लगोरी - मराठी मालिका

Submitted by परीस on 20 May, 2014 - 07:38

मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणार्या मैत्रीसारख्या अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या नातेसंबंधावर भाष्य करणारी `लगोरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारीत होत आहे.
`एंडेमॉल इंडिया प्रा.लि.’या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या `लगोरी’ची संकल्पना अतुल केतकर यांची आहे. दिग्दर्शक गौतम कोळी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन सचिन दरेकर आणि अमृता मोरे यांनी केले आहे.
`लगोरी’ ही धनश्री नावाच्या मुलीची आणि तिच्या चार मैत्रीणींची कथा आहे.
`लगोरी’मध्ये ज्ञानदा चेंबुरकर धनश्रीची मुख्य भूमिका साकारत आहे. याखेरीज अनुजा साठे, अभिज्ञा भावे, दिप्ती लेले, रेश्मा शिंदे, अशोक शिंदे, पल्लवी प्रधान, चैत्राली गुप्ते, मिलिंद शिंत्रे इत्यादी कलाकारांच्या विविध भूमिका आहेत.

तर लगोरी विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.:स्मित:

lagori.jpg

(प्रचि: आंतरजलावरुन साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज शुक्रवार, आज बघेनं. पीडीचं तसं काहीतरी असणार असं वाटतचं होतं - मधे तो फोनवर बोलतो ना की आईला बरं नाहीये वगैरे, त्याचे तर आई-बाबा दाखवलेचं नाहीयेतं

मुक्ता - पूर्वा फ्रंटवर काय चालू आहे ?

माहीत नाही. पण विकी मुक्ताकडेच आहे आणि मुक्ता पूर्वाशी बोलत नाहीये. पेडणेकरांची सून (नाव आठवत नाही) ज्वेलरी डिझाईन करून त्यांनाच विकणार आहे. ती यडपट मुलगी धन्नोच्या कॉलसेंटरमध्ये तिला ज्युनियर असते पूर्वीृ मग ती पीडीचं ऑफिस जॉईन करते. पूर्वाही एकदा त्यांना बघते.

हो ती मुलगी मला आठवत्ये बघितल्याचं, धन्नो जेव्हा ह्या चौघींना शोधणार असते तेव्हा ही मुलगी दाखवली होती तिच्या ऑफीसमधे Happy

रुजु पीडी ला त्या अनुष्काबरोबर रोमांस करताना लपुन पाहते.. घरी येउन रडू लागते, . लगोरी टीम धन्नो च्या घरी जमलेली असते. तिथे ही अनुष्का समीर शी मिटींग करायला आलेली असते. तिची लाईफ फिलॉसॉफी ऐकुन गँग चक्रावते. इतक्यात रुजुची मुलगी मुक्ताला फोन करुन सगळा प्रकार सांगते.
अनिष्काला कट्वुन सगळ्या रुजुच्या घरी जायला निघतात. पोहचतात तर रुजु आत्महत्येचा प्रयत्न करत असते. त्या तिला वाचवतात,, अन झापतात, ? रुजु कडून त्यांना पिडीच्या अफेअर बद्दल कळतं.

त्या रुजुला शांत करतात. धन्नो, आणि पुर्वा तिला पीडीशी घटस्पोट घ्यायचा सल्ला देतात. पण मुक्ता म्हणते की असं केलं तर त्याला रस्ता मोकळाच होईल. मग त्या त्याला धडा शिकवायचा ठरवतात. नंतर त्यांना हे ही कळतं की पिडी चं अफेयर असणारी मुलगी दुसरी कोणी नसुन ' अनुष्काच ' आहे. हे कन्फर्म करण्यासाठी त्या अनुषका च्या ऑफिस मधे जातात. त्या कन्फर्मेशन बरोबरच त्यांना हे ही कळतं, अनुष्का चा पिडी ला लुबाडण्याचा प्लान आहे. अन सहा महिन्यात ती सगळी प्रॉपर्टी नावावर करुन घेऊन अमेरिकेला पळणार आहे.

इथे त्या दोघांना धडा शिकवण्याचा ग्रँड प्लान बनतो. रुजुला एकदम हॉट अँड सेक्सी कपडे घालुन त्या सगळ्या अनुष्काच्या पीडी नी घेऊन दिलेल्या फ्लॅट वर जाते. आत फक्त रुजु आणि तिची मुलगीच जाते.. तेवढ्यात पिडी येतो आणि रुजुला तिथे बघुन आधी घाबरतो मग चिडतो.. नंतर निर्लज्जा सारखं... रुजुला सांगतो की तुमच्या सारख्या बोरींग बायकोसोबत मी कंटाळलो होतो.
अन अनुष्का हे त्याच्या लाईफ मधलं थ्रिल आहे.

द एंड Happy

हो कालचा भाग एकदम हॆपनिंग होता.
मला त्या पाचही मैत्रिणी कोणत्याही प्रसंगात आपापले स्वभाव वैशिष्ट्यं न विसरता रिअॆक्ट होतात ते फार आवडतं. श्रेय अर्थातच लेखक, दिग्दर्शक व कलाकारांना आहे.

आजचा एपिसोड धमाल होता.. मज्जा आली. या पोरी फुल्ल्ल्ल मॅड आहेत.

अपडेट वाचण्यापेक्षा तो भागच बघा.. खर्र्र्र्र्र

बघताय का नाही कुणी? पीडी मूर्ख झालाय. काल रूजुता किती गोड दिसत होती. बिचारी पीडीसाठी गयावया करत होती. पण अनुष्कानेच तिच्या डोक्यात उजेड पाडला. की दुसऱ्यावर प्रेम करणारा नवरा का हवाय तुला? ज्याच्यावर तुझं एवढं प्रेम आहे त्याची लायकी नाही की तू त्याच्यासाठी माझ्याकडे भीक मागावीस. अनुष्कासोबत ड्रिंक्स घेऊन खरं काय ते कॆमेऱ्यात पकडायचा प्लॆन असतो पण रूजू आणि अनु फक्त 'स्त्रीया' म्हणून एकमेकींशी बोलतात ते महान होतं. त्यासाठी दिग्दर्शकाला 100 गुण.

काल नाही पाहीलं, शनिवारचं नेटवर पाहीलं.

पीडी दुबईला गेला ना ?

त्या आदीतीसमोर हे सगळं करतायतं ते जरा ऑड आहे.

बाकी उल्हास - पूर्वा अंदाज बरोबर Happy

बाकी विक्रम गायकवाड गायब आहे का सध्या ? का तो फक्त पीडीचं लफडं उघडं करायला आणला होता ?

मी पण बघते आहे ...

तो आधी पीडी चे काम करणारा जास्त सोज्वळ वाटायचा ना ...? आताचा विलनीश वाटतो

लगोरी कोणी बघतंय का अजून?

त्यात उल्हास नावाच्या charactorची आई म्हणून माझी भाची 'माधवी सोमण' येणार आहे. परवाच तिचे शुटींग सुरु झाले. आता मी तिचे काम बघायला मधूनच फिरकेन तिथे.

हो मी परवा थोडंस बघितलं, अंदाज आला की उल्हास कोण आहे ते. तो हिरो मागे एका मी मराठीच्या शिरेलीत होता त्यात रवींद्र मंकणी, किशोरी शहाणे, कुलदीप पवार, रवींद्र महाजनी अशी मोठी मोठी लोकं होती.

मी पहिले दोन भागच बघितले होते आणि मध्ये एकदा सहज बघितलं तर कोर्टात निकाल लागतो, सासऱ्याविरुद्ध ते काहीतरी चालू होतं.

झाली आमच्या भाचीबाईची एन्ट्री. ती वयाने लहान आहे तशी आणि एवढ्या मोठ्या मुलाची भूमिका करतेय. मी तिला म्हटलं की तू एकदम यंग आई वाटतेस. तो उल्हास खूप मोठा आहे.

गंध फुलांचा मध्येपण नायिकेची आई होती.

कोणी बघत नाहीये का सध्या ?

उल्हास श्रीमंत आहे कळल्यावर पूर्वा त्याच्याशी लग्नाला तयार होते. आयत्या वेळी चित्रपट सोडावा लागेल म्हणून माघार घेते, लगोरी तिला शोधून काढते , ती उल्हासला नकार देणार तेवढ्यात वाधवानी तिला सांगतो की प्रभुणेंची सून म्हणून तिला चित्रपट मिळाला आहे - का फायनांसर असं काहीतरी - म्हणून ती लग्नाला तयार होते, लगोरी अजून तिच्या विरूध्द आहे.

आयत्या वेळी उल्हासचे बाबा तिला अ‍ॅक्टिंग सोडावी लागेल असं सांगतात, आज बघायचं काय होतं.

मी मध्ये एक एपि. पाहिला होता. त्यात कोणीतरी त्या पुर्वाला (मॉडेल) "तू खोटारडी आहेस. मी दिलेल्या साडीत फोटो काढुन फेबुवर टाकला तेव्हा मी हरखलो. पण नंतर तुच स्थळ म्हणून आलीस" असं काहीबाही बरळत होता.
मला काहीच टोटल लागली नाही म्हणून मी चॅनल बदलले.
मध्येच ती अन्जुची भाची माधवी सोमण पण कुठेतरी दिसली.

अरे मी बघतच नाही. माझ्या भाचीची एन्ट्री झाल्यानंतर दोन दिवस बघितली. एकदा ती लगोरी टिम पुर्वा खोटं बोलते, तिला झापते ते बघितलं, आता नाही बघत, मला कंटाळा आला.

पियू मी पण ह्या ४-५ दिवसात बघायला सुरो केलयं. बाकी उल्हासच्या आधीच्या व्यक्तिरेखेला अनुसरून तो वागतं नाहीये Wink

मी पण मध्ये मध्ये बघते त्यावरुन सांगते ...

पूर्वा उल्हास चे लग्न होणे रमेश भाटकर ला मन्य नाही कारण ती सिनेमात काम करते ...

लगोरी टीम ला त्यांचे लग्न लावून द्यायचेच आहे ... अजुन लग्न झालेले नाही ...मी बघितले तेव्हा मुक्ता कुठे दिसली नाही ...कुठेर्तरी गेली आहे असा रेफरंस होता ....

बाकी पीडी रुजुला उल्हास वरुन संशय घेउन पिडत आहेत ... समीर दिसला नाही कुठे ....

Pages