एका लघुग्रहास मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

Submitted by गामा_पैलवान on 21 July, 2014 - 08:52

लोकहो,

एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.

याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...

आ.न.,
-गा.पै.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर्ब ! ग्रेट न्यूज !!!
रस्त्या चौकाला नावे द्यायला किती धडपड असते इथे, नामांतराचे कित्येक वाद .. तिथे लघुग्रहाला नाव.. अभिमानास्पद बातमी आपल्या सर्वांसाठीच Happy

लघुग्रहाला विदर्भपुत्राचे नाव
Jul 21, 2014, 01.53AM IST
( http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster... )

सूर्यमाला घडत असताना मंगळ आणि गुरू या ग्रहांदरम्यान सापडलेल्या ग्रहाच्या तुकड्यांचे आकर्षण अभ्यासकांना कायम खुणावत आले आहे. या तुकड्यांचा शोध घेऊन त्याचे विश्लेषणही केले जात आहे. अमेरिकेतील अॅरिझोनाची 'कॅटालिना' ही संस्था अशा लघुग्रहांचा शोध घेत आहे. या शोधमोहिमेत एका लघुग्रहाच्या शोधात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या मूळच्या यवतमाळच्या डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.

साडे-चार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला घडत असताना मंगळ आणि गुरू यांच्यादरम्यान आणखी एक ग्रह होता. पण, गुरू आणि सूर्याच्या ओढाताणीत त्याचे अनेक तुकडे झाले. अॅरिझोनामधील कॅटा‌लिना स्काय सर्व्हे (सीएसएस) अशा लघुग्रहांचा शोध घेत आहे. त्यांच्या कक्षा जाणून घेत आहे. पॅसॅडेना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॅटालिना रिअल-टाइम ट्रानसिएण्ट सर्व्हे (सीआरटीएस) हा प्रोजेक्ट राबवित आहे. यामध्ये सीएसएसचा डेटा वापरला जातो. डॉ. आशिष महाबळ हे सीआरटीएसचे सदस्य आहेत. १५ फेब्रुवारी २००४ रोजी एक लघुग्रह दिसला. मात्र त्याच्याविषयीची अधिक माहिती उपलब्ध नव्हती. डॉ. महाबळ यांनी या लघुग्रहाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा सखोल अभ्यास केला. त्याची कक्षा आणि गती जाणून घेतली. ही माहिती मायनर प्लॅनेट सेंटर (एमपीसी) या आंतरराष्ट्रीय संस्थेला मिळाली. ही संस्था अंतराळातील विविध लघुग्रहांचे नामकरण करते. संस्थेने डॉ. महाबळ यांची या लघुग्रहाच्या शोधातील महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेत त्यांचेच नाव देण्याचा निर्णय घेतला. त्या लघुग्रहाला 'महाबळ' हे नाव दिले. हा लघुग्रह सध्या सूर्याच्या पश्चिमेला ~३० अंश आहे. या लघुग्रहाला सूर्य प्रदक्षिणा पूर्ण करायला ३.८७ वर्षे लागतात. '९०४७२' आणि २००४सीटी९९' अशी पर्यायी नावेही या लघुग्रहाला देण्यात आली आहेत.

सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील आययूसीएएमध्ये डॉ. आशा केंभावींच्या मार्गदर्शनात पीएच.डी. केली आहे. आपल्या आकाशगंगेतील तसेच आकाशगंगेबाहेरील वेगाने तेजस्विता बदलणारी स्रोते हा डॉ. महाबळ यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे. खगोलशास्त्राव्यतिरिक्त डॉ. महाबळ यांना माहितीशास्त्र, अव्यक्त जगते, शैक्षणिक ज्ञान-संवर्धनात अभिरुची आहे.

आशिषला बालपणापासूनच संशोधनाची आवड होती. चवथीत असताना घरी त्याला टेलिस्कोप आणून दिला. त्यात तो तासन् तास रमलेला असायचा. पुढे पुण्यातील आययूसीएएच्या उन्हाळी शिबिरात जावू लागला. दरम्यान, डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी संपर्क आला. पुढे यातच करिअर करण्याचे त्याने ठरविले. फेलोशिप मिळाली. आज तो अमेरिकेत संशोधन करीत आहे. वडील म्हणून त्याच्या प्रत्येक वाटेवर मी सोबत होतो. पण, त्याचे हे यश सर्वस्वी त्याचे आहे. कुठल्याही पाठबळाशिवाय त्याने मिळविले असल्याची प्रतिक्रिया डॉ. आशिष यांचे वडील अरविंद महाबळ यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
--------------------------------------------------------------------------------
(म टा तील बातमी कॉपी पेस्ट करुन दिली आहे - अ‍ॅडमिनला विनंती - यात काही (कॉपीराईट संबंधाने) गैर वाटत असल्यास कृपया सांगावे ) -

डॉ. आशिष महाबळ यांचे मनापासून अभिनंदन ...

