अंतरपाटातील अंतर

Submitted by Anvita on 16 February, 2014 - 01:03

मुलगा/ मुलगी विवाह योग्य झाली कि आई वडिलांना सून / जावई यायचे वेध लागतात .
पण बर्याच वेळा लग्न ठरण्यास उशीर होत असतो .
लग्न लवकर न ठरण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यातील काही कारणे म्हणजे त्याच्या / तिच्या अपेक्षा खूप आहेत . दिसायला चांगला, चांगले करियर म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम असणाराच जोडीदार हवा आहे . वयात जास्त अंतर नको . अजून योग नाही वगेरे .
बाकी सगळे मुद्दे मान्य केले तरी वयातले अंतर ह्य मुद्द्यावर मात्र विचार करायला हवा असे वाटते .
हल्ली ५-६ वर्षाचे अंतर हे खूप वाटायला लागले आहे . खरेतर आजकाल मुली पण शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको आम्ही २-३ वर्ष अंतर असणारे स्थळच बघत आहोत आणि बाकी त्या स्थळाची कहिही चौकशी न करता ते नाकारतात तेव्हा साहजिकच असा प्रश्न पडतो कि खरेच एवढे अंतर खूप आहे का ? केवळ त्या एकमेव कारणासाठी स्थळ नाकारणे कितपत योग्य आहे ?
मला असे वाटते कि ५-६ वर्षाचे अंतर असले तर स्थळ बघायला काही हरकत नसावी . कधी कधी वयापेक्षा मुलगा दिसायला लहान वाटतो किंवा वयाने लहान असून मोठा पण वाटू शकतो . तेच त्याच्या maturity बद्दल पण म्हणता येईल . कितीतरी तेवढे किंवा जास्त अंतर असलेल्या जोडप्याचे सुखी संसार बघतच असतो . आत्ताचा काळ बदलला आहे. आता ५-६ वर्ष अंतर म्हणजे generation gap असते वगेरे पण एकू येते पण तरीही अशावेळेस मुलाला भेटून मगच मत बनवावे असे वाटते . अर्थात वयातील अंतर किती असावे ह्या बाबतीत वेगळी मते असू शकतात .

तसेच ज्या मुलींची / मुलांची लग्न काहीही कारण नसताना वेळेत ( म्हणजे बघायला लागल्या पासून लवकर ) ठरत नाहीत असे मुले/ मुली पण नाराज असतात . त्यांनीही लग्न ठरत नाही म्हणून नाराज होऊ नये . लग्न ठरेपर्यंत त्या काळात करियर कडे जास्त लक्ष द्यावे ,एखादा आवडणारा छंद जोपासावा . पुढे लग्न झाल्यावर जबादारी वाढते त्यावेळेस स्वत: साठी वेळ मिळतोच असे नाही . आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावे असे वाटते .त्यांच्या आई वडिलांनी (परिवाराने)पण लग्न ठरत नाही या विषयाचा फार मोठा issue करू नये .

हा लेख आधी माझ्या ब्लोगवर ( anaghabhade.blogspot.in ) लिहिला होता . परंतु माझा ब्लोग हा 'ज्योतिषशास्त्र ' विषयावर असल्याने त्या विषयात रस असणार्यांनीच फक्त हा लेख वाचला असावा असे वाटले हा जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या उद्देशाने इथे देत आहे .
आपली मते ह्या विषयी काय आहेत हे पण जाणून घ्याला आवडेल .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

btw, If the bride/groom's parents are communicating (even in so-called "initial stages") it is better not to go ahead with that person.>>> म्हणजे स्थळांच्या यादीतली ७० ते ८०% नावं बाद करावी लागतील सिमन्तिनी! हे म्हणजे असं झालं की आधीच हा ओरिजिनल लेख याबद्दल आहे की नसत्या मुद्द्यांवरून चॉईस कमी करून घेऊ नये आणि वर तू तो कमी करण्यासाठी उपाय सुचव! Happy

कॉन्टॅक्ट नं. कधीच मुलांचे अथवा मुलींचे दिलेले नसतात. शिवाय आपल्याकडे तरी निदान लग्न हे दोघांचं नसून दोन कुटुंबांचं असतं. त्यामुळे बहुधा लग्नानंतरची मोठ्यांची लुडबुड गृहीत धरलेली असते.

म्हणजे स्थळांच्या यादीतली ७० ते ८०% नावं बाद करावी लागतील सिमन्तिनी!>> Happy Goal is one right person, not the list or choice! So if 80% of the list is gone then that makes life much easier.

