अंतरपाटातील अंतर

Submitted by Anvita on 16 February, 2014 - 01:03

मुलगा/ मुलगी विवाह योग्य झाली कि आई वडिलांना सून / जावई यायचे वेध लागतात .
पण बर्याच वेळा लग्न ठरण्यास उशीर होत असतो .
लग्न लवकर न ठरण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यातील काही कारणे म्हणजे त्याच्या / तिच्या अपेक्षा खूप आहेत . दिसायला चांगला, चांगले करियर म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम असणाराच जोडीदार हवा आहे . वयात जास्त अंतर नको . अजून योग नाही वगेरे .
बाकी सगळे मुद्दे मान्य केले तरी वयातले अंतर ह्य मुद्द्यावर मात्र विचार करायला हवा असे वाटते .
हल्ली ५-६ वर्षाचे अंतर हे खूप वाटायला लागले आहे . खरेतर आजकाल मुली पण शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको आम्ही २-३ वर्ष अंतर असणारे स्थळच बघत आहोत आणि बाकी त्या स्थळाची कहिही चौकशी न करता ते नाकारतात तेव्हा साहजिकच असा प्रश्न पडतो कि खरेच एवढे अंतर खूप आहे का ? केवळ त्या एकमेव कारणासाठी स्थळ नाकारणे कितपत योग्य आहे ?
मला असे वाटते कि ५-६ वर्षाचे अंतर असले तर स्थळ बघायला काही हरकत नसावी . कधी कधी वयापेक्षा मुलगा दिसायला लहान वाटतो किंवा वयाने लहान असून मोठा पण वाटू शकतो . तेच त्याच्या maturity बद्दल पण म्हणता येईल . कितीतरी तेवढे किंवा जास्त अंतर असलेल्या जोडप्याचे सुखी संसार बघतच असतो . आत्ताचा काळ बदलला आहे. आता ५-६ वर्ष अंतर म्हणजे generation gap असते वगेरे पण एकू येते पण तरीही अशावेळेस मुलाला भेटून मगच मत बनवावे असे वाटते . अर्थात वयातील अंतर किती असावे ह्या बाबतीत वेगळी मते असू शकतात .

तसेच ज्या मुलींची / मुलांची लग्न काहीही कारण नसताना वेळेत ( म्हणजे बघायला लागल्या पासून लवकर ) ठरत नाहीत असे मुले/ मुली पण नाराज असतात . त्यांनीही लग्न ठरत नाही म्हणून नाराज होऊ नये . लग्न ठरेपर्यंत त्या काळात करियर कडे जास्त लक्ष द्यावे ,एखादा आवडणारा छंद जोपासावा . पुढे लग्न झाल्यावर जबादारी वाढते त्यावेळेस स्वत: साठी वेळ मिळतोच असे नाही . आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावे असे वाटते .त्यांच्या आई वडिलांनी (परिवाराने)पण लग्न ठरत नाही या विषयाचा फार मोठा issue करू नये .

हा लेख आधी माझ्या ब्लोगवर ( anaghabhade.blogspot.in ) लिहिला होता . परंतु माझा ब्लोग हा 'ज्योतिषशास्त्र ' विषयावर असल्याने त्या विषयात रस असणार्यांनीच फक्त हा लेख वाचला असावा असे वाटले हा जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या उद्देशाने इथे देत आहे .
आपली मते ह्या विषयी काय आहेत हे पण जाणून घ्याला आवडेल .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे आपण मुलीने पाच वर्षे मोठा असलेल्या मुलाला नकार दिल्याची चर्चा करतोय आपण. किती ती चर्चा.. बापरे.

मी पाहिलय मुलगे आपल्यापेक्षा एक वर्ष लहान असलेल्या मुलीला नाही म्हणतात का तर ती फक्त एक वर्षाने लहान आहे. कमीतकमी तीन वर्षाने तरी लहान हवी होती, पाच सहा वर्षे लहान असती तर बरेच. मुलगा मुलगी एकमेकांच्या आकंठ प्रेमात असताना, लिव्ह इन मध्ये असताना, मुलगी प्रेग्नंट असताना आईवडिल लग्नाला नकार देतात इतकेच नव्हे तर स्वतःला जाळून घेण्याची धमकी देतात का तर मुलगी दीड वर्षाने मोठी आहे.

