मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाच ठिकाणचे BOD ४८, ३१, १०३, २९, १२, १५ mg/lit एका ठिकाणी प्रमाण चिन्ताजनक आहे >> आणि आकृती ७ मधील डेटा जुळत नाही ना?
------ मी दिलेले सर्व आकडे पिडीएफ फाईल मधले आहेत, त्याची लिन्क वर दिलेली आहे, तुम्ही बघितली असेल असे समजतो. केवळ याच आधाराने CSEindia ने साबरमतीला ३ र्‍या स्थानावर ठेवले आहे.

आकृती ७ मधे केवळ trend दिलेला आहे. त्याचा आणि CSEindia मधे आलेल्या लेखाचा सम्बध्ध नाही आहे. पण एखादा रिपोर्ट लिहीताना सर्वान्गाने विचार करणे, वाचन करणे, माहिती गोळा करणे अपेक्षित आहे.

शिवाय CSEindia ने CPCB चाच आधार घेऊन रिपोर्ट बनवला आहे तर मग एवढा ग्रॉस फरक कसा काय??
------ प्रश्न योग्य आहे. Sampling Technique हा एक शास्त्रिय विषय आहे, आणि याचे सखोल ज्ञान माहिती गोळा करणार्‍या पर्यावरण विभागाला (आणि कर्मचार्‍याना) असेलच. माहिती कशी गोळा करायची याची लेखी पद्धत (documented procedure) अस्तित्वात असेल आणि त्याच पद्धतीने सर्व ठिकाणचे samples गोळा केले जात असावे असा माझा समज आहे.

>> टीमकी वाजवताना पाहुन गंमत वाटते आहे. >> ६० वर्षा काहीच प्रगती झाली नाही ही टिमकी डफली वाजवत असताना आम्हाला देखील गंमत वाटते आणि मनोरंजन होते हो <<

त्यांना ६० वर्षांत काहि जमलं नाहि, आता ह्यांना पांच वर्षतरी ध्या... नाहितर आम्हीहि येउ तुमच्यासोबत त्यांचा बँड वाजवायला...

बाकी मॅक्झिमली पोल्यूटेड नद्यांच्या यादीत टॉप १० मधे ३ रा नंबर की ७ वा यावर आकडेवारीची फेकाफेक गमतीदार आहे.

एकाच नदीचे पाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे असू शकते, ही सिंपल गोष्ट आहे. बाकी ज्या CPCBच्या आकडेवारीवर विसंबून तावातावाने लिहिणे सुरू आहे तो नॅशनल / सेंट्रल पोल्यूशन कन्ट्रोल बोर्ड नावाचा जोक विसर्जित करून टाकला, तर अक्ख्या जगातले समुद्र पोल्यूट होतील इतके घाणेरडे लोक त्यात भरलेले आहेत. त्या सोबत सगळे स्टेट पोल्युशन कन्ट्रोलवाले देखिल.

पोटभर लाच दिली, की हॉस्पिटलच्या संडासाच्या सेफ्टी टँकमधून पोटेबल वॉटर ग्रेडचं अ‍ॅफ्ल्युअंट बाहेर येते असली सर्टिफिकेटं देतात ही लोकं.

देव/अल्ला/जिझस कुणीतरी काहीतरी करो अन किमान नद्यांतली घाण खरेच कमी होवो.

एकाच नदीचे पाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे असू शकते, ही सिंपल गोष्ट आहे.
----- या पेक्षाही साधी (simple) गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणचे पाणी वेगवेगळ्या वेळी भिन्न उत्तरे देतील.

एकाच ठिकाणचे sample रविवारी सकाळी गोळा करत आहात का बुधवारी दुपारी २:०० वाजता हे महत्वाचे आहे. याची सर्व बारिक माहिती "sample गोळा कसे केले जाते?" यामधे असायला हवी.

मला येथे नागरिकानी विषयाची माहिती काढुन, त्याची स्तत्यता पडताळुन मगच Educated Opinion बनवलेला बघायला आवडेल.

बाकी ज्या CPCBच्या आकडेवारीवर विसंबून तावातावाने लिहिणे सुरू आहे तो नॅशनल / सेंट्रल पोल्यूशन कन्ट्रोल बोर्ड नावाचा जोक विसर्जित करून टाकला,
----- Sad दुर्दैवाने असे प्रत्येक सरकारी खात्या बद्दल म्हणता येइल आणि मग चर्चेला काही अर्थ रहात नाही.