त्यामुळे बहुधा लग्नानंतरची मोठ्यांची लुडबुड गृहीत धरलेली असते.>> Happy If you give someone a chance, they will perform (ludbud cha chance dila tar ludbud karnarch). Better to minimize chances from your side.

आपल्याकडे अजूनएक प्रचार करतात की बाईला वय वाढलं की मूल होत नाही पण पुरुषाला मात्र ’कधीही’ (?) मूल होऊ शकतं. म्हणून जास्त वयाची बायको नको पण मोठया वयाचा नवरा चालेल.
पण आजची परिस्थिती खरंच वेगळी आहे. मेडिकल सायन्स पुढे गेलंय..पस्तीसच्या पुढे कितीतरी बायकांना सहजपणे मुलं होतायत.
आजकाल प्रॉब्लेम पुरुषांचा आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या विकी डोनर चित्रपटात हेच दाखवलंय की आजकाल पुरुषांत प्रॉब्लेम जास्त वेळा असतो आणि वयाबरोबर तो वाढत जातो. पण अगेन- एखादया बाईला मूल व्हायला प्रॉब्लेम होत असेल तर तो सार्वजनिक चर्चेचा विषय असतो. कसं तिचं वय वाढलं, कसा तिने लग्नाला उशीर केला, आता भोगेल आपल्या कर्माची फळं- एक ना दोन.
आणि पुरुषांतले दोष या कानाचे त्या कानालाही कळत नाहीत- विकी डोनरमध्ये दाखवल्याप्रमाणे गुपचूप ’उपाय’ केला जातो. म्हणून त्याची चर्चाच होत नाही!

वेदिका२१ .. तुम्ही इतका गन्भीर पण बरोबर मुद्दा मान्ड्ला आहे की काय खर नाही आता या धाग्याचे........बहुदा owner हा धागा बन्द करेल इतका विरोध बघून....

तुमच बरोबर आहे वेल.पण तो जरी फक्त सल्ला असला ना तरी सतत दिला तर त्या मुलीवर दड्पण येउ शकत आणि त्या ती होकार देउ शकते....//

सुम, अहो तोच मुद्दा आहे माझा . आपल्या माणसाला समजावून सांगा पण तुमचे मत लादु नका त्यांच्यावर .
लेखात तर मी फक्त अंतरातल्या मुद्या विषयी मत मांडले आहे . कोणालाच समजावले नाहीये . पण ह्या विषयी समजा उदा . माझ्या बहिणीने जर वयात अंतर ५ वर्षे आहे म्हणून एखादे स्थळ बघायला नकार दिला तर मी तिला एकदा नक्कीच समजावेन . सारखे सारखे नाही आणि त्यानंतर तिचा जो काही निर्णय असेल तो मान्य असेलच मला .
सारखे सारखे समजावणे म्हणजे आपले मत त्या व्यक्तीवर लादणे हे मलापण मान्य आहेच.

इतका विरोध बघून धागा बंद करायचे काहीच कारण नाही. एकतर मी जे वयातील अंतर ५ वर्षे असले तरी सगळ्या बाजूचा विचार करून मग नकार द्यावा फक्त अंतराच्या एकमेव कारणासाठी नकार देऊ नये असे मत व्यक्त केले आहे.
ह्या उलट काहीही झाले तरी ५ वर्षे अंतर नकोच असे सुद्धा मत असूच शकते म्हणूनच लेखात 'आपली मते जाणून घ्यायला आवडतील ' असे लिहिले आहे.
तसेच प्रेमविवाहात जसे वयातील अंतर जास्त असूनसुद्धा समोरची व्यक्ती काही कारणाने आवडते व त्यांचे संसार सुखाचे होतात तेच मी arranged marriage मध्ये सांगत आहे.
अर्थातच माझे मतच योग्य आहे व तसेच करायला पाहिजे किंवा तसेच करा हा सल्ला पण कुठेही दिलेला नाही. त्यामुळे खरेतर विरोध होण्याचे पण काही कारण नाही . तुम्ही तुमची मते मांडण्यासाठी स्वतंत्र आहात .

माझ्या बहिणीने जर वयात अंतर ५ वर्षे आहे म्हणून एखादे स्थळ बघायला नकार दिला तर मी तिला एकदा नक्कीच समजावेन .<<<<
उदाहरण देतानाही पुन्हा बहीणच????? (मुळात तुमचा मूळ प्रॉब्लेम 'मुली' जास्त अंतर असेल तर नाकारतात हा आहे, हे स्पष्टच आहे) मुलींना शांतपणे जगू द्या हो प्लीज.

