ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मामी!

मात्र मला आपलं हे खालील विधान संपूर्णपणे नाही पटू शकत. Happy

>>>आणि प्रेम माणसाला आंधळं, बहिरं आणि बिनडोक बनवतं.<<<

अनेकदा प्रेम हे व्यवस्थितपणे तर्कसुसंगत वागूनही केले जाऊ शकते. (उदाहरणार्थः आई वडिलांनी मुलांना शिस्त लावणे)

जनरलायझेशन योग्य होणार नाही.

ह्या विशिष्ट धाग्यापुरते बोलायचे झाले तर पाळीव प्राण्यांसंदर्भात त्यांच्या मालकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम जर इतर कोणाला त्रासदायक ठरत असेल तर ते नक्कीच निषेधार्ह आहे.

माझा एक अनुभव शेअर करायला आवडेल.

उटीला इंड्स्ट्रीयल ट्रीपला सगळे गेलो होतो.पहाटे लवकर जाग आली म्हणून आवरून समोरच्या डोगरावर जाऊन यावं म्हणून निघालो.उटीचं मस्त लॅडस्केप आस्वादत असता पायाला ओलं लागलं म्हणून खाली पाहीलं तर एक काळा करकरीत्,श्वान पाय आणि पँट हुगत होता.बस्स...काय झालं असेल विचारू नका.पण लहानपणापासून आजोबांनी सांगितलेलं,जागीच उभं रहायचं.तेच केलं.पण तो भाऊ जाता जाईना.पलीकडे त्याची मालकीण शंभर एक पावलांवर उभी तिला हाक मारली तर हा गुरगुरायला लागला.जरा दोन पावलं बाजूला गेला की चालायला लागलो कि हा परत हुंगायला.शेवटी मोजून तीन-साडेतीन मि.झाल्यावर तो गेला तिथून...ती चार मि. घड्याळ लॉक झाल्यासारखं भासत होतं.

बाकी खरी भटकी कुत्री अनुभवायची तर पहाटे साडेपाच-पाचला सिडको ,औरंगबाद्च्या बागेत जायला हवं.ती टोळी मागे लागली की बास्स...

पण खरं सांगू का?....आमच्याकडे एक राणी नावाची,अल्सेशीयन होती.मी लहान होतो.तिचा खूप लळा लागलेला.ती जाईल असं वडलांना जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी तिला गावा़कडे नेऊन ठेवली.ती गेली हे त्यांनी मला खूप नंतर सांगीतलेलं.मी तिला आजही विसरू नाही शकणार.तशीच औरंगाबाद्ला एक रहाट केसाची भट्की कुत्री यायची.रोज रात्री जेवण्याच्या वेळी येणार्,तिला एक चपाती वगैरे दिली की सकाळी उठेपर्यंत तिकडेच.मग परत संध्याकाळी त्याच वेळी हजर... रस्त्याने दिसलो की पळत यायची आणि समोरून पुढेपुढे उड्या मारत चालणार.आमच्या पुण्याच्या नातेवाईंकांचं एक कुत्रं...त्यानं तर त्या नातेवाईंकांपेक्षा जास्त प्रेम दिलं...अगदि निघताना स्वारी बरीच लांब सोबत चालत आली.जा आता घरी म्हटल्यावर मग माघारी फिरली.

वर कुणीतरी म्हटलंय प्रेम आंधळं वगैरे....पण खरं सांगू का? एखादा प्राणी जे देतो ना ते माणूस नाही देऊ शकणार.
आपण प्राण्यांवर प्रेम करताना(कुठलाही असो) हिप्नोटाईझ न झालो तर नवल काय हो!आमच्याकडे सगळे सारखेच.आमच्या आजवरच्या सगळ्या लबाड मनीबाई असोत,इतर प्राणी किंवा या जगातली/आजूबाजूची कुत्री असोत.

आम्हाला कधीही अजुनतरी कुठल्या कुत्रा मालकाची अरेरावी दिसली नाहीए.असं कोणि भेटलं नाहिय.लहान मुलांवरती झालेल्या हल्ल्यांबाबत मात्र काहीतरी करायला हवं.त्याबद्दलचा ऊहापोह खरा गरजेचा आहे.

बादवे,शाळेत असताना एकदा एका कानतुटक्या(नसबंदी केलेल्या) कुत्रीला पिल्लं झालेली पाहून आम्ही हसत सुटलेलो तेव्हा... Proud

ध.

श्वानप्रेमींनो माझ्या ओळखीच्या एका ७ वर्षाच्या मुलाला कुत्रा चावला आत्ता दोन दिवसापूर्वी. भटक्या कुत्रा होता. त्या दिवसात तो अजून सात मुलांना चावला म्हणे.

त्या मुलाला जखमेत इंजेक्शन घ्यावं लागलं. विचार करा त्याला किती दुखलं असेल तरी आपण भटक्या कुत्र्यांना खायला घालून त्यांना आप्ल्या जवळ यायला प्रवृत्त करनार आहोत का?

कुत्र्यांची नसबंदी हा अत्यंत विनोदी प्रकार आहे. ते काय रांग लाऊन उभे राहणार आहेत नसबंदी करायला?

वरील उदाहरण अगदीच हहपुवा

तसेही मला मेले हे कुठलेच प्राणी आवडत नाहीत, यककककक वाटते ते पायात घुटमळतात तेव्हा.

त्यात वर वेल ने सांगीतलेला ७ वर्षांचा मुलगा माझाच आहे. नुसते पाण्यात बोट सोडायला म्हणुन घराबाहेर गेला तेव्हा कुत्र्याने हल्ला केला आणि चावला. मुलगा खाली पडला माझा तर दुसर्‍या पायावर पंजा मारलाय. असले डोके फिरलेय माझे. साल्या त्या कुत्र्याचे तुकडे तुकडे करावेसे वाटले. दोन्ही पायांवर मिळुन ३-४ ठिकाणी मांस बाहेर काढलेले त्याने.

आजच ईंजेक्शनचा दुसरा डोस झाला. आता जुन संपेपर्यंत डॉक्च्या फेर्‍या कराव्या लागणार आहेत.

एवढासा जीव कसे सहन करतोय मी पहातेय. वर आम्हाला टेंशन आहे तो अजुन मनस्ताप.

मोना गं Sad

काळजी घ्या....

ज्यांना ज्यांना श्वानप्रेमाचे उमाळे येतात आणि अशी भटकी कुत्री कशी मारू नयेतचं ते लेक्चर देतात तेंव्हा वाटतं एकदा 'त्या' कुत्र्यांना यांच्या अंगावर सोडावं Angry

मोना, ते कुत्रं कोणी पकडुन नेलं का? नसेलच Angry

त्यात वर वेल ने सांगीतलेला ७ वर्षांचा मुलगा माझाच आहे. नुसते पाण्यात बोट सोडायला म्हणुन घराबाहेर गेला तेव्हा कुत्र्याने हल्ला केला आणि चावला. मुलगा खाली पडला माझा तर दुसर्‍या पायावर पंजा मारलाय<<<

हे वाचून अतिशय वाईट वाटत आहे. काळजी घ्यालच. पण ७ वर्षाचं पोरगं केवढं घाबरलं असेल.

आपला प्रतिसाद वाचला. Sad खरेच,खरेच वाचून वाईट वाटत आहे.कसा आहे मुलगा..?
कृपया माझ्या वर दिलेल्या प्रतिसादाचा सरसकट अर्थ घेऊ नका. Uhoh

मी कूठल्याही श्वानप्रेमी वगैरे संघटनेशी जोडलेलो नाहीये. योग्य ते उपाय करायला आपणच कुठेतरी कमी पडतो आणि इतरांवर त्याचं खापर फोडत असतो. आणि बर्‍याच बाबतीत आपल्या सगळ्यांचच असं होतं. हे मी श्वानांच्या बंदोबस्ताबाबत म्हणतोय.

इथे तो आजोबा मधला यशपाल यादव आणि उर्मिलाचा सीन क्रिएट झाल्याचा फील येतोय आता. माफी चाहूंगा,पण बाकी जनरेशन गॅप आहेच. ठिणग्या पडणार थोड्याशा. जुने माबोकर वि. नवे वगैरे.(आणि ते स्वागतार्हच असावं असं वाटतं.त्यातूनच तर लोक्स कळतात)

अरेरे, मोनाली ... किती दुखत असेल लेकराला. काळजी घ्या Sad

आमच्या इथे रस्त्यावर मधूनच एकदम पंधरावीस कुत्रे चवताळल्यागत भुंकत उगवतात. मोठ्यामोठ्या सोसायट्या आणि बाकीचे शेताचे पट्टे, मोकळी जमीन अशी असल्याने एकदम झुंडच शिरते रस्त्यावर. बरेचदा ते एकमेकांवर भुंकत असतात पण आपण त्यात सापडल्यास हल्ला करणार नाहीत ह्याची काय खात्री ! अजिबात सुरक्षित वाटत नाही. पण बहुतांशी लोकं न घाबरता अशा भुंकणार्‍या कुत्र्यांशेजारुन जाऊ शकतात असे निरीक्षण आहे.
शांत बाजूला बसलेला कुत्रा असेल तर भिती नाही वाटत पण ह्या प्रकारामुळे सोसायटीच्या गेटबाहेर पडलं की भाजीवाल्यापर्यंत जाईपर्यंतचा रस्ता कायम धास्तीतच पार होतो. वैताग आहे !
अर्थात हे फक्त पुण्यातले चित्र नाही. त्याव्यतिरिक्त पार्ल्याठाण्यात जाणं होतं तिथेही भरपूऽर भटके कुत्रे आहेत !
( * धागा भटक्या कुत्र्यांबद्दल नाही त्यामुळे अवांतर पोस्ट आहे पण राहवलं नाही. )

श्वानप्रेमींच्या बेशिस्त वा उद्दाम वर्तनाबद्दल सर्वांशी सहमत, अनुभव असेच असतात.
मात्र मला वाटते की खरा प्रॉब्लेम आपल्या सिस्टीममध्येच आहे.

आपल्याकडे चलता है किंवा हे असेच असते, सारेच करतात प्रवृत्ती प्रत्येक ठिकाणी आढळतेच. काही ठोस नियमच नसतील आणि त्यांचे तसेच काटेकोर पालनच होणार नसेल तर तुम्ही शिस्तबद्ध वर्तनाची अपेक्षा आपल्या समाजाकडून धरूच नये. यात मी तुम्ही आपण सारेच आलो. आज श्वानप्रेमींवर आगपाखड करणारे जर पुढच्या जन्मात या देशात श्वानप्रेमी म्हणून जन्माला आले तर असेच वागतील याची खात्री बाळगा. त्यामुळे कायदे होणे गरजेचे. नुसते ईंजेक्शन दिले पाहिजेत वेळच्यावेळी हा एकच कायदा करून फायद्याचा नाही. (कारण बरेच मालकांकडून हेच नेहमी मोठ्या कौतुकाने ऐकू येते की आम्ही आमच्या टॉमी, मिकी, बिल्ला, टायगर जो कोणी असेल त्याला वेळच्यावेळी ईंजेक्शन देतो) तर सार्वजनिक स्वच्छता आणि इतरांच्या सुरक्षिततेच्या व प्रायव्हसीच्या दृष्टीनेही कायदे बनवले गेले पाहिजे, त्यानुसार सदर व्यक्तीचे कुत्रा पाळायचे लायसन्स ठेवायचे की नाही वगैरे निकष लावले गेले पाहिजे.

मला पर्सनली कुत्राच काय कुठलेही जनावर पाळणे आवडत नाही. मुळात शहराच्या जागी जनावर पाळणे हा प्रकारच आवडत नाही. पण ते माझे वैयक्तिक मत झाले.

बाकी भटक्या कुत्र्यांना गरजेपेक्षा जास्त भूतदया दाखवणे म्हणजे दहशतवाद्यांना माणूसकी दाखवण्यासारखे आहे.

कोंबड्या, डुकर, बैल, बकर्‍याचे मटण जसे आपण खातो तसे कुत्र्याचे मांस ही माणूस खात असता तर `कुत्रे मारू नका' असा ओरडा खरेच असता का ?

काल बिल्डिंगमधला सो कॉल्ड पाळलेला कुत्रा माझ्या नणंदेला चावला. सुदैवाने दात वरचेवर लागण्यावर निभावले.

सो कॉल्ड अशाकरता की पाळलेल्या कुत्र्यासारखे लाड तर त्याचे केले जातात पण त्याची जबाबदारी कोणी नाही घेतलेली. काही वर्षापूर्वी त्याला अँटी रेबिज इंजेक्शन दिले होते. पण कुत्री दोन आहेत. दुसर्‍या कुत्र्याला काही इन्जेक्शन्स इत्यादी दिली आहेत का नाही माहित नाही. शिवाय पण दर वर्षी त्यांना काही इन्जेक्शन्स द्यावी लागतात का नाही इत्यादी माहिती कोणालाही नाही आणि त्याबद्दल कोणी काहीही करत नाही. दोन्ही कुत्री आमच्या बिल्डिंगमध्ये गेली नऊ वर्षे आहेत. त्यांना तिथून हाकलले तरी परत ते तिथेच येणार.

कोणी मला सांगेल का कुत्र्यांना काय इन्जेक्शन्स इत्यादी द्यायला हवीत. कारण त्या कुत्र्यांना तिथून हाकलले तरी बिल्डिंगमधली मुलं पुन्हा त्यांना घेऊन येणार.

(पूर्वी त्या कुत्र्यांची आई सुद्धा होती.) आता बिल्डिंगमधली मुले (वय वर्षे १२ ते २०) नवीन पिल्लू घेऊन येण्याचे म्हणत आहेत. असेच अनऑफिशियली पाळण्यासाठी. त्या मुलांनाही कसे थांबवावे ह्याबद्दल जरा सल्ला द्याल का?

पोलीस कंप्लेंट करा किंवा.............बाकी काय करा ते इथे सांगत नाही. समझ जाओ

वेल, सोसायटी मिटिंगमध्ये असे भटके कुत्रे न पाळण्याबद्दल नियम करता येईल का ? अर्थात कमिटीवरचेच सदस्य प्राणीप्रेमी असतील तर कठीण आहे.
सगळ्या सदस्यांमध्ये सर्क्युलर फिरवून बहुमताच्या आधारे निर्णय घेता येईल. सोसायटीला वॉचमन असेल तर भटक्या कुत्र्यांना आत येऊच द्यायचे नाही असे करता येते.

जर असा सो कॉलड पाळलेला कुत्रा कुणाला चावत असेल तर त्या अश्या कुत्र्यांना एंटरटेन न करण्याचा निर्णय बिल्डींगच्या सोसायटीच्या कमिटीनेच घ्यायला हवाच.

सोसायटी मिटिंगमध्ये असे भटके कुत्रे न पाळण्याबद्दल नियम करता येईल का >> कमिटीवरची एक सदस्या आहे जी ह्या कुत्यांना रोज खायला देते आणि तेही कुठेही खायला देते बिल्डिंगच्या पोर्चमध्ये सुद्धा. काल सेक्रेटरी सोबत बोलले आहे. ते कुत्र्यांना सोसाञ्टीत खायला घालण्यावरून सर्क्युलर काढतील असे म्हणाले आहेत. पण त्यांनाही काही करता येत नाही, बिल्डिंगची मुले ऐकणार नाहीत. सोसायटीचे गेट बंद करण्यावरून बरेच पॉलिटिक्स आहे. पण ही दोन कुत्री सोडली तर अजून कोणतीही कुत्री आत येत नाहीत आणि ही दोन कुत्री बाहेर जात नाहीत.

त्यामुळे त्या मुलांना ही कुत्री पाळण्याची लायसन्स घेणे, त्यांची इंजेक्शन्स इत्यादी करवणे ह्यासाठी फोर्स करावे लागेल. त्याकरता सेक्रेटरी मदत करणार आहेत. पण वर्षभराची काय इंजेक्शने असतात ह्याबद्दल कोनी माहिती देईल का?

व्हेटला विचारणे Happy
सर्वात उत्तम म्हणजे जी मुले त्या कुत्र्यांना संभाळणार आहेत त्यांनाच घेऊन व्हेटकडे जाणे व कुत्रे पाळण्यासाठी कायकाय खबरदारी घ्यावी ते व्हेटकडूनच येऊदेत.

Pages