मी तर म्हणते अपोझिट पार्टीने बरे झाले अशा कोत्या विचाराच्या व्यक्तीशी माझी गाठ नाही पडली असे म्हटले पाहिजे. केवळ वयाच्या अंतरावरून कोणाला रिजेक्ट करावे हे योग्य नाहीच ना? पण मग ५ वर्षेच का १३ / १५ वर्षे का नाही? म्हणजे १३ वर्षाने मोठा असलेला मुलगा किंवा मुलगी का नाही?

मला वाटतं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या मुलीला ५ वर्षाने मोठा म्हणजे आधीच्या पिढीतला वाटत असेल. अर्थात तो खरच तसा आहे का नाही हे त्याला भेटल्याशिवाय किंवा त्याच्याशी बोलल्याशिवाय नाही समजणार. पण तिला ते खरच समजून घ्यायचं आहे का?

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं आपण म्हणतो ना, मग ती मुलगी काही तरी कारणाने त्या मुलाला रिजेक्ट करत आहे म्हणजे त्यांची गाठ एकमेकांशी नाही बांधलेली, किती सोप्पं आहे. जिचे जिथे तीळ तांदूळ असतील तिथे ती योग्य वेळी आपोआप पोहोचेल. आपण का चिंता करा आणि सल्ले द्या,

jisaka darr tha bedardi
wo hi baat ho gayee.... > मामी हे काय??? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी नक्कि काय लिहिले. Lol

पहिल॑ स्थळच उरकुन टाकायला हव होत, न्॑तर आपोआप जमल॑ असत॑ दोघा॑च.> लग्न ही उरकून टाकण्याची गोष्ट नाही. माझ्या आईच्या पिढीतल्या बायका ही आपल्या मुलांबद्दल असे नाही म्हणत.

जो मुलगा स्वत: च्या वयाहून ५ वर्षे लहान / मोठी किंवा समवयस्क मुलगी बघतो आहे असेही म्हणता येईल ना. लहानच बघतो आहे हे त्याला विचारल्याशिवाय कसे कळले तुम्हाला ?
भारतात तरी मुला पेक्षा मुलगी लहान बघतात म्हणजे ते काही जगावेगळे ( भारता वेगळे) नाही.
हेच तर लगेच काही माहिती न बघता मते तयार करायची हाच मुद्दा आहे ना.

वेल , आपण चिंता करायची नाहीत आणि सल्ले पण द्यायचे नाहीत परंतु मत सांगणे खरेतर कोण्या एका व्यक्तीला पण नव्हे कारण विचारल्याशिवाय सांगू हि नये परंतु मत व्यक्त करणे चूक कसे काय होऊ शकते?
मी मत व्यक्त केले आहे सल्ला दिला नाही. मी सल्ला दिला आणि अमुक व्यक्तीने एकाला नाही म्हय्तले ते मला आवडले नाही असे काहीच लिहिले नाहीये. तरी सल्ला नकोय वगेरे प्रतिसाद का येत आहेत कळत नाही.
असे प्रतिसाद आल्यावर काय विचार आहे तो बाजूलाच राहिला . सारखे आपले सल्ला देऊ नका. तिच तिला ठरवू द्या हेच लिहिले जातेय . ठरवू देत कि तिच तिला मी कुठे नाही म्हणते आहे.

काय विचार आहे तो बाजूलाच राहिला >>> त्येच आमी म्हन्ताव की इचार बाजूलाच ठीवा. लिवा आणि लेट लिवा.

हाहा तुम्ही जोक करत अहात अन्विताजी.......
कोणता भारतातला मुलगा ५ वर्षे मोठी मुलगी बघेल. ईतकतरी अजून पुढारलेल कोणी नाही.

"मुलगे आपल्यापेक्षा एक वर्ष लहान असलेल्या मुलीला नाही म्हणतात का तर ती फक्त एक वर्षाने लहान आहे. कमीतकमी तीन वर्षाने तरी लहान हवी होती, पाच सहा वर्षे लहान असती तर बरेच. " अशी धारणा आहे आणि तुम्ही सुद्धा तेच मान्ड्ले आहे तुमच्या लेखात आणि आता कुणी त्याबद्द्ल काही बोलल तर तुम्हाला नको वाटत आहे.

