लगोरी - मराठी मालिका

Submitted by परीस on 20 May, 2014 - 07:38

मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणार्या मैत्रीसारख्या अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या नातेसंबंधावर भाष्य करणारी `लगोरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारीत होत आहे.
`एंडेमॉल इंडिया प्रा.लि.’या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या `लगोरी’ची संकल्पना अतुल केतकर यांची आहे. दिग्दर्शक गौतम कोळी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन सचिन दरेकर आणि अमृता मोरे यांनी केले आहे.
`लगोरी’ ही धनश्री नावाच्या मुलीची आणि तिच्या चार मैत्रीणींची कथा आहे.
`लगोरी’मध्ये ज्ञानदा चेंबुरकर धनश्रीची मुख्य भूमिका साकारत आहे. याखेरीज अनुजा साठे, अभिज्ञा भावे, दिप्ती लेले, रेश्मा शिंदे, अशोक शिंदे, पल्लवी प्रधान, चैत्राली गुप्ते, मिलिंद शिंत्रे इत्यादी कलाकारांच्या विविध भूमिका आहेत.

तर लगोरी विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.:स्मित:

lagori.jpg

(प्रचि: आंतरजलावरुन साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीर गायबचं आहे.

र. भा. मुद्दाम विकीला पूर्वाचं कॅलेंडर फोटोशूट करायला लावतो आणि त्यांना गुंगीचं औषध पाजून त्यांचे फोटोज काढतो, ते उल्हासला दाखवून लग्न मोडायचा प्रयत्न असतो.

लगोरीने र्/भा. चा डाव उलटवते, त्याची माफी मागितल्याचं नाटक करून त्याच्याकडून सत्य काढून घेते जे उल्हास आणि त्याची आई ऐकत असतात.

आजच्या भागात - र.भा. बायकोला म्हणले की हे लग्न झालं तर आपलं नातं संपलं (तत्सम काहीतरी)

परवा ५ मिनिटं बघितली ही सिरीयल. ते खोटं लग्न वगैरे चाललं होतं, मग रमेश भाटकरकडून contract काढून घेतात etc.

कंटाळा येतो मला ही बघायला. कधीतरी भाचीसाठी तिचा शॉट असेल तर बघते.

आहे का कोणी ?

पहील्या भागावर मालिका आली पण पूर्णपणे वेगळचं चाललयं, त्या भागात उर्मि प्रेग नव्हती, मुक्ता वेगळ्याचं घरात होती.....

तो समीर बदलल्यापासून नाही पाहीली, आता एकदम सगळ्या संकटात दाखवत आहेत का ? उर्मि , धन्नो, रुजु ??

मी नाही बघू शकले. आमच्या भाचीबाई होत्या तेव्हा एक दोन एपिसोड बघितले पण जास्त बघावीशी वाटेना सो नाही बघितली.

Pages