लगोरी - मराठी मालिका

Submitted by परीस on 20 May, 2014 - 07:38

मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणार्या मैत्रीसारख्या अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या नातेसंबंधावर भाष्य करणारी `लगोरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारीत होत आहे.
`एंडेमॉल इंडिया प्रा.लि.’या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या `लगोरी’ची संकल्पना अतुल केतकर यांची आहे. दिग्दर्शक गौतम कोळी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन सचिन दरेकर आणि अमृता मोरे यांनी केले आहे.
`लगोरी’ ही धनश्री नावाच्या मुलीची आणि तिच्या चार मैत्रीणींची कथा आहे.
`लगोरी’मध्ये ज्ञानदा चेंबुरकर धनश्रीची मुख्य भूमिका साकारत आहे. याखेरीज अनुजा साठे, अभिज्ञा भावे, दिप्ती लेले, रेश्मा शिंदे, अशोक शिंदे, पल्लवी प्रधान, चैत्राली गुप्ते, मिलिंद शिंत्रे इत्यादी कलाकारांच्या विविध भूमिका आहेत.

तर लगोरी विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.:स्मित:

lagori.jpg

(प्रचि: आंतरजलावरुन साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यॅस -

उर्मि घर सोडून धन्नो कडे आली आहे, ती अप्पां विरोधात केस करणार आहे स्त्री भ्रूण हत्येची.

धन्नोची सासू आणि उर्मिची सासू दुरावलेल्या मैत्रिणी, तो ट्रॅक सुरू होईल आता

विक्रमने डिवोर्स साठी अर्ज केला आहे, ते मुक्ताला पटतं नाहीये

लगोरीला एक इव्हेंट मिळाला आहे मुक्ताचं घर वाचवायला, पूर्वा मदत करेल का माहीत नाही

कारण काल ती उर्मिला सांगते की मी ते घर विकत घेत नाहीये.

काल काय झालं ? कोणी बघतं आहे का ? कोर्ट केस इंटरेस्तिंग चालू आहे, पण उर्मिचा नवरा अगदीचं बुळ्या आहे, तो काहीचं स्टँड कसा घेत नाही, ना धड बायकोच्या बाजूने ना धड वडीलांच्या.

कोर्ट केस इंटरेस्तिंग चालू आहे....+१११
आप्पांनी मेहंदळे होस्पिटला दिलेली २५ लाख देनगी वकिल रहानेनी ति समाजकार्यासाठी व अकाउटंट्द्वारे दिली .... तसेच आप्पां डौ. मेहंदळेला ओळ्खत नाहित असे सिद्ध केले.
धनश्रीची उलट तपासनी घेउन ति व उर्मि (आप्पांना त्यांच्या घरी प्रथम भेट्ल्याचा प्रसंग) कसे खोटे बोलतात हे सिद्ध केले.

ओह मला वाटलं तो पुरावा उर्मिच्या बाजूने ठरेल Sad , केस बरेचं दिवस चालेल असं दिसतयं

मोल, कालचे अपडेटस लिहितेस ? रादर, तू बघशील तेव्हा लिहिशील ? मी पण मालिका पाहीली तर नक्की लिहेन Happy

काल उर्मिच्या नवर्याअप्प्पावरचा आरोप स्वतवर घेतला आहे.....त्यामुळे उर्मि अस्वस्थ झाली...

डॉ. मेहेंदळे अचानक बदलल्या कशा ?>>>>> उर्मिचे रिपोर्ट डॉ. मेहेंदळे नी manupulate केल्याचे सिद्ध झाले व त्यानंतर आप्पांनी हात वर केल्याने --- म्ह्णून डॉ. मेहेंदळे नी आप्पांविरुध साक्श दिली.

आप्पांनी आपल्याला काहीहि माहीत नसल्याचे सांगितले कोर्ट मध्ये. ही बातमी उर्मि चे वकील डॉ. मेहेंदळे ना देतात...त्यामुळे डॉ. मेहेंदळे घाबरल्या.....

ह्म्म्म ... पूर्वा त्या वकिलावर लाइन मारते का? त्यांची जोडी जमवणार बहुतेक .... विकी आणि मुक्ता एकत्र येतील असे वाटते

यॅस, सेम गेस, पूर्वा आणि उल्हासचं जमवणार, पण मग स्टोरी काय राहीली ? मालिका संपेलचं, अजून काही गुंते नाही राहीलेत सुटायचे Wink

अग त्या रुजुताच्या नवर्याचे आहे ना काहीतरी .... विकी बद्दल सुध्दा थोडे ताणता येइल.... मुक्ताचे घर आहेच Happy

अजून आहे ग बरेच ....

