लगोरी - मराठी मालिका

Submitted by परीस on 20 May, 2014 - 07:38

मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणार्या मैत्रीसारख्या अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या नातेसंबंधावर भाष्य करणारी `लगोरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारीत होत आहे.
`एंडेमॉल इंडिया प्रा.लि.’या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या `लगोरी’ची संकल्पना अतुल केतकर यांची आहे. दिग्दर्शक गौतम कोळी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन सचिन दरेकर आणि अमृता मोरे यांनी केले आहे.
`लगोरी’ ही धनश्री नावाच्या मुलीची आणि तिच्या चार मैत्रीणींची कथा आहे.
`लगोरी’मध्ये ज्ञानदा चेंबुरकर धनश्रीची मुख्य भूमिका साकारत आहे. याखेरीज अनुजा साठे, अभिज्ञा भावे, दिप्ती लेले, रेश्मा शिंदे, अशोक शिंदे, पल्लवी प्रधान, चैत्राली गुप्ते, मिलिंद शिंत्रे इत्यादी कलाकारांच्या विविध भूमिका आहेत.

तर लगोरी विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.:स्मित:

lagori.jpg

(प्रचि: आंतरजलावरुन साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय ... ओह्ह्ह खरच??? मला नव्हते माहित... पण ती मोठी वाटेल ना त्याच्या पेक्षा Happy

अभिज्ञा भावे कोण ?

हो ना मी आत्ताचं युट्युबरवर पहीला भाग पाहीला, त्यात त्यांची वयही जास्त नाही वाटत आहेत, फक्त मुक्ताचं घर वेगळं आहे आणि पूर्वा जरा मोठी दिसत्ये आधी पेक्षा

ओह बरं Happy

उर्मिचे सासरे 'मुला'साठी तिला अ‍ॅबोर्शन करायला लावत असतील असा अंदाज , ती लपवत असेल ही गोष्ट लगोरीपासून.......

हली कोणी बघतं नाही का ?

उर्मिच्या सासर्‍याने नक्कीचं उर्मिचं अ‍ॅबॉर्शन करवलं आहे, तिच्या सासूला माहीत आहे आणि ती टाळाटाळ करत्ये आधीचे रिपोर्ट् डॉ.ला दाखवण्याची.

धन्नोची सासु आणि उर्मिची सासु दोघी पुर्वी मैत्रीनी होत्या बहुतेक >> त्या दोघी त्या डोहाळजेवणात समोरासमोर आल्या होत्या का आठवत नाही.

मी बघते ग ... हो हो मला पण काल तिची रिअ‍ॅक्शन बघून तसेच वाटले ... पण उर्मिलाला ते माहित नसावे ... आता कळेल ...

काल धन्नो आणि रुजु च्या भांडणाचे सुतोवाच झालेच ....

तो मुक्स्ताचा मॅनेजर नाही दाखवला हल्ली.... माझा एक अंदाज आहे कि त्यानेच फसवले आहे मुक्ता ला पैशासाठी ...

हो हो तोचं फसवत असणार

हे जरा हास्यास्पद आहे ना की इतकी वर्ष लपून राहत्ये, काय वसुली असेलं ती घर / कंपनी विकून झालीचं असेलं की Wink

हो ना ... एवढे वर्ष असे लप्पोन कसे राहु शकेल...

पण तरी बरेच लॉजिक लावतात .... ड्रेसिंग सेन्स पण बराच बरा रादर बिलिवेबल दाखवला आहे.. सो छोड दिया Happy

शेवटी म्हणजे पहिल्या भागाच्या वेळी ना, तेव्हा तर मुक्ता एकटीचं आहे असं वाटतयं, बहुतेक पूर्वा त्याला सोडेल. काल पण पूर्वाचं आणते ना मिहिरला शोधून

कधीपर्यत बघितली आहेस ??

सध्या मुक्ताचा मुलगा मिहीर गायब आहे ... .

उर्मी ने ठरवले आहे कि सासर्याच्या विरोधात जाय्चे नाही ... सगळ्यांशी संबंध तोडायचे ...

पण सध्या काही कथा पुढे सरकल्यासारखी मला तरी वाटली नाही ..

पूर्वा आणी मुक्ता चे भांडण चालूच आहे ....बाकि जैसे थे

उर्मी ने ठरवले आहे कि सासर्याच्या विरोधात जाय्चे नाही ... सगळ्यांशी संबंध तोडायचे ...

>> म्हणजे काय झाले? तिच्या सासर्‍यांनी तिचं अबॉर्शन केलं ना? मुलीचा गर्भ होता म्हणुन?
तिने संबंध तोडले का? माहेरी वै. गेली का राहायला?
तिच्या नवर्‍याची काय रिअ‍ॅक्शन?

अग तसे नाही .... ती अबॉर्शन करवली आहेत हे तीला अजून माहित नाही ... तीला प्रेग्नंट असल्यामुळे डाउन वाटत असते ना ... सो तीच्या नवर्याच्या सांगण्यावरून तिने गँग ला घरी बोलावले असते ... त्याच्वेळी सासरा घरी येतो आणी तिच्या सासूला खूप रागावतो कि आम्च्या मागे तुम्ही शिस्त घालवत आहात ...
सो उर्मी म्हणते कि माझ्यामुळे तुम्हाला बोलणी खायला नको ...आता मी कोणाशी संबधा ठेवणार नाही...

सास रीच आहे ग तिच्या ...आणी अजून प्रेग्नंट पण आहे Happy

सगळ्यांशी संबंध तोडायचे ...

>> मी नीट वाचले नाही त्यामुळे वाटले कि सासर्‍यांच्या विरोधात न जाता सासरकडच्यांशी संबंध तोडायचे.
पण हे काहीतरी भलतंच.

बादवे तिचं अबॉर्शन झालंय असं आपल्याला वाटतंय का दाखवलं तसं मालिकेत?

बादवे तिचं अबॉर्शन झालंय असं आपल्याला वाटतंय का दाखवलं तसं मालिकेत?>>> अजून ते दाखवल नाही ... पण हिंटस दिल्या आहेत ... त्यामुळे नक्की तसेच असेल

अभिज्ञा भावे आधी इ मराठीवरच्या एका सिरीयलमध्ये व्हिलन होती. सुनील बर्वे आणि खुशबू तावडे होते त्यात मेन भूमिकेत. ती महाराष्ट्र टाईम्सच्या श्रावणक्वीन स्पर्धेत पण होती.

मिहिरला पूर्वा घेऊन आली, हा शेवट होता का कालचा, युट्युबवर ५ मिनिटांचाचं भाग मिळाला बघायला.

मिहिरला पूर्वा घेऊन आली (पुर्वाला तो सापडतो), पुढे >>>>
विकी पूर्वावरच संशय घेतो पण मुक्ता सांगते ती पुर्वाला लहानपणापासून ओळखते ती किडन्याप करणार नाही <<< समाप्त.

Pages