मायबोली म्हण ऑफ द डे (यत्र, तत्र, सर्वत्र!)
'झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही!'

लोक लहान मुलगी बायको म्हणून मिळावी म्हणून काय काय उद्योग करतात...
असा एक किस्सा झाला होता .. कि ओळखितून एक स्थळ सान्गून आल होत..मुलगा आणि मुलीच्या जन्मात ४ वर्श अन्तर होत..
मुलाची पत्रिका गुरुजीना दाखवल्यावर पत्रिकेवरून त्यानी सान्गितले कि मुलाची जी जन्मतारिख आहे त्याच्या ४ वर्श आधी त्याचा जन्म झाला आहे .. म्हण़जे मुलाची जन्मतारीख जर ८२ दिली असेल तर तो actaully ७८ चा आहे.. कारण सगळे ग्रह त्यावेळे च्या (७८ च्या) पत्रिकेनुसार आहे...यावर वधुपक्षाच्या लोकानी सरळ फोन करून सन्गितला की तुमची पत्रिका पूर्ण चुकिची आहे ती नीट करून घ्या.
म्हणजे बघा कसे उद्योग करतात लोक ... म्हणजे त्या मुलाला आपल्यापेक्षा ८-९ वर्श लहान मुलगी हवी होती म्हणून ते इतके खोटे बोलले... असा पत्रिका बघण्याचा पण कधी कधी चान्गला उपयोग होतो ....

विवाह सऊनस्थेच्या सन्दर्भात आपला समाज खूप महत्वाच्ह्या सन्क्रमणातून जात आहे. ह्या बदलाचा वेगही खूप जास्त आहे. मुलगा आणी मुलगी निवडीचे निकशही अगदी वेगळ्या स्वरूपाचे आहेत. नवीन पिढीसमोरील आव्हानेही वेगळी आहेत ( हे विधान वैवाहिक जीवनाच्या द्रिश्टिकोनातून आहे).त्यान्ची आजची आणी अजून १५ - २० वर्षानन्तरची जीवन पध्धती अगदी निराळी आहे आणी असणार आहे.
ज्यान्ना अशा नवीन प्रकारच्या जीवन पध्धतीची कल्पना नाही अश्या लोकान्नी त्यामुळे नवीन पिढीच्या मुला मुलीन्वर विश्वास ठेउन पुढे वावे. चिन्ता करू नये. नवीन पिढी अगदी समन्जस आणी विचारी आहे. "तुम्ही फक्त त्यान्च्या पाठीवर हात ठेउन लढ म्हणा ! " आणी त्यान्च्या पाठीशी उभे रहा. चुका घडणारच आहेत. तुमच्या पिढीतल्या विवाहातही घडत होत्याच की.
ते अडखळले - पडलेच तर त्यान्ना आधार द्या.

उदाहरण देतानाही पुन्हा बहीणच????? >> Happy अग, नसेल भाऊ त्यांना म्हणून डोक्यात येत नसेल कि उदाहरण देताना भावाच द्याव.
असा पत्रिका बघण्याचा पण कधी कधी चान्गला उपयोग होतो ....>> हायला!!! घाबरत नाहीत का लोक कि असल्या वागण्याने शनीचा कोप/ राहूची वक्री दृष्टी असल काहीबाही होईल. धीटच दिसतायत!! पत्रिका फोर्जरी हा कायदेशीर गुन्हा केलाच पाहिजे.

माझ्या बहिणीने जर वयात अंतर ५ वर्षे आहे म्हणून एखादे स्थळ बघायला नकार दिला तर मी तिला एकदा नक्कीच समजावेन >> का ? कशासाठी ?? यात समजावण्यासारखे काय आहे , हे काय व्यसन आहे की वाईट मार्गाचा रस्ता आहे की ते सोडण्यासाठी तुम्ही बहिणीला समजवण्याची गरज पडावी. असे काय आहे की जे तुमच्या सुविद्य बहिणीला स्वतःहुन समजत नाही आणि तुम्ही समजावून द्यायची गरज लागते ?
मुळात तुमच्या बहिणीने तुम्हाला योग्य न वाटणारी अट घातली तर ती तिच्यासाठी 'योग्य' आहे हे तुम्हाला का समजू नये हा प्रश्न आहे.

