झटपट सोलकढी

Submitted by pltambe@yahoo.co.in on 5 April, 2014 - 03:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

झटपट सोलकढी

साहित्य : घट्ट दही,दूध,पाणी,कोकमचे आगळ,साखर,मीठ,आले,मिरच्या,कोथिंबीर,४-५ कढीपत्याची पाने,धने-जिरे पूड,स्ट्रौबेरी खाण्याचा रंग

क्रमवार पाककृती: 

कृती : प्रथम मिक्सरच्या द्रव पदार्थासाठीच्या भांड्यात १मोठा कप घट्ट दही,१-१/२ते २ कप दूध,१/२ कप कोकमचे आगळ व पाणी,चवीप्रमाणे साखर व मीठ घालून फिरवून घ्या व एका मोठ्या स्टीलच्या उभ्या आकाराच्या गंजात काढून नंतर त्यात मिक्सरच्या छोट्या भांड्यातून आल्याचा एक छोटा तुकडा,लसणाच्या ४-५ पाकळ्या,चवीप्रमाणे २-३ मिरच्या,धने-जिरे पावडर,थोडी चिरलेली कोथिंबीर व ४-५ कढीपत्याची पाने ह्यांचे वाटण करून घेऊन ते वाटण आणी ५-६ थेंब स्ट्रौबेरी खाण्याचा रंग घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या व काचेच्या ग्लासमधून सर्व्ह करतेवेळी सजावटीसाठी वरुन थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

ही सोलकढी झटपट होते व लागतेही छान

माहितीचा स्रोत: 
माझी पत्नी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या रविवारीच केलेली... स्वतःचं इन्वेन्शन! (आणि नारळ खवायचा कंटाळा Proud म्हणतात ना आळशी माणसंच जास्त शोध लावू शकतं :D) चांगली झालेली. नवशिक्या (नवर्‍यां)च्या पटकन लक्षात येत नाही. पण खवय्यांना फार नाही आवडत. कधीतरी बदल म्हणून ठीकेय. लस्सी मठ्ठा यामधलं काहीतरी वाटतं. पण मी वाटण नव्हतं घेतलं आलं लसूण खडबडीत ठेचून आणि मिरच्या कोथींबीर बारीक चिरून घातलेलं. रंग नव्हता घातला. कोकमाचा रंग येतो पिंक! तरी धन्स प्रमोदजी Happy

मी जी सोलकधी करते त्यात दही घलत नाही. २-३ लसुणक्पाकळ्य ओले खोबरे वाटुन त्याचा रस घालायचा.

आणि आगळाचे पाणी. जर नसेल तर घरी असलेली आमसोले भिजत घालायची. खुपच छान लागते. व पट्कन पण होते.

प्रिती सगळेजण अशीच सोलकढी करतात पण ओले खोबरे खवायला ज्यांना वेळ नाही, घरात नारळ उपलब्ध नाही तेव्हा अशी दह्याची सोलकढी पटकन होते Happy

मित्रहो,
दही + कोकम आगळचा एकत्रित आंबटपणा कमी करण्यासाठी दूध घातल्याने तो कमी होण्यास मदत होते व आमसुलाचा काळपट रंग जाऊन छान रंग येण्यासाठी खाण्याचा रंग (स्ट्रॉबेरी लाल ) वापरावा असे सुचवले आहे.