माझ्यामते या विषयावर सैफ अलीचं मत घेतलं पाहीजे. त्याला वयाने चिक्कार लहान आणी चिक्कार मोठी अशा दोन्ही बायकांचा अनुभव आहे!

आपल्याकडे मुलगी सगळ्यात कमी हवी असते..उंची मुलापेक्षा कमी, पगार कमी, वय कमी अस असेल तर ओके , नाहीतर नो.. मुलाकडील ईगो दुखावतो का? आणि मुलींना पण असच हव असत, जास्त पगार, वय बरोबर किंव १-२ वर्श जास्त्..त्याच जातीतला किंवा उच्च(खाल जातीत नको?). .माझ्या ५-६ मैत्रीणी याचमुळे अजुन शोध्मोहिमेवर आहेत...समजाउन सांगुन झालय, पण नाही...ईगो
४-५ वर्श म्हणजे खुप मोठा? मग तेंदुलकरने म्हातर्या मुलीशी लग्न केल का?

वयापेक्षा मुलाचे आणि मुलीचे विचार जुळतायेत का ते नाही बघत...

मुलीने सासरचे म्हणाले तर नोकरि करायची नहीतर नाही...तरि आता चित्र बदलतय (माझा समज?)
वयापेक्षा मुलाचे आणि मुलीचे विचार जुळतायेत का ते नाही बघत...
मला एकजण २००६ मधे बघायला आले होते आणि म्ह्नणाले की तुला नोकरि सोडावी लागेल कारण आमच्याकडे खुप लोकांची येजा असते, त्यांच चहा पाणी ,जेवन खाण कराव लागेल...
डोक्यात गेले ते लोक माझ्या ..मी इंजिनीयर यासाठी नाही झाले. .अस बोलले मी त्यांना..:(
ते लोक गेल्यावर माझी झाड निघाली घरात, अस उत्तर देतात का? हो म्हणायच...:(

जोक नाही करत आजकाल मुलींची सख्या कमी झाल्याने तसेच मुली जास्त शिकून जास्त कमवत असल्याने आता स्वत: ची जात सोडून इतर जातीच्या मुली बघणारे किंवा वयाहून अधिक मुलगी चालणारे मुलगे आहेत.

आधीच्या काळी मुली शिकत नव्हत्या आता भरपूर शिकतात स्वत: च्या पायावर उभे राहतात . चित्र हळूहळू बदलते आहे मग मुलगे आपल्याहून मोठी मुलगी का नाही बघणार आत्ता अशा मुलांची संख्या अगदी नगण्य असली तरी पुढे जास्त असणारच नाही असे नाही.

मी तेच मांडले नाहीये . मी फक्त मुलींचे त्यांच्याहून ५ वर्षे मोठ्या असलेल्या मुला बद्दलचे मत मांडले आहे .कदाचित आत्ताच्या सगळ्या मुलींचे तसे नसेलही .
मुलापेक्षा ५ वर्षे मोठ्या मुलीचे काही लिहिले नाहीये इतकेच म्हणजे असे असू नये असे अजिबात नाही. तुम्ही म्हणता तसा पिढीतला फरक दोन्ही कडूनच आहे ना . मग एखाद्या मुलाला स्वत: हून एखादी मोठी मुलगी आवडली आणि तिलाही तो चालणार असेल तर हरकत काहीच नाही .

जोक नाही करत आजकाल मुलींची सख्या कमी झाल्याने तसेच मुली जास्त शिकून जास्त कमवत असल्याने आता स्वत: ची जात सोडून इतर जातीच्या मुली बघणारे किंवा वयाहून अधिक मुलगी चालणारे मुलगे आहेत.

>>> नाही, तुम्ही हे घ्याच _______/\_______

अन्विताजी मी तुम्हाला उद्देशून नाही म्हटलं.

माझा स्वतःचा असा अनुभव आहे की आपण मत व्यक्त करतो तेव्हा लोक त्याला आपला हेका समजतात अगदी आपण दिलेला फायनल डिसिजन सुद्धा. आणि मग त्यानंतर काय काय नाही होत आजकाल बोलतानासुद्धा डिस्क्लेमर लावावा लागतो - "हे माझे वैयक्तिक मत आहे आणि तुझ्याबाबतीतला हेका किंवा तुला दिलेला निर्णय नाही." प्रत्येक ठिकाणी हा डिस्क्लेमर वापरते मी आजकाल.
कारण काही असेल पण सब घोडे बारा टक्के हे ब्रह्मवाक्य असल्यासारखे वागले गेल्यास तुम्ही काय करणार, त्या व्यक्तीचे विचार तसेच आहेत म्हणून आपण सोडून द्यावे. स्वतःला त्रास करून घेऊ नये.

माबो वर विषय मांडलात हे उत्तम पण कोण काय म्हणते कोणाचे काय मत जे काही असेल ते आपण स्वतःच्या मनापर्यंत नेऊ नये. अर्थात हेमावैम.

मुलगा मुलगी एकमेकांच्या आकंठ प्रेमात असताना, लिव्ह इन मध्ये असताना, मुलगी प्रेग्नंट असताना आईवडिल लग्नाला नकार देतात इतकेच नव्हे तर स्वतःला जाळून घेण्याची धमकी देतात का तर मुलगी दीड वर्षाने मोठी आहे.
<<

अरे वा! कसे मस्त मूर्ख आहेत.

पत्ता कळवा. काँप्लिमेंटरी काडेपेटी माझ्या खर्चाने कुरियर करतो Happy

बघा तुम्हीच वर पक्शाचे विचार किती सन्कुचित आहेत ते सान्गत आहात.

मुली जास्त शिकून जास्त कमवत असल्याने वयाहून अधिक मुलगी चालणारे मुलगे आहेत.
म्ह्णजे मुलगा जर २०,००० पगार मिळवत असेल तर त्याला १-२ मोठी वयाने आणि जास्त शिकलेली असेल आणि ५०००० पगार मिंळवणारी चालेल. ईथे सुदधा १-२ मोठी वयाने , मुलगी कमी शिकलेली किवा तेवढीच शिकलेली आणि कमी किवा तेवढीच पगार मिंळवणारी चालत नाही.

आणि मुलीनी जरा adjust करायला पाहीजे ही अपेक्शा. नवीन काही नाही हेच चालू आहे ईतके वर्श. आजकाल मुली जरा अटी घालू लागल्याने किवा बोलू लागल्याने तथाकथित sanskuti रकक्षाना सहन होत नाहीये.

आता अन्विताताईंनी लिहिलं स्वत:चं मत की ’पाच-सहा वर्षांनी मोठा मुलगा असला तर काय झालं?’ त्यावर कोणीतरी लिहिलं की ’नऊ वर्षांचा फरक काही फार नाही.’ आता कोणीतरी प्लीज असं लिहा की ’वीस वर्षांनी मोठा मुलगा चालायला हवा मुलीला.’ म्हणजे हा धागा सफळ संपूर्ण होईल.
जरठ-कुमारी विवाहादी प्रथांविरुध्द लढलेले, त्यासाठी स्वत:वर तत्कालिन समाजाचा रोष ओढवून घेतलेले आमचे समाज सुधारक स्वर्गात हा धागा वाचत असतील आणि गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणत म्हणतील- "जर इतक्या वर्षांनीही हीच परिस्थिती असेल तर मग- आपण दिलेला लढा हा खरा लढा होता...की..टाईमपास?"

खरंच एकंदरित अवघड आहे सगळं.

पाच सहा वर्षाने मोठा मुलगा म्हणजे जरठ - कुमारी नव्हे.. नऊ वर्षे म्हणजे जरठ कुमारी असे असू शकेल. वीस वर्षे तर नक्की. आणि हे सगळे विचार म्हणजे फक्त अरेंज्ड मॅरेज साठी. लव्ह मॅरेजसाठी काहीही चालते.

माझ्या ओळखीत असा मुलगा आहे ज्याने घटस्फोटीत स्वत:हून ४ वर्षे मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न केले आहे त्याचे हे पहिलेच लग्न आहे.त्याचा प्रेमविवाहच आहे. त्याच्या घरच्यांनी पण हे छान स्वीकारले आहे . लग्न पण अगदी छान करून दिले.
त्यांचा संसार पण सुखाचा चालू आहे. हे बघून खूप छान वाटते . मुलगी इथे मुलाहून मोठी आहे . त्यामुळे दोघानाही चालणार असेल तर मुलापेक्षा मुलगी मोठी असली तरी काही हरकत नाही.