पोटभर लाच दिली, की हॉस्पिटलच्या संडासाच्या सेफ्टी टँकमधून पोटेबल वॉटर ग्रेडचं अ‍ॅफ्ल्युअंट बाहेर येते असली सर्टिफिकेटं देतात ही लोकं.
----- हा निराशावादी युक्तीवाद झाला... आपल्याला आशावादी रहायला हवे.

देव/अल्ला/जिझस कुणीतरी काहीतरी करो अन किमान नद्यांतली घाण खरेच कमी होवो.
------ या विचाराला १०० % सहमती फक्त हे काम आपल्यालाच करावे लागणार आहे (देव/अल्ला/जिझस यान्ची मदत शुन्य)... निव्वळ नद्या मधलीच नाही तर इतर सार्वजनिक ठिकाणची देखील.

<< देशात कुठेही काहीही झाले (जे झाले ते अत्यंत निंद्य होते ह्यात वादच नाही, कृपया विपर्यास केला जाऊ नये) तर त्यावर मोदींनीच स्टेटमेंट द्यावे किंवा कारवाई करावी ही अपेक्षा गैर आहे.>>

मयेकर, मान्य. पण ह्या असल्या ट्वीटपेक्षा किंवा असल्या ट्वीटसोबतच एखादी चिवचिव अशा घटनांबद्दलही केली असती तर जरा माणुसकी दिसली असती. वैम.

Untitled.png

<<मनमोहन सिंग आणि सोनिया ह्यांचा संबंध जितका थेट, जगजाहीर होता तितका मोदी व संघ ह्यांचा नाही.>>

बेफिकीर, सिंगांचा रिमोट सोनिया आणि मोदींचा रिमोट संघ हे गृहितकच जरा गडबड वाटतंय. दोघांचाही कर्ताकरविता धनी वेगळाच असावा असं वाटतंय Happy

<<ता.क. - ह्या मिर्ची म्हणजे लहानपणी जत्रेत हरवलेली माझी जुळी बहिण आहेत का?>> यु नेव्हर नो साती Happy

उदय,
तेच तर मी पण म्हणतेय. दोन रिपोर्ट्स जुळत नाहीत. काहीतरी झोल आहे. मलापण ह्याबद्दल इथल्या तज्ञांचं म्हणणं ऐकायला आवडेल.

हा निराशावादी युक्तीवाद झाला... आपल्याला आशावादी रहायला हवे.>> +१ आणि जागरूकसुद्धा.

६९% मतदार आणि ८६% भारतीय जनता (मतदान न केलेले धरून) ह्यांनी मोदींना मत दिलेलं नाही. मोदी कितीही "पुरा भारत" म्हणत असले तरी हे सत्य विसरून चालणार नाही.

बाकी, भाजपा असो किंवा काँग्रेस, समर्थक इतकं हमरीतुमरीवर का येतात हे काय समजेना बुवा.

समर्थक इतकं हमरीतुमरीवर का येतात हे काय समजेना बुवा.
<<
त्याचं काये,
आपण लहानपणी एस्टीतून प्रवास करायचो.
एस्टी लागणारी लै लोकं असायची गाडीत.
त्यातली बहुतेक आपापली उर्मी दाबून ठेवत. पण कुणी धीर सोडून, वांती केलीच,
तर उत्तरादाखल इतर वांत्या येऊ लागत.
आता कंडाक्टर साहेब असल्या वांतीवीरांना दाराजवळच्या पायरीवर बसवून, स्वतःजवळची ब्याग देऊन, /पांशा ऑनः प्रसंगी सायटीवरून ब्यान करून /पांशाऑफः मल्टिपल वांत्यांच्या ओरिजिनला दाबायचा प्रयत्न करतात, पण वर्जिनल उर्मीला इलाज नसतो.

थोडक्यात, समोरच्याला उमाळा आला, की मलाही आवरता येत नाही, असली गत आहे. दुसरं काही नाही.

हा निराशावादी युक्तीवाद झाला... आपल्याला आशावादी रहायला हवे
<<
हाच आशावाद काँग्रेसबद्दल का नाही दाखवता आला?
जौद्या. हरामखोर लाचखोरांना जात नसते अन पक्षही नसतो. सरकारी नोकरांच्या नाकर्तेपणाबद्दल मी लै दिवसांपासून बोलतो आहे.

