अंतरपाटातील अंतर

Submitted by Anvita on 16 February, 2014 - 01:03

मुलगा/ मुलगी विवाह योग्य झाली कि आई वडिलांना सून / जावई यायचे वेध लागतात .
पण बर्याच वेळा लग्न ठरण्यास उशीर होत असतो .
लग्न लवकर न ठरण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यातील काही कारणे म्हणजे त्याच्या / तिच्या अपेक्षा खूप आहेत . दिसायला चांगला, चांगले करियर म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम असणाराच जोडीदार हवा आहे . वयात जास्त अंतर नको . अजून योग नाही वगेरे .
बाकी सगळे मुद्दे मान्य केले तरी वयातले अंतर ह्य मुद्द्यावर मात्र विचार करायला हवा असे वाटते .
हल्ली ५-६ वर्षाचे अंतर हे खूप वाटायला लागले आहे . खरेतर आजकाल मुली पण शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको आम्ही २-३ वर्ष अंतर असणारे स्थळच बघत आहोत आणि बाकी त्या स्थळाची कहिही चौकशी न करता ते नाकारतात तेव्हा साहजिकच असा प्रश्न पडतो कि खरेच एवढे अंतर खूप आहे का ? केवळ त्या एकमेव कारणासाठी स्थळ नाकारणे कितपत योग्य आहे ?
मला असे वाटते कि ५-६ वर्षाचे अंतर असले तर स्थळ बघायला काही हरकत नसावी . कधी कधी वयापेक्षा मुलगा दिसायला लहान वाटतो किंवा वयाने लहान असून मोठा पण वाटू शकतो . तेच त्याच्या maturity बद्दल पण म्हणता येईल . कितीतरी तेवढे किंवा जास्त अंतर असलेल्या जोडप्याचे सुखी संसार बघतच असतो . आत्ताचा काळ बदलला आहे. आता ५-६ वर्ष अंतर म्हणजे generation gap असते वगेरे पण एकू येते पण तरीही अशावेळेस मुलाला भेटून मगच मत बनवावे असे वाटते . अर्थात वयातील अंतर किती असावे ह्या बाबतीत वेगळी मते असू शकतात .

तसेच ज्या मुलींची / मुलांची लग्न काहीही कारण नसताना वेळेत ( म्हणजे बघायला लागल्या पासून लवकर ) ठरत नाहीत असे मुले/ मुली पण नाराज असतात . त्यांनीही लग्न ठरत नाही म्हणून नाराज होऊ नये . लग्न ठरेपर्यंत त्या काळात करियर कडे जास्त लक्ष द्यावे ,एखादा आवडणारा छंद जोपासावा . पुढे लग्न झाल्यावर जबादारी वाढते त्यावेळेस स्वत: साठी वेळ मिळतोच असे नाही . आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावे असे वाटते .त्यांच्या आई वडिलांनी (परिवाराने)पण लग्न ठरत नाही या विषयाचा फार मोठा issue करू नये .

हा लेख आधी माझ्या ब्लोगवर ( anaghabhade.blogspot.in ) लिहिला होता . परंतु माझा ब्लोग हा 'ज्योतिषशास्त्र ' विषयावर असल्याने त्या विषयात रस असणार्यांनीच फक्त हा लेख वाचला असावा असे वाटले हा जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या उद्देशाने इथे देत आहे .
आपली मते ह्या विषयी काय आहेत हे पण जाणून घ्याला आवडेल .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो तिथे एन चूकुन राहीलाय. क्रोमात टायपताना माझ्या हातुन तर अनेक चूका होतात. नन्दिनीची ही फक्त एकच टायपो आहे.:स्मित:

फॅशनेबल

आमच्या घरी माझ्या धाकट्या दिराच्या लग्नाचे नाटक सद्ध्या जोरात चालू आहे. आलेली स्थळे स्वीकारणे किंवा नाकारणे यासाठी जे काही (भन्नाट) निकष लावले जातात ते पाहून जाम मनोरंजन होते आहे. एकूण सगळा प्रकार पाहून मी नम्रपणे सगळ्या आघाड्यांवरून माघार घेतली आणि लग्न ठरले की मला सांगा, तोवर मला यात खेचू नका असे शांतपणे सांगितले.

एक स्थळ नाकारले होते कारण तिच्या आईने लिपस्टीक लावली होती. (आईच एवढी नखरेल तर मुलगी तर दिवाळंच काढेल! :-(). दुसरे स्थळ नाकारले कारण तिचा भाऊ शाळेत शिकत होता अजून.... (आपल्यावरच त्याच्या शिक्षणाची जवाबदारी टाकतील नंतर... :अओ:) याशिवाय मुलीची उंची कमी वाटते, जरा जास्त सावळी आहे, एकुलती एक नको असे अनेक डोक्यात जाणारे निकष मुलगी निवडताना लावले जातात. अश्या सर्व निकषांमधून अखेर पास झालेल्या एका मुलीने 'मुलगा माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठा आहे. मला माझ्याच वयाचा मुलगा पाहीजे.' असे स्पष्ट सांगून नकार कळवला होता तेंव्हा खरेतर मला त्या मुलीचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटले होते.

वरपक्षाचे लोक जर स्वताच्या नादात्च असतात की आपण म्हणजे वरपक्ष ५६ मुली येतील सान्गून वै.........
माझ्या मैत्रिणीला स्थळ बघत होते तेव्हा तिच्या वडिलानी वघुवर सूचक site वर बघून मुलाकड्च्याना फोन केला... फोनवर मुलाची आई होती. तर सगळी माहीती सान्गितल्यावर मुलाची आई -" आम्हाला मुलगी खुप सुन्दर हवी आहे..कारण आमचा मुलगा खूपच Handsome आहे , तशी असेल तर आम्ही विचार करू" इति.......
हे सगळ एकून माझ्या मैत्रिणीच डोक सणकल ..
२-३ दिवसानी त्या मुलाच्या आईचा फोन आल परत..( तो येणारच होता मुलगी इतकी गोरी , देखणी , शिकलेली, नोकरी करणारी बघून) मुलाची आई- " तुमची मुलगी आमच्या मुलाला आवड्ली आहे मग आपण कधी भेटायच?"
त्यावर माझ्या मैत्रिणीने तिच्या बाबाना अस उत्तर द्यायला लावल होत-" तुमचा मुलगा काही दिसायला आवड्ला नाही मुलीलाअ त्यामुळे आपला योग नाही.. :D"

याशिवाय मुलीची उंची कमी वाटते, जरा जास्त सावळी आहे, एकुलती एक नको असे अनेक डोक्यात जाणारे निकष मुलगी निवडताना लावले जातात. अश्या सर्व निकषांमधून अखेर पास झालेल्या एका मुलीने 'मुलगा माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठा आहे. मला माझ्याच वयाचा मुलगा पाहीजे.' असे स्पष्ट सांगून नकार कळवला होता तेंव्हा खरेतर मला त्या मुलीचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटले होते. >>>>>>> एकच वार सगळ गार

Pages