लगोरी - मराठी मालिका

Submitted by परीस on 20 May, 2014 - 07:38

मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणार्या मैत्रीसारख्या अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या नातेसंबंधावर भाष्य करणारी `लगोरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारीत होत आहे.
`एंडेमॉल इंडिया प्रा.लि.’या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या `लगोरी’ची संकल्पना अतुल केतकर यांची आहे. दिग्दर्शक गौतम कोळी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन सचिन दरेकर आणि अमृता मोरे यांनी केले आहे.
`लगोरी’ ही धनश्री नावाच्या मुलीची आणि तिच्या चार मैत्रीणींची कथा आहे.
`लगोरी’मध्ये ज्ञानदा चेंबुरकर धनश्रीची मुख्य भूमिका साकारत आहे. याखेरीज अनुजा साठे, अभिज्ञा भावे, दिप्ती लेले, रेश्मा शिंदे, अशोक शिंदे, पल्लवी प्रधान, चैत्राली गुप्ते, मिलिंद शिंत्रे इत्यादी कलाकारांच्या विविध भूमिका आहेत.

तर लगोरी विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.:स्मित:

lagori.jpg

(प्रचि: आंतरजलावरुन साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय ... राखी पहिल्यापासून चांगला पेस होता मालिकेचा ...
पण मला लास्ट विक पास्सून थोडी संथ केल्यासारखे वाटत आहे ...

कदाचित एक्दम मोठे वळण येनार असेल

ह्म्म , एक तर अजून पहील्या भागाचा संदर्भ नाही लागते.

पहील्या भागात उर्मि पेढीवर गेलेली दाखवल्ये, म्हणजे त्यांचं सुरळीत झालं असणार आणि तिच्या डिलिवरीनंतर असणार.

@ राखी...अपडेट बद्द्ल आभार!!!

@ प्राजक्ता_शिरीन
ह्म्म , एक तर अजून पहील्या भागाचा संदर्भ नाही लागते.>>>>> तिथे पोहचायला अजुन बरच काही बाकी आहे. just wait and watch .....(and enjoy)!!!

कालचे अपडेट्स...
तर सर्व जणी ट्रुथ अँड डेअर खेळायला बसल्यात.. उर्मीला समोसा खायचे क्रॅविंग होते आणि नेमके त्याच वेळी पुर्वा समोसे घेऊन येते.. Happy
सर्व जणी वर एक एक करुन ट्रुथ येत..
रुजु पी डी बद्दल सांगते. उर्मी सर्वांची एक्टिंग करुन दाखवते अगदी रुजु पासुन ते उल्हासपर्यंत..
मग धन्नो आपली सासु अजुन नवर्याबरोबर बोलत नाहिये हे सांगते आणि लगोरी टिम यावर उपाय शोधायचं कबुल करते.
शेवटी मुक्ता (सॉरी मला नावं अजुन लक्षात राहत नाहियेत :(... आलं आलं नाव. पटकन आठवलं) पुर्वा ला तु विक्रम बरोबर (म्हणजे तिच्या नवर्याबरोबर... हे पण लिहिता लिहिता आठवलं) लग्न का केलं असं विचारते..
पुढील भागात पुर्वा मुक्ताला सांगते कि तुच माझा डिवोर्स होण्यापासुन वाचवु शकते...

धन्नोची आई व नवरा बोलत नाहीयेत, सासू नाही.
मला आवडते ही सीरीयल. दुराव्याऐवजी हीच बघणार आता 9 ला.
पण समहाऊ विक्रमच्या प्रकाराबद्दल सगळं कळल्यावरही पूर्वा मुक्ताचं 'काही घडलंच नाही' असं एकमेकींशी वागणं रिअल लाईफ मधे अशक्य वाटतं.

धन्नोची आई व नवरा बोलत नाहीयेत, सासू नाही. >>>> ओह्ह.. ती अहो आई म्हणत होती म्हणुन मला वाटल की सासु बद्द्ल बोलतेय कि काय...
मलाही आता खरच इंटरेस्ट आलाय बघायला.. विक्रम आणि मुक्ता च काहि अफेअर वगैरे होत का?

यॅस , विकी आणि मुक्ताचं लग्न ठरलेलं असतं - विकी गरीब वगेरे असतो म्हणून तेव्हाच्या श्रीमंत मुक्ताशी पैशासाठी लग्न करतोय असं वाटू नये म्हणून तो काही काम मिळाल्यावर मुक्ताला भेटायला येतो

तेव्हाचं मुक्ताचे वडील वारलेले असतात आणि तिला आपण बँक्रप्ट झालोयं हे कळलेलं असतं, त्यावेळी ती विकीला म्हणते आपण लग्न करू, त्याला वाटतं की पैशासाठी लग्न केलं अस होईल, त्याला तिच्या वडीलांचा बिझनेस बुडालायं हे माहीत नसतं, तो लग्नाला नकार देतो आणि मग मुक्ता गायब होते , विकी काय कोणालाचं ती ८ वर्षे भेटत नाही आणि दरम्यान पूर्वा विकी बरोबर लग्न करते.

