मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघना पेठे म्हणते तसे हा संसार बारा काय बारा हजार वर्शे पण चालेल. Wink कुच्च होनेका नै.

माझी सर्व मते फक्त आणि फक्त चला हवा येउद्या च्या आधी काय ते दोन मिनिटे रेकॉर्ड होते त्यावर आधारित आहेत. आउ इला भाटे म्हटल्यावर टीव्ही वर रिमोट फेकून मारायचेच बाकी होते. मुळात ते हपीस आहे कश्याचे? आणि इतके बोअरिन्ग म्हातारे काय करत आहेत. त्यांच्या सोशीक बायका? इव्हील वहिनी. कौन लिखता है यार ये.

आउ इला भाटे >>>>>>>>> बासच. हेच बाकी होतं फक्त. आता त्या भांबावुन बावरुन इकडे तिकडे करतील. आणि ही भंबेरी अद्दिती त्यांना आपल्या लेकासाठी आवडेल.

त्या जानव्ही च्या विजया ब्यांक मध्ये कोणी हि कस्टमर येताना दाखवत नव्हते तसेच या ऑफिस मध्ये हि. विजया ब्यांक मध्ये तर अख्या ऑफिस मध्ये जानाव्ही आणि गीता दोघीच दाखवायचे सुरवातीला . आणि ती नंदिनी सारख्या जोड्या कसल्या लावत असते. तिला काय दुसरे उद्योग धंदे नाहीत का ? नंदिनीचा बोलण पण इतक नाटकी Happy

मुळात पाया कच्चाच आहे ह्या कथानकाचा पण तरी जंक फूडसारखं चटपटीत बनवायला खूप वाव होता.

हे म्हणजे पिझ्झा करायला घेतला आणि झालं भाज्या पेरलेलं मैद्याचं धिरडं असा फ्लॉप शो झालाय Wink

ही सेरियल म्हणजे निर्माता/दिग्दर्शकाची धंद्याची मजबुरी आहे ....
इथे "कथानक" आहे म्हणुन सेरियलमधुन सांगतोय/दाखवतोय असे नाही, तर सेरियल चा धन्दा आहे म्हणून कथानकात पाणी घालघालून वाढवून, संथ गतीने कथा(?) पुढे सरकवत रहायची आहे त्यांना..
मात्र एक नक्की, की नशीब या निर्माता/दिग्दर्शक/झीचे की त्यांना भुमिकेतील नट/नट्या उत्कृष्ट अ‍ॅक्टिंग करणारे भेटलेत. वरील बर्‍याच कॉमेण्ट्स या त्या त्या उत्कृष्ट अ‍ॅक्टिंगला अप्रत्यक्षपणे दाद देणार्‍या आहेत.
निर्माता/दिग्दर्शक आणि झी मराठी निव्वळ धन्द्याकरता या सर्व तंत्रज्ञ/कलाकार टीमला वाया घालवित आहेत.
एकिकडे सीआयडी/केडीपाठक एका एपिसोड मधे एकेक गोष्ट सांगुन/दाखवुन संपवत असताना याच अशा मालिका इतक्या रटाळ का दाखवितात?
माझ्या घरि/आजुबाजुला/परिसरात जी घाण वागणी/बोलणी चालत असतात तीच सेरियलमधेही कशाला बघायची अन त्यांनी तरी तीच घाण उगाळत कशाला दाखवित बसावे? असो. गंदा है मगर धंदा है त्यांचा.

आशु आणि अमा भारी पोस्टी आहेत तुमच्या. हसून हसून लोळले मी>>>> + २ Rofl

फक्त सुबोध भावे काय तो बघण्यासारखा पण त्याला पण चांगली हिरोईन नाही. कायतरीच आहे ती आदिती "सोशीक".खरच "कौन लिखता है यार ये." आणि त्या नंदिनी मॅडम हापिसात जोड्या लावा हेच एक काम करताना दिसतात. Proud

काल आदिती आणि काकू स्वयंपाकात होत्या, तर मागच्या बाजूला बरण्यात चक्क रांगोळीचे रंग होते. निळ्या रंगाचे मसाले आपण तरी नाही वापरत. भांडी पण एकाच मापाची होती.