रच्याकने, + ५ अतंरापेक्षा कमी अंतर असलेली मुले बघितली तर तिला स्थळे मिळणारच नाहीत का? अशी सगळी मुले तिच्यासाठी अयोग्यच असतील का? अशी अट एखादीनी ठेवली तर तिचे लग्नच होणार नाही अशी परीस्थीती आहे का?

काय हे? किती प्रश्न?
अहो, तुम्हाला पत्रिकेतलं काय कळतं का? अट मोडली नाही तर लग्न होणार नाही असं स्वच्छ दिसत असेल त्यांना. त्या बिचार्‍या कळकळीने सांगताहेत, की घोडनवरे कन्सिडर कराच. तसं पत्रिकेत आहेच्च. तरीही तुम्हा माबोकर्णींचं उगंच आपलं सुरुच्चै!
नॉट फेयर हां.

रच्याकने:
माझ्या पुढल्या लेखाचं नांव असणारे : मांजरपाटातील मांजर.

काय हे? किती प्रश्न?
अहो, तुम्हाला पत्रिकेतलं काय कळतं का? अट मोडली नाही तर लग्न होणार नाही असं स्वच्छ दिसत असेल त्यांना. त्या बिचार्‍या कळकळीने सांगताहेत, की घोडनवरे कन्सिडर कराच. तसं पत्रिकेत आहेच्च. तरीही तुम्हा माबोकर्णींचं उगंच आपलं सुरुच्चै!
नॉट फेयर हां.

रच्याकने:
माझ्या पुढल्या लेखाचं नांव असणारे : मांजरपाटातील मांजर.
हाहाहाहाहाहा

रच्याकने, + ५ अतंरापेक्षा कमी अंतर असलेली मुले बघितली तर तिला स्थळे मिळणारच नाहीत का? अशी सगळी मुले तिच्यासाठी अयोग्यच असतील का? अशी अट एखादीनी ठेवली तर तिचे लग्नच होणार नाही अशी परीस्थीती आहे का?>>>>>>>>>>>>>>>>>>.. परिस्थिती उलटी आहे हो...... आता मुलीनी ५ वर्श अतंर नको म्ह्णल तर घोडनवरयाची लग्न कशी होणार हो मग... त्यानी काय करायच मग .. त्याचा विचार नको करायला.. आणि मुलीना कुठे काय कळ्त जरा त्याना येता जाता सारख तेच तेच समजावल की होतील तयार त्या.......त्याना काय हवय याचा विचार करत बसल तर घोडनवरयाची लग्न कशी होतील,, त्यामुळे ए़कतर त्यानी अशी वयाची अट घालणच मुळा त चुक आहे...पण जाउदे जरा शिकलेल्या असल्याने तेवढी मिजास असुदे नाहीतर त्याच काहिच एकल नाही अस होइल ना.. पण स्थळ चान्गल असेल (याच्या द्रुश्टीने ) तर मात्र ही अट भयानकच आहे... खर अशी अट घालता येणार नाही असा कायदाच करायला हवा.......

ण मी माझ्यापेक्षा ९ वर्षाने मोठा असलेला मुलगा जो दिसायला माझ्याहून लहान वाटतो, मोकळ्या विचारांचा जास्त समजुतदार, घरातली कामे स्वतःची म्हणणारा (तुला मदत करतो असे म्हणत नाही तो. कामे आपली आहेत असे म्हणतो.) त्याची आई सूनेचे जास्त लाड करते मुलापेक्षा.. >>> वेलु मस्त

नी पण > मस्त

रचाक्याने भुषण ५ ने मोठा आहे
मला आधी वाई ट वाटायचे की ५ ने तो आधी म्हाता रा होईल पण असे नहिये हे आता समजतंय

सीमंतिनी , अगदी बरोबर आहे. मला फक्त बहीणच आहे. त्यामुळे साहजिकच ' मुलीचे ' उदाहरण दिले आहे.
तसेच अजून आपल्यकडे मुलापेक्षा मुलगी लहान वयाची बघतात ( arranged marriage ) म्हणून ५ वर्षाच्या अंतरामध्ये मुलापेक्षा मुलगी लहान असे उदाहरण आहे . ह्याचा अर्थ 'मुलापेक्षा मुलगी ५ वर्षाने 'मोठी नको' असे मला वाटते ,असा होत नाही. तसे मी कुठेही म्हटले नाहीये. त्याउलट प्रतिसादामध्ये एका मुलाने त्याच्याहून ५ वर्षे मोठ्या मुलीशी लग्न करून त्याचा संसार चांगला छान चालू आहे असे लिहिले आहे.
ह्यावरून मुलापेक्षा मुलगी मोठी असणे चूक किंवा न पटण्यासारखे आहे असे मला अजिबात वाटत नाही हे स्पष्ट होतेच .