धन्नोची आई आणि समीर - लग्नाच्या वेळी समीर यु एस ला जाणार असतो, मग त्याची नोकरी जाते, यु एस कँसल होतं म्हणून धन्नोची आई नाराज आहे समीर आणि घरच्यांवर.

पण समहाऊ विक्रमच्या प्रकाराबद्दल सगळं कळल्यावरही पूर्वा मुक्ताचं 'काही घडलंच नाही' असं एकमेकींशी वागणं रिअल लाईफ मधे अशक्य वाटतं. >> अगं आता उल्हास आलायं ना पूर्वा साठी Wink

मेजर अपडेट मिसिंग प्राजक्ता.
विकी व मुक्ताचं प्रेम सगळ्या गृपला माहीत असतं. पूर्वाही विकीवर प्रेम करते पण बोलून दाखवत नाही. विकी व मुक्ता शरीरानेही जवळ येतात. मुक्ताला प्रेग्नंसी व बँक्रप्ट न्यूज एकदमच मिळतात. ती नेहमीप्रमाणे प्रे बद्दल न सांगता लग्न करू म्हणून मागे लागते विकीच्या. तो सेटल्ड नसल्याने नकार देतो. भांडण होऊन अर्थातच एक्सीडेंट होऊन पांगळा होतो. इकडे मुक्ता भूमिगत. मग पूर्वा मोक्याचा फायदा घेऊन विकीशी लग्न करून त्याच्या अंध आईची व त्याची जबाबदारी घेते. हीरोईन असल्याने लग्न झाले आहे हे जगापासून लपवून ठेवते. मुकता विकीचा मुलगा मिहीर आठ वर्षांचा झाल्यावर हे स्रव सर्वांना कळते. आता विकीला मुक्ताकडे जायचंय पण ती त्याला स्वीकारत नाही आणि पूर्वा सोडत नाही.

तिला प्रेग्नंसी तेव्हाचं कळली हे नव्हतं माहीत, मला तो सीन आठवतोयं, विकी येतो मुक्ताकडे, तिच्या बाबांचा फोटो लावलायं आणि मुक्ता रडत्ये, आणि मग त्याला लग्न करू म्हणून विचारते, मधलं नाही आठवत त्याला बाहेर काढते एवढं आठवतयं Happy

ओह गॉड.. मला खरच ही मालिका पहिल्यापासुन बघावीशी वाटतेय..
घरी नेट नाहिये..
ऑफिसमधे??? नकोच्च..
कस होणार :संभ्रमात पडलेली बाहुली:

ओह आय कंप्लिटली फरगॉट... सॉरी.. (त्या बेफिंच्या चारचौघी मधे रंगुन गेले होते)
कालचे अपडेटस..
ट्रुथ अँड डेअर च्या खेळात मुक्ता पुर्वा ला तु विक्रम बरोबर का लग्न केलस असं विचारते.. पुर्वा त्यावर असं सांगते की तिलाही विक्रम आवडु लागल्याने तिने त्याचे सर्व खुप प्रेमाने केले आणि नंतर स्वत:च लग्नाबद्द्ल विचारल.
मुक्ता तिला सांगते कि यापुढे तु एक वेगळीच मुक्ता पाहशील आणि तिथुन निघुन जाते.. (ह्या वेळेला माझ्या अंगावर सरसरुन काटा आला होता) उर्मी पुर्वाच अजुन एक सिक्रेट लगोरी समोर उघड करते कि ती बांदेकर हाऊस विकत घेणार होती म्हणुन..
दुसर्‍या दिवशी सगळ्या निघतात तेव्हा उर्मी पुर्वा ने आणलेले कपडे तिला परत करते. प्रवासात मुक्ता ला ईव्हेंट मॅनेजर चा फोन येतो कि त्याला आजच लगोरी टिम ला भेटायचय. सर्व जणी हे स्विकारतात. पुर्वा कडे सर्वजणी जाणुन बुजुन दुर्लक्ष करतात..
दुसरीकडे विक्रम आणि पी डी चर्चा करत असताना विक्रम पी डी समोर कबुल करतो की पुर्वाच्या लग्नाच्या प्रस्तवाला तो नाही म्हणुच शकला नाही..
रुजु घरी पोचल्यावर पी डी तिच्या हलगर्जी पणावर वैतागतात.
पुढील भागात मुक्ता विक्रम ला सांगत असते कि मी तुझ्याशिवाय नाहि जगु शकत. आणि नंतर विक्रम पुर्वा चे घर सोडुन जाताना दाखवलय..