मला कळत नाही आहे ते पहिल्या एपिसोड मध्ये जे दखावले ... त्याचा मेळ कसा घालणार आहेत... कारण अजुन तरी सगळ्याजणी एकत्रच आहेत

यप...मला वाटतंय उल्हासच पूर्वावर लाईन मारतोय. Wink
पण ह्यामधे खूप वेळ घालवतील...पूर्वा-विक्रमचा डिवोर्स इ.

आजच सकाळी पाहिली. अप्पाना दहा वर्ष कोठडी आणि ५०००० रुपये दंड अशी शिक्षा झाली.. मंदार ला वाटतय की त्याची बायको घरी यावी त्याची आई पण त्याला हेच समजावते.
तो फोटोग्राफर(शुभमंगल साव धान मधला हिरो, मला नाव माहित नाही) केस जिंकल्याबद्दल पार्टी देणार आहे...
बाकी सर्वांची नावे माहित नसल्याने नीट लिहिता येत नाहिये..
आता रेग्युलर बघेन आणि अपडेट्स टाकेन Happy
रच्याकने मी आणि माझ्या ४ मैत्रिणी असा आमचा ग्रुप असल्याने ईटंरेस्ट जास्त आहे (इयत्ता बालवाडी ते आजतागायत गेली २५ वर्षे..).. Wink

ओह विक्रम - फोटोग्राफर त्या पिक्चरमधे आहे का ? त्यात अगदीचं काही तरी दिसत होता Wink

हो हो अपडेटस टाकत चला, मी शुक्र-शनि बघते बाकी ४ दिवसांचं नाही मिळत बघायला.

मंदार दुसरं घर नाही का घेऊ शकत ? उर्मि त्या घरात नाही म्हणत्ये यायला, पण ह्या मालिकावाल्यांना अशा गोष्टी पटकन कुठे सुचायला ?

रच्याकने, बाकी कोणाचे आई-वडील का नाही दाखवत ? धन्नो आणि रुजुचे एका फ्लॅश्बॅकमधे सोडून

लगोरी ची टीम पिकनिक ला निघाली आहे..
आत्तापर्यंत.... पी डी नीं घेतलेल्या नवीन गाडीतुन सर्व जणी निघाल्यात. प्रवासात छोटी छोटी भांडण, एकीने रुजु चा मोबाईल फेकुन देणे (हा सीन जिंनामिदो या चित्रपटातुन उचललेला आ हे Wink ) अशा गमती चालु असताना गाडीचा टायर पंक्चर होउन सर्व जणी गाडीला ध क्का मारत गॅरेज जवळ आणतात. तिथे एका गुंडाबरोबर बाचबाची होते. गाडी रिपेअर होऊन सर्व जणी रिसॉर्ट वर मजा करताना दाखवले आहे.
तो गुंड बहुदा ह्यांचा पाठलाग करत रिसॉर्ट येणार. (नव्हे येतोच.. पुढील भागात)

काल..
स्विमिंग करुन सर्व जणी फेरफटका मारायला बाहेर पडतात. तिथे चार गुंड यांच्यावर हल्ला करतात. उर्मी सोडुन इतर सर्व जणी चारही गुंडाना पळवुन लावतात. जवळच्या देवळात दर्शन घेवुन टपरी वर मस्त कटिंग घेऊन रिसॉर्टला परततात. पण मॅनेजर त्याना माहिती देतो की हायवे दरड कोसळल्याने बंद आहे आणि त्या आ ता निघु शकत नाही.
कुणाच्याच फोन ला रेंज नसल्याने नवर्यां बरोबर काँटॅक्ट होत नाहिये. इकडे विक्रम आणि पी डी टेंशन मधे दाखवलेत की ह्या मुली अजुन कशा आल्या नाहित.
विशेष म्हणजे पुढील भागात सर्व जणी ट्रुथ अँड डेअर खेळताना दाखवल्यात..
रच्याकने याआधीचे सर्व भाग मला कुठे बघायला मिळतील किंवा याआधीची स्टोरी कुणी मला थोडक्यात सांगेल का? खुप curiosity आहे..

राखी, धन्यवाद गं, मी फक्त शुक्र-शनि बघते.

स्टार चा चॅनेल आहे ना, त्यावर मिळेल बघायला सगळे भाग.

इकडे बघ - लगोरी

Pages