(डॉ. महाबळांना विनंती - काही दुरुस्ती असल्यास कृपया तसे सांगावे.)

गुरू व मंगळ ह्यात आणखीन एक ग्रह असावा असे शास्त्रज्ञांना फार पूर्वीपासून वाटत आले आहे. अ‍ॅस्टेरॉईड्स हा ऑब्जेक्ट्सचा कचरा असून तो गुरू व मंगळ ह्यांच्यामधून सूर्याभोवती फिरत असतो. तेथे ग्रह असावा असे वाटण्यास एक गणिती कारण आहे. सूर्यापासून सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह एका विशिष्ट अंतरावर असून त्याचे समीकरण अस्तित्वात आहे. त्या समीकरणानुसार मंगळ व गुरू ह्यांच्यातील अंतर इतके अधिक आहे की त्यामध्ये एक ग्रह असायलाच हवा ह्याला पुष्टी तर मिळतेच, पण तेथे हा कचराही आढळतो. गुरू ग्रहाच्या भयंकर गुरुत्वाकर्षणाने त्या ग्रहाच्या ठिकर्‍या उडाल्या, त्यातील बराच कचरा मंगळावर, थोडा पृथ्वीवर व काहीसा शुक्रापर्यंत पोचला असे नोंदवले गेलेले आहे. त्या कचर्‍यात एक मीटर व्यासापासून पुढे अश्या अनेक वस्तू (दगड वगैरे) फिरत आहेत.

अस्चिग ह्यांनी त्यातील एका महत्वाच्या ऑब्जेक्टचा अभ्यास करून, त्याची गती, कक्षा वगैरे शोधली हे महान काम आहे.

वरील माहिती तुटपुंज्या वाचनावर आधारलेली आहे, येथे थोडीशी संबंधीत वाटली म्हणून लिहिण्याचा आगाऊपणा केला.

अस्चिग ह्यांच्या अतुल्य प्रतिभेस वंदन!

Congratulations Aschig !

( we r interested in authentic information @ topic, if it comes from Dr. Ashish Mahabal).

>> सविस्तर वाचायला आवडेल.
हे उत्सवमूर्तींना सांगायला हवं. त्याच्या मागे लागून लेख पाडवून घेऊयाच आता!

>>>>>>>>

दिवाळी अंक येतोय ना मायबोलीचा, त्यासाठी म्हणूनच हा लेख लिहायची विनंती करा. मग माबोकर म्हणून दुप्पट अभिमानाची गोष्ट होईल Happy

तो लघुग्रह आशिष यांनी शोधला नाही तर ज्या टिमने तो शोधला त्यांनी आशिष यांच्या सन्मानार्थं त्या ग्रहाचे नाव महाबळ ठेवले आहे. अस्चिग ची पोस्ट वाचा. त्यांनी स्पष्ट लिहिलंय की केवळ धूमकेतूला तो शोधणार्या शास्त्रज्ञाचे नाव देण्यात येते.
आशिष यांच्या संशोधनाचा मुख्य विषय या लघुग्रहापेक्षाही फार लांब आणि फार महत्वपूर्ण असणार्या ग्रह/गोलांबद्दल
आहे. आणि त्यातले त्यांचे संशोधन इतके महत्त्वपूर्ण आहे की ज्याच्या सन्मानार्थ त्यांच्याटीमने त्यांच्ये नाव एका लघुग्रहाला बहाल केलेय.
याऊलट 'हे लघुग्रह माझ्या संशोधनात(त्यांच्या कक्षेमुळे ) अडथळा आणतात असे अस्चिग त्यांच्या लेखात गंमतीने म्हणतायत.
Wink . आशिष, आम्हाला याबद्दल डिटेलात आणि मराठीत वाचायला आवडेल.

लगो, पैसे भरून लघुग्रहाला आपले नाव ठेवता येते हे मी ही ऐकले आहे.
बहुतेक कुसुमाग्रजांच्या एका फॅनने किंवा फॅन मंडळाने एका लघुग्रहाला त्यांचे नाव अश्याप्रकारे दिले आहे.
तुम्ही निकाळज्यांचे फॅन असाल तर पैसे भरून त्यांचे नाव देऊ शकता.
Wink

Pages