शुक्रवार अपडेट्स
मुक्ता विकी ला सांगते की मी आता तुझ्याशिवाय जगु शकत नाही. मी तुझ्याशी खुप वाईट वागले.
पुर्वा धन्नोच्या आईला जाऊन भेटते तेव्हा मालतीकाकु पुर्वाला विकीबद्दल विचारते कि तो मुक्ता बरोबर होता ना मग तु कसं काय लग्न केलस वगैरे...
(अधिक आठवत नाहिये.. सॉरी)
शनिवार अपडेट्स..
धन्नो समीर ला आईला आमंत्रणासाठी फो न करायला सांगते. फोनवर मालातीकाकु समीर शी न बोलताच वडिलांकडे फोन देतात. पुर्वा धन्नोच्या आईला समजावते कि आता तुम्ही समीर बरोबर बोलल पाहिजे आणि धन्नो च्या मंगळागौर ला तुम्ही याय्लाच पाहिजे.
उर्मी मंदार ला भेटायला रॅस्टोरंट मधे येते. तिथे मंदार तिमा आपण नवीन घरात शिफ्ट होण्याची न्युज देतो सोबत दोन अटी घालतो कि आई आणि बिजनेस ला लगेच सोडता येणार नाही. आई आपल्या सोबत राहिल आणि बिजनेस मधे तो नोकरी केल्यासारखं काम करेल.
मंदार आई ला स्वतःचा निर्णय सांगतो. आई सुध्धा त्याला पाठिंबा देते.
रुजु मुक्ता ला फोन करुन ईव्हेंट वाल्यांची चौकशी करते आणि मुक्ताच्या मंगळागौरी नंतर आपण त्याना भेटु असे त्या दोघी ठरवतात. पण रुजु म्हणते की यापुढे पुर्वा लगोरी मधे नसेल.

आत्ता विचारचं करत होते अपडेटस टाईप करायचा Happy

राखी, प्लीज ह्या आठवड्यात पण दे हं अपडेटस, मुलीची परीक्शा आहे त्यामुळे गुरुवार पर्यंत बघणं शक्य होणार नाही.

रच्याकने, विकी घर सोडून जातो तो सीन आधी पण झालायं ना एकदा ?

रच्याकने, विकी घर सोडून जातो तो सीन आधी पण झालायं ना एकदा ? >> हो तो प्रोमोस मधे दाखवलेला पण प्रत्यक्षात अजुन झाला नाहिये..
या आठवड्यात माझीच प्रोक्झी मारा कुणीतरी.. मी पण बुधवार पासुन रविवार पर्यंत अलिबाग ला गणपती साठी..:)

अगं नाही प्रत्यक्षात पण पाहीलायं मी, पूर्वा त्याचं फ्रॉक मधे असते, जेव्हा ती डिक्लेअर करते की विकी तिचा नवरा आहे तेव्हाचं विकी जातो घर सोडून, मग परत येतो असं अंधूक आठवतयं.

हो प्राजक्ता ....विकी नाही का रात्रभर बाहेर राहात ... सकाळी मुक्ता कडे जातो ... घरं सोडून आलो म्हणून सांगतो ... तेव्हा तीच त्याला परत जा सांगते ...तो पूर्वाचा वाट्वानी, गुंड पाठवतो ... तेच आठवते आहे क तुला? ... मला तेव्हा एक्दा घर सोडलेले आठवत आहे

मी बर्यापैकी रेग्युलरली बघते ... पण जुलै मध्ये २-३ विक जमले नव्हते ...... ती मुक्ता नविन घरात कशी गेली ते पण मला माहित नाही ... आद्धी ती राहाय्ची ती खोली वेगळी होती ना?

@ प्राची, हो मला तेचं आठवतयं आणि प्रोमो मधेही दाखवल तो तोचं सीन परत का दाखवला कळलं नाही.

मुक्ताच्या जुन्या घरातल्या शेजारच्यांना विकी बद्दल कळतं आणि मुलं, मोठे मुक्ताच्या मुलाला चिडवतात, तो रात्रभर बाहेर राहतो, मग पूर्वा शोधून आणते , त्यानंतर मुक्ता घर बदलते (बहुतेक).

ओह आणि धन्नोची आई आली का ? >>> हो हो धन्नोची आई येते असं दाखवल पुढिल भागात..
प्लीज्च अपडेट्स टाका कुणीतरी.. म्हणजे गावावरुन आल्यावर काय घडुन गेले ते कळेल...

आज येणारे. धन्नोचा नवरा तिची माफी मागणारे.
यूएसला गेला नाही म्हणून जावयाशी कुणी 8 वर्षं कट्टी घेतं? 8 वर्षांनी कसली मंगळागौर? ओढूनताणून सीन लिहीतायत.

लगोरी ऑन सीरीयस टर्न.
पीडी एका यडपट मुलीच्या प्रेमात पडलाय. तिच्यासाठी घर नेकलेस इ घेतले. ऱूजुला संशय आलाय. गँग त्याचा पाठलाग करतेय. पण कन्फ्युजन आहे की पीडी असे कसे उथळ वागू शकतात? त्या मुलीला पीडीचे लग्न मुलगी इ बद्दल काहीच माहिती नाहीये. पीडी तिला का फसवतोय कळत नाही. म्हणजे खरंच आकर्षण आहे की दुसराच काही हेतू?

Pages