निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिस्प्या, साधना... ती स्प्रिंगसारखी दिसणारी फुले होती ना, त्याचे पण नाव आहे त्या पुस्तकात. घरी गेल्यावर बघून लिहितो.

दिनेश दा आर्या कडले झाड शेदरी सारखे दिसते आहे... अगदी पाने सुदधा तशीच आहेत.. फक्त शेंदरीची फुलं
शेंदरी रंगाची असतात..

शोभा ताई गुलबाक्षी खुपच गोड.. आज माझ्याकडे पण आलं असेल एक फुल, ४ वाजता उमलतात न ही...

दिनेश दा, नविन पुस्तकातली माहिती येऊ द्या लवकरच...

जागूने वेळात वेळ काढून हा भाग सुरु केल्याबद्दल, मंडळातर्फे .....

वेळ वाचलीत का ? कालपासूनच नि.ग. च्या गणपतीचे जागरण केले मी पावणेदोनला धागा काढला माझ्या घड्याळाप्रमाणे. Lol

शशांकजी खुप सुंदर आहेत मणिमोहोरची फुले.

शोभा संध्याकाळ झाल्यासारख वाटल फुल पाहून गुलबक्षिची. सुंदर रंग आहेत.

आर्या ही रानफुले आमच्या इथेही खुप येतात.

उजू फार सुंदर प्रस्तावना दिलीस. धन्यवाद. इशिकाला शाब्बासकी दे.

शशांक, srd , beautiful snaps

मनीमोहोर तर पहिल्यांदाच पाहिला.. अप्रतिम..
शोभे गोड आहे तुझी गुलबक्षी..

आर्या.. ओह्..काश भेंडी ही होती...
दिनेश च्या नवीन खजिन्यातल्या गूढ गोष्टींची वाट पाहतेय..

शोभा, गुलबाक्षी मस्त. आम्ही ह्याची वेणी करायचे लहानपणी. गणपतीला सायंपूजेला असायचीच त्याच्या गळ्यात हारासारखी.

जागू, पाहिली वेळ धागा काढण्याची . डेड लाईन आखून घेतली होतीस का स्वतःची स्वतःच? पण कमाल आहे हं तुझी.

नवीन भाग काढलास की मस्त ताजतवानं वाटतं गं

नलिनी, कसलं ग आहे हे फुलं ?

गेल्या आठवड्यात आम्ही पिकनिकला गेलो होतो. तिथे ओडोमासचे झाड बघितले. गवती चहासारखे दिसते. पण वास अगदी ओडोमासचाच. डासही येत नाहीत त्यामुळे. मज्जा वाटली ते बघून Happy

आर्या, ती रानभेंडी वाटतेय.
याच्याच (malvaceae) कुळातले हे abutilon. याला मदाम असेही नाव आहे.

abutilon.JPG

-अश्विनी

हेमा ताई, त्या गुलबाक्षीच्या फुलांचे गजरे (बिना सुई दोर्‍याचे) त्याला जाळ्या म्हणतात ना? आईच्या माहेरी महालक्षम्यांच्या डोक्यावर वाहत असे... खुप सुंदर दिसतात.. लक्ष्मीच्या आवडत्या फुलांपैकी एक असे आई सांगते आणि त्याचा सुवास पण छान मंद असतो ना!

आदीजो पण त्याची पाने वेगळीच दिसतायत..

ओडोमासचे फोटो असतील तर टाका..

आपली, कछुआ छाप अगरबत्ती ज्याच्या पानापासून करतात ते पायरेथ्रम झाड, शेवंतीच्या कूळातले आणि शेवंतीसारखेच दिसते. त्याला पांढर्‍या शेवंतीसारखीच फुले येतात. केनयात त्याची मोठ्या प्रमाणावर शेती होते.

हि शेती पहिल्यांदा बघितली, त्यावेळी वाटले होते केनयात पण आमच्या शेवंतीचे चाहते दिसताहेत Happy

इथे आणखी माहिती वाचा.

http://www.pyrethrum.com

सुप्रभात

mabo7.jpg

शशांकजी, मणीमोहोर मस्त फुललाय. राणी बागेत खरच मणीमोहोरसाठी जायलाच हवे आत्ता.
आणि धन्यवाद सगळ्यांना माझ्या आणि इशिकाकडुन.
इशूनी तो गणपती भाज्यांच्या रंगांपासून नाही तर भाज्यांच्या ठस्यांनी रंगवलाय.
जागूला खरच मानल पाहिजे, कस जमवते ती हे सगळ........... आणि जागू सॉरी गो. माझ्या मूळेच इतका उशीर झाला अन तूला इतक्या उशीरापर्यंत जागून हे काम करत बसाव लागल.
गुलबक्षी,मोगरा, हजारी मोगरा अन सगळ्यांचेच प्रचि छान.

जास्वंदाची फुलं सध्या गणपती मुळे भरपुर वाहिल्या जातात... ही फुलं केसांसाठी फार उपयोगी आहे.. त्याचे निर्माल्य
झाडात टाकुन न देता, त्या फुलाचे हिरवे देठ काढुन, खोबरेल तेलात उकळुन केसांना लावते आहे. किंवा फुले दोन दिवस
टोपलीत घालुन उन्हात वाळवुन मिक्सर मधुन पावडर करुन ती शिकेकाईत उकळुन वापरते आहे... अजुन काही करता येईल का, सुचवा बर!

सायली, यापासून केलेले जास्वंद जेल बाजारात उपलब्ध आहे. केसांना लावण्यासाठीच असते ते.

जागूच्या उरणला खुप पाऊस पडतोय का ? थांबला कि नाही ?

अहाहा..काय सुन्दर प्रचि येताहेत!! Happy गुलबक्षी, बटमोगरा, हजारीमोगरा.... आजची सकाळ प्रसन्न झाली.

दिनेशदा, तुम्ही दिलेली लिन्क बघितली. पायरेथ्रम ची फुल खुपच सुन्दर दिसताहेत.

हे सगळ्यात आधी इशिकाच्या बाप्पाला नमस्कार Happy
शशांक मस्त फुले. मस्त बहर.
शोभा१ तुला त्या फुलांतुन गणपतीचा आकार अपेक्षीत होता का? तो तसा आलाय जरा म्हणुन विचारतेय Happy
बाकी नव्या भागाबद्दल अ भि नं द न तर आहेच सर्वांचे.

माझी हजेरी लावुन घे जागु ताई.. >>>>> हा हा हा - लै भारी चातकराव
(सध्या पावसाळा असल्याने "चातका"ने हजेरी लावलेली दिसते इथे Happy Wink

आर्या, केनयात डोंगर उतारावर याची शेती करतात. फुले आल्यावर मस्तच दिसते ती शेती.
तशी आपली अळशीची शेती पण छान दिसते. त्याला आकाशी रंगाची फुले येतात. आपल्याकडे पण कुंडीत
लागवड करून बघता येईल. भरपूर फुले येतात आणि बियाही तयार होतात.
करडईला पण लाल, पिवळी फुले येतात पण तिला नंतर काटे येतात. कारळांना सुंदर पिवळी फुले येतात.

हे सगळे प्रकार किचन गार्डन मधे होण्यासारखे आहेत.

Pages