निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://en.wikipedia.org/wiki/Guaiacum

इथे आहे त्याची माहिती. पण फोटो चांगला नाही. माझा एक लेख होता. पण आता दिसत नाही.
गायत्री नावाने शोधल्यास मिळेल. ( गायत्री हे नाव डॉ डहाणूकरांच्या माळ्याने ठेवलेले. अर्थातच ऑफिशियल नाही.)
जिप्स्याने काढलेला पण एक फोटो होता... पण मी तरी त्याला आग्रह करणार नाही.

आपला पहीला नि.ग. गटग राणीबागेत झाला होता तेव्हाच्या वृत्तांतात पण आहे अस वाटत गायत्रीच्या फुलांचा फोटो. त्या आधीही तुम्ही टाकलेले होते दिनेशदा.

आता सांगा गोड पान करायला काय काय घालू त्यात Happy

गायत्री आणि गोरखचिंच दोन्ही फोटो खुपच गोड आहेत. दिनेश दा, तुम्ही म्हणजे साक्षात
कल्पवृ़क्ष आहात, तुमच्या जवळ जी इच्छा व्यक्त केली ती लगेच पुर्ण होते.....
खुप खुप धन्यवाद...

शशांक जी धन्यवाद, बरीच माहिती दिसते तुम्हाला आयुर्वेदाची देखिल....

सुंठ + साखर + तुप हे पण पोट दुखीवर चांगले औषध आहे...

जागु, जेष्ठमध.... किंवा गुंजीचे पानं सुद्धा घालतात तांबुल करतांना..

दिनेश दा, गुंजीच्या झाडाचे खोड म्हणजेच जेष्ठमध ना?

पोट दुखी -
१] चिमटी भर ओवा + गरम पाण्याचा घोट
२] संजीवनी गुटी = १-२ गोळ्या
३] भूक लागत नसल्यास वा तोंडाची चव गेल्यास = आल्याचा रस + लिंबू रस + चवीला गूळ
४] माइल्ड लॅक्झेटिव्ह - त्रिफळा गोळी वा चूर्ण + गरम पाण्याचा घोट/ गरम दूधाचा घोट (चूर्ण खाताना फक्की मारु नये - श्वासनलिकेत ते चूर्ण जाऊन जीव घाबरा होउ शकतो - चूर्ण हळुहळु चाटून मग त्यावर पाणी वा दूधाचा घोट घेणे) = हा उपाय प्रत्येकाची (पोटाची) प्रकृती लक्षात घेऊन कमी-जास्त करावा लागतो.

त्रिफळा चूर्णाने दात साफ केल्यास हिरड्या छान आवळल्याचे फिलिंग येते व दात-हिरड्यांनाही खूप चांगला उपयोग होतो.

सध्या सर्दी-ताप यांचे प्रमाण खूप आढळत आहे - त्यासाठी सेप्टिलिन सिरप - दिवसातून ३-४ वेळा व सीतोपलादि चूर्ण मधातून ३-४ वेळा चाटणे (सर्दीकरता हमखास उपयोग होतो -सतत काही कारणाने सर्दी होत असल्यास सेप्टिलीन सिरप खूपच उपयोगी - सर्दी नसतानाही दिवसातून दोनदा घेत राहिल्यास खूप चांगला फायदा दिसेल). हे सेप्टिलिन वा सितोपलादि घेण्यापूर्वी पोट थोडे रिकामे असल्यास लगेच फायदा मिळेल - म्हणजे काहीही खाण्यापूर्वी एक -दीड तास वा खाल्ल्यानंतर दोन तासाने असे हे घेतल्यास एक -दोन दिवसात चांगला उपयोग दिसून येईल.
नाकातून पाण्यासारखी धार लागत असेल तर (सर्वसाधारणपणे) ते व्हायरल इन्फेक्शन असते - याला अँटिबायोटिक काही करु शकत नाही. मात्र जर नाकातील गळती कमी होऊन कफ घट्ट झाल्यास (पिवळा-हिरवा रंग) डॉ.च्या सल्ल्याने अँटिबायोटिक घ्यावे. सर्दीत शक्य असेल तेव्हा गरम पाण्याचे घोट घेत राहिल्यास गरम पाण्याच्या गुळण्या केल्याचा इफेक्ट मिळतो. आपण एकावेळेस फार गरम पाणी पिऊ शकत नाही (उलटीसारखे वाटते) पण एखाद-दुसरा गरम पाण्याचा घोट घसा शेकण्यासाठी केल्यास चांगला फरक पडेल. जेवणानंतर लगेच खूप गरम पाणी घेतल्यास उलटीचाच अनुभव येईल - ते टाळावे.

