निवडणूका निकालांचा 'अगंभीर' धागा

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2014 - 10:36

मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.

प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)

ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!

कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.

जय लोकशाही!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक समजत नाही, बीजेपीला २०० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर आत्ता जे भाजपमध्ये चाललेले आहे त्याचे काय होईल?

<< ...तर शरद पवार सत्तेपासुन किती दिवस दूर राहु शकतील? एनी गेसेस?? >> ते सहज राहूं शकतील कितीही दिवस पण सत्ता नाही ना राहूं शकत त्याच्यापासून दूर क्षणभरही ! अहो, मंत्रीपदासाठी मोदींकडे आपल्या नांवाची शिफारस करावी म्हणून भाजपवालेसुद्धां पवारसाहेबांकडेच घिरट्या घालत असतील !! ५० वर्षं क्रिकेट बघतोय मीं पण अशी जबरदस्त 'फिल्डींग' लावणारा असा कॅप्टन नाही पाहिला !! Wink

सगळयंनीन आपापली मंत्री पदे चॉईस केलेली आहे आणि आपापल्या घराचे सामान ट्रक मधे भरुन त्यात्या मंत्रीपदाच्या बंगल्याच्या समोर उभे केलेले आहे

पंतप्रधान बंगला : गुजरात वरुन आलेला मोदीचा ट्रक
गृह मंत्री : उत्तरप्रदेश मधुन आलेला राजनाथ चा ट्रक
वित्तमंत्रालय चा बंगला :- यशवंत सिन्हा यांचा दिल्ली टु दिल्ली ट्रक
संरक्षण मंत्रालयाचा बंगला:- तोगडिया यांचा ट्रक
विदेशमंत्रालयाचा बंगला: सुषमा स्वराज यांचा ट्रक
कृषी मंत्रालयाचा बंगला.: - मुरली मनोहर जोशी यांचा ट्रक
आरोग्य मंत्रालय बंगला :- सुब्रमन्यम स्वामी
कोळसा संसाधन बंगला :- येडुरप्पा यांचा कर्नाटक वरुन आलेला ट्रक
रेल्वे मंत्रालय :- अमित शहा यांचा ट्रक
कायदेमंत्रालयः जेटली यांचा ट्रक

पूनम ताइ पांडे (वर्ल्ड कप क्रिकेट फेम) यांनी मोदी सरकार आल्यास 'रोड शो' वगरे करण्याचे आश्वासन
नाही का दिले यावेळेस???

'रोड शो' वगरे करण्याचे आश्वासन
नाही का दिले यावेळेस??? >>>>>>>>>>>>>>> पुनम पांडे यांचे WORK FROM HOME असल्याने रोड शो सारख्या भानगडीत पडणार नाही बहुतेक Biggrin

ट्विटर ऑन ठेवा.................. लकी ट्विट बघायला मिळाला तर मिळे ल Wink

सरकार कोणाचे ही येवो सनी ताई लीओन यांना महीला व समाज कल्याण(??) मंत्री पद मिळावे अशी जोरदार मागणी आहे. पुनम ताई पांडे यांना त्याच खात्याचे राज्यमंत्रि पद..
हां पण WFH ला सक्त मनाई.. Happy

अर्र परदेशी बाई डोक्यावर बसवली म्हणून मुंडन कोण करणार? मल्लिका ताईंची नियुक्ती त्या कामासाठी...

नाही नाही त्यासाठी कोयना मित्रा या अंतरा माळी उपलब्ध होतील..........किमान नुसतीच तोंडा वाफ घालवण्यापेक्षा प्रसिध्दी साठी मुंडन करतील तरी Wink

पण डिंकाचे लाडू म्हणजे......
बाळंतपणापर्यंत टिकतील का?

भाजप आधीपासूनच बहुमताने निवडून येऊ, सरकार बनवू असे म्हणत आहेत. त्यामुळे नवीन सरकार स्थापन केल्यावर 'हनिमून' झाला की बाळंत्पणाची तयारी पण आत्तापासूनच सुरु करायला हरकत नाही.

Modi,soniya gandhi aani rahul gandhi yana aaj kiti bhanykar watat asel nahi?
mhnje kahitari honar aahe tychi tayari tar karaychi..nakki kashachi? jinkle tar celibration chi ani harle tar shok sabha..
AAj ch karat astil na???

आजच्या ईसकळमधील बातमी
पंतप्रधानांना निरोपावेळी राहुल गांधी अनुपस्थित

त्यावर एक प्रतिक्रिया
त्याच वेळेला छोटा भीम चा कार्यक्रम प्रसारित होत असल्या मुळे राहुल गांधीला दुसर्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही....

Lol

मनमोहन सिंगांचा सेंड ऑफ झाला
<<
<<
चला, सोनिया गांधीच्या नोकरीतुन सुटका झाली त्यांची एकदाची.

त्याच वेळेला छोटा भीम चा कार्यक्रम प्रसारित होत असल्या मुळे राहुल गांधीला दुसर्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही....>>> Lol Lol

इकडे बी.जे.पी वाले लयीच उतावीळ झालेत.. आधी निकाल लागू द्या ना..
मुंढे साहेबांचं नारजी नाट्य पण पार पडलं निकालाआधीच..

छोटा भीम चा कार्यक्रम प्रसारित होत > ????/// त्यावेळी टॉम अँड जेरी असते ना आणि हंगामा टिव्ही वर डॉरेमॉन

असेल ही कामकाज कसे चालते ते नको का शिकायला ....? उद्या परवा बोहल्यावर गेल्यावर म्हणजे मुख्यमंत्री या पंप्र झाल्यावर कामकाज चालवताना प्रोब्लेम नको .. Wink

दिल्ली के नाथूराम हलवाई ने बीजेपी के लिये लड्डू बनाने से किया इंकार
.
कहा, "2004 और 2009 में सारे लड्डू गये थे बेकार" Happy

असं ऐकण्यात येत आहे की, पंप्रनिराोपसमारंभाच्या वेळी जी जेवणावळ झाली ती खरतर दिग्‍गीजींच्या केळवणाची हाोती आणि ते पप्पुजींना पसंत नसल्यामुळे ते हजर राहिले नाहीत.

Pages