अंतरपाटातील अंतर

Submitted by Anvita on 16 February, 2014 - 01:03

मुलगा/ मुलगी विवाह योग्य झाली कि आई वडिलांना सून / जावई यायचे वेध लागतात .
पण बर्याच वेळा लग्न ठरण्यास उशीर होत असतो .
लग्न लवकर न ठरण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यातील काही कारणे म्हणजे त्याच्या / तिच्या अपेक्षा खूप आहेत . दिसायला चांगला, चांगले करियर म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम असणाराच जोडीदार हवा आहे . वयात जास्त अंतर नको . अजून योग नाही वगेरे .
बाकी सगळे मुद्दे मान्य केले तरी वयातले अंतर ह्य मुद्द्यावर मात्र विचार करायला हवा असे वाटते .
हल्ली ५-६ वर्षाचे अंतर हे खूप वाटायला लागले आहे . खरेतर आजकाल मुली पण शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको आम्ही २-३ वर्ष अंतर असणारे स्थळच बघत आहोत आणि बाकी त्या स्थळाची कहिही चौकशी न करता ते नाकारतात तेव्हा साहजिकच असा प्रश्न पडतो कि खरेच एवढे अंतर खूप आहे का ? केवळ त्या एकमेव कारणासाठी स्थळ नाकारणे कितपत योग्य आहे ?
मला असे वाटते कि ५-६ वर्षाचे अंतर असले तर स्थळ बघायला काही हरकत नसावी . कधी कधी वयापेक्षा मुलगा दिसायला लहान वाटतो किंवा वयाने लहान असून मोठा पण वाटू शकतो . तेच त्याच्या maturity बद्दल पण म्हणता येईल . कितीतरी तेवढे किंवा जास्त अंतर असलेल्या जोडप्याचे सुखी संसार बघतच असतो . आत्ताचा काळ बदलला आहे. आता ५-६ वर्ष अंतर म्हणजे generation gap असते वगेरे पण एकू येते पण तरीही अशावेळेस मुलाला भेटून मगच मत बनवावे असे वाटते . अर्थात वयातील अंतर किती असावे ह्या बाबतीत वेगळी मते असू शकतात .

तसेच ज्या मुलींची / मुलांची लग्न काहीही कारण नसताना वेळेत ( म्हणजे बघायला लागल्या पासून लवकर ) ठरत नाहीत असे मुले/ मुली पण नाराज असतात . त्यांनीही लग्न ठरत नाही म्हणून नाराज होऊ नये . लग्न ठरेपर्यंत त्या काळात करियर कडे जास्त लक्ष द्यावे ,एखादा आवडणारा छंद जोपासावा . पुढे लग्न झाल्यावर जबादारी वाढते त्यावेळेस स्वत: साठी वेळ मिळतोच असे नाही . आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावे असे वाटते .त्यांच्या आई वडिलांनी (परिवाराने)पण लग्न ठरत नाही या विषयाचा फार मोठा issue करू नये .

हा लेख आधी माझ्या ब्लोगवर ( anaghabhade.blogspot.in ) लिहिला होता . परंतु माझा ब्लोग हा 'ज्योतिषशास्त्र ' विषयावर असल्याने त्या विषयात रस असणार्यांनीच फक्त हा लेख वाचला असावा असे वाटले हा जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या उद्देशाने इथे देत आहे .
आपली मते ह्या विषयी काय आहेत हे पण जाणून घ्याला आवडेल .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>नकार असेल तर पुढे कशाला जास्त कीस पडायचा? कारण न सांगता हि कुणी नकार दिला तर ठीकच!<<
अशा वेळी लोक पत्रिका जमत नाही असे कारण न दुखावता नकार देण्यासाठी वापरतात. पत्रिकेचा बाकी काही नाही तरी हा उपयोग होतो.

आपले मत आपल्या माणसाना समजावून सांगणे यात काही गैर आहे असे वाटत नाही परंतु ते लादणे चुकीचे असू शकते.
तुम्ही जो माझा प्रतिसाद दाखवत आहात तो अगदी जवळच्या माणसाबद्दल आहे . इथे लेखात जे मत व्यक्त केले आहे त्यात समजावणे हा प्रकार नसून मत मांडणे हे आहे.
public forum वर मत मांडले जाते बहुधा समजावण्याचे प्रयत्न कोणी करत नाहीत कारण पलीकडच्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती असतेच असे नाही.
त्यामुळे तुम्हाला जर लेख एकांगी वगेरे वाटत असेल तर ते तुमचे मत आहे. त्यामुळे त्याच त्याच प्रकारचे प्रतिसाद देऊन आम्हाला असे वाटते म्हणून ते तसेच आहे असे नव्हे.