फार लांबण लावल्याबद्दल क्षमस्व....... Happy

अरे वा शशांक, खूप छान माहिती दिलीस

जागु , तुझ्याकडचा पानाचा वेल मस्त दिसतोय.. आमच्या घरी ही खालच्या बागेत पसरलाय नुस्ता पानाचा वेल..

दिनेश ची सूचना अमलात आण लौकरात लौकर... कुटलेला विडा बनवून स्टोअर करण्याची Happy

वा शशांकजी चांगली माहिती.

ह्यातला आलं-लिंबाचा रस आमच्याकडे हिट आहे. आई बाटली भरून करून ठेवते. मीपण करते आणि त्यात मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवते. अपचन वगैरे झालं, तोंडाला चव नसली की आम्ही घेतो. विविध पदार्थातपण टाकतो ओव्याबरोबर. कटलेटमध्येपण घालतो. चांगलं घरगुती पाचक आहे.

शशांक,
पान १० वरील झाडाचं नाव काय आहे? इकडे तशाच शेंगांचं झाड फुलांनी डवरलंय.इका फांदीला अशा शेंगा/ फळे लागली आहेत .साधारण ३-४ इंच रुंद, गुलाबी तंतूसारखी फुले आहेत.
जागू,
हेलिकेनिया व ओवा मस्तच.
कणभर चुना व काथ घालून खायला दे. कॅल्शियम मिळेल. +१.काथ नसला तरी चालेल.हे डायेटिशियनचे मत आहे.
अन्जू,
आलं-लिंबाच्या रसात काळे मीठ घाला.मघई पानाचा वेल वाचूनच मस्त वाटलं.

परवा एक डॉक्युमेण्टरी पाहिली. आणि असं वाटलं या जगाच्या पाठीवर असंही जीवन व्यतीत करणारे लोक आहेत?
Happy People: A Year in the Taiga
(Director: Werner Herzog)नावाची डॉक्युमेण्टरी.
सैबेरियन तैगा प्रदेशातल्या बख्तिया खेड्यातल्या येन्सै नदीकाठच्या एका समाजावर ही डॉक्यु. बनवली आहे. हे लोक प्रामुख्याने फर ट्रॅपर्स म्हणून ओळ्खले जातात.
याचा हिरो दिमित्री याच्यावरच बरंचसं चित्रण आहे. हा सेबल प्राणी पकडतो…।त्याच्या फ़रसाठी. आणि त्याची हत्यारं अगदी प्रिमिटिव्ह काळातला माणूस वापरता असेल अशी. कुर्हाड, हातोडी...तीही तो स्वता: हाताने बनवतो. आणि जास्तीत जास्त लाकडाचा वापर करून. बरेचसे सापळे हे पाचर पद्धतीचेच.
हा समाज अगदी रानटी पद्धतीने जगतो. आणि आपल्या संस्कृतीपासून अगदी लांब.
हा भाग इतका निबिड जंगलात आहे की इथे पोचायला एका तर हेलिकॉप्टर तरी किंवा बोट तरी.
इथे ना पाण्याचे नळ, ना टेलीफोन…ना काही वैद्यकीय मदत. हे सगळे अगदी आदिमानवासारखे जगतात.
या डॉक्यू.त हा दिमित्री वर्षभर काय करतो....कोणत्या सिझनला त्याचं काय रूटीन असतं ते इतकं मस्त दाखवतात...की आपण अचम्बित.
हा बरेचसे महिने बर्फाने आच्छादित आपल्या लाकडी ओण्ड्क्यानी स्वत:च बनवलेल्या झोपडीत रहातो. आणि कुटुंबासाठी वरशभराचे खाद्यही धुरावून खारवून ठेवतो.
या दिमित्रीची स्वत:ची अशी एक फिलॉसॉफ़ी आहे. सम्पूर्ण फिल्मभर तो अशी फिलॉसॉफ़ीकल वाक्यं पेरत असतो. बहुतेक तो इतक्या एकांतवासात रहात असल्याने आपोआपाच तत्वचिंतक झाला असणार.
तो म्हणतो माणसाचं कॅरॅक्टर ...तो त्याच्या कुत्र्याशी कसा वागतो त्यावरून लख्ख ओळखता येते.
दिमित्रीचे सोबती म्हणजे त्याचे कुत्रे. हेही शिकार करण्यात अगदी ट्रेण्ड. दिमित्री झाडं पाडून त्यातून सापळे बनवतो. आणि कधी कधी हा कुत्राच त्या झाडाच्या ढोलीत वस्तीला असणारे प्राणी मारतो आणि दिमित्रीला देतो. हे खूप छान दाखवलं आहे. दाखवंलं म्हणजे……… खरं चित्रिकरणच आहे ते. हा दिमित्री त्याचं काम करता करता आपल्याशी बोलत रहातो.
तो म्हण्तो… आपल्याजवळून बाकी सगळं कुणी लुबाडू शकेल पण आपले स्किल्स नाही. ही स्किल्स पिढ्यान्पिढ्या पुढे पास होतात.
दिमित्रिइबरोबर याच समाजातले इतरही काही लोक दाखवले आहेत जे झाडे पोखरून छोट्या होड्या ( कनू) बनवतात आणि मासेमारी करतात. पण यातले काही अति दारुडे आहेत.