डेलिया , अहो ५ वर्षे अंतर असणारा मुलगा नको हि अट ठेवणे गुन्हा नक्कीच नाही पण बहिणीला आपले मत सांगणे व त्या मागची भूमिका समजावून सांगणे हे बहुतेक तुम्हाला गुन्हा वाटतो आहे.
जी गोष्ट गुन्हा असे वाटते ती गोष्ट आपण करू नकोस ह्याबाबत आग्रही असतोच . ह्या बाबतीत तरी मी माझे म्हणणे बहिणीला पटले नाही तर तिचे मत मला मान्य असेलच असे लिहिले आहे. बहुतेक ते तुम्ही वाचलेले दिसत नाही.

जसे माझे मत आहे कि ' वयातील अंतर ५ वर्षे चालू शकते' तसेच जर ज्यांचे मत आहे कि' वयातील अंतर ५ वर्षे नको' असे म्हणणे योग्य नाही असे काही माझे म्हणणे नाही ह्या बाबतीत .
वेदिका २१ ह्यांनी जो पस्तिशीच्या पुढच्या मुला मध्ये मुल होण्याच्या दृष्टीने जास्त प्रोब्लेम्स येतात व त्यामुळे ३५ वर्षे व त्यावरील मुलगा मुलीनी नाकारावा हा मुद्दा मांडला आहे . तो विचार करायला लावणारा आहे.
मी' विकी डोनर' हा चित्रपट पाहिलेला नाही. परंतु तशी परिस्थिती असेल तर पस्तीशीतील मुलीनी चाळीशीतील मुलगा नाकारणे पटू शकते.
योग्य पद्धतीने मुद्दे मांडले तर पटतात . कुटुंबामध्ये ' healthy discussion ' असवितच. शेवटी ज्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्या व्यक्तीने निर्णय घ्यावा.

अन्विता, आधीही हेच लिहिले होते. आता पुन्हा जरा वेगळ्या शब्दांत लिहितो.

वयाच्या कारणावरून स्थळे नाकारण्यातले एक कारण तुम्ही निवडले. (१) मुलीला आपल्यापेक्षा वयाने फार मोठा मुलगा नसतो.
अशी वयाच्या बाबत अन्यही कारणे असतात.
(२) जसे मुलाला आपल्याच वयाची किंवा आपल्यापेक्षा जराशीच लहान मुलगी नको असते.
(३) स्थळ शोधताना सामान्यतः पहिली चाळणी मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त अशी असते. या चाळणीचीही तशी काही गरज नाही.
२ आणि ३ या प्रकारची उदाहरणे जास्त प्रमाणात मिळतील. १ प्रकारची (कदाचित) तितकी मिळणार नाहीत(तुम्हाला अधिक माहिती असेल). तरीही तुम्हाला लेख लिहायला १ हीच केस घ्यावीशी वाटली आणि २ & ३ केसेस घ्याव्याश्या वाटल्या नाहीत. याचे कारण काय? (प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांना ते कारण कळलेले आहे. पण तुमच्याकडून वाचायला आवडेल.) [वयाचाच विचार करायचा तर हे तिन्ही आणि अन्यही काही मुद्दे (जे तुम्हालाच नीट माहीत असतील) घेऊन तुम्हाला संतुलित आणि सर्वसमावेशक लेख लिहिता आला असता. अर्थात तुम्ही काय लिहावे याचे स्वातंत्र्य तुमचेच आहे. ]
आता २ आणि ३ ला या अटी उडवायलाही माझी काही हरकत नाही किंवा हरकत आहे असे मी कुठे म्हणत नाही असे पुन्हा पुन्हा सांगण्याने काहीही साध्य होणार नाही. तुम्हाला काय सांगावेसे वाटते आणि कशाबद्दल बोलावेसे वाटत नाही यातूनही बरेच अर्थ निघतात. ते अनाठायी, अनावश्यक, अतिरेकी आहे असे तुम्ही म्हणू शकताच. जसा हा लेख किंवा मतप्रदर्शन, समजावणे अनाठायी, अनावश्यक आहे असे अन्य कुणाला वाटू शकते.

<<खरेतर आजकाल मुली पण शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको आम्ही २-३ वर्ष अंतर असणारे स्थळच बघत आहोत आणि बाकी त्या स्थळाची कहिही चौकशी न करता ते नाकारतात तेव्हा साहजिकच असा प्रश्न पडतो कि खरेच एवढे अंतर खूप आहे का ?>>

यात पण हा शब्द कधी सुद्धा या अर्थाने तर कधी परंतु या अर्थी वापरला आहे. 'आजकाल' मधल्या काळाचा संदर्भ परिस्थिती/व्यक्तिप्रमाणे बदलू शकतो. पण परिस्थिती बदलते आहे हे तुमच्याही ध्यानात आलेच आहे. तर परिस्थिती बदलल्यावर विचारसरणी बदलण्यात धक्का बसण्यासारखे काय आहे, ते सांगाल का?

एक वाक्य पुन्हा देतोय.
<आजकाल मुली पण शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको>

मुली शिकतात, जॉब करतात त्यामुळे त्यांना जोडीदार आपल्यापेक्षा एक पाऊल पुढेच( म्हणजे वरचढ म्हणा की) अपेक्षित असतो? मी हे वाक्य 'त्यामुळे' च्या जागी 'तरीसुद्धा' हा शब्द वापरून लिहिले असते. अर्थात प्रत्येकाला आपण उभे असतो तिथून दिसणारे चित्र वेगळे असते. आपल्या डोळ्यांवर कोणता चष्मा आहे त्याचाही भाग असतो.
"यात काही गैर नाही" असे म्हटल्यावर तुम्ही लगेच "पण मुली ५-६ वर्षांचे अंतर नको म्हणतात" असे म्हणता याचा अर्थ मुलींनी अशा प्रकारे नाकारणे गैर आहे असाच अर्थ होतो. जर 'क्ष' प्रकारच्या चाळण्या लावण्यात काही गैर नाही, तर 'य' प्रकारच्याच चाळण्या लावण्यात नेमके काय गैर आहे? "मी असे म्हणत नाही," असे म्हणायला तुम्हीच इथे जागा ठेवलेली नाही, असे माझे मत आहे.

३५ च्या पुढचा मुलगा नाकारावा असं मला अजिबात म्हणायचं नाहीये हो. चाळिशीनंतर वगैरे शरीरात बदल जे होतात ते स्त्री व पुरुष दोघांच्याही शरीरात होतात- इतकंच मला म्हणायचंय. बाकी मला ४० च्या पुढे मूल झालेल्या स्त्रिया व पुरुष दोन्ही माहीत आहेत Happy
मला इतकंच म्हणायचंय की लग्नाच्या बाबतीत दबाव कोणीच कोणावर कधीही टाकू नये. विशेषत: मुलींवर.

परंतु तशी परिस्थिती असेल तर पस्तीशीतील मुलीनी चाळीशीतील मुलगा नाकारणे पटू शकते.>>> ऑ!!!!! आता लग्नाआधी काय स्पर्म काऊनट रिपोर्ट मागायचा का? चाळीशीत आहे पण स्पर्म किती गुबगुबीत आहे बघ! मग परत सुरूच का...

आपल्याला कारण पटायला कशाला हव. नाही कुणी म्हणल तर "तिला नाय पटल" एवढ्यावर सोडून द्याव कि.

वयाचं काय ते एकदा ठरवा मग आपण

मुलीला चष्मा नको
मुलगी फार बारीक आहे
मुलगी फार जाड आहे
मुलगी फार उंच आहे
मुलगी फार काळी आहे
मुलगी रत्रीअपरात्री काम करते
मुलगी फार आगाऊ आहे
मुलगी फार बोलते
मुलगी डावरी आहे
मुलीचे केस फार बारीक कापले आहेत.
मुलीची आई फार फॅशबेल आहे.

इत्यादि नकारांच्या कारणांचा ऊहापोह करू या!!!!

ती नेहमीची घिसीपीटी कारणे आहेत. जरा कायती वेगळी कारणे नकोत??

रच्याकने, आमच्या मातोश्रींना एकदा काय ऐकावे लागले होते माहिताय?

"आमच्या आजेसासूबाई अजून आहेत त्यांना पणतू पहायचाय. त्यामुळे तुमच्या मुलीला पहिला मुलगाच होइल का?"

असतात. असतात. जगात असलेपण लोकं असतात.

जुन्या माबोमधे एक कांपो अनुभवाचा बाफ होता त्यात अ आणि अ सिनेम्यांना लाजवतील असे किस्से होते.

Pages