निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसांनीही असाच विचार करुन पुर्ण वर्ष आनंदी असावे रॉबिनसारखेच >>>>>>
नाही, नाही....... साधनासारखे ----- साधना कधीही निष्कारण काळजी करीत नाही, कायम मजेच्या, चेष्टेच्या मूडमधे असते, दुसर्‍यांनाही तसे रहायला प्रवृत्त करते - त्यामुळे साधना कायम आनंदीमूडमधे असते .....

पुरंदरे शशांक | 1 March, 2014 - 07:16
माणसांनीही असाच विचार करुन पुर्ण वर्ष आनंदी असावे रॉबिनसारखेच >>>>>>
नाही, नाही....... साधनासारखे ----- साधना कधीही निष्कारण काळजी करीत नाही, कायम मजेच्या, चेष्टेच्या मूडमधे असते, दुसर्‍यांनाही तसे रहायला प्रवृत्त करते - त्यामुळे साधना कायम आनंदीमूडमधे असते .....
शशांक् + १००
हा रॉबिन नाही का?

लाल पोटवाला रॉबीन ?? नसेल गं.. हा स्लेट थ्रोटेड रेड् स्टार्ट आहे.

तुझे पक्षी नाचताहेत गं... जीआयेफ टाकलीस ना... मस्त वाटतेय पाहायला.

अगं ते जिइ आय एफ काय आहे? मला माहिती नाही. ं मी पक्षाचे फोटो पिकासावर टाकले तर असंच नाचरं दिसतय.
माझ्या बर्फांच्या फोटोवरही आपोआप स्नोफॉ ल होत रहातो. गुगलची किमया.

GIF is a bitmap image format.
यात अनेक फोटोज आपण घालून त्याची एक मिनी क्लीप बनवू शकतो. आई पण पिकासा वरूनच टाकते. आम्हाला नाही दिसल अस.. पण मस्त वाटतये Happy

हो का जरबेरा....गम्मतच्चे! अगं माझ्या कित्ती तरी स्नो च्या फोटोमधे मस्त स्नो फॉल होत असतो..

Filename: image-MOTION.gif
Happy

अगं माझ्या कित्ती तरी स्नो च्या फोटोमधे मस्त स्नो फॉल होत असतो.. सही!!!!

अश्विनी के ...खरंच गरगरतय.
जरबेरा...मिनी क्लिपची आय्ड्या भारीये.

असा पडतो बर्फ???? अगदी परिकथेतल्या ख्रिस्तमसची आठवण झाली.

आणि ते डिजाईन ? काचेवर बर्फ पडल्यामुळे बाहेरच्या बाजुने उमटलेय बहुतेक. तेही मस्तच आहे.

वा मानुषी, नवी स्टाईल आवडली... साधना तर आहेच, पण नि.ग. वरचे सगळेच कायम अश्याच मूडमधे असतात Happy

आदील कोण तो नोळखीजे !

मी इंदूरला गेले होते तेव्हा सकाळी खूप धुकं होतं त्याचा फोटो काढला आणि तो गुगल प्लस वर अप्लोड केला तेव्हा गुगल प्लस ने असा अ‍ॅडिशनल फोटो मला दिला. इन्दोर मध्ये सुद्धा स्नो फॉल !!
From mayboli

हे हे हा धागा खुपच इंटरेस्टींग होत चालला आहे.

झरबेरा तुझ नि.ग.वर स्वागत. दोन पिढ्यांचा निग झाला

दिनेशदा मागच्या कुठल्यातरी भागात तुम्ही काळ्या कुड्याच्या शेंगेचा फोटो टाकला होतात. माझ्या ऑफिसच्या पुढे आहे ते झाड. कधी जाणे झाले की शेंगा पाहीन. मागे मी फुले पाहीली होती.

खरच हल्ली शेवग्याच्या शेंगा फुटलेल्या दिसत नाहीत खाली. पण मला लहानपणीच आठवतय. शेतात सुकलेल्या शेंगा फुटून पडलेल्या असायच्या. एखाद रोपही उगवायच तिथे शेवग्याच.

एक दु:खद बातमी - आमच्या शेवग्याच्या झाडाला खालूनच वाळवी लागली त्यामुळे झाड पूर्ण तोडावे लागले. आता ते धनेश, इतर पक्षी यांची बागडायची जागा गेली. पण तरीही पक्षी आमच्या पाठच्या झुडूपांमध्ये भरपूर येतात.

वर रासबेरी व साधना म्हणतेय ते फळ ओसाड जागी खुप उगवतात. आम्ही आधी ती फळे कपाळावर फुगा म्हणून फोडायचो. फाट कन आवाज यायचा. पिकल्यावर खातातही ती फळे. थोडी तुरट-गोड लागतात. काल घरी लवकर गेले म्हणून जरा झाडातील तण काढले त्यात हे सापडले.
आम्ही ह्याला डवचाणे म्हणतो.

साधना ,
धन्यवाद.छान कविता आहे.
जास्त बघितलं तर गरगरायला लागतंय आपल्यालाच >>> अगदी अगदी! स्नो फॉल मस्तच.