शेवटी जेव्हा त्याच्या घरी तो परत आलेला दाखवलाय तेव्हा कुठे जरा तरी वाटते की याच काळातलं काही तरी आपण बघतोय.
कारण तो परत येताना स्नोबाइकवरून येतो आणि त्याच्या मुलाच्या टी शर्टवर पोकेमान दाखवलाय.
याच्या डायरेक्टराने दिमित्रीलाही को डायरेक्टरचं क्रेडीट दिलंय. आणि डायरेक्टर स्वता: बेक्ग्राउंड्ला नॅरेशन देतोय. पण ते जरा कंटाळ्वाणं आहे. ( मला जरा त्याचा अ‍ॅक्सेन्ट भारी पडत होता.) Proud

पण एकंदरीत अप्रतीमच! परत एकदा नीट बघणार आ हे.

दिमित्री कसा सैबेरियन बर्फात ओण्ड्क्यांच्या झोपडीत मिण्मिण्त्या तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात रहातो… आपली स्लेज बनवतो…
सगळं हॉण्टीनग!

मानुषी, आमच्या शेजारी नामिबीया देशातही असे लोक अजून आहेत. ते अजूनही शेती करत नाहीत. ह्ंटर्स गॅदरर्स आहेत अजून. त्यांची भाषाही खास आहे. गॉड्स मस्ट बी क्रेझी चित्रपटाचा नायक या देशातला आहे.

गुंजीचा पाला म्हणजे रतनगुंजेचा पाला नाही. त्या गुंजेचा पाला खाण्याजोगा नसतो.

जागू, तूला पान कुटायचेच असेल तर त्यात चुना, वेलची, चिकणी सुपारी, वेलची, कंकोळ ( हे औषधाच्या दुकानात मिळेल ) गुलाबाच्या पाकळ्या ( या पण औषधाच्या दुकानात मिळतील) बडीशेप, लवंग, दालचिनी वगैरे घालू शकतेस. गोडपणासाठी साखर घातलीस तरी चालेल. त्यात ठंडक ( हे पानांचे साहित्य विकणार्‍या दुकानात, कुर्ला पश्चिमेला किंवा दादर कबूतर खान्याजवळ मिळेल). ठंडक घालायच्या आधी सगळे मिश्रण कुटून घेतलेस तरी चालेल, पाणी न घालता केलेस तर ते न सुकवताही टिकेल. ठंडक मात्र शेवटी घालायचे.
त्यात ओवा, तीळ व काळे मीठही घालू शकतेस. स्वादासाठी केवडा इसेन्स घातलास तरी चालेल. याचे प्रमाण असे काही नाही. चव बघत बघत कुटायचे Happy

मी कसला कल्पवृक्ष... पण पुराणात वर्णन केलेला कल्पवृक्ष म्हणजे गोरखचिंच असायची शक्यता आहे. या झाडापासून अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी पण मिळू शकते.

नीलमोहोरासारखाच गम ग्वायकम म्हणजेच गायत्रीची झाडे पण आता बहरू लागतील. राणीच्या बागेत तर आहेतच पण फोर्टमधे टॅमरींड लेनमधून आत गेल्यावर जे चर्च लागते, त्याच्या आवारात पण आहेत>>> हे वाचून मी आज जाऊन आले त्या चर्चच्या आवारात. पण निराशा झाली. अजून फुलले नाहीये ते झाड. पण दिनेशजींचा फोटो बघून उत्सुकता खूप ताणली गेली आहे. कधी एकदा ती फुले पाहीन असे झाले आहे. झाड ओळ्खलं असं वाटतं आहे.
बाकी महिती आणि चर्चा मस्त.
जागू पानचा वेल सुन्दर.
अंजू आलं लिंबाचा रस एकदम टेस्टी लागतो.
आम्ही मागे अंबेजोगाईला गेलो होतो तिथे आम्हाला कुटलेल्या विड्याचा प्रसाद मिळाला होता, खूप छान लागतो.>> अंजू मी ह्याच्याशी सहमत अगदी

पण दिनेश ही डॉक्यु तुम्हाला मिळाली तर तुम्ही पहाच आणि इथे लिहा.
इथे टीव्हीवर नेट फ्लिक्स आहे तिथे आम्ही पाहिली.

