निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाण्याचे फुल??? मुळात अस काही झाडाच नाव असत हेच माहित नव्हत.
त्या समान्तर शिरान्ची पन नविनच माहिती कळली. Happy धन्स अदिजो!

इशिका, बाप्पा मस्तच आहे तुझा.

शशांक, मणिमोहोराच्या फोटोबद्दल खूप धन्यवाद. तुमच्यामुळे बघायला मिळाला इतका सुंदर बहर.

नलिनी, मोगरा कसला टपोरा आहे!

जिप्सि छान फोटो.
sr पक्षी छान, खाऊ बरोबर पाणिही ठेवता का.
अ आ छान फुले दिसत आहेत.
अदिजो असाण्याचे फुल मस्त, समांतर शिरांची नविनच माहिती कळली.
साधना माझे फोटो दिसतात का.

सायली - या चार चार महालक्ष्मी कधी पाह्यल्या नव्हत्या - काय प्रकार आहे हा - जरा सविस्तर सांगणार का ??

कामिनी तुझा हौसा बघितला, त्यात लाह्या नाहीयेत का? आमच्याकडे लाह्या वाटतात.

गावी एक विचित्र पद्धत बघितली. हौसेवाल्या बायका हौसे घेउन फिरतात, लहानथोर सगळ्यांच्या हातात केळीच्या पानात घालुन लाह्या देतात, पाया पडतात. दोन हौसेवाल्या बायाही एकमेकींची सुपे धरुन लाह्या देऊन पाया पडतात. पण ज्यांचे नवरे निर्वर्तले अशा बायांच्या हातात मात्र लाह्या देत नाहीत, पायाही लांबुन पडतात. अगदी अस्पृश्यासारखे वागवले जाते. माझी आजी समोर एक स्टूल ठेवुन बसते आणि येणा-या बाया त्या स्टुलावर केळीचे पान व लाह्या ठेवतात. जणू काय आजीच्या हातात जर लाह्या दिल्या तर जगबुडीच येणार आहे. मला अशा वेळी खुप अवघडल्यासारखे वाटते आणि असे जर असेल तर मग हा सणच नको असे वाटते. Angry

शशांक मी ही तेच लिहीणार होते. अशा चार कधी पाहिल्या नाहीयेत. सायली, लिही ना सविस्तर त्या बद्दल

व्वाह... काय सुन्दर सजवलय महालक्ष्म्यान्ना! Happy
मी ही कुठे पाहिल्या नव्हत्या ४ महालक्ष्मी. सायली खरच डीटेल्स द्या.

शशांकजी, या दोघी बहिणी आहेत, एक जेष्टा आणि दुसरी कनिष्टा आणि ती दोन त्यांची मुलं आहेत.
अशा लेकुरवाळ्या माहेरी येतात...

त्यांच्या समोर गहु , तांदळाच्या राशी, पाच पळे, नारळ कलश असे सगळे मांडुन स्थापना करतात.
दर वर्षी नविन साड्या यांना नेसवतात, वेगवेगळी सजावट करतात. सगळे सोन्याचे, मोत्याचे दागिने परिधान
करवातात. फुलांन मधे शेवंतीच्या वेणीचे महत्व आहे.
फुलारो पण असतो (सौळ्यात) . खुप लोकं खणा-नारळांनी ओटी भरतात.

महालक्षम्या पहिल्या दिवशी बसतात(स्थापना), दुसर्‍या दिवशी जेवतात, खुप कडक सौळ असत, जेवणात, फळ भाजी, फुल भाजी,सोळा भाज्यांची एक भाजी (मिक्स वेज) कढी,भजे, वडे, बोंड, पानाच्या डावी कडे , जवस, तीळ, कारळं, कवठ, हिरव्या मिरच्यांची चटणी, ४, ५ प्रकारच्या कोशिंबीरी, मो़कळी डाळ असे सगळे असते, शिवाय पुरणपोळी, लाडु, आणि थोडा थोडा फुलोर्‍याचा प्रसाद असतो.. सगळ्यात मुख्य प्रसाद म्हणजे ज्वारीची आंबील.. ही तीथेच संपवावी लागते. घरी आणता येत नाही.. हा सगळा प्रसाद के़ळाच्या पानावर मिळतो आणि तोही पंगतीत बसुन. आणि जेवण झाल्यावर हात झाडामधे धुवावे लागते, प्रसादाचे कण सुदधा वाया जाउ देता येत नाही.

शेवटी तांबुल किंवा विडा असतो,

आणि तिसर्‍या दिवशी महालक्षम्या उठवतात (विसर्जीत करतात) त्या दिवशी हळदी कुंकु पण करतात,

छान आहे पद्धत.! Happy

<<सगळ्यात मुख्य प्रसाद म्हणजे ज्वारीची आंबील.. ही तीथेच संपवावी लागते<<
ज्वारीची आम्बील हा प्र्कार भारी वाटला.

सायली, ती बाळं आहेत होय? पण मस्त माहिती दिलीस आणि फोटो ही दोघींचे ही छान मजा येत असेल ना खूप ?

गोड आहेत ग स्निग्धा या दोघीही.:)
आमच्याकडे हा काहीही प्रकार नसतो. नागपन्चमीनन्तरच्या पहिल्या रविवारी 'कानबाई' बसवातात. तिचा प्रसाद फक्त घरातलेच लोक, भाऊबन्दान्साठी असतो. विवाहीत मुली, इतर लोक यान्च्यासाठी वेगळा स्वैपाक होतो.
आणि जेवणानन्तर हात इतर कुठे ही न धुता एका मोठ्या पातेल्यात धुवुन नन्तर ते पाणी बागेत एक खड्डा खणुन त्यात ओतल जात. खान्देशात कण्हेरीच्या झाडाला महत्व आहे. कानबाईला कण्हेरीच्या फान्द्या, फुले लावतात.

धन्यवाद आर्य,शोभा ताई,हेमाताई.. हो खुप प्रसन्न वाटतं..
आर्या कानबाईची माहिती छानच. मी पहिल्यांदाच ऐकते आहे..
स्निग्धा सुरेख आहेत ग महालक्ष्म्या...

आमच्याकडे हा काहीही प्रकार नसतो. >> आर्याताई आमच्याकडे कोकणस्थांकडेही नसतात उभ्या महालक्ष्म्या पण मला अतिशय आवडतात. मागल्यावर्षी मुद्दाम गेले होते मावशीकडे आणि त्या शेजारच्या काकुंना फराळ करण्यापासुन ते गौरी बसवून त्यांना साड्या नेसवणं, सजवणं, आजुबाजूचं डेकोरेशन पर्यंत सगळी मदत केली होती. खुप आनंद झाला होता सगळं करतांना Happy

छान माहिती आणि फोटो.
त्या कानबाई बद्दल आणखी काही..
मुस्लीम राजवटीत आपले सण उघडपणे साजरे करता येत नसत. त्यावेळी कुणा रखवालदाराने हटकल्यास,
कुछ नही, वो तो खानभाई है--- असे सांगत. आजही त्या भागात कानबाई चा उच्चार थोडासा खानभाई असाच करतात.

स्निग्धा, पण हे उत्सवाचे दिवस किती छान असतात. कल्पकतेचा अगदी कस लागतो नाही? Happy

अगदी बरोबर दिनेशदा... ! Happy

सायली, मोनालीप, हा माझा कानबाईवरचा लेख. http://www.maayboli.com/node/29490

या प्रथा आपणच मोडायला हव्यात आता >>
अगदी बरोबर.
त्या महालक्ष्म्यांच्या पुढ्यातली बाळेही खरेतर एक मुलगा एक मुलगी अशी पाहिजेत Wink

त्या महालक्ष्म्यांच्या पुढ्यातली बाळेही खरेतर एक मुलगा एक मुलगी अशी पाहिजेत+++ एक मुलगा आणि एक मुलगीच आहे..

Pages