पंजाबातल्या एका मेडिकल कॉलेजला रेकग्निशन देण्यासाठी २ करोड रुपयांची लाच घेण्याच्या प्रकरणात पकडल्या गेलेल्या केतन देसाई नामक हरामखोराला, परत एमसीआय प्रेसिडेंटपदी नेमण्यासाठी भाजपा अन काँग्रेस, या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी या निवडणुकीपूर्वी जोर लावला होता. समहाऊ हे झालं नाही. देव पावला.

पडद्या आडच्या लोच्या लोकांना दिसत नाहीत, अन दिसल्या, तरी अभ्यास करून समजून घ्यायची इच्छा नसते लोकांची. टीव्हीवरचे बिनडोक सासूसुना अन "बिग बिझिनेस" मधल्या डावपेचांपायी चिकण्या लोकांनी केलेल्या फोनी काड्या पहाण्यात विरंगुळा शोधू लागलीत लोकं.

(शक्यतो शेजारच्या घरातून) कुणीतरी मसीहा यावा, अन त्याने आमचा उद्धार करावा ही मेंट्यालिटी कधी जाणारे कुणास ठाऊक.

बेसिक प्रॉब्लेम हे बोगस सरकारी नोकर आहेत या देशातले. आमच्यातलेच अनेक लोक सरकारी नोकर असतात. पेन्शन हा आमचा हक्क आहे, पेन्शनलाही डीए लागू आहेच, इ. कन्सेप्ट असतात. वगैरे. असो.. अभ्यास करून मुळापाशी कोण जाईल?

लालूने देखिल रेल्वेतल्या नोकरांच्या कामावर येण्याच्या वेळा ठिकाणावर आणण्यासाठी १० वाजता ऑफिसचे दरवाजे बंद करण्यासारखी कामं केली होती. आज लालू चारा खात आहेत.

उद्या या निवडून आलेल्या फायरब्रँडचं काय होतंय ते पाहू.

उदयजी,
ते pdf फाईलची तारीख बघा की! ते लेटेस्ट म्हटलंय ते काय आहे? २०११ चं रेकॉर्ड आहे ते...

लेटेस्ट पोस्ट आवडली इब्लिस.

फायरब्रँड ची बरीच पावले धोकादायक वाटत आहेत.
१. No talking to media, no visitors with phones: Modi
http://www.firstpost.com/politics/no-talking-to-media-no-visitors-with-p...

२. Work without fear, I’ll protect you, PM Modi tells senior bureaucrats
http://timesofindia.indiatimes.com/india/Work-without-fear-Ill-protect-y...

३. Government mulls changes in anti-corruption laws to protect officials http://articles.economictimes.indiatimes.com/2014-06-09/news/50447971_1_...

मोदींच्या अशा निर्णयांमुळे शंका आणखीनच वाढायला लागली आहे. पत्रकारांना पेनसुद्धा आत न्यायला परवानगी नाही म्हणे. खखोदेजा.
(इथे बातम्यांचे दुवे दिलेले चालतात ना ?)

आज सुरतमध्ये पूल कोसळल्याने तीन लोकांचा मृत्यू झाला. बांधकामातील निष्काळजीपणा?? भ्रष्टाचार??
http://timesofindia.indiatimes.com/city/surat/Three-died-as-a-slab-porti...

पत्रकारांना पेनसुद्धा आत न्यायला परवानगी नाही म्हणे. खखोदेजा.>>> हे कूठे आहे? पहिल्या लिंकमधे मला दिसले नाही. माझ्या नजरेतून मिस झाले असेल तर वाक्य इथे कॉपी पेस्ट कराल का प्लीज?

आधी लिहिलं होतं, मीडीयाशी कुणी काय बोलायचं याचे स्पष्ट दिलेले संकेत फार आवडले. आपल्या राजकरण्यांना नक्की काय बोलायचं ते समजतच नाही, नंतर पक्षाला अथवा खात्याला त्यांची घाण निस्तरत बसावी लागते. त्यांना अशा गॅग ऑर्डरची गरज नक्की भासते. व्हिजिटर्सनी फोन आत न नेता बाहेर डीपॉझिट करणे हे बर्‍याच ठिकानी वापरले जाते. (त्याच लेखामधेय राहुल गांधीच्या इंटर्व्ह्युला जाताना फोन डीपॉझिट करावा लागण्याचे उदाहरण दिला आहे) सरकारमध्ये हे पहिल्यांदा वापरलेले जाईल -त्यामध्ये धोकादायक काय आहे?