अनि असंबद्ध बोलतात म्हणलं तर लगेच इतकं टोकाचं बोलूनही लोक विश्वास ठेवतात?
मुंबईसारख्या ठिकाणी जाता जाता कंगवा देऊन जावं म्हणून कुणाच्याही घरी जाता येतं? Uhoh

ते रांगोळीचे डब्बे/बरण्या पण किचन मध्ये ठेवतात.....अगदीच रंगीबेरंगी आहे किचन त्यांचे.
हे मालिकांमधले जेवण एक महाभयंकर प्रकार असतो , शिजते एक प्लेट मध्ये असते एक आणि खाताना दुसरच दाखवलं जात. शेवटी काय पकावगिरी सगळी. स्टोरी पण आणि जेवण पण. :):D

तरी पण लोकं बघतातच ना मग झाले तर त्यांना अजुन काय हवे ?
अजुन एक झी जिंदगी वर चालु असलेल्या मालिका** पहा म्हणावं एकदा ह्या नालायकांना.

** नंतर

खडा मसाला Rofl

आदे-मेदेच्या मालिकेत चिनीमातीच्या बरण्या डेकोरेशनसारख्या मांडून ठेवलेल्या दिसतात नेहमी Uhoh

नन्दिनीमॅडम फार्रच चिवट आहेत. पण त्या अदितीचे लग्न जुळवण्या ऐवजी स्वतःचेच लग्न कदम काकान्शी का जुळवत नाहीत? काकान्ची तर तीच ईच्छा दिसतेय.:फिदी:

रश्मे लग्न केलं तर नोकरी जैल ना त्या जाडीची Proud त्यामुळे ती त्या आदितीचं आणि सुभा चं लग्न लाऊन हापिसच्या नियमाला सुरूंग लावून सर्वांच्या नोकर्या तर वाचवणारच + लग्न ही लावून देणार्/घेणार. लग्नापरी लग्न आणि नोकरी परी नोकरी.. सगळंच सुमंगल. Proud

सगळ्यांची लग्ने बाहेरच्या बाहेर लावून टाका. नाहीतरी नंदिनी मॅडमला जोड्या जुळवायला आवडतात.
मग एक दिवस सगळ्यानी जाहीर करा... शिरेल संपेल.. हा का ना का..

खरे आहे दक्षिणा.:फिदी: बेसिक तळ उध्वस्त केला की गड हातात येईल अशी मॅमची कल्पना असावी.:डोमा:

गोगा.:फिदी:

त्या वहिनी ला आणि त्या मंद बैलोबा भावाला हाकला कोणितरी.. ऑफिस मधून आदिती ला मिळालेला लॅपटॉप स्वत:च्या पोराला मिळाला नाही म्हणून काय ते थोबाड दाखव्लं आहे तिचं. लोचटपणाचा कहर झाला बै बै बै बै बै.

दुराव्यात आज अदितीच्या वडिलांना दाखवणार का ? मला शंका येतेय . ते अदितीचे वडील नसावेत Happy
भोचकपणा करण्यात आणि घालून पाडून बोलण्यात रजनीचा हातखंडा. पण अशा व्यक्ती ऑफिस मध्ये असतात का ? आणि त्याचं कोणी इतक ऐकून घेत का ?

पण अशा व्यक्ती ऑफिस मध्ये असतात का ? आणि त्याचं कोणी इतक ऐकून घेत का ?>>>>>>>>> ऑफिसात असतीलही कदाचित असे लोक पण त्यांचं इतकं ऐकुन घेणारे म्हणजे मुर्खच जय आणि आदीती सारखे.

ऑफिसात असतीलही कदाचित असे लोक पण त्यांचं इतकं ऐकुन घेणारे म्हणजे मुर्खच जय आणि आदीती सारखे.>>>>>>>>अशी मुखदुर्बळ लोक नेहमी सेरिअल मध्ये असतात असे मला वाटायचे खरे पण बाजूच्याच बे मध्ये बसणारी एक कलीग जेव्हा तिच्या साबा बद्दल सांगते तेव्हा खरच तिची कीव येते. बघाव तेव्हा आज सासू असे म्हणाली, आज तिने हेच केले, आज तिने तेच केले.......पूर्वी तिला योग्य सल्ले देत असू आता रोज मरे त्याला कोण रडे म्हणून टाळतो.

त्या नंदिनीच्या दोन कानफटात ठेवाव्याश्या वाटतात .
हिला कामापेक्षा सगळ्यांच्या जोड्या लावण्यात केवढा तो इंटरेस्ट .

Pages