पण आधी असणारी परिस्थिती बदलते आहे असे नाही का वाटत तुम्हाला . हा बदल सकारात्मक आहे . काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी काही ठिकाणी अजिबात नाही. पण आशा ठेवायला नक्कीच जागा आहे.

४-५ वर्षाचे अंतर चालू शकते हे आजूबाजूला असणारी बरीचशी उदाहरणे बघून लिहिले आहे. आता २० पण चालेल असे म्हणा म्हणजे उगिचच मुद्दा सोडून काहीतरी बोलण्यासारखे आहे कारण २० वर्षात पिढी बदलते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

बाकी मुलीनच्या बाबतीत हे विचार आहेत असे नव्हे तर मुलांनी पण स्वत:हून मोठी मुलगी जर अनुरूप वाटली तर जरूर लग्न करावे . अर्थात मुलीला स्वत:हून वयाने लहान मुलाशी लग्न करण्याची इच्छा असेल तर.

अहो हा बदल आताचा वगैरे काही नाही असे मला वाटते.

४४ वर्षापुर्वी, माझ्या मावस आत्येने तिच्यापेक्षा ३ वर्षाने लहान मुलाशी लग्न केले. प्रेमविवाह केला. घरच्यांनी काहीही विरोध केला नाही. तेव्हा हे प्रत्येक माणसाच्या विचारांवर अवलंबून आहे. ती ट्युशन घ्यायची ह्या मुलाची.

ती कॉलेजला, हा मुलगा (तेव्हाची अकरावी). तेव्हापासून प्रेम.

त्यावेळचा जोक बाबा सांगतात की, मावस आत्येच्या सासरच्या शेजारच्या आजी म्हणत, मुलगी मोठी (त्यांना कुठुनतरी कळले) तर मूल कसे होणार त्या मुलीपासून? (मोठा विनोद आहे हा) Proud

मला वाटते हा ट्रेडर आणि ग्राहक यातिल द्रुष्टीकोनाचा फरक आहे.
अन्विताताई एक्स्चेंजवर काम करत आहेत. त्यांना दिसतेय की बरेच दिवस ट्रेड होत नाही आहे. शेवटी त्यांना एक ४० मागणारे गिर्हाईक दिसले असावे. ग्राहक म्हणताहेत मी ३७ अगदी फार तर ३८ द्यायला तयार होईन.

शेवटी हा ट्रेडर आणि ग्राहक यांच्या द्रुष्टीकोनतिल फरक आहे. अन्विता आज काल मुली स्वतःचा भाव बरोबर वसुल करु लागल्या आहेत, त्यांना अशी ट्रेड नको असते.

माझे वैयक्तिक मत स्टॉक चांगला असेल आणि लॉन्ग जाणार असाल तर प्राइस कडे लक्ष देउन व्हॅल्यु नजर अंदाज करु नये पण हे माझे वैयक्तिक मत आहे शेवटी प्रत्येकाचा निर्णय आपआपला. याबरोबरच प्रतिसादकांची पण बाजु बरोबर आहे की आतली माहिती असल्याशिवाय व्हॅल्यु फाइंड करणे तसे कठीणच यापेक्षा मार्केट प्राइस नक्की मिळवता येते.

झम्पी , वरती वेल ह्यांनी एक उदाहरण दिले आहे . त्याला अनुसुरून मी दुसरे लिहिले. तुम्ही म्हणता तसा हा बदल बर्याच वर्षांपासून असेल पण आता आशा गोष्टी स्वीकारण्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. आंतरजातीय /अन्तरभाषिक विवाहानापण बरेच जण अगदी आनंदाने स्वीकारतात . infact माझ्या माहितीत एक जण आहेत ज्या स्वत: च्या मुलीकरता एका south indian मुलाबाबत बोलत होत्या मला वाटले प्रेमविवाह म्हणून सांगत आहेत पण तसे नव्हे स्थळ म्हणून बघत आहेत. अशी उदाहरणे कमी आहेत परंतु पुढे नक्कीच वाढतील .

नीलिमा , मी सुद्धा ह्या बाबत माझे मत व्यक्त केले त्यात मुलीनी सगळे बघून मत बनवावे असे वाटते असे लिहिले आहे कुठेही मताचा आग्रह नाही किंवा असेच करा हा सल्ला पण दिला नाहीये.

साधना ह्यांनी पण अगदी नेमकी प्रतिक्रिया दिली आहे .माझे वयाची अट शिथिल करा/ कराच / करावी असे मत नसून त्याबाबत विचार करायला हरकत नाही असे मत आहे.

त्यामुळे जर अट बदलायची नसेल तर बदलू नका. विचार पण करू नका. लेखातल्या मताशी असहमती दाखवू शकता पण तुम्ही असा विचार मांडणेच चुकीचे आहे असे कसे?
काही जणांनी आपल्या प्रतिक्रियेतून मत पटले नसले असल्याचे मांडले आहे ते ठीक आहे ना पण लेख बघून डोके फिरले , भोचक पणा नको हे सगळे कशासाठी .
मत पटले नसेल तर नेमक्या शब्दात नीट व्यक्त करता येतो ना. मग आता इथे कोणीतरी येउन २० वर्षे अंतर पण चालेल असे लिहा . हा आक्रस्ताळेपणा कशासाठी?

नीलिमा , मी सुद्धा ह्या बाबत माझे मत व्यक्त केले त्यात मुलीनी सगळे बघून मत बनवावे असे वाटते असे लिहिले आहे कुठेही मताचा आग्रह नाही किंवा असेच करा हा सल्ला पण दिला नाहीये. > > अहो तुम्हीच तर वरती लिहिले आहे की मुलगी जर ५ वर्षाहून मोठा मुलगा पहायला तयार नसेल तर तिला समजावून सांगितले पाहिजे. अता लग्नाच्या वयाच्या मुलीला हे समजावून सांगणे म्हणजेच सल्ला देणे नाही का ? तिला स्वतःला समजत नसल्याने ( तिला स्वतःचे भले समजत नाही असा अर्थ यातून निघतो) तिला समजावून सांगणे कसे महत्वाचे आहे असेच सांगताय ना !!

मुलाला स्वत: हून एखादी मोठी मुलगी आवडली>>>> बघा, मुलाला कसा स्वत: हून चा चॉईस आहे अरेरे >>
अगदी !! बघा मुलगा न बघताच म्हणला मोठी मुलगी नको तर तुम्ही नाही जाणार त्याला समजावयाला , नाही का ?

साधना ह्यांनी पण अगदी नेमकी प्रतिक्रिया दिली आहे .माझे वयाची अट शिथिल करा/ कराच / करावी असे मत नसून त्याबाबत विचार करायला हरकत नाही असे मत आहे. >>
मत मांडताय तर समजावून सांगण्याच्या गोष्टी का करताय ? शिवाय हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे , सामाजिक प्रश्न नव्हे . तुम्ही तुमचे वैयक्तिक मत मांडले असलेत तरी ते सल्ला देण्याच्या टोन मधे मांडले आहेत. आणि ते तुमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी नसून लग्नाळू मुलींना उद्देशून आहे. अर्थातच तुम्ही स्वतःविषयी काही सांगत नसून इतर लग्नाळू मुलींविषयी तक्रार करत आहात. मग हे वैयक्तिक कसे काय बरे ?? तुम्हाला जर फक्त वैयक्तिक मतच मांडायचे असेल तर वाक्यरचना बदला म्हणजे लोकांना तो सल्ल्ला वाटणार नाही.

उदा. - मी लग्नाला उभी राहिले तर / राहिले होते तेव्हा ५/६ वर्शानी मोठी असलेली स्थळेसुद्धा पहात होते. मला माझ्यासाठी असा वर चालला होता/ चालणार होता.
असे लिहिलेत तर ते 'वैयक्तिक' होईल , इतर लग्नाळू मुलीनी कसा विचार करावा , हे जर तुम्ही मांडत असाल तर तो सल्लाच होणार हो , वैयक्तिक मत नव्हे काही

शेवटी हा ट्रेडर आणि ग्राहक यांच्या द्रुष्टीकोनतिल फरक आहे. अन्विता आज काल मुली स्वतःचा भाव बरोबर वसुल करु लागल्या आहेत, त्यांना अशी ट्रेड नको असते. >> स्त्री आणि कमॉडिटी ह्यात फरक असू शकेल का?

'समजावून' सांगितले पाहिजे असे कुठे लिहिले आहे बरे मी ? उलट
साहजिकच असा प्रश्न पडतो कि खरेच एवढे अंतर खूप आहे का ? केवळ त्या एकमेव कारणासाठी स्थळ नाकारणे कितपत योग्य आहे ?
उलट आपली मते जाणून घ्यायला आवडेल असे लिहिले आहे.
लग्न ठरत नसेल तर त्याचा मोठा issue पण करू नये असेही म्हटले आहे. त्यामुळे ह्यात जर तुम्हाला सल्ल्याचा टोन वाटला ( तसे नसताना ) तर मी तरी काय करणार ?
लग्नाळू मुलींविषयी तक्रार करत नाहीये पण त्या आशा का निर्णय घेतात त्या मागे काय करणे असतील हे ह्या निमित्ताने कळेल असे वाटले .
मला स्वत: ला ५ वर्षे अंतर असले तर चालेल असे का वाटते ह्या विषयी पण लिहिले आहे . तसे त्यांनी पण लिहावे . ह्या चर्चेतून कदाचित मुलीना ज्यांची अजून ह्या विषयी काही ठराविक मत झाले नाहीये त्यांना निर्णय घ्यायला मदत होईल . ज्यांचे ५ वर्षे अंतर चालेल असे वाटते आहे त्यांना कदाचित इतरांचे अनुभव किंवा त्यांचे विचार ऐकून ५ वर्षे अंतर नको असे मत बनेल किंवा त्याच्या उलट ज्यांना ५ वर्षे चालणार नाही त्यांना एवढे अंतर चालेल . असेही वाटू शकले . शेवटी चर्चेतून कधी कधी निर्णय घेणे सोपे होते म्हणून इथे public forum वर लिहिले.
त्यामुळे मला वाक्यरचना बदलण्याची गरज नसून तुम्हालाच प्रतिसादात नीट वाक्यरचना आणि विचार मांडण्याची गरज आहे.

'समजावून' सांगितले पाहिजे असे कुठे लिहिले आहे बरे मी ? उलट >>
--------------
Anvita | 17 February, 2014 - 08:16
राजसी , अगदी बरोबर आहे//// ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तिर्‍हाईताचे काय काम?//
परंतु अशावेळेस समजावणे आपले काम आहे. निर्णय हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा आहे. बर्याच वेळा हि मुले / मुली तिर्हाईत नसतात अगदी आपल्या जवळचीच असतात मग नात्यात असो वा ओळखीत .
अर्थातच त्यांची मते काही कारणाने तयार झालेली असतात आपण जर नीट समजावले तर ते वेगळ्या दृष्टीने विचार करू शकतात असे वाटते

>>>
--------
तुमच्या या पोस्ट चा अर्थ मला तरी असा लागतोय की जास्त वयासाठी नकार देणार्‍यांना नीट समजावण्याची गरज तुम्ही व्यक्त करत आहात. समजावणे आपले काम आहे असे चक्क लिहिले आहे की तुम्हीच !!!

-------
लग्नाळू मुलींविषयी तक्रार करत नाहीये पण >>>

अगदी ३५ वर्षाच्या मुलीला ४० वर्षाचा मुलगा नको म्हणाली कारण ५ वर्षे अंतर . फारतर ३८ वर्षापर्यंत चालेल असे म्हणाली. फक्त वयातील ५ वर्षे अंतर ह्या शिवाय काही कारण नाही . स्थळाची माहिती ऐकून घेतलीच नाही. अशीच अजूनपण उदा . आहेत.
कोणी जर कोणाला चांगल्या हेतूने काही सांगायला गेले ते सुद्धा एक विचार किंवा एक मत म्हणून म्हणजे सक्ती नव्हे तरी ' mind your own buisness ' हाच सूर ऐकू येतोय . >>
------

यावरून मला जो अर्थ लागलाय तो असा की , अरे मी किती चांगला समजावते आहे पण या मुली ऐकतच नाहीयेत. थोडक्यात दुखावले गेल्याने कुरकुरीचा सूर .

खर सान्गायचा तर हा purn लेख मुलीनी जास्त अटी न घालता ५-६ वर्श मोठी स्थळ बघावीत यासाठी लिह्लेला आहे.......purn एकान्गी आहे. अस कुठ्च म्हणलेल नाही की मुलानी आपल्या बरोबरीची आणि स्वःताच्या वयाला शोभणारी स्थळ बघावीत म्हणजे त्यान्चीही लग्न जमतिल आणि लहान वयाच्या मुलीना जरा योग्य जोडीदार मिळू शकेल,
आणि जी काही excpetional cases नन्तर माल्ड्ल्या आहेत त्या love marraiges आहेत. ज्याविषयी हा ले़खच नाहीच आहे ..........
जर तुम्हाला कुणी एवढा सल्लाच द्यायचा असेल तर तुम्ही मुलाना (विशेषत: मुल व त्यांचे पालक) याना द्यावा की काळ बदलत आहे त्यानुसार बद्ला नाही तर समवयस्क मुलीन्ची तर लग्न होतिलच पण लहान मुलीन्ची पण होतील आणि तुमच्या हाती काहीच लागणार नाही.......कारण एकूण विचार केला तर मुलीची सन्ख्या कमी आहे आणि भविश्यात मुलगाच हवा या MURKH अट्ट हासापायी अजूनच कमी होत आहे........

यावरून मला जो अर्थ लागलाय तो असा की , अरे मी किती चांगला समजावते आहे पण या मुली ऐकतच नाहीयेत. थोडक्यात दुखावले गेल्याने कुरकुरीचा सूर >>>>>>>>>>>>>>>>>.................correct 100% असच आहे डेलिया

त्या आशा का निर्णय घेतात त्या मागे काय करणे असतील हे ह्या निमित्ताने कळेल असे वाटले . >> "आवड" हे एक भावनिक कारण पुरेसे नाही वाटत का? वय चेहऱ्यावर दिसत नसल तरी अनेक परीने व्यक्त होत. हे वयाचे व्यक्तीकरण (भावनिक समरसता, पैसा, शारीरिक क्षमता, सामाजिक प्रतिष्ठा इ अनेक पातळ्यांवर) जर कुणाला पटत नसेल तर त्यात त्या व्यक्तीला जास्त काही विचारण्यात अर्थ नसतो.
शिवाय वयाने जास्त आहे हे नकार कळवण्याचा सभ्य मार्ग असू शकतो. प्रत्येकीला/प्रत्येकाला तोंड उचकटून हा मुलग/मुलगी दिसायला धड नाही किंवा कमी पगार आहे किंवा एकत्र कुटुंब आहे असली झोंबणारी कारणे सांगणे जमणार नाही. नकार असेल तर पुढे कशाला जास्त कीस पडायचा? कारण न सांगता हि कुणी नकार दिला तर ठीकच!

खर सान्गायचा तर हा purn लेख मुलीनी जास्त अटी न घालता ५-६ वर्श मोठी स्थळ बघावीत यासाठी लिह्लेला आहे.......purn एकान्गी आहे. अस कुठ्च म्हणलेल नाही की मुलानी आपल्या बरोबरीची आणि स्वःताच्या वयाला शोभणारी स्थळ बघावीत म्हणजे त्यान्चीही लग्न जमतिल आणि लहान वयाच्या मुलीना जरा योग्य जोडीदार मिळू शकेल,
आणि जी काही excpetional cases नन्तर माल्ड्ल्या आहेत त्या love marraiges आहेत. ज्याविषयी हा ले़खच नाहीच आहे ..........
जर तुम्हाला कुणी एवढा सल्लाच द्यायचा असेल तर तुम्ही मुलाना (विशेषत: मुल व त्यांचे पालक) याना द्यावा की काळ बदलत आहे त्यानुसार बद्ला नाही तर समवयस्क मुलीन्ची तर लग्न होतिलच पण लहान मुलीन्ची पण होतील आणि तुमच्या हाती काहीच लागणार नाही.......कारण एकूण विचार केला तर मुलीची सन्ख्या कमी आहे आणि भविश्यात मुलगाच हवा या MURKH अट्ट हासापायी अजूनच कमी होत आहे........

+१

सुम, डेलिया, राजसी, मामी यांच्या पोष्टींशी सहमत आहे.

Pages