नंदिनी, ते वाक्य त्या लेखात नाही. मी इथे वाचलं.

http://scroll.in/article/modi-bars-ministers-bureaucrats-from-talking-to...

"Such is this fear that one of the ministers in Modi government, Minister of State for Agriculture Sanjiv Baliyan, has put up a notice outside his office asking visitors to not bring a mobile phone or even a pen inside his cabin."

<<आपल्या राजकरण्यांना नक्की काय बोलायचं ते समजतच नाही, नंतर पक्षाला अथवा खात्याला त्यांची घाण निस्तरत बसावी लागते. >> खरंय. पण दु:खाची गोष्ट अशी की आपण असेच लोकप्रतिनिधी निवडतो. ६ वी पास, ८ वी पास....असो.

आपण असेच लोकप्रतिनिधी निवडतो. ६ वी पास, ८ वी पास....असो.<<< शिक्षणाशी याचा काही संबंध नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या बोलण्याचे काय भयावह परिणाम होतात ते समजून न घेता बकबक करणारे कित्येक नेते आहेत. त्यापैकी कित्येक उच्चशिक्षित आहेत.

Sanjiv Baliyan, has put up a notice outside his office asking visitors to not bring a mobile phone or even a pen inside his cabin>>> . पेनमध्ये देखील रेकॉर्डर कॅमेरा बसवलेला असतो.
तसेही जर मीडीया अथवा व्हिजीटरला प्रेस किट दिले तर त्यात पेन-नोटपॅड-प्रेस रीलीज-इतर माहिती वगैरे सर्व मटेरीयल असतेच. पुन्हा एकदा त्यामध्ये "धोकादायक" काय आहे ते समजले नाही.

सरकारी खात्यांची एफिशियन्सी वाढावी म्हणून जी काही पावलं उचलली आहेत त्यापैकी ही काही पावले आहेत.

साबरमती नदी अमदाबाद. ४ मिनिटाचा (२६.०० पासुन ते ३०.००) फुटेज

https://www.youtube.com/watch?v=XylsBTzfeSU

त्याची तुलना मुम्बई च्या मिठी नदी , पुण्याचा मुळामुठा आणि सोलापुर्च्या भिमा नदीशी होउच शकत नाही.

उदयजी,
ते pdf फाईलची तारीख बघा की! ते लेटेस्ट म्हटलंय ते काय आहे? २०११ चं रेकॉर्ड आहे ते...
-----
मुद्दा क्र. १) सर्व प्रथम मिर्ची यान्नी http://www.cseindia.org/node/3701 एक लिन्क दिली होती आणि त्या लिन्क मधे साबरमती नदीचा प्रदुषणात क्रमान्क ३ आहे असे म्हटले होते. हा रिपोर्ट २०१२ मधला, किमान दोन वर्षे जुना आहे. त्याच लिन्क मधली वाक्य

"The National Water Quality Programme led by Central Pollution Control Board (CPCB) positions Sabarmati River (Ahmedabad), Khari River (Ahmedabad) and Amlakhadi River (Ankaleshwar) as the most polluted rivers in India. Surprisingly, all these rivers flow in Gujarat."

आता हा रिपोर्ट तयार करताना काही आधार हवा तर आधारासाठी आकडे घेतले आहे त्या pdf मधुन. रिपोर्ट २०१२ चा आहे आणि pdf अर्थात त्याच्या पुर्विची. २०१२, १३ बद्दल मला कुठे काही सापडले नाही.

त्या pdf मधे सहाव्या क्रमान्कावर साबरमती दिसते पण pdf च्या आधाराने बनवलेल्या रिपोर्ट मधे ३ रा क्रमान्क का आणि कसा आला?

मुद्दा क्र. २) मी त्याच साइट वर कालमानानुसार ट्रेण्ड बघत फिरत होतो तर सम्पुर्ण वेगळे चित्र २०१२ ते २०११ मधे दिसते आहे.

परदेशी शास्त्रीय परिसंवादाला जाताना फक्त शास्त्रज्ञ जातील, मंत्री नव्हे, हा चांगला निर्णय. शिवाय मंत्र्यांसाठी आचार संहिताही चांगली आहे. मंत्र्यांचे नातेवाईक सरकारी कंत्राटे घेतात ते कमी होईल. ती राज्यातील मंत्र्यांनाही लागू असेल का? सचिवांना थेट पंतप्रधानांशी बोलायचे निमंत्रण म्हणजे पी एम ओ पुन्हा एकदा शक्तीशाली बनेल. आजकाल पेन मध्ये कॅमेरा ठेवून स्टिंग केले जाते म्हणून आपले पेन आणायला बंदी योग्यच आहे. नव्या सरकारच्या चांगल्या निर्णयांचे कौतुक करायला काय हरकत आहे ?

