निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते जायफळ असेल तर लालबुंद आहे ती जायपत्री.. एकाच झाडापासून दोन मसाले मिळतात. शिवाय त्या फळांचे लोणचेही करतात.

ते जायफळ असेल तर लालबुंद आहे ती जायपत्री.. एकाच झाडापासून दोन मसाले मिळतात. शिवाय त्या फळांचे लोणचेही करतात.<< व्वा... ही नविनच माहिती मिळाली मला. Happy

Happy
जायफळाचाच भाऊ. हे रानजायफळ आहे. knema attenuata. याचा उपयोग आपल्या मसाल्यातल्या जायफळासारखा करतात का ते माहिती नाही.
हा फोटो ताम्हिणी घाटातल्या काळकाईच्या देवराईतला आहे.

मग त्याला वायफळ किंवा मायफळ असा शब्द असणार. मला शंका होती कारण खर्‍या जायफळाचे कवच ( फळ ) जाड असते आणि ते एकाच बाजूने उकलते.

वायफळाचा मळा, अशा शब्दप्रयोगही आहे मराठीत.

वायफळ.... Lol Lol

मायफळ वेगळे असते हे नक्की . लहान बाळाचे पोट बिघडले तर त्याच्या गुटीत जायफळ आणि मायफळाचा एक वेढा जास्त उगाळतात. आमच्य घरी गुटीत होतं ते.
आत्ता गूगलवर पाहिलं तर मायफळ म्हणजे oak gallnut असं दिसतंय.

आणि हीच फुल चिमटीमधे पकडुन 'रावणा तु सितेला का पळवुन नेलस, तुझ मुन्डकच तोडीन' अस म्हणुन नखाने ते फुल खुडुन टाकायचो++++ अगदी आम्ही सुद्धा हेच खेळायचो Happy

जायपत्री मस्त...
ज्याला तुम्ही टणटणी म्हणता त्याला इकडे कळलावी म्हणतात...

अन्जू, बहुतेक त्याचा काही उपयोग नसणार म्हणून. जायफळात पण नर मादी अशी वेगवेग़ळी झाडे असतात ना ?
कदाचित, नर झाडाला वायफळ म्हणत असावेत.. असा आपला अंदाज.

जिप्स्या, कुणी अभिनंदन केलं तर आभार मानावेत, उगाच नस्त्या चौकश्या करू नयेत.

अगदी बरोबर दा.. बकुळीची आहेत.. आमच्या परिसरात एक झाड आहे, सकाळी वॉकला गेले तेव्हा हे दिसले..
अन्जु Happy

Mimusops elengi म्हणजे बकुळ >>

ग्रीक भाषेत mimo म्हणजे माकड आणि ops म्हणजे सारखे दिसणारे. Mimusops म्हणजे मकडासारखे दिसणारे.
इतक्या गोड फुलाकडे पाहून माकडाचे तोंड ज्याला आठवले तो धन्य होय Happy

लोणावळ्याकडून राजमाचीकडे जाणार्या वाटेवर बकुळीची खूप झाडे आहेत. उन्हाळ्यात राजमाचीला रात्रीचा ट्रेक केला तर ती रानवाट कुड्याच्या आणि बकुळीच्या वासाने घमघमत असते. उन्हाळ्यातल्या एका पौर्णिमेच्या रात्री राजमाचीला गेलो होतो तेव्हा एका वळणावर बकुळीचा घमघमाट आला. पुढे गेलो तर वाटेवर नुकत्या उमललेल्या बकुळीचा सडा पडलेला आणि वार्‍याच्या झुळुकेसरशी बकुळीची फुलं टपटप आमच्या अंगावर पडत होती! आम्हाला तर वेड लागायचंच बाकी राहिलं होतं.

bakul.JPGbakul1.JPG

मोह , चिक्कू - याच कुळातले +++ अरे व्वा नविनच..

आदिजो... खुप छान माहिती..
वार्‍याच्या झुळुकेसरशी बकुळीची फुलं टपटप आमच्या अंगावर पडत होती!++++ काय सुरेख अनुभव !
आणि दुसरा फोटो तर खुप सुंदर आलाय... जमिनीवर बकुळीची फुलं कीती तेजस्वी दिसतायत! खुप छानः)

मला बकुळ हा असा कधीच 'अनुभवायला' मिलत नाही.
एख्दं दुसरं फुल हातात येत कधी तरी Happy
फळ तर आजतागायत एकदाच पाहिलंय मी . खाल्लेली चव पण आठवत नाही.
एवढंस बुटुक ४ जणांमधे खाल्ल होतं Uhoh

एवढंस बुटुक ४ जणांमधे खाल्ल होतं +++ आम्ही अजुनही अस खातो कधी कधी... एक चिंच ओढणीत ठेवुन दातानी चार तुकडे करुन ४ जणांनी वाटुन खायचे... (चिमणीच्या दातानी :)) अस खायला मज्जा येते Happy

रिया मला कळलं ग ते... पण मी चिंचेबद्द्लच सांगते आहे... किवा एकच चोकलेट असेल तरी अस खायला मज्जा येते..

बकुळ ही चिकूच्या कुटूंबातली आहे काय?

गेल्या भेटीत राणी बागेतल्या एका बकुळीच्या झाडावर सपोटा असे लिहिलेले वाचलेले आणि त्यावर मी व जिप्सीने ब-याच काथ्याकुट केलेला. Happy सपोटा म्हणजे चिकु हे आमचे सामान्य ज्ञान. राणीबागेतली मंडळी आमच्यापेक्षा हुशार असल्याने त्यांनी झाडावर फॅमिली नाव लिहुन आमच्या डोक्याला उगीच हा भुंगा लाऊन दिला बहुतेक Happy

Pages