स्पॅथोडिया !! याला मराठीत काय म्हणतात? Happy
साधना खुप खुप धन्स Happy
आमच्या ऑफिसात जेवढी झाडं आहेत त्यांना जेंव्हा होड्या असतात तेंव्हा कधीच पानं मी पाहीली नाहीत. आणि मी कायम जमिनीकडे पहात असते असं नाही. मी आधी जमिनीवर शोधते एखादी होडी मिळतेय का ते नाही तर झाडावरची तोडायच्या अंतरावर आहे का ते पहाते Wink Happy

रच्याकने या निमित्ताने मला आणखी एक गोष्ट कळाली ती म्हणजे आमच्या ऑफिसात काटेसावरचंही एक झाड आहे Happy
फुलं मात्र खरच कधीच नाही दिसली. आता जेंव्हा होड्याचा सिझन जाईल तेंव्हाही लक्ष देईन त्या झाडांकडे Happy
पण या होड्या मात्र खरचं खुप क्युट आहेत Happy
मी माझं डेस्क सजवणारेय आता त्या होड्यांनी. होडीमध्ये एक बाहुला बाहुली Wink हाऊ रोमँटीक Wink Proud

स्पॅथोडीयाला जेवढी फुले येतात त्या मानाने शेंगा कमीच लागतात.
>>>दिनेशदा, तुमच्या अनुभवाला आमच्या ऑफिसातल्या झाडाने फसवलय बर का Wink
सगळीच्या सगळी झाडं होड्यांनी बहरलीयेत आणि तेही असंख्य होड्यांनी Happy
फुलं एकही नाही Uhoh

जागु, नवीन भागाबद्द्ल सगळ्यांचे खुप खुअप अभिनंदन.... मी खुपच उशीरा करत आहे. हल्ली वेळच मिळत नाही
.त्याम्मुळे खुप दिवसांनी आले आहे...

जागू, झाडांचे आयूष्य मर्यादीतच असते. आता दुसरे झाड लावायचे. शेवग्याच्या पण नवीन जाती आल्या आहेत. अगदी वर्षा दोन वर्षातच शेंगा लागायला लागतील. तूला बिया किंवा फांदी देखील लावता येईल.

रिया... फुलांशिवाय शेंगा कश्या येतील ? आता त्या झाडावर नजर ठेवायला पाहिजे.

साधना,
ती ज्ञानेश्वरीतली ओवी आहे.

एखाद्या दिव्याने जेव्हा दुसरा दिवा लावला जातो त्यावेळी ( काही काळाने ) दुसरा दिवा देखील तेवढ्याच तेजाने उजळतो. त्यामूळे दोन दिव्यांपैकी आधी कुठला उजळला होता ( आदील ) ते ओळखता येत नाही. जेव्हा ज्ञानी माणूस दुसर्‍यांना आपले ज्ञान देतो तेव्हा दुसरेही तितकेच ज्ञानी होतात.. ( मूळ ओवी शशांक कडून मिळेलच. )

हा खरा अर्थ.. हिंदी चित्रपटात ज्योत से ज्योत जगाके चलो, प्रेम कि गंगा बहाते चलो.. असे चुकीचे रुपांतर झालेत ( गायक मुकेश आणि लता, चित्रपट संत ग्यानेश्वर.. ज्ञ या अक्षराचा ग्य हा मूळ उच्चार आहे, असे किरणने इथेच लिहिले होते... )

रिया, जर त्याच्या कळ्या दिसल्या तर त्यापैकी एक खुडायची त्याचे टोक जरासे कापायचे आणि ती दाबायची. त्यातून मस्त कारंजे उडते. कोकणात त्याला पचोडीया असे म्हणतात पण तो अपभ्रंश असावा.

सुप्रभात ... आज इथे कोणी नसेल्च बहुतेक... Uhoh

मला एक प्रश्न विचारायचा आहे ... घरच्या भाजी वर किड पडु नये म्हणून हळद आणी हिंग पाणी टाकले होते ... पण तंबाखू चे पाणी कसे कराय्चे ... इथे पानपट्टी नाही आहेत .... सिगारेट मधला काढून पाण्यात मिसळला तर चालेल का... चालत असेल तरच सिगारेट विकत आणेन ...माहितगार लोकहो प्लीझ उत्तर द्या ...

पुण्यामध्ये आता जॅकरांडा फुलायला लागला असेल ना? कुणीतरी फोटो काढुन आम्हाला त्याची इथे भेट घडवून द्या ना! त्याच्या निळाईत आम्हाला बुडु दे ना! इकडे मुंबईत दमट हवेत ते फुलत नाहीत अंग झोकुन. ह्या दिवसात ही हिरवेच असतात.

प्राची, सिगारेटमधला तंबाखू चालेल असे वाटतेय. मी प्रयोग केला नाही. तंबाखूचे पाणी वापरल्याने तंबाखूच्या मूळावर वाढणारे एक तण वांग्याच्या शेतात पसरल्याचा अनुभव श्रीकांत इंगळहाळीकरांनी नोंदवलेला आहे.

हेमा. माझा आणि शापित गंधर्वाचा अनुक्रमे केनया आणि दक्षिण आफ्रिकेतल्या झकरांदा बद्दलचा लेख मायबोलीवर आहे. या नावाने शोधल्यास सापडेल.

Pages