<<परदेशी शास्त्रीय परिसंवादाला जाताना फक्त शास्त्रज्ञ जातील, मंत्री नव्हे, हा चांगला निर्णय.>> +१ उत्तम निर्णय.

<<आजकाल पेन मध्ये कॅमेरा ठेवून स्टिंग केले जाते म्हणून आपले पेन आणायला बंदी योग्यच आहे. >> मग काय हरकत आहे? स्टिंग झाले तरच सत्य बाहेर येतं हल्ली. कारण सरळ मार्गाने तर कोणी सत्य सांगत नाही.

<<सरकारी खात्यांची एफिशियन्सी वाढावी म्हणून जी काही पावलं उचलली आहेत त्यापैकी ही काही पावले आहेत.>> नंदिनी, ह्या पावलांचा आणि एफिशियन्सीचा काय संबंध? स्टिंग झालं तर एफिशियन्सी कमी कशी होते?

<<प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या बोलण्याचे काय भयावह परिणाम होतात ते समजून न घेता बकबक करणारे कित्येक नेते आहेत. त्यापैकी कित्येक उच्चशिक्षित आहेत.>>
अशी बकबक जनतेच्या हिताची आहे. वैम. हे मंत्री (अशिक्षित्/उच्चशिक्षित) कसलेले अभिनेते नाहीत. त्यामुळे जरा खोलात प्रश्न विचारले की खरं सांगून टाकतात.
मोदींच्या एका गुणावर त्यांचे विरोधकही सहमत होतील - अभिनयक्षमता. इतक्या आत्मविश्वासाने आणि दृढरित्या खोटं बोलतात (किंवा मग अजिबातच बोलत नाहीत) की विरोधकही बुचकळ्यात पडावेत.
अशी अनेक उदाहरणे आहेत. शेतकर्‍यांचा मृत्युदर, पतंगाचा उद्योग, जसोदाबेन....

(आता तर मुख्य अभिनेत्यासोबत सासबहु वाली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पण आहे. मज्जाच मज्जा!)

उदय, सगळ्यात आधी धन्यवाद. चिकाटीने साबरमतीवर लिहिताय त्याबद्दल.
<<रिपोर्ट २०१२ चा आहे आणि pdf अर्थात त्याच्या पुर्विची. २०१२, १३ बद्दल मला कुठे काही सापडले नाही. >> बरं, २०१२ पर्यंतच्या परिस्थितीचाच विचार करू या.

<< त्या pdf मधे सहाव्या क्रमान्कावर साबरमती दिसते पण pdf च्या आधाराने बनवलेल्या रिपोर्ट मधे ३ रा क्रमान्क का आणि कसा आला? >> ३ रा की ६ वा ह्या प्रश्नापेक्षा तो डेटा खालच्या चित्रात का जुळत नाहीये?

trend in Sabarmati.png

मुद्दा क्र. २) मी त्याच साइट वर कालमानानुसार ट्रेण्ड बघत फिरत होतो तर सम्पुर्ण वेगळे चित्र २०१२ ते २०११ मधे दिसते आहे.>> CPCB च्या साइटवर? काय सापडलं मग?

Water pollution of Sabarmati River—a Harbinger to potential disaster ह्या पुस्तकाला अ‍ॅक्सेस आहे का कुणाला?
http://link.springer.com/article/10.1007%2Fs10661-013-3532-5#page-1

नंदिनी, ह्या पावलांचा आणि एफिशियन्सीचा काय संबंध? स्टिंग झालं तर एफिशियन्सी कमी कशी होते?>>>>

मिर्ची, स्टिंगचा अर्थ समजून घ्या. इतक्या बेसिकपासून समजवायचं म्हणताय???

मग काय हरकत आहे? स्टिंग झाले तरच सत्य बाहेर येतं हल्ली. कारण सरळ मार्गाने तर कोणी सत्य सांगत नाही.>>> स्टिंग ऑपरेशन्स म्हणजे प्रत्येक वेळेला जनतेसमोर सत्य वगैरे आणण्यासाठी केली जात नाहीत. कित्येकदा त्याचा उपयोग ब्लॅकमेलसाठीदेखील केला जातो.

