहारात मैत्री आणी मैत्रीत व्यवहार कधीच नको....
येता जाता थोडेफार बोलायचे नि सोडून द्यायचे,हा मार्ग कधीही बरा.

बोलणे कमी झाले किवा आदिसारखा मोकळेपणा राहिला नाहि म्हणून तुम्ही अपराधी भावना बाळगण्याचे काहि गरज नाहि.त्याने हि तुमचि परीस्थिती समझून घ्यायला हवी होती.मैत्री गैरफायदा घेण्याचा प्रयत्न त्याने केलाच म्हणायला हरकत नाहि.

आपल्याला एक चांगला मोलाचा अनुभव मिळाला असे समजून सारे विसरून जा.तुम्ही तुमचे काम पप्रामाणिक पणे पार पाडले हे महत्वचे.तिथली मैत्री जपण्यापेक्षा तुमचा परफोर्मंस तुमचा साठी जास्त महत्वाचे आहे.

प्रोसिजर म्हणून किंवा बॉसच्य सांगण्यावरून मेल टाकायला लागणार आहे; तुझ्या बॉसला कॉपी मार्क करावी लागणार आहे असं त्याला आधी सांगता आलं असतं.

माफ करा, पण अतिशय क्षुल्लक बाब वाटत आहे. शिवाय ह्यात गंडलेले आहे ते तुमचे (अंतर्मनातील, उघड न झालेले) गृहीतक की असा काही निखळ मैत्रीचा कट्टा / ग्रूप प्रोफेशनल लाईफमध्ये अस्तित्त्वात असावा / असू शकतो / आहे. असल्या हजारो बाबी अनुभवलेल्या असल्यामुळे इतकेच सांगावेसे वाटत आहे की नुसते मनच मोकळे करायचे तर मनुष्याच्या आयुष्यात ह्याहीपेक्षा महत्वाच्या इतर अनेक बाबी घडतात, ज्यांच्या तुलनेत ही बाब किरकोळ वाटत आहे. इतरांचे विचार / अनुभवही येथे शेअर व्हावेत ही इच्छा मस्तच! (पण मग ऑफीसमधील राजकारणाचे अनुभव असा एक मस्तपैकी नवीन धागा असला तर हुरूप येईल. होते काय आहे की तुमचा हा वरचा अनुभव वाचून त्यावर प्रतिक्रिया देऊन मग स्वतःच्या अनुभवांकडे वळणे हे किंचित तापदायक वाटत आहे मनाला).

माझ्या ह्या प्रतिसादाने वाईट वाटले असल्यास मनापासून क्षमस्व, पण उगाच दुसर्‍याला बरे वाटावे म्हणून काहीतरी लिहिण्यापेक्षा मला हे असे लिहावेसे वाटले.

अवांतर - तुमचा एकुण वर्क एक्स्पिरिअन्स किती वर्षांचा आहे हे कृपया समजेल का? हा प्रश्न मी खोचकपणे नव्हे तर माहितीसाठी विचारत आहे.

-'बेफिकीर'!

भरत मयेकर,
खरे तर तो मेल माझ्या बॉसनेच माझ्या डेस्कच्या बाजूला उभे राहून टंकवून घेतला आणि त्वरीत सेंड. त्यात मित्राला पुन्हा फोन करून सांगायला वेळ किंवा संधी अशी नव्हतीच. पण ती संधी असती तरी मी तसे केले असते याची शक्यता किती हे प्रामाणिकपणे नाही सांगू शकत.

बेफिकीर छान कल्पना आहे,
काढतो तसा धागा. Happy

मग त्या मित्राचं वागणं चुकलं असं नक्की वाटतंय का तुम्हाला? तुम्ही त्याच्या जागी राहून विचार करा.

तुमच्य बाजूने विचार करता : तुम्ही मित्र आहात त्यामुळे त्याच्या कामात होणारा (टाळत अयेण्याजोगा?) उशीर तुम्ही खपवून घ्यावात अशी त्याची अपेक्षा होती का? (तुमच्या लिखाणातून तसं दिसतंय.) तसं असेल तर you have learnt your lesson.

भरत मयेकर, दोन दिवस उशीरामुळे देखील आमची मारामार झालीच. जर त्याच्या मानगुटीवर मी बसलो असतो आणि मग माझ्या हातात फ्री टाईम उरला असता तर मला तशी गिल्ट फीलींग आली असती. उगाच त्याला घाई करवली म्हणून.
पण याउपर त्याला वेळ देणे माझ्याही हातात नव्हतेच. आणि फोनवर मी त्याला मी जास्तीत जास्त किती ताणू शकतो हे बॉसशी डिस्कस करून सांगितले होते. आणि मझ्या बॉसने देखील आपल्या परीने प्रयत्न केलाच होता.
अर्थात तो माझ्या बॉसचा मित्र नसला तरी दोन डिपार्टमेंटमधील संबंध चांगले राहावेत म्हणून उगाच अडून बसत नाहीत. शक्य तेवढे को ऑपरेट केले जातेच.

मुळात चूक कोणाची काय किती या मुद्द्यापेक्षा एवढा छोटासा प्रसंग कॉर्पोरेट लाईफमधील मैत्रीच्या व्याख्या आणि निकष मला दाखवून गेला हे कुठेतरी मनात सलतेय.

ऋन्मेऽऽष----- छान लिहीले आहे ..असे प्रसन्ग रोजच्या कामात घडत असतात पण साती म्ह् णे त्यावरुन खरे मित्र आणी ओळखीचे असा फरक करायला शिकावे. ...

स्वत : चा स्वानुभव असा की ----- मला सगळ्यान मधे रहायला आवडते ..अवती भवती खुप घोळका असतो .... सुरुवातीला वाटायचे हे सगळे माझे जिगरी दोस्त आहेत . पण असेच काही काही लहान लहान अनुभव आले आणी मी मैत्री ची व्याख्याच बदलली .... अता सुध्दा मी घोळक्यात असते पण मित्र किवा मैत्रीणी ---अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतिल इत्केच आहेत हे नक्किच .... अनुभव अनुभव....

ईथे ( कुवेत ) मधे तर ओफिस मधे सर्ळ सरळ एक रेश आखलेली असते. कामा च्या ठिकाणी काम ते colleagues...आणी घरी गेले की बाकीचा घोळका ... आवडतय मला हेच ...:) Happy
आणी ओफिस मधे वेळ असेल तर मा बो ...:) तुम्ही सगळे ... Happy

आपण चोवीस तासांतील ८ तास झोपेत घालवतो.
उरलेले जे १६ तास जागेपणी जगतो त्या पैकी किमान ८ तास ऒफिसात असतो.
तर मग तिथे मित्र न बनवणे म्हणजे आपले अर्धेअधिक आयुष्य बोर करणे नाही का?

अमा,
तुमच्या वरच्या पोस्टला आणि राजकारणाच्या धाग्यावरच्या पोस्टला इथे उत्तर देतो. अर्थात उत्तर म्हणजे प्रतिवाद नाही. तुम्ही बरोबरच असाल वा आहात आणि मलाही बरोबर ओळखलेय. पॉप्युलरीटी म्हणा किंवा लोकांचा लाडका बना, अगदी सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनायची आवड असणे वगैरे सारे आरोप मला मान्य आहेच Happy माझ्या वरच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे असे केल्याशिवाय मला रोज सकाळी उठल्यावर वाह आज ऑफिसला जायचेय अशी कॉलेजला जाताना जशी पॉजिटीव्ह फीलींग यायची ती नाही येऊ शकत. हे माझे साधे जगण्याचे गणित आहे, फक्त आता प्रोफेशनल लाईफची याची सांगड कशी घालता येईल हे बघायला हवे. कारण मी माझ्या आवडीच्या पद्धतीने जगलो, वागलो तरी सर्वांकडूनच मी त्या योग्य प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा करू शकत नाही ना..

सुहास,
येस्स, आता हेच मी अनुभवातून शिकतो का नाही, त्यापेक्षा याला कसे अ‍ॅडजस्ट होतो हे माझे मलाच बघायचे आहे. Happy

भग्वद गीता ! हे एक मॅनेजमेन्ट बूक आहे असे मी मानतो . एरव्ही त्या अरेबियन नाईत्स सारख्या भाकड कथा आहे असे माझे मत आहे...

अर्जुन हा क्षत्रिय होता म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्था पाहता त्याची नेमणूक लढण्यासाठी होती . एखाद्या आर्मी ऑफिसरसारखी . ते त्याचे कर्म होते . युद्ध भूमीवर ठाकल्यावर त्याला समोर मामे, भाचे, गुरू काके दिसू लागले . आणि ' सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति ' असी स्थिती झाली (म्हणजे गात्रे शिथील झाली आणि तोंडाला कोरड पडली). या नातेवाईकाना ,ज्येष्ठाना कसे मारू असा प्रश्न त्याला पडला...

मामे काके भाचे गुरूं,
यांते कैसा मी संहारू,

तोंडात बाटाचे खेटरूं
हाणतील लोक !

असा प्रश्न त्याला पडला. त्यावर श्रीकृष्णाने त्याला सांगितले की बाबा रे तू इथे क्षत्रीय म्हणून उभा आहेस आणि लढणे व समोरच्याचा नि:पात करणे हे तुझे काम /कर्म आहे. तू इथे कोणाचा नातेवाईक म्हणून भूमोकेत नाही. सबब तुझे गांडीव धनुष्य उचल आणि युद्धाला प्रारम्भ कर.

भारत पाकिस्तानचे मागच्या पिढीतले सर्वोच्च सेनाधिकारी आर्मी कॉलेजमधले कलीग, वर्गमित्र, बॅचमेट होते म्हणून मी आता मित्राच्या विरोधात कसे लढू असा प्रश्न त्याना कधी पडला नाही.पडूही नये.

शेवटी ज्याची त्याची भूमिका असते रोल असतो. उद्या रामायणावरील एखाद्या नाटकात स्टेजवर रावणाची भूमिका करणार्‍या पात्राने जर म्हणायला सुरुवात केली की ' वा वा रामा, किती उदात्त तुझे विचार, मला युझे म्हणणे पटते.मी तुझा भक्त झालो आहे' तर लोक त्याला जोड्याने मारतील ' अरे साल्या तुला का हे बोलण्याकरता नाटकात घेतले आहे का? तुझे काम का रामाची स्तुती करणे आहे ? फारच पुळका आला असेल रामाचा तर पडद्याच्या मागे जाऊन त्याच्या गळ्यात पड::फिदी:

तात्पर्यः जग ही रंगभूमी आहे ज्याने त्याने आपापला वाट्याला आलेला रोल व्यवस्थित पार पाडावा Happy

तर मग तिथे मित्र न बनवणे म्हणजे आपले अर्धेअधिक आयुष्य बोर करणे नाही का?>>>> मित्र बनवायचेच.पण मग असा धक्का लागला तर तो अपरिहार्य म्हणून सोडून देणे जमायला हवे.:)

>>तर मग तिथे मित्र न बनवणे म्हणजे आपले अर्धेअधिक आयुष्य बोर करणे नाही का?<<
ऑफिसमध्ये मित्र असायलाच हवे, सोशल/प्रोफेशनल डेवलपमेंट करता. लेकीन दोस्ती कि है, तो निभानी पडती है.

इमेल हे दुधारी अवजार आहे. कधी वापरावे, कधी वापरु नये, काय लिहावे/लिहु नये, कधी/कोणाला कॉपी करावे/करु नये या बाबींच्या गाइडलाइन्स आहेत. तुमच्या बाबतीत, मयेकरांनी म्हटल्याप्रमाणे मित्राला इमेल पाठवत आहे (नाइलाजास्तव) याची पूर्वसुचना देणे आवश्यक होते. यापुढे जेंव्हा असे प्रसंग येतील तेंव्हा हि ऑर्डर पाळा - प्रत्यक्श बोलणे, फोनवर बोलणे, टेक्स्ट आणी शेवटी इमेल.

परत एकदा - नेटवर्कींग इज वेरी इंपॉर्टंट फॉर योर प्रोफेशनल डेवलपमेंट.

खर तर ऑफिस मध्ये कोणीही मित्र किव्वा मैत्रीण होऊच शकत नाही हा माझा ही अनुभव आहे. कितीही चांगले रिलेशन्स असतील आणि आपण अगदी तिला चांगली मैत्रीण किव्वा माझा चांगला मित्र वगैरे समजत असू तरीही वेळप्रसंगी कामावरून कुठल्याही प्रकारचे गैरसमज होऊ शकतात नव्हे होतातच आणि तुमच्या रिलेशन मध्ये तणाव येतो

खरतर ऑफिस मध्ये कोणीच तुमचे खरे मित्र किव्वा मैत्रिणी नसतातच शेवटी ते सहकारीच ( तुमच्या बरोबर काम करणारे ) असतात असा माझा अनुभव Happy

खरतर ऑफिस मध्ये कोणीच तुमचे खरे मित्र किव्वा मैत्रिणी नसतातच शेवटी ते सहकारीच ( तुमच्या बरोबर काम करणारे ) असतात >>> +१

मैत्री ही खूप व्यापक व्याख्या आहे. मैत्री किती गहन ह्याला फार महत्वं आहे. मैत्रीचे वेगवेगळे परीघ असतात. सगळ्याच मित्रांना एकाच वर्तुळात ठेवत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वाटलं होतं त्या वर्तुळात हा सहकारी नाही. हेच ह्यावरून दिसतं, नाही का?
ऑफिसातली कोणती मुलगी आवडते हे ज्याला सांगू शकतो त्याच्याकडून योग्य वेळेत कामाची अपेक्षा ठेवता कामा नये... हे लॉजिकच पटत नाहीये.
तसच देवाने अशी "परिक्षा" (???) घेऊ नये ही अपेक्षा तर विनोदीच आहे, ऋन्मेष. पुन्हा एकदा सांगते... तुम्हाला वाटलं होतं त्या वर्तुळात हा सहकारी नाही. हेच ह्यावरून दिसतं, नाही का?

इतक्या फुटकळ परिक्षेवर जी तुटते ती मुळात मैत्री (तुम्हाला अपेक्षित आहे त्या खोलीची) आहे का?

दाद +१. एकदा मित्र म्ह्टल कि मग भले त्याचे काम आपल्यावर पडले तरी ते आपलेच काम वाटले पाहिजे असे मला तरी वाटते. आणि आपण एकदा मित्र म्हटले कि तो मैत्री पाळत नाही असे चुकुन सुध्धा मनात आले नाही पाहिजे. हे जबरदस्ती नाही, पण असे काहिहि झाले तर ओळखायचे कि हि मैत्री नव्हे, अपेक्षापुर्तीची कॉम्प्रोमाइज आहे. Happy

एकुण च तुम्ही "मित्र" हा शब्द खुप ढिले पणाने वापरताय.
ऑफिस मधे एकत्र कँटीन ला खाणे, पार्ट्या करणे ह्या ला तुम्ही "मित्र" ही संज्ञा देत असात तर कठीण आहे.
ह्या फक्त ओळखी आहेत आणि टीकतील जो पर्यंत दोन्ही पार्टी एकाच पर्यावरणात आहेत. कोणी एकानी कंपनी बदलली तर तुमची ही "मैत्री" लगच संपुष्टात येइल.

खरतर ऑफिस मध्ये कोणीच तुमचे खरे मित्र किव्वा मैत्रिणी नसतातच शेवटी ते सहकारीच ( तुमच्या बरोबर काम करणारे ) असतात >>> +१

जिथे स्वार्थ (व्यावसायिक जीवन, प्रगती, फीडबॅक, अ‍ॅप्रेझल, पगारवाढ, वगैरे) असतो तिथे मैत्री ही फार म्हणजे फारच दुर्मिळ गोष्ट असते.

टोचा | 29 September, 2014 - 10:13
या प्रतिसादाशी संपूर्ण सहमत.

१) दाद - मैत्रीचे वेगवेगळे परीघ असतात. सगळ्याच मित्रांना एकाच वर्तुळात ठेवत नाहीत.
२) टोच्या - एकुण च तुम्ही "मित्र" हा शब्द खुप ढिले पणाने वापरताय.
>>>>

२) मध्ये भावना जरी साधारण त्याच व्यक्त होत असल्या तरी १) मला जास्त समर्पक वाटते.

टोच्या आपण म्हणतात तसे "मित्र" हा शब्द आपण सारेच ढिलेपणाने वापरतो. तेच सोयीचे असते आणि तेच सुखकर असते.

प्रेम एकतर्फी होते, पण मैत्री शक्यतो नाही.
आपली आपल्या एखाद्या मित्रासाठी जे करायची तयारी असते तेवढेच तो देखील आपल्यासाठी वेळप्रसंगी करेल हि आपली अपेक्षा असतेच. आणि त्यानुसारच हे मैत्रीचे वर्तुळ ठरते. (इथे मैत्रीत अपेक्षा ठेवायच्या नसतात वगैरे उदात्त विचार कृपया नको, कारण अपेक्षा बाळगणे हि एक नैसर्गिक कृती आहे असे मला वाटते)

असो, धागा मैत्रीवर नाही तर ऑफिसमधील मैत्रीवर आहे. दाद यांच्या वर्तुळ संकल्पनेशी सहमत, पण बहुधा ऑफिसमध्ये या वर्तुळांचे निकष वा परीमाण बदलतात जे मला समजून घ्यायला हवे, अनुभवाने समजेल. Happy

आणि हो,
<<< तसच देवाने अशी "परिक्षा" (???) घेऊ नये ही अपेक्षा तर विनोदीच आहे, >>
येस्स दाद, हे भोळेभाबडे विधान मी साधारण त्याच अंगाने केले होते Happy

आतापावेतो एकूण बरेच छान प्रतिसाद आलेत, प्रत्येकाच्या मुद्द्याला प्लस वन मायनस वन नाही करू शकत, पण आभार मात्र सर्वांचे मानतो Happy

रीया,
अपवाद असतात म्हणून मी शक्यतो लिहिले.
तरीही आपला अनुभव वाचण्यास उत्सुक, कदाचित ते मैत्री नसून प्रेम असावे Happy

Pages