निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा , गुलबाक्षी मस्त. आता फोटो दिसले. मला ही फुले आणि रंग खुप आवड्तो.
आदजो, कवठी चाफा सुंदर आहे. पिवळा आहे का. मी सफेदच पाहीला आहे.
स्निग्धा, महालक्ष्म्याचा, फोटो दिसत नाही.

बुचाच्या फुलांची पण होते अशी छान..
माझ्या लेकीचा ( तिनेच शोधलाय का माहीत नाही ) एक आवडता प्रकार. इक्झोरा ( रुक्मिणी ) ची फुले ती सुटी करून घेते. मग त्याच्या देठाला ती बॉलपेनने भोक पाडते, त्यातून दुसर्‍या फुलाचा देठ ओवते. मग त्याही देठाला...
असे करत हातभर लांब नाजूक गजरा करते आणि तिच्या लांबसडक केसात माळते. देठ न मोडता भोक पाडणे हे कौशल्याचे काम आहे. पण तिला ते नीटच जमते.

देठ न मोडता भोक पाडणे हे कौशल्याचे काम आहे. पण तिला ते नीटच जमते.>>>>> शेवटी मुलगी कोणाची ???? Happy Wink

दिनेशदा रुख्मीणी च्या फुलांची देठ न तोडता दाट कंठी करतात, ती पणं खुप छान दिसते...
देठ न मोडता भोक पाडणे हे कौशल्याचे काम आहे. पण तिला ते नीटच जमते.शेवटी मुलगी कोणाची ???? १००%

देठ न मोडता भोक पाडणे हे कौशल्याचे काम आहे. पण तिला ते नीटच जमते.>>>>> शेवटी मुलगी कोणाची ???? एकदम सही बात.

मी म्हणते ती टणटणी वेगळी. तिच्या पानांचा रस लावतात जखमेवर. लांब देठांची फुलं असतात.

गुगलवर ही नावे सापडली: Tantani Flower. एकदांडी | Tridax Procumbens. एकदांडी | tridax procumbens | Kambarmodi in Marathi. This is Tridax Procumbens,

अदीजो, घाणेरीला टणटणी म्हणतात हे आज कळाले मला. धन्यवाद! सगळेच फोटो सुंदर आहेत. वेगवेगळ्या रंगातली घाणेरी पाहायला मस्त वाटते.

अदिजो फोटो मस्तच.

आम्हीपण दगडी पालाच म्हणतो त्याला, पूर्वी खूप असायचा डोंबिवलीत. आता नाही दिसत. जखमेवर ह्याचा पाला चुरडून लावतात औषध म्हणून. थोडंस लागलं असेल तर ह्याचा पाला चुरडून बाबा लावायचे.

हो हो ... आम्हीही एकदान्डी म्हणायचो. लहानपणी खेळता खेळता काही लागल/ खरचटल तर याच्या पाल्याचा रस टाकायचो त्यावर.
आणि हीच फुल चिमटीमधे पकडुन 'रावणा तु सितेला का पळवुन नेलस, तुझ मुन्डकच तोडीन' अस म्हणुन नखाने ते फुल खुडुन टाकायचो. Proud (अवान्तर: ही आठवणही इथेच माबोवर की निगवर कुठेतरी आधीच निघाली आहे. Wink )

Pages