मला तर त्या माइंड युअर ओन बिझनेस म्हण णार्‍या पस्तिशीच्या बाईंचा आदर वाट्तो आहे. इतक्या पर्सनल बाबतीत सल्ले घेउनही डोके फिरवले नाही म्हणजे ग्रेट.

अन्विता, आधी एक क्लियर करा .... तुमच्या कोणा नात्यातल्या मुलीनं एका मुलाला तो वयाने ५-६ वर्षांनी मोठा आहे म्हणून नकार दिला या घटनेवर आधारीत हा लेख असता तर तुमची मतं ठीक होती. पण तुम्ही ही घटना पार्श्व भूमीवर ठेऊन एक सरसकट लेख बनवला आहे. जनरल ठोकताळे मांडून सगळ्या मुलींना एका जनरल कॅटेगरीत बसवलं आहे. ते योग्य नाही.

आणि इतरांनी इतके वेळा सांगूनही ते तुम्हाला पटत नाहीये. मग तसंच त्या (किंवा कोणत्याही) मुलीने तुमचं ऐकून लगेच आपल्या आयुष्याचा निर्णय तुम्हाला हवा तसा घ्यावा हा तुमचा अट्टाहास चुकीचा नाही का?

पेट थेरपी | 18 February, 2014 - 20:20
शेवटी हा ट्रेडर आणि ग्राहक यांच्या द्रुष्टीकोनतिल फरक आहे. अन्विता आज काल मुली स्वतःचा भाव बरोबर वसुल करु लागल्या आहेत, त्यांना अशी ट्रेड नको असते. >> स्त्री आणि कमॉडिटी ह्यात फरक असू शकेल का?
>>>>>>>

दिल देके दर्दे मोहोबत लिया है सोच समझके मैने सौदा किया है.. लग्न म्हणजे ट्रेड नाहितर दुसरे काय? अर्थात स्त्री आणि पुरुष दोघेही विकले जातात. तुझे लग्न अजुन झालेले दिसत नाही Wink
बाकी चालु द्या!

इतरांनी इतके वेळा सांगूनही ते तुम्हाला पटत नाहीये. मग तसंच त्या (किंवा कोणत्याही) मुलीने तुमचं ऐकून लगेच आपल्या आयुष्याचा निर्णय तुम्हाला हवा तसा घ्यावा हा तुमचा अट्टाहास चुकीचा नाही का?>>>>>>>>>>>

+१ मामी

माझ्यामते या विषयावर सैफ अलीचं मत घेतलं पाहीजे. त्याला वयाने चिक्कार लहान आणी चिक्कार मोठी अशा दोन्ही बायकांचा अनुभव आहे! >>> मस्त षटकार मारलायस मंदार.

मला तर त्या माइंड युअर ओन बिझनेस म्हण णार्‍या पस्तिशीच्या बाईंचा आदर वाट्तो आहे. इतक्या पर्सनल बाबतीत सल्ले घेउनही डोके फिरवले नाही म्हणजे ग्रेट.///
त्या पस्तीशीतील मुलीने कोणालाही ' mind your own buisness ' म्हटले नाहीये . कारण कोणीही तिला किंवा ज्या व्यक्तीने ( ती व्यक्ती मी नाहीये त्यामुळे हा मला आलेला अनुभव पण नाही आणि कोण्या एका मुलीने असे केले म्हणून हा अनुभव पण नाही. )
हे स्थळ सुचवले तिने पण तिला काहीच सल्ले वगेरे दिले नाहीत . तुला जर वयातील अंतरामुळे हे स्थळ नको असेल तर ठीक आहे असेच म्हटले.पस्तीश वर्षाच्या मुलीचे उदाहरण प्रतिसादात दिले आहे. फक्त त्यामुलीमुळे हा लेख लिहिलेला नाही. एकंदरीत बर्याच वेळा ह्या विषयावर चर्चा होताना दिसते . कदाचित मला पत्रिका ह्याविषयाची आवड असल्याने बरेच लोक माझ्याशी ' लग्न योग ' ह्या विषयावर बोलतात व त्या अनुषंगाने त्या संदर्भात हे विषय चर्चिले जातात . त्यामुळे कोणा एका ' मुलीविषयी ' विषयी हे मत नव्हे .
तसेच वयातील अंतराचा फक्त मुद्दा घेतल्या मुळे मुलांनी पण ५ वर्षे लहान मुलगी स्वीकारावी असे म्हटले नाही कारण मुलांना ५ वर्षे लहान मुलगी चालणार नाही असे फारसे एकू येत नाही. तसेच आपल्याकडे अजून' मुलीपेक्षा मोठ्या वयाचा मुलगा ' हे अजून रुळत नाहीये . मुलीनापण मोठा मुलगा नको असतो कोणतीही मुलगी स्वत:हून कमी शिकलेला . स्वत : हून बुटका . स्वत: पेक्षा आर्थिक परिस्थिती कमी असलेला असा मुलगा' स्थळ' म्हणून आनंदाने स्वीकारत नाही. समानतेचा विचार केला तर मग मुलीनी पण असे स्वीकारले पाहिजे व मुलांनी पण स्वत: हून मोठी , शिक्षणाने जास्त मुलगी जरूर बघावी का नाही?

त्यामुळे मला आलेल्या एका अनुभवातून हा लेख लिहिला आहे असे अजिबातच समजू नये .

स्थळ नाकारण्यामागे सांगितल्या जाणार्‍या अनेक कारणांपैकी नेमके एक कारण उचलून त्यावर लिहिले. कोणते कारण? मुली आपल्यापेक्षा वयाने जरा जास्त असलेल्या मुलाला नाकारू लागल्यात. मुलींना असे करायचा आता चॉइस आहे.
त्यामुळे नुकसान कोणाचे होते(लग्न न जुळणे/लवकर न जुळणे, या अर्थाने) कोणाचे होते? वय वाढलेल्या मुलांचे.(हे उत्तर मला लेखिकेने दिलेल्या प्रतिसादांतच मिळाले - मुलींची संख्या घटल्याने मुलांनाच आता स्थळासाठी अधिक पायपीट करावी लागून नकारही पचवावे लागत असावेत). त्या मुलींना यात आपले नुकसान होते असे वाटत नाही.
वयाच्याच मुद्द्यावरून नकार देण्याची अन्य कारणे : मुलाने आपल्यापेक्षा पुरेशा लहान नसलेल्या मुलीचा विचार न करणे, दोघांनीही मुलगा मुलीपेक्षा लहान अशा स्थळांचा विचार न करणे - यांची वासलात हे जगावेगळे नाही, बहुमान्य आहे असे म्हणून लावली आहे. जर लेखन समतोल वाटायला हवे असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा.

इतकेच नाही तर मुलींपेक्षा मुलगा वरचढच असला पाहिजे या विचारात काहीच गैर नाही असेही म्हटले आहे.
<<<खरेतर आजकाल मुली पण शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको आम्ही २-३ वर्ष अंतर असणारे स्थळच बघत आहोत >>>>

२) एवढे सगळे झाल्यावर पत्रिकाही बघतच असतील तर त्या पत्रिकेतच संकेत मिळतील ना, की मुलीचे विचार काय आहेत, समजवल्याने बदलतील का नाही, बदलले तर केव्हा बदलतील? मग एवढा काथ्याकूट कशाला?

स्वत:हून कमी शिकलेला, खालच्या आर्थिक पतीचा मुलगा >> असा मुलगा नको असतो कारण अजूनही समाज प्रबोधन हवे तितके झालेले नाही. मुलगा कमी कमावतो म्हणून घरातल्या कामाच्या जास्त जबाबदार्‍या घेतो का? तर नाही. मग मुलीने पगारही जास्त कमवायचा आणि घरात कामेही जास्त करायची, का?

स्वतःपेक्षा बुटका मुलगा - माझ्या पाहाण्यत आहेत असे कपल्स. अरेंज्ड मॅरेजमध्ये. प्रमाण कमी असेल तरी नाहीत असे नाही म्हणता येणार.

त्या मुलीने ५ वर्षे मोठा असलेला मुलगा न बोलताच न भेटताच रीजेक्ट करू नये असे मलाही वाटते. कारण मी माझ्यापेक्षा ९ वर्षाने मोठा असलेला मुलगा जो दिसायला माझ्याहून लहान वाटतो, मोकळ्या विचारांचा जास्त समजुतदार, घरातली कामे स्वतःची म्हणणारा (तुला मदत करतो असे म्हणत नाही तो. कामे आपली आहेत असे म्हणतो.) त्याची आई सूनेचे जास्त लाड करते मुलापेक्षा.. असासुद्धा असू शकतो एखादा. आणि ह्याउलट माझ्यापेक्षा पाच वर्षाने कमी असलेला मुलगा (बायकोपेक्षा ६ महिन्याने मोठा) अत्यंत जुन्या वळणाचा.

त्यामुळे मुलगा केवळ ५ वर्शाने मोठा आहे किंवा २-३ वर्षाने मुलगी मोठी आहे म्हणून न भेटता रिजेक्ट करू नये असे मला वाटते.

>>एवढे सगळे झाल्यावर पत्रिकाही बघतच असतील तर त्या पत्रिकेतच संकेत मिळतील ना, की मुलीचे विचार काय आहेत, समजवल्याने बदलतील का नाही, बदलले तर केव्हा बदलतील? मग एवढा काथ्याकूट कशाला?<<
तसा योग असावा लागतो Happy

मेर्को पयला ये बताओ की लगीन जिसको करनेका है उसको क्या चाहिये ये महत्वका की आजूबाजूके गाववालोंको क्या लगता है ये महत्वका?

एक लडकीको नै ना कर्नी शादी ५ सालसे बडे छोरेसे.. ठिकैना फिर! गाववाले मत प्रदर्शित कायको कर रेले?
शादी टैम लगा तो अच्छा फिस्ट निकल न जाय इस्के वास्ते क्या?

ते कैतरी सुभाषित आहे ना ज्यात कन्या लग्नामधे काय बघते, तिचे आईबाप काय बघतात वगैरे आहे आणि शेवट 'मिष्टान्नं इतरेजनः' असा आहे.
तर लगीन ठरलं, बोलावलं तर नटून थटून जा, आहेर द्या, जेवणावर आडवातिडवा हात मारा, वेळ उरला तर शुभेच्छाही द्या आणि आपलं आयुष्य जगा.

त्यांचे त्यांना जगू द्या.

मुलींना असे करायचा आता चॉइस आहे.>>> उच्चविद्याविभूषित, सुविद्य घरातील, क्वचित सहा आकडी पगार असणार्या मुठभर मुली सोडल्या तर खरेच आज मुलीना हा चॉइस आहे? फक्त ६०-६५% महिला साक्षरता (सही करता येणे = साक्षरता) असलेल्या भारतात? अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

सिमन्तिनी, बरोबर. ज्या मुलींबद्दल हा लेख लिहिला गेला आहे अशा काही मुलींना आता असा चॉइस आहे असे म्हणायला हवे होते.

उच्चविद्याविभूषित, सुविद्य घरातील, क्वचित सहा आकडी पगार असणार्या मुठभर मुली सोडल्या तर <<<<
त्यांना चॉइस आहे आणि तोच प्रॉब्लेम वाटतो आहे ना इथे! जोडीदार म्हणून अशीच मुलगी हवी असते म्हणून स्थळ बघायला जावं तर ती वयाची अट घालते... अशा मुलींमुळे जगबुडी एणार नैतर काय? Proud

वयात जास्त अंतर मुलींनी अरेंज्ड लग्नात नाकारायला अजून एक कारण आमच्या लांबच्या नातेवाइकांतच पाहिलंय. मुलगा मुलीच्या वयात सात वर्षांचं अंतर. लग्नाच्या वेळी मुलगा एकोणतीस वर्षांचा होता. त्या मुलीला लग्नानंतर का होईना करीयर सुरू करायचं होतं. पण तिच्यामागे लगेच मूल होऊ देण्याची भुणभुण सुरू झाली. कारण मुलगा २९चा! अजून उशीर केला तर मुलं मोठी होईपर्यंत तो रिटायर होईल, वगैरे! त्यात कुठेही तिच्या इच्छांचा विचारच नाही. लागोपाठची दोन मुलं झाल्यावर त्यांचं लहानपण वगैरेंत तिची उमेद कमीकमीच होत गेली. शेवटी करीयर वगैरेवर पाणी सोडून ती केवळ 'अनंतकाळची माता' मोडात राहते आहे.

मुलींना असे करायचा आता चॉइस आहे.<<<
ज्या मूठभर मुलींना हा चॉइस आहे त्यांना सुखाने त्यांच्या त्यांच्या अपेक्षांप्रमाणे, मनाप्रमाणे निवड करू द्या की मग. 'समजवायला' कशाला जाताय?
मुलींना चॉइस आहे ही काय समस्या नाहीये.

मुलीनापण मोठा मुलगा नको असतो कोणतीही मुलगी स्वत:हून कमी शिकलेला . स्वत : हून बुटका . स्वत: पेक्षा आर्थिक परिस्थिती कमी असलेला असा मुलगा' स्थळ' म्हणून आनंदाने स्वीकारत नाही. <<
सिरीयसली डोळे उघडून बघा जगतात...
माझा नवरा माझ्यापेक्षा ८ वर्षांनी मोठा आहे. मी चुकून अ‍ॅरेंज मॅरेज केलं असतं तरी ५ पेक्षा कमी अंतर असलेला मुलगा नको अशी अट ठेवली असती. कारण बरोबरचे मुलगे मला बावळट्ट वाटायचे. अजून एक मैत्रिण किमान १० वर्ष तरी वयाने मोठा असा नवरा मिळाला तर किती मस्त म्हणायची. मिळाला तिलाही हवा तसा. दुसर्‍या एका मैत्रिणीने १६ वर्षे मोठा असलेल्या मुलाशी लग्न केले. आमच्या लग्नांना १२, १० आणि २५ वर्षे झाली रिस्पेक्टिव्हली. आम्हाला सगळ्यांना आपापल्या निर्णयांच्या विरोधात 'समजवायला' येणारे उपटसुंभ भेटलेच होते. त्यांना फाट्यावर मारणे तेव्हा जमले हे योग्यच झाले. Happy
कित्येक मैत्रिणी त्यांच्या नवर्‍यांपेक्षा जास्त शिकलेल्या आणि आर्थिकरित्या जास्त स्टेबल असलेल्या होत्या तर त्यांचे रिस्पेक्टिव्ह नवरे स्ट्रगल करत होते लग्न ठरले वगैरे तेव्हा. बायको स्टेबल नोकरी असलेली आणि नवरा स्ट्रगल करतोय (काही क्षेत्रांच्यात कधी यश आणि स्थैर्य मिळेल हे अनिश्चित असते) अशी उदाहरणे मला तरी पोत्याने माहितीयेत. यात काही प्रेमविवाह तर काही अ‍ॅरेंज्डही आहेत.
स्वत:हून बुटक्या असलेल्या मुलाला स्वतःहून प्रपोज करून पुढे ४-५ वर्ष भक्ती करून अखेर होकाराचे फळ पदरात पाडून घेतलेल्या मुली पण माहितीयेत Happy

तस्मात मुलींनो तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी जे योग्य वाटतंय तेच करा. त्याविरूद्ध कुणी समजवायला, मत मांडायला आलं तर फाट्यावर मारा बिंधास्त!! Happy

कालच विवाहाविषयक कायद्याबाबत चर्चा ऐकायला पुण्यात लॉ कट्ट्याला गेलो होतो. लॉ कॉलेज रोडला आगाशे विद्यालयात महिन्याच्या २ र्‍या व ४ थ्या शनिवारी संध्याकाळी ६ वाजता त्यांचा लॉ कट्टा असतो. तिथे अ‍ॅड व्योमा देशपांडे यांनी सांगितले कि विवाह करण्यासाठी मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असता कामा नये व मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असता कामा नये. म्हणजे कायदा काय असू नये हे सांगतो काय असावे हे सांगत नाही. तरी मग प्रश्न राहतोच की मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ म्हणजे किमान बाउंड्रीलाच ३ वर्षांचे अंतर आहे. दोघांचे ही वय १८ पेक्षा कमी किंवा दोघांचे ही वय २१ पेक्षा कमी असता कामा नये असा कायदा नाही. म्हणजे मुलासाठी असो वा मुलीसाठी सज्ञान असायचे वय १८ पुर्ण पण विवाहासाठी मुलाला अजून तीन वर्षे थांबायला लागतो.
पुरुषमुक्ती वाल्यांनो आतातरी जागे व्हा! काय हा अन्याय ? ते ही न्यायदेवतेच्या मंदिरात? चला तरुणांनो संघटीत व्हा संघर्ष करा! Happy

उलटा संघर्ष करायला हवा. मुलींना १८ लाच कोंडून घालण्याची सोय आहे आणि मुलांना ३ वर्षे जास्त सूट म्हणून!!

वयात जास्त अंतर मुलींनी अरेंज्ड लग्नात नाकारायला अजून एक कारण आमच्या लांबच्या नातेवाइकांतच पाहिलंय. मुलगा मुलीच्या वयात सात वर्षांचं अंतर. लग्नाच्या वेळी मुलगा एकोणतीस वर्षांचा होता. त्या मुलीला लग्नानंतर का होईना करीयर सुरू करायचं होतं. पण तिच्यामागे लगेच मूल होऊ देण्याची भुