ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा, एवढं समजून घेणारे श्वानमालक असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही.

कुत्र्यांचा विषय निघाला की कॉलेजच्या काळातलाच किस्सा आठवतो. एका मैत्रिणीकडे पॉमेरियन होता. भयंकर मोठ्या आवाजात भुंकायचा. त्यांच्याकडे जायचं झालं की मी दारातूनच तिच्या आईला विचारयचे की टॉमी कुठे आहे? त्याला आत न्या. एकदा तिच्या आईने मला सांगितलं आहे हॉलमध्येच पण मी धरुन ठेवते त्याला. मग मी बिन्धास्त आत गेले. आत गेल्यावर तिच्या आईने मस्करी म्हणून "ही घाबरते ना? जा रे!" करुन त्याला सोडून दिलं. तो डायरेक्ट माझ्या अंगावर जो तारस्वरात भुंकायला लागला तो थांबेच ना. माझी भितीने गाळण उडालेली पाहून त्या काकू जोरजोरात हसत होत्या. एरव्ही प्रेमळ असलेली बाई, त्या कुत्र्याच्या कौतुकात इतकी दुष्ट कशी होऊ शकते? मला त्या कुत्र्याचा राग तर आलाच पण त्या काकूंच्या वागण्याचं जास्त वाईट वाटलं. दाराच्या आत २ फुट आलेली असताना हे घडलं. मी तिथूनच त्यांना "मी परत कधीही तुमच्याकडे येणार नाही." असं सांगून वळले ती खरंच कधी त्यांच्याकडे गेले नाही.

कुत्र्यांच्या मालकांनी त्यांना नीट ट्रेन करायलाच पाहिजे. हे महत्त्वाचे आहेच.

पण कुत्र्यांना न घाबरता त्यांना सामोरे जाता यायला पाहिजे हेही तितेकच महत्त्वाचे आहे..

हिम्या, तोंड वासून, दात विचकून भॉ भॉ करत, कर्कश ओरडत, आपण चोर असल्यागत आपल्या जवळ जवळ येऊन भुंकू लागला तर काय करायचं? आणि तेव्हा मी १७ वर्षांची होते.

आता मध्यंतरी आमच्या गल्लीच्या तोंडावर २५ भटक्या कुत्र्यांची कॉन्फरन्स भरली होती रात्री. मी गुरुपौर्णिमेच्या उत्सवाहून परतत होते. इतके कुत्रे पाहून मैत्रिणीने गाडी रस्त्यावर थांबवून ठेवली मी माझ्या बिल्डिंगपर्यंत जाईस्तोवर. पण ते सगळे कुत्रे शांतपणे शेपट्या हलवत उभे होते. माझ्याकडे बघत होते तरी मला भिती वाटली नाही कारण त्यांची बॉडी लँग्वेज अगदी कूल होती. कुठेही तापटपणा, वसवसाट नव्हता. कधीपण मला सोडवायला यावं लागेल म्हणून मैत्रिणीचा ड्रायव्हर गाडीबाहेर येऊन उभा होता. मी त्या कुत्र्यांच्या सभेला पार करुन पुढे गेल्यावर मी मागे वळून त्या लोकांना 'जा' आता असं हात हलवून सांगितलं.

केश्वे. असं जर एखादं कुत्रं अंगावर आलंच तर सरळ त्याच्या पेकाटात लाथ घालायची.. आणि कोणाचं पाळीव कुत्रं असेल तर त्या व्यक्तीला ही कळेल की असला आचरटपणा जर परत केला तर तो त्या कुत्र्याच्या जीवावर बेतू शकेल..

दिनेशदा.. माझे म्हणणे जे पाळीव कुत्रे आहेत त्यांच्या बद्दल आहे.. जे बहुतेक रेबीज मुक्त असणे अपेक्षित आहे..

भटक्या कुत्र्यांना आपल्या जवळ फिरकू ही देउ नये.. जर आलीच तर जवळ असलेला दगड, काठी किंवा हातात येईल त्या वस्तूने त्यांना फेकून मारावा..

हिम्या, नाही जाता येत सामोरं. फोबिया म्हणावा इतपत भीती वाटते. अनेको वेळा प्रयत्न केला आहे. एवढं समजून घ्यायला काय जातं कुत्रामालकांचं? त्यांच्यासाठी अगदी ही भीती अनाकलनीय असेल पण ती समोरच्याला आहे हे मान्य करायला काय अडचण आहे? प्रत्येकाने कुत्र्याची जवळीक सहन करावी/ त्याला सामोरं जावं हा अट्टाहास कशाला?

केश्वे, तुझ्या जागी मी असते तर काय या कल्पनेनेच गाळण उडाली.

हिम्या Angry त्या कुत्र्याचं पेकाट आपल्या लाथेच्या कक्षेत आलं तर लाथ घालणार ना? त्याचं जिभली काढलेलं तोंडच थेट आपल्यासमोर आलं तर काय करायचं?

त्याचं जिभली काढलेलं तोंडच थेट आपल्यासमोर आलं तर काय करायचं? >> त्यांना आयतीच हॉट्लाथ (हॉट डॉग च्या चालीत वाचावे) नावाची डिश मिळेल :-(.

हिम्या, त्यांच्याशी कबड्डी खेळायची मनस्थितीतरी राहते का शिल्लक? ते त्यांचं थोबाडच समोर असतं ना व्हॅव व्हॅव करत. काही कुत्रे त्यांच्या डोळ्यांवरुनच खूप शांत, सालस दिसतात आणि वरदाने त्या वाण्याच्या कुत्राचं सांगितलं तसे शहाणे असतात. त्यांच्या असण्याने मला काही फरक पडत नाही. फक्त ते गुपचूप एका जागी बसले पाहिजेत. मैत्री करायला पुढे यायला थोडी जरी हालचाल दिसली की मी आधीच "ओ त्याला सांभाळा हा" सांगते.

माझ्यासोबतचा माझा मामेभाऊ कुत्र्याचा दात हाताला लागण्याचे निमित्त ! वय वर्षे ६ असताना रेबीज होऊन गेला. अजूनही आमच्या घरातले सगळे कुत्र्याला घाबरतात. मी तर कधी कधी पुढे पळतोय अन कुत्रा माझ्यामागे असे स्वप्न पडुन दचकुन ओरडुन उठतो Sad भयंकर भिती वाटते. अजूनही ऑफीसला यायच्या शॉर्टकट रस्त्यात कुत्रे असतात म्हणून दुरचा रस्त्याने येतो.
सोसायटीतली एक वयस्कर विनापत्य बाई तिच्या पाळीव कुत्र्याला फार जीव लावत होती. त्याला मटण, चिकन, टीवी समोर सेपरेट बेड अशी व्यवस्था होती घरात तिच्या. टॉमी की मम्मी म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व. टॉमी कसल्याशा आजाराने गेला दोन महीन्यापुर्वी तर हिला शुगर डीटेक्ट झाली . त्याच्या टेंशनने शुगर झाली असं सगळीकडे सांगते. टॉमी गेल्यावर आम्ही भेटायला आलो नाही ह्याचाही राग आला! तर सध्या काही विरंगुळा नाही म्हणून शिळ्या पोळ्या जमा करुन रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालायचं पुण्यांच(!) काम करतात. सोसायटीत भटकी कुत्री फिरतात. जवळपास २० कुत्र्यांचा घोळका बसलेला असतो रात्री. थर्ड शिफ्ट करुन येणार्‍या अनेकांनी तक्रारी केल्या पण उलटा वाद सुरु अन मला शुगर आहे टेंशन देऊ नका असं ऐकवतात वर ! भयंकर आहे. लहान मुलांना एकट्याला गार्डनमधे खेळायला सोडुच शकत नाही कोणी.
पण पिल्लुला त्याचा बाउन्सी (व्होडाफोन च्या अ‍ॅडमधला कुत्रा टेडी) फार आवडतो. सगळीकडे तोच हवा असतो.

<पण कुत्र्यांना न घाबरता त्यांना सामोरे जाता यायला पाहिजे हेही तितेकच महत्त्वाचे आहे..>

भटकी कुत्री दिसली तर न घाबरता किंवा न घाबरल्याचा अभिनय करत पुढे जाता येतं. पण पाळीव कुत्री त्यांच्या मालकाच्या कह्यात असावीत. त्यांच्यापासून आपले रक्षण करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा करणे चूक आहे का?

पण कुत्र्यांना न घाबरता त्यांना सामोरे जाता यायला पाहिजे हेही तितेकच महत्त्वाचे आहे..> हं आपण पळाले कि तेही चेकाळतात आणि जोरात मागे लागतात. एक भुकायला लागले कि दुसरे असे होते. अहो साधे मंदीरातुन येत होतो. तर एक कुत्र कोणावर तरी भुंकत होते. मी पुढे निघालो तर दुसरे कुत्रे आले त्याला वाट आधीचे याचेवरच भुंकत आहे असे होत होत टोळकेच जमा झाले एव्हांण सरळ समोरच्या दुकानात शिरलो म्हणुन बरे.

एका विशिष्ठ धर्मात आता हे भूतदयेचे प्रस्थ फारच वाढले आहे. कबूतरांना ज्वारीच द्या, कावळ्यांना शेवगाठ्याच द्या, मुंग्याना साखरच द्या, कुत्रांना ब्रेडच द्या.. असले नेमनियम त्यांच्यात फार बोकाळले आहेत. असे कुठलेही अन्न त्या पक्षी, प्राणी, किटकांचे नैसर्गिक अन्न नाही, हे त्यांना कसे कळत नाही.>>>>>:हहगलो:

दिनेशजी वस्तुस्थिती अशी आहे की हे भटके कुत्रे आणी मान्जरी माणसातच राहुन हे असले खायला शिकलेत. कारण भूत/हडळ दया. सगळेच भटके कुत्रे चावरे नसले तरी कधी होतील याचा नेम नसतो आणी माणुसही या सतत आसपास वावरणार्‍या प्राण्याना उरलेले शिळे-पाके असले काही-बाही घालत असतो. ही भटकी कुत्री मग सोकावतात, कधी कधी कचराकुण्डी जवळ काही मिळतय ते बघतात.

अहो मी मागे एक फिल्म बघीतली अ‍ॅनिमल प्लॅनेटवर. अमेरीकेत एका शहरात काही अस्वले मनुष्य वस्तीकडे यायला लागली होती. त्यातुन ते बाहेर ठेवलेले डस्टबीन पण उचकायचे खाण्यासाठी ( कधी तरी उष्टा बर्गर किन्वा मासे सापडले असतील त्यात ). यातुन एका दान्डग्या अस्वलाने एका बाईवर हल्ला केला, पण तिच्या मैत्रिणीने सगळ्या लोकाना बोलावुन त्या अस्वलाला पळवुन लावले.

आमच्या घराच्या मागे असणारी एक मान्जर कुठुन कुठुन शेव- फरसाण-बालुशाहीचे पुडे पळवुन आणायची आणी पिल्लान्सोबत खायची. हे अती नाहीये, मी स्वतः बघीतले आहे.:फिदी: आमच्याच बागेत बसुन तिने तो पुडा खाल्ला.:खोखो:

अश्विनी तुला या धाडसाबद्दल दन्डवत. मी खरे तर कुत्र्याच्या भुन्कण्याला घाबरते, कुत्र्याला नाही. कुत्रे भुन्कायला लागले की एका जागीच उभी रहाते. ( खरे तर कुत्रे ज्यान्च्याकडे असेल त्यान्च्या कडे जातच नाही) पण माझ्या माहेरी आमच्या एका डॉक कडे साधी कुत्री पाळलेली आहेत. काही वेळेस जावे लागतेच काही कारणाने. पण गेट वाजवुन आधीच त्याना सुचना देतो, कारण बाहेर बेल नाहीये. मालकाच्या ओळखीचे आहेत बघीतल्यावर गप्प होतात ही कुत्री. कधी कधी जवळ पण येतात.

लहानपणी कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळल्याने मला त्यान्च्या जवळ येण्याची भीती वाटत नाही. पण आता नकोच ते.

लोकहो,

भटक्या कुत्र्यांना आपल्या एरियातून कायमस्वरूपी दूर पळवायचा एक नामी उपाय आहे. तो म्हणजे फटाका! साधारण आठवडाभर रोज ठराविक वेळी एखादी डांबरी माळ फोडली की भटकी कुत्री पांगतात. आमच्या इथे एकजण सिगारेट लायटरने फटके पेटवत असे. पहिल्या दिवसानंतर कोणी लायटर हाती जरी घेतला तरी कुत्र्यांची फाटत असे. अधूनमधून अनपेक्षितपणे अॅटमबाँब फोडायचा. मस्त प्रभाव पडतो. दिवाळीचे चार दिवस कुत्री कुठेतरी गायब असतात हे कित्येकांना आठवेल. Happy

आ.न.,
-गा.पै.

अजुन एक नामी, जालीम आणि दुष्ट उपाय आहे.
एक कापडी बोळा घ्या त्याला पेट्रोल मधे बुडवा. आणि तो बो़ळा कुत्र्याच्या पार्श्व भागावर लावून द्या. (माचिस लावून नव्हे, तसाच). अशी धूम ठोकेल की परत कधी दारात काय गल्लीतही येणार नाही.
पेट्रोल महाग वाटत असेल तर रॉकेल ही चालेल. Happy

अस्वल हा महाभयानक व रानटी प्राणी आहे. वीस वीस माणसांनी दोरखंडाने बांधून धरले तरी अस्वल त्यांना आवरत नाही इतकी ताकद अस्वलाच्या अंगात असते. तसेच रान्डुक्करही अतीताकदवान असते. पण हे रानटी पशू असतात.

शहरात रात्रीबेरात्री हिंडणारी भटकी कुत्री ही निव्वळ माणसांच्या वस्तीत राहिल्याने थोडी मवाळ वागतात. मुख्य म्हणजे त्यांना कमी प्रयत्न करून काही ना काही अन्न मिळते. (परवा आमच्या येथील एका भटक्या कुत्र्याने उगीचच एक उंदिर मारलेला मी पाहिला. खाल्ला वगैरे नाही, पण नुसताच मारला). कमी प्रयत्नांत अन्न मिळत असल्याने ही कुत्री थोडे मवाळ स्वरूप धारण करतात. अन्यथा ही शेळपट कुत्रीसुद्धा तितकीच रानटी बनू शकतात. कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात वाचायला मिळाल्या.

हिम्सकूल म्हणतात तसे निडरपणे ह्या कुत्र्यांना सामोरे जाणे अनेकांना अशक्य असते व मीही त्यातलाच एक आहे. पेकाटात लाथ वगैरे प्रकार तेव्हा सुचतील जेव्हा प्रथम आपण श्वानदंशापासून पूर्ण सुरक्षित आहोत हे माणसाला पटेल.

तरीसुद्धा मी सुरुवातीच्या प्रतिसादात लिहिलेले उपाय (शैली हास्योत्पादक किंवा वैतागलेल्या माणसाची असली तरीही) भरपूर विश्वासार्ह आहेत.

१. आपण दुचाकीवरून जाताना भटकी कुत्री मागे लागली तर आहोत तिथे थांबायचे. कुत्री ताबडतोब नाद सोडून निघून जातात. (हा सहज शक्य होणारा उपाय आहे) (भटकी कुत्री)

२. लांबून कुत्रे भुंकत येताना दिसले (आणि आपण चालत असलो / उभे असलो) तर जमीनीवरून दगड उचलण्याची अ‍ॅक्शन करणे! कुत्रे घाबरून मागे पळते. (हा सहज शक्य होणारा उपाय आहे) (भटकी व पाळीव कुत्री)

३. जवळ येऊन थोड्या अंतरावरून अंगावर भुंकणार्‍या कुत्र्याकडे संतापल्यासारखे पाहून त्याला घाबरवणे! कुत्रे अनेकदा घाबरते. (मात्र हा उपाय सुचल्यावर प्रत्यक्षात आणण्यासाठी धैर्य लागते आणि ते नसल्यास उगाच परिक्षा घेऊ नये). (भटकी व पाळीव कुत्री)

निव्वळ पाळीव कुत्र्यांपासून स्वसंरक्षण करण्यासाठी:

१. कुत्र्याला घाबरणे अथवा कुत्र्याचा तिरस्कार करणे हे अनैसर्गीक अजिबात नसून कुत्र्याच्या मालकाला नि:संदिग्ध शब्दात सांगणे की 'बाबारे मला कुत्रे आसपास असलेले चालत नाही, तेव्हा कुत्रे असल्यास मी येणार नाही' हे आवश्यक आहे. त्यात लाजण्याचे, कमीपणा वाटण्याचे अजिबात कारण नाही. कुत्रा कितीही माणसाळला तरीही मुद्दलात निसर्गाने त्याला शिकारी प्राणी म्हणून निर्माण केलेले आहे, तो गवत खात नाही.

२. कुत्र्याच्या मालकांच्या कुत्र्याबाबतच्या भावना आणि आपले आणि त्यांचे संबंध ह्यातील 'आपल्याला कुत्र्याची वाटणारी भीती / तिरस्कार' ह्याला सर्वाधिक प्राधान्य आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. कुत्र्याच्या उपस्थितीत एकमेकांना भेटणे टाळूनही नाते जपता येते हे स्वतःलाही शिकवणे व त्या मालकालाही शिकवणे आवश्यक आहे.

३. अननोन ठिकाणी जाताना संबंधितांकडे आधीच चौकशी करून ठेवा. आपला प्रॉब्लेम स्पष्ट शब्दात सांगूनही ठेवा.

४. अश्विनी के ह्यांना त्यांच्या मैत्रिणीच्या घरी मैत्रिणीच्या आईकडून जो अनुभव आला तो कोणालाही येऊ नये. पण अशी काही बिनडोक (सॉरी अश्विनी) माणसे असतात ज्यांना 'आपण आपल्या कुत्र्याला घाबरत नाही तर हा का घाबरतो' हे समजत नसते. त्यावर अश्विनींनी केलेलाच उपाय सर्वोत्तम, पुन्हा त्या घरी पाय न ठेवणे!

५. आमच्या येथे तर मध्यंतरी एका पाळलेल्या श्वानाला मालक एलेव्हेटरमधून नेत व ते श्वान लिफ्टमध्येच शू करत असे. ते आम्ही लक्ष ठेवून, सिद्ध करून, बंद पाडले. प्रश्न असा आहे की त्या मालकांना ते मान्य करण्यात कमीपणा वाटायचा की त्यांचा कुत्रा असे काही करतो. ही माणसे माणूस म्हणून पूर्ण विकसित झालेली नसतात हे ध्यानात घ्यावे. ह्यांना फक्त आणि फक्त दादागिरीचीच भाषा समजू शकते.

अजून सुचतील तसे उपाय लिहीन.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

आमच्या ओळखीत एकाच्या बंगल्यात कुत्रे होते. व्रात्य मित्रमंडळीनि एका रात्री गेटवर "बिवेर ऑफ मास्टर, डोग इज फाईन" अशी पाटी लावली. त्यांनी ती हसून तशीच ठेवली. आता कुत्रे गेले पण पाटी आहे Sad

तुम्हाला खोटं वाटेल पण मला जर कधी घरी यायला उशीर झाला तर मी फोन करुन कोणाला तरी स्टेशनवर आणायला बोलावते. नाही नाही, आमची लेन तशी आहे अगदी सुरक्षित तरीही.
याचे कारण आहे गल्लीतली कुत्री. चांगली पाच सहा कुत्री जिवाच्या आकांताने भुंकत भुंकत आपल्या भोवती गराडा घालतात आणि माझी पाचावर धार॑ण बसते कारण मी कुत्र्याना खूप म्हणजे खूप घाबरते. बरं भटकी कुत्री ती. त्यांना कोण रेबीज विरोधी इंज्क्शन देणार? नाहक आपला जीव जायचा.
कधी कधी मध्यरात्री ही एका पाठोपाठ एक करुन अशी काही कोकलायला लागतात की आपल्या झोपेचं पार खोबरं.
मी कुठेतरी हे ही वाचलय की एक कुत्रं साधारणपणे १० /१२ वर्ष जगतं आणि कचरा एवढा असतो की ह्यांना अन्नाला कमी नाही. त्यामुळे ह्यांची प्रजा कमी होणं कठीण.
पण वर्षानुवर्ष हे चाललयं कही उपाय सापडत नाहीये यावर अजुन.

भटक्या कुत्र्याला ठार मारणे हा कायद्याने गुन्हा आहे का?
भटके कुत्रे प्रमाणाबाहेर वाढले असतील तर म्युनिसीपालीटीवाले काय करतात ? मारतात का लाम्ब नेऊन सोडतात?

डेलिया ते यातलं काहीही करू शकत नाहीत. कुत्रेप्रेमी संघटना त्यांच्यावर धावून येतात. मग त्यांना गप्पच बसावं लागतं.
भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जायची त्यालाही प्रचंड आक्षेप घेतला आहे या कुत्रेप्रेमी संघटनांनी. थोडक्यात काय त्यांना मारायचं नाही (हे मलाही मान्य आहे), आहे त्या जागेवरून हलवायचं नाही, त्यांची संख्या वाढू नये म्हणून प्रयत्नही करायचे नाहीत. असे कुत्रेप्रेमी संघटनांचे म्हणणे.
पण मग भटके कुत्रे मागे लागले, कुणालाही चावले, रोगी असले तर करायचं काय? याबद्दल कुत्रेप्रेमी संघटना चकार उत्तर देत नाहीत.

मला तर वाटतं पालिकेने हे सगळे भटके कुत्रे या कुत्रेप्रेमी लोकांच्या घरी नेऊन सोडले पाहिजेत. आहे ना पुळका एवढा तर सांभाळा.

अशा कुत्र्यांना घाबरविण्यासाठी आपलाही एक कुत्रा असुद्या !

डेलिया ते यातलं काहीही करू शकत नाहीत. कुत्रेप्रेमी संघटना त्यांच्यावर धावून येतात. मग त्यांना गप्पच बसावं लागतं.<<<

मी असे पाहिलेले आहे की महापालिकेची गाडी येऊन असे कुत्रे घेऊन जाते. त्यानंतर त्यांना कोठेतरी ठेवले जाते किंवा गोळी घालून किंवा औषध देऊन मारले जाते. ही यंत्रणा अस्तित्वात आहे असे मला नक्की वाटत आहे, पण बरेच दिवसांत अशी गाडी दिसली नाही हेही तितकेच खरे!

ऑन अ सेपरेट नोट - हे जे 'कोणतेतरीप्रेमी' लोक असतात ते अनेकदा न्यूसन्स असतात. पक्षीप्रेमी लोक पारव्यांना दाणे घालत बसतात, पारवे निसर्गाला हवे आहेत त्याहून अधिक वाढले आहेत. कुत्रेप्रेमी लोक वर म्हंटल्याप्रमाणे कुत्र्यांची बाजू घेत राहतात. पुण्यामध्ये कर्वे रोडला पर्याय नाही. हा पर्याय हनुमान टेकडी, पॅगोडा टेकडी व पौड फाट्याजवळची टेकडी ह्यातून बोगदा काढून निर्माण करावा ह्या मागणीला वृक्षप्रेमींनी वर्षानुवर्षे विरोध केलेला आहे. कर्वे रोडची अवस्था दररोज कालपेक्षा अधिक भीषण होत आहे पण हे 'प्रेमी' लोक आडमुठेपणा करण्यात धन्यता मानत आहेत. विषयांतराबद्दल क्षमस्व!

माझ्या वाचनात आलेल्या बातम्यांनुसार भटक्या कुत्र्यांसाठी काम करणार्‍या संस्था त्यांची नसबंदी करून देतात.त्यांचा याला विरोध नाही. महानगरपालिकेने अशा संस्थांना नसबंदीसाठी वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
अशाच एका संस्थेच्या संकेतस्थळावरून : http://www.wsdindia.org/faqs.htm
पुण्यातही अशा संस्था आहेत
काही वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांना पकडून नॅशनल पार्कमध्ये (तेथील बिबळ्यांसाठी भक्ष्य म्हणून) सोडून देण्याची टूम निघाली होती.

अवांतर : गेल्या वर्षी एका वसाहतीत घुसलेल्या एका बिबळ्याला एका भटक्या कुत्र्याने पळवून लावले

Pages