सध्याच्या काळात इन्फोर्मेशन इज पॉवर. त्यामुळे माहितीसाठी इन्फर्मेशनची सिंगल विंडो तयार करून "अधिकृत माहिती" तिथूनच मिळेल अशी सोय केल्यास काय प्रॉब्लेम आहे? हीच पॉलिसी राहुल गांधी यांना भेटण्यसाठी इतके दिवस वापरली जात आहे, मग ती सरकारी खात्यामध्ये वापरली तर धोकादायक काय आहे?

याव्यतिरीक्त पत्रकारांना माहिती काढायची असल्यास अनेक मार्ग उपलब्ध असतात, त्यांना जर सत्य बाहेर काढण्यात इंटरेस्ट असेल तर ते कसेही करून काढता येते.

उद्या, एखाद्या नेत्याच्या पर्सनल वागणुकीमुळे (ते वागणे नैतिक की अनैतिक हा वाद बाजूला ठेवू) किंवा पर्सनल मतांमुळे (अशी मते असावीत की नसावीत हाही वाद बाजूला ठेवू) संपूर्ण पक्षाला, खात्याला, सरकारला अडचणीत आणायचे की, एक क्लीअर कट पॉलिसी राबवून असल्या गोष्टींपासून वाचायचे? सरकारने कामं करायची की इतर मंत्र्यांची लफडी निस्तरायची?? आणि या पॉलिसीमध्ये "धोकादायक" काय आहे?? (परत परत तेच विचारतेय, त्याचे उत्तर अद्याप मिळत नाही)

मोदींचे कौतुक यासाठी वाटलं कारण सरकार ही एक "कार्पोरेट" असल्यासारखे नियम लावले जात आहेत आणि खासदारांना झक मारत ते पाळावे लागणार आहेत. खासदारांची संख्या एवढी आहे की तू नाय तर दुसर्याला मंत्री करता येतंय, आघाडी सरकारचे धर्म म्हणून कुणाचीच मर्जी राखायची गरज नाही. गेलास उडत हे लिटरली पंतप्रधान म्हणू शकत आहेत. Happy

मोदींच्या एका गुणावर त्यांचे विरोधकही सहमत होतील - अभिनयक्षमता. इतक्या आत्मविश्वासाने आणि दृढरित्या खोटं बोलतात (किंवा मग अजिबातच बोलत नाहीत) की विरोधकही बुचकळ्यात पडावेत.
>>>>> उत्तम राजकारणी होण्यासाठी तो अत्यंत आवश्यक गुण आहे. त्यामध्ये काही चुकीचे नाही. खोटं बोलणं हा तर राजकारणाचा पाया.

(आता तर मुख्य अभिनेत्यासोबत सासबहु वाली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पण आहे. मज्जाच मज्जा!)

>>> अत्यंत घाणेरडी पोस्ट!!!!

कित्येकदा त्याचा उपयोग ब्लॅकमेलसाठीदेखील केला जातो.
..............ब्लेकमेल कधि करतात ? क्लिन असल्यावर ?

>>> अत्यंत घाणेरडी पोस्ट!!!!>> बापरे ! किती पोटतिडकीने प्रतिसाद दिलाय तुम्ही.
इतकं घाणेरडं त्या पोस्टमध्ये काय दिसलं? मोदींना अभिनेता म्हटल्यावर इतका राग का येतो भक्तांना देव जाणे. Uhoh

<<मिर्ची, स्टिंगचा अर्थ समजून घ्या. इतक्या बेसिकपासून समजवायचं म्हणताय???>>
माझं हे क्षेत्र नाही. एकाच व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रातील सर्वज्ञान असणं शक्य नाही. तुम्ही त्या क्षेत्रात आहात तर समजावून सांगा.
Sting operation -
From Wikipedia, the free encyclopedia
In law enforcement, a sting operation is a deceptive operation designed to catch a person committing a crime. A typical sting will have a law-enforcement officer or cooperative member of the public play a role as criminal partner or potential victim and go along with a suspect's actions to gather evidence of the suspect's wrongdoing.

इतकंच मलाही माहीत आहे.

..ब्लेकमेल कधि करतात ? क्लिन असल्यावर ?>> एक्झॅक्टली माय पॉइंट!

