निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्निग्धा, कमाल आहे तुझी, लक्षात ठेवण्याची. >>> कमाल काही नाही गं, माझ्या ताईचा वादि असतो ७ मार्चला आणि तुझा ६ ला त्यामुळे सहज लक्षात रहातो. आणि आपल्या जवळच्या माणसांनी आठवणीने शुभेच्छा दिल्या तर बरं वाटत, आनंद होतो म्हणुन मुद्दाम निग वर लिहील Happy

शोभा हॅप्पी बड्डे गं!
जागू कोकिळाचे डोळे कसे लाल गुंजेसारखे दिसतायत.
सरिवा रामफळं अगदी टेस्टी!
इथे साधारण दीड फुटी केळीचं झाड(रोप?) गिफ्ट मिळालं आहे. त्याची कशी काळ्जी घ्यायची?
प्लीज गाइड. पाणी कधी घालायचं , उन्हात ठेवायचं का?
सध्या परत अति स्नो आहे. पण उनही आहे. तर हे दिवसभर उन मिळॅल अश्या जागी पण घरातच ठेवलंय.

सरीवा रामफळे मस्तच. माझ्याकडच्या फळांचा नंतर झब्बू देते.

मानुषी केळीचे झाड छान.

जागू, तु लकी आहेस तुला कोकिळा दिसते आणि ती तुला छान फोटो बिटो काढून देते. मला आत्तापर्यंत एकदाही दिसलेली नाहिये. मला वाटतं होत की ती झाडात द्डूनच गाते.

सरिवा रामफळं मला माहेरी घेऊन गेली. आमच्याकडे माहेरी झाड होत रामफळाच.

मानुषी कुंडीमध्ये इतकी छान वाढ झालेली केळं unbelievable.

शोभा, हॅप्पी बड्डे Happy
रामफळं खाऊन बरीच वर्षे झाली. महाशिवरात्री ला हमखास येतात मुंबईच्या बाजारात.
मानूषी, वेगळी शोभेची केळी आहेत का ? तिथल्या देवळात वगैरे वाढवलेली असतील तर चौकशी करता येईल.

वर्षू.. जूलै पर्यंत त्यांचा सिझन असेल तर जाईनही.. आमच्या आफ्रिकेतच तर आहे Happy
जागू कोकीळा बहुतेक कावळ्याच्या घराच्या टेहळणीसाठी आली असणार. अगदी क्षणार्धात अंडे घालून मोकळी होते ती.

सुप्रभात!
हे गोड फूल मी पावसला पाहिलं होतं. भक्तनिवासामध्ये. याचं नाव आहे: jatropha integerrima

हे गोड फूल मी पावसला पाहिलं होतं. भक्तनिवासामध्ये. याचं नाव कुणाला माहिती आहे का? >>>> बहुतेक जट्रोफा असावे ... या नावाने गुगलून पहा - पाने व इतर भाग म्हणजे जास्त नीट कळून येईल ...

बरोबर. गुगलमध्ये pink jatropha integerrima या नावाने हीच फुलं दिसत आहेत. वरती नाव अपडेट करते.

मलाही कण्हेर वाटलेलं.. पण फुलाच्या पाकळ्यांचा आकार वेगळा आहे हे समजलं (हे विशेष!! Wink )

रामफळ मस्त दिस्तंय..

शोभा, बिलेटेड हॅप्पी वाला बर्थडे.. Happy

शोभा चालेल काय, माझ्या पोटात पळाला सुद्धा.. आता अगदी पोटातुन तुला हॅप्पीवाला बर्थ्डे बरे का.... Happy

जत्रोफा सुंदर दिसतेय, मलाही कण्हेरचीच आठवण आली पण कण्हेरीचा फक्त रंगच आहे, बाकी सगळॅच वेगळे आहे.

दिनेश, आता कावळे बुळे राहिलेले नाहीयेत. त्यांनी सुद्धा नॅटजिओ वाचुन समजुन घेतलेय कोकीळेची चलाखी. राणीबागेत आम्ही पाहिले ना, एक कोकि़ळबाई पंख झाडत बसल्या होत्या आणि कावळे कसे हुसकत होते त्यांना ते.

मी गेल्यावर्षी मानखुर्द रोडवरही पाहिलेले. तिथली झाडे खुपच शिडशिडीत आहेत त्यामुळॅ झाडावरचे सगळे स्पष्ट दिसते. तिथे रस्त्याच्या कडेला झाडांच्या ओळी आहेत, प्रत्येक झाडावर एक घरटे आणि घरट्याच्या बाहेर कावळा बसलेला. कोकीळाबाई आल्या तर त्यांना हुसकावुन लावायला.

साधने, धन्यवाद. Happy
आमच्या स्वयंपाक खोलीसमोर, एक गुलमोहराच झाड आहे खूप उंच आहे. त्यावर नेहमी कावळे घरटी बांधतात. मी तिथे असले की घत असते. पण अजून काही कोकिळा त्याच्या घरट्याजवळ गेलेलीसुद्धा दिसली नाही. Uhoh

सरिवा, रामफळ मस्त...

जागु, कसली गोड दिसतेय कोकीळ... काय मस्त वाटत असेल ना वेगवेगळे पक्षी तुमच्या कडे
बागडतात!

Pages