अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृश्चिक वाले भुताना घाबरत नाहीत. >>>>>>>>>>>> मी आहे वृश्चिक राशीची .रात्री झोपताना , दिवे मालवल्यावर , बाहेरून येणार्या प्रकाशामुळे दिसणार्या , भिंतीवरच्या सावल्यानाही मी घाबरते Sad .

माझा मामा खुपच लवकर गेला. म्हजे ३५ व्या वर्शी.आजीच्या घरात कहि कालजि असेल , आजीला घराच्या दारा बाहेर लाम्बच लाम्ब सावलि दिसायची.

वृश्चिक वाले भुताना घाबरत नाहीत. >>>>>>>>>>>> मी आहे वृश्चिक राशीची .रात्री झोपताना , दिवे मालवल्यावर , बाहेरून येणार्या प्रकाशामुळे दिसणार्या , भिंतीवरच्या सावल्यानाही मी घाबरते >>

आता कळलं ना ज्योतिषवाल्यांच्या नादी का लागायचे नाही Rofl ते जे सांगतात त्याच्या बरोबर उलटेच असते.

वृश्चिक वाले भुताना घाबरत नाहीत हे चूक आहे. त्यांना भुतांचा काही त्रास होत नाही असे म्हणणे संयुत्तिक ठरेल. (अर्थात गण कुठला त्यावर ठरते हे)

Proud माझ्या ओळखीतले पोलीस, होमगार्ड यातल्या तिघिजणी वृश्चिक आहेत. जाम टेरर आहेत. एकजण माझ्या नातेवाईकात आहे ( पोलीस नाही ) नवरा तिला घाबरतो काही वेळेस.:खोखो:

उलट असणारच. मानवी स्वभाव आहे तो. पण पोलीसान्मध्ये कर्क राशीची बाई वा बुवा गेले तर चोराला अलेले, अच्चु गुच्चु करुन उलट त्याची ख्याली खुशालीच विचारत बसतील.:फिदी: तिथे वृश्चिके सारखे टफ व्यक्तीमत्वच हवे.

बर सान्गा बर या वरच्या वृश्चिकेतल्या किती स्त्रीया पोलीसात आहेत?

नाही अप्पाकाका. देव गण वृश्चिकेत सुद्धा असतो, अनुराधा नक्षत्रचा मालक शनी व गण देव गण.

माझ्या मामेभावाची मेष रास आणी मित्राची कुम्भ रास. तरी दोघे कितीतरी वेळा रात्री १ नन्तर वडा-चिन्चेच्या झाडाखालुन ( जे भुतान्साठी कुप्रसिद्ध होते ) आलेत. त्याना कधी दिसले नाही तसे मात्र तिथे रहाणार्‍या गवळ्याला दोनदा काही आकृत्या दिसल्या होत्या.

राशीचे कौतुक नाहीये ओ भाऊ. ती वस्तुस्थिती आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तो पॅरा सोडुन बाकीचे वाचा.

सस्मित Happy भुताना मी पण घाबरते. तसे प्रत्यक्ष काही दिसेल असे वाटत नाही, पण कल्पनेनेच थरकाप होतो.

Exorcist पाहुनच जाम टरकले होते मी.

आमच्या सोसायटीबाहेर एक पिंपळाचे झाड लावावे म्हणतो
>>

पिंपळाच्या झाडावर कोणत भूत रहात? आलीत तर भाडे घ्यायला विसरू नका.

अवांतर: भूतांचे सगळे प्रकार यावर एक धागा आला होता. नेमकी लिंक आहे का कोणाकडे?

https://www.facebook.com/Shodh.daivi.shaktincha?fref=nf हा ब्लॉग बरा वाटला वाचायला सहज.

रीया अग मी इथे सारे काही ज्योतिष्य वा भविष्यावर लिहीणार नव्हते, ते ओघा ओघात लिहीले. पुढे लिहीणार नाहीये.

मात्र तिथे रहाणार्‍या गवळ्याला दोनदा काही आकृत्या दिसल्या होत्या. >>रश्मी त्या त्यांच्याच आकृत्या असणार मग Wink

पण पोलीसान्मध्ये कर्क राशीची बाई वा बुवा गेले तर चोराला अलेले, अच्चु गुच्चु करुन उलट त्याची ख्याली खुशालीच विचारत बसतील>>> परत एकदा हसू झाले. कर्क राशीचा मित्र पोलिस आहे. मंत्र्याच्या पोलिस कमांडो पथकामधे काही वर्षातच समावेश झाला आहे बहुदा अच्चु गुच्चु खुशाली करण्याकरीता भरणा केला असावा. नाही का रश्मी ? Rofl

उद्देश उर्फ उदयन, मी मजेत लिहीलेले बहुतेक तुम्हाला पचलेले दिसत नाहीये, तशीही तुम्ही प्रत्येकाची टिन्गल करण्यातच धन्यता मानता त्यामुळे यापुढे तुमचा अनुल्लेख करीन.

अरेच्या मजेत लिहिलेले तुम्हाला देखील पचत नाही वाटते तशीही तुम्हाला प्रत्येकाचीच मज्जा करण्यात धन्यता वाटते मग तुमची कोणी केली तर पचत नाही का? तुम्ही धांदात खोटे लिहितात.
आणि नाव उद्देश आहे बहुदा तुमच्या नजरेला कमी दिसु लागत आहे.

हा अनुभव अमानवीय प्रकारात मोडतो का ते जाणकार सांगतीलच.
नोव्हेंबर २०११ मधला अनुभव. रात्री बराच वेळ झोप येत नव्हती, आणि अचानक माझ्या वहीनीची वहीनी तिला मी प्रतिभाताई म्हणायचे ती मला डोळ्यासमोर दिसायला लागली. हे माझे इमॅजीनेशन आहे हे मला कळत होते, असे वाटत होते तिला काहीतरी सांगायचे होते, ती म्हणाली की तिला खुप अचानक जावे लागले कोणाशीच बोलता नाही आले घरी सांग की तिच्या दोन नंबर च्या मुलीला सांभाळा तिला खुप त्रास होतोय वैगरे. आणि ती गेल्यावर मी भानावर आले आणि माझ्या लक्षात आले की मी रडत होते.
दुसर्‍या दिवशी दादाला फोन केला आणि समजले दोन दिवसांपुर्वीच प्रतिभाताई गेली तिला खुप खोकला आल्याचे निमित्त झाले तिला अ‍ॅडमिट केले आणि ती कोमात गेली एक दिवसात संपले सगळे. Sad

Sad : ( Sad

सारीका यांच्या अनुभवाशी मिळता-जुळता प्रसंग झी मराठीवरील रमाबाई रानडे यांवर आधारित 'उंच माझा झोका' या मालिकेत दाखवला होता. न्या. रानड्यांची काकी 'ताई काकू' यांचा जेव्हा मॄत्यू होतो त्या वेळेस न्या. रानडे तिथे नसतात, दुसर्‍या शहरात असतात. त्यांना रात्री दार ठोठावल्याचा आवाज येतो. उघडून बघतात तर ताई काकू समोर ऊभ्या. त्या दोघांचे काही मिनिटे बोलणे होते व नंतर त्या अदॄश्य होतात. दुसर्‍या दिवशी त्यांच्या मॄत्यूची तार मिळते.

सारिका Sad ह्याला पुर्वाभास म्हणजे प्रिमोनेशन म्हणतात. प्रसिद्ध पाश्चात्य भविषवेत्ता किरो याच्या पुस्तकात याच्या बद्दल लिहीलेले आहे. काही वेळेस सुचक स्वप्ने पण पडतात. पण असे म्हणतात की आपल्या आई वडिलान्खेरीज ( ते गेलेले असतील तरच ) दुसरी मृत व्यक्ती स्वप्नात येऊ नये. खरे खोटे देव जाणे.

<<पण असे म्हणतात की आपल्या आई वडिलान्खेरीज ( ते गेलेले असतील तरच ) दुसरी मृत व्यक्ती स्वप्नात येऊ नये. >>
रश्मी याच्या मागे काही कारण आहे का?
माझी आजी 5 वर्षांपूर्वी गेली ती येते स्वप्नात अधे मधे. आणि आई ला जाऊन 18 वर्ष झाली ती मोजून 3 च वेळा स्वप्नात आलीय.

स्वप्निल मी हे एका भविष्य विषयक पुस्तकात वाचले होते, बहुतेक म दा किन्वा व दा भट लेखक होते त्याचे. त्यात स्वप्नानचे पण अर्थ दिले होते. पण ही गोष्ट मी पण अनुभवली आहे की ज्याचा आपण विचार करतो, ते स्वप्नात दिसते. फक्त सुर्योदयी पडलेली स्वप्ने खरी होतात. बाकी स्वप्ने त्या त्या व्यक्तीचा विचार करत असु तर ते स्वप्नात दिसतात.

पुर्वाभास +१
असे अनुभव बरेच ऐकले आहेत आणि एकदा मलाही आला आहे.
दहावीला असताना शाळेची कोकण ट्रीप ठरली . निघण्याच्या आधल्या रात्री मला अथांग समुद्राच्या कडेला असणा-या नारळाच्या झाडावर एक लाल मोठे कापड अडकल्याचे स्वप्न पडले होते . दुस-या दिवशी रत्नागिरीच्या अलिकडे एका निर्जन बिचवर गाडी थांबली तेव्हा एका नारळाच्या झाडावर लाल रंगाचे फाटलेले पॅराशूट अडकलेले दिसले . स्वप्नांत पाहिला होता तसाच अथांग समुद्र समोर होता. मी त्याआधी समुद्र फक्त फोटोमध्येच पाहिला होता त्यामुळे हे सर्व पाहून मी नि:शब्द झालो होतो.

वरचे भुताखेताचे एकापेक्षा एक सरस असे किस्से वाचले, पण एक प्रश्न पडलाय की हा धागा "धार्मिक ग्रुप" मध्ये का?
Happy

Pages