बाकी जरा वेळाने लिहिते.

विकु तुमचे मित्र आहेत, हे ठाऊक आहे.
पण, काँग्रेस समर्थक असलेल्या मित्रालाही कुणीतरी-उल्लाखान बनवून टाकणे ही विकृती आहे, असे वाटत नाही का? मोदी विरोधक अथवा काँग्रेस समर्थक असलेत तर मुसलमानच असायला हवे असते का? >>>

तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते कळत नाही. तुम्ही ह्याच बाफवर खुद्द विकुंनी विकूल्लाखान असे स्वतःला म्हणलेले तुम्ही वाचले नसावे बहुदा. ते मी बनवलेले नाही. मागच्या पोस्ट वाचा जरा !!

मोदी विरोधक अथवा काँग्रेस समर्थक असलेत तर मुसलमानच असायला हवे असते का? >>. हा तुमचा गेस आहे, उत्तर द्यायला मी बांधील नाही.

---------------------------
ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यावरून तुम्ही नेहमीच काहीही बरळत आला आहात. मागे काय ते मुसलमान मराठी बोलतात हे माहिती आहे की नाही म्हणे ! च्यायला माझा जवळचा मित्र देखील मुसलमान आहे अन हा माणूस (इब्लिस) मला मुसलमान मराठी बोलतात असे शिकवतोय !

परत लिहितो, कुण्याही वंश, धर्माविषयी प्रॉब्लेम नाही, नसते वाद (तुमच्या मनातले) आणून माझ्यावर लेबलं चिटकवू नका. कृपया !

आणि तसेही मी विकुंना आणि विकु मला काय म्हणतात हा माझा अन त्यांच्या प्रश्न आहे. तुमचा नाही.

<बदायु प्रकरण :- मोदी चे मौन<<<>

दिल्ली गँगरेप प्रकरणानंतर भाजपने काय म्हटलेले पहा.

Why is the Prime Minister silent. The whole nation is angry and Prime Minister has not said anything. Prime Minister should speak up." We would like to appeal to you. Please don't maintain silence today. Delhi wants assurance. Young boys and girls want assurance. People of the country want assurance that they will be given security and safety

पीएमओच्या संकेतस्थळावर पाहिले तर रोज कोणकोणते सरदार मनसबदार मुजरा करून गेले त्याचेच अपडेट्स बहुतेक आहेत.

कोण आहे रे तिकडे? राज्याची हालहवाल काय आहे? हा प्रश्न विचारायला अजून वेळ झाला नसेल. होउंद्या सावकाश.

मेडियाला विरोध हा तर हिन्दुत्वाचा स्थायीभाव आहे. इतिहास म्यानिपुलेट करुन सोयीस्कर इतिहास जनतेला दाखवुन आपली मन्दिरे उभारणे हाच यान्चा इतिहास आहे.

मेडियाने स्टिन्ग ऑपरेशने करायची नाहीत. कारण काय ? तर ब्लॅक्मेलिन्ग होते.

मग उद्या किडनी ट्रान्स्प्लाण्ट सर्जरीवरही बन्दी घालायला हवी नै का? त्याचाही गैरवापर होतो म्हणुन.

सरकारी प्रतिनिधी बेआक्कल आहेत म्हऊन मेडियाला माहिती घेऊ द्यायचीच नाही. हे म्हणजे मास्तर नालायक आहे म्हणुन पोरान्ना शाळेत पाठवु नका असा आदेश काढण्यागत आहे.

पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया द्यायला हवी असा आग्रह कशाला? मोदीजी असल्या गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत http://kafila.org/2008/02/25/gangrape-in-modirashtra-sangh-parivar-stand...

मीडियाला विरोध कोणत्याही सत्तेवरच्या पक्षाचा कायमच असतो हो. मीडिया बीडिया जोपर्यंत आपण विरोधी पक्षात आहोत तोपर्यंतच सर्वांना हवे असते. पण त्याकरिता भाजप किंवा त्यांच्या पक्षातील संघटनांना वेगळे काढून का धोपटायचे? मीडिया वरती बंधने प्रत्यक्ष घालण्याचे एकमेव उदाहरण काँग्रेसचे आहे. आता परवा अजित पवार सुद्धा ऑलमोस्ट तसेच बोलून गेले.
(आगावा ही पोस्ट तुझ्या पोस्टनंतर आली असली तरी तुझ्या पोस्टबद्दल हे नाही).

Pages