मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू Lol

फार म्हणजे फारच बोर्झाल्लं बाबा Sad
मी कालपासून ऑफिशियली बंद केल्या बघायच्या दोन्ही सिरियल्स Sad

रिया तो एक चष्मेवाला जो छातिवर पँट घालतो ना, त्याला कळलंय अदिती आणि जय नवरा बायको आहेत ते.
तो धाय मोकलू न रडत होता काल उगिचच

त्याला धाय मोकलणं नाही म्हणत.. भोकाड पसरणं म्हणतात.

त्याने इतक्या अचानक मोठ्या आवाजात रडायला सुरुवात केल्यावर विनोदी प्रसंग असल्यासारखे आमच्या घरचे सगळे हसायला लागले. नशीबाने प्रोमोमधे तो रडतोय हे दाखवलं होतं, नाहीतर गडगडाटी हास्य झालं असतं आमच्याकडे.

हो यार कदमांनी इतक गळा काढण्याच कारण मलाही नाही समजल... त्यांच गळा काढण अस होत जणु काही त्यांची नाबालिक मुलगी या वयात नाही ते करुन बसली...

त्या काकांना एवढे रडायला काय झाले>> हो किती विचित्रच वाटत होता तो सीन. कदाचित तावडें काकांच्या स्वता:च्या स्टोरी चा मेलोड्रामा असेल.
आता त्यांना जय आदितीचं सिक्रेट निघेल तोंडातुन म्हणुन कायच्या काय चालु आहे. Proud कालच्या भागावरुन नंदिनी मॅडमना कळेल लगेच असं दिसतयं . खुप प्रेडिक्टेबल असतात या मालिका. Happy

आणि इतका मोठा माणूस. आयुष्य पाहिलेला, टक्केटोणपे खाल्लेला तरिही इतकी छोटी गोष्ट पोटात ठेवू शकत नाही. विसरायची विसरायची म्हणत घोकत बसलाय. अतिशय फालतूपणा... डायरेक्टर भांग पिऊन डायरेक्शन करतो की काय देव जाणे.

कालच्या भागात नवरेन्ची मजा आली. तो तान्गडे का भान्गडे, त्याला ते सान्गत होते की कदमाना बहुतेक कळलय त्यान्चे गुपित.:फिदी:

इतके दिवस त्या काकांचं कॅरेक्टर आवडायचं. पण परवापासून जाम डोक्यात जायला लागलेत.

काल सारखे तोंडावर हात दाबून धरत होते जशी काही उलटी हो आहे आणि ते कोन्ट्रोल करत आहेत. Proud अइइइइइइइ घाण

येस अन्जु. वाचकानी मन्त्र्याना छातीवर पॅन्ट घालायला लावली.:दिवा: ( कदम काका- सुनिल तावडे, भाजपा मन्त्री- विनोद तावडे)

वाचकानी मन्त्र्याना छातीवर पॅन्ट घालायला लावली. ( कदम काका- सुनिल तावडे, भाजपा मन्त्री- विनोद तावडे)>>>>>>>>>>>>>>>>>आमच्याकडे येवून गेले विनोद तावडे (भाजपा मन्त्री) त्यामुळे ते लक्षात राहिले.

मागे एकदा सहजच चानेल बदलत असताना एक पाहिलेला एपिसोड ते सुनील तावडे सात्यानारायानाच्या पूजेला जात होते.

मला सर्व मालिका बघण्यापेक्षा वाचायला आवडतात विशेष करून मायबोलीवरील त्यांच्यावर केलेली चर्चा (चिरफाड), मायबोलीवरील मालिकांचे परीक्षण वाचून काही मालिका गपचूप holidays ला बघते (आमच्याकडे मराठी /हिंदी मालिका ब्यान आहेत का ते विचारायला या मालीकानीच सोय ठेवली नाही). आणि एका एपिसोड मध्ये पूर्ण मालिका आधी काय असेल व मग काय होईल हे कळून चुकते. पण येथे वाचलेले परीक्षण वाचताना (ऑफिसमध्ये लंच Time मध्ये) हसून हसून डोळ्यात अक्षरश: पाणी येते आणि मी एवढी का हसतेय म्हणून बाजूच्या deskvaril आश्चर्याने बघत बसते.

अरे काल-परवाचे ( शनी-सोम) चे कुणी पाहीले नाही का? हसून वाट लागली. आजचा पण मनोरन्जक भाग आहे. काका-काकु येतात. काकाना त्या अदितीच्या वहिनीचा फार राग असतो, आज ते तिला टोमणे मारणार आहेत.

ते टोमणेच तर मारत असतात सारखे.. आजचं काय विशेष..

भयंकर हास्यास्पद आणि अगदी फ दर्जाची झाली आहे मालिका. कथेचा प्लॉट चांगला होता खरंतर.. छान प्रगल्भ पण तरीही नर्म मालिका करता आली असती.. पण वाट लावली पूर्ण!

आजच विषेश आहे. ती भम्पक वहिनी अण्णाना म्हणते की मी डॉ. ना विचारणार आहे औषधान्बद्दल ( समथिन्ग लाईक दॅट ), हे ती त्या काकान्कडे पाहुन बोलते. अदितीवर विश्वास नाही, मीच सगळे निभावते असा अविर्भाव. नन्तर काका म्हणतात तुला अभिनय चान्गला जमेल, काम कर, पण नको करुस कारण अभिनय कधीतरी उघडा पडेल. तिचा आणी तिच्या नवर्‍याचा चेहेरा खेटर मारल्यागत होतो.:फिदी:

.

गेली दीड वर्षे टीव्ही बन्द होता, केबल काढली होती, आता परत लावलीये अन या मालिकांचा रतीब सुरू झालाय....
तो जय तर कस्ला शेळपट दाखवलाय..... मंगळसूत्र खिशातून पडते काय, ती भवानि ते फिरवत फिरवत याची उलटतपासणी घेते काय, अन तरी हा आपला शुंभासारखा स्वस्थ उभा.... दोन काचकिनी ठेवून द्याव्याश्या वाटल्या, एक त्या भवानीला अन दुसरी या जयला... शेळपट कुठला...
(मी चिडायचे कारण म्हणजे लिम्बी मला पहिल्यापासुन "जय" नावानेच ओळखते... त्यामुळे मालिकेतला देखिल "शेळपट" "जय" तिलाही अन मलाही सहन होत नाही अगदी Lol )

अन घरजावई करुन घ्यायचे खूळ कोणत्या मालिकेत आहे? राया राया करत ? तिथेही राया, अन त्याचे आईवडील अगदी बुळचट दाखविलेत.... आयला माणसे इतकी कणाहीन असू शकतात? अन ती बै बै बै बै करणारी बै..... पुन्हा एकदा बैबैबै केले की तोन्डात काहीतरी बोळा वगैरे कोंबावे असे वाटते....

बाकी अ‍ॅक्टींग चांगले करताहेत, दिग्दर्शक/लेखकाने वाट लावली आहे मालिकेची, त्यान्ना उलटे टांगून..... जौदे, मिरच्या वाया जातील माझ्या... धुरीचा काही उपयोग नाही.

Pages