हो मानुषी, तिच शोधतोय.
इनक्रेडीबल जर्नी मधे पण याचे चित्रण आहे असे आठवतेय. ( हि ६ भागांची मालिका, मानवाच्या मुळ स्थानापासून म्हणजेच इथिओपियातून तो आजच्या सर्व खंडात कसा पोहोचला याबद्दल आहे. )

विडा कुटायची पद्धत आपल्याकडे पूर्वापार आहे. पुर्वी म्हातार्‍या माणसांसाठी असा कुटून देत असत.
मला नीट माहीत नाही पण माहूर किंवा तूळजापूरच्या देवीला पण असा विडा देतात.

हेमा त्याच परीसरात आहात तर आणखी दोन झाडे आवर्जून बघावीत अशी.
एक आहे बकुळीचे. चर्चगेट कडून हुतात्मा चौकात आल्यावर हायकोर्टाकडे वळताना उजव्या हाताला हे लागते.
अगदी सकाळी झाडाखाली फुलेही असतात. आणि तिथेच डाव्या हाताला म्हणजे अमेरिकन एक्स्प्रेस बँक आहे तिथे सुवर्णपत्राची झाडे आहेत. आता त्यांना मोहोर येईल आणि क्वचित फळेही ( स्टार अ‍ॅपल ) लागतील.
या झाडाची पाने खालच्या बाजूने अगदी सोन्यासारखी झळाळतात. ती एरवीही बघता येतात.

होय दिनेशजी. सुवर्णपत्राचे झाड दुपारच्या उन्हांत बस मधुन खूप सुन्दर दिसते. खालच्या बाजूने पानं अगदी सोनेरी दिसतात. आपण बसमध्ये ( डबलडेकर) असलो तर ती जास्त नजरेच्या टप्प्यात येतात. पण ती फळं नाही पाहिली अ़जून. बकुळीच झाड मात्र नाही पाहिल अजून तिथलं. आत गम ग्वायकम साठी तिकडे जाणं होणारच आहे तेव्हा नक्की पाहिन.

आपल्या स्मरणशक्तीला आणि निरिक्षणशक्तीला सलाम!!

मला नीट माहीत नाही पण माहूर किंवा तूळजापूरच्या देवीला पण असा विडा देतात. >>>> माहूरच्या रेणुकेला विडा देतात आणि त्याचाच प्रसाद म्हणून तांबुल लाकडी खल बत्त्यात कुटून पण मिळतो. खुप सुंदर चव असते तांबुलाची Happy

देवकी | 4 March, 2014 - 19:29
शशांक,
पान १० वरील झाडाचं नाव काय आहे? इकडे तशाच शेंगांचं झाड फुलांनी डवरलंय.इका फांदीला अशा शेंगा/ फळे लागली आहेत .साधारण ३-४ इंच रुंद, गुलाबी तंतूसारखी फुले आहेत.>>>>> त्या झाडाचे नाव आहे -
Kapok, Ceiba, White Silk-Cotton Tree, सफ़ेद सेमल
Botanical name: Ceiba pentandra , Family: Bombacaceae (baobab family)
या नावाने गुगलून पहाणे - फुले, शेंगा वगैरे तेच आहे का दुसरे काही ???? Happy

अरे वा जिप्स्या आता त्यातली छान छान माहीती इथे शेअर कर. >>>>> स्वयंपाकाचीच म्हणतीएस ना ??? शिकेल गं तो सारे पदार्थ करायला ... हळुहळु .... मग फोटु पण टाकेल वेगवेगळ्या पदार्थांचे .... Happy Wink
ऑल दि बेस्ट जिप्सी ....... Happy

शशांक Proud Happy

"नवा आसमंत" पुस्तकातील शांता शेळके यांची हि कविता.

हे एक झाड आहे याचे माझे नाते
वार्‍याची एक झुळूक दोघांवरून जाते

मला आवडतो त्याच्या फुलांचा वास
वासामधुन उमटणारे जाणीव-ओले भास

पहिल्यानेच त्याची मोहरताना फांदी
ठेवली होती बालगाणी त्याच्या कटिखांदी

मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
त्याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती

ढलपी, ढलपी सुटुन माती झाली सैल
रूजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल

कधी तरी एक दिवशी मीच झाड होईन
पानांमधुन ओळखीचे जुने गाने गाईन
— शांता शेळके

'कधीतरी एक दिवस मीच झाड होईन', वा काय सुंदर कविता आहे शांताबाईंची. धन्यवाद जिप्सी, इथे शेअर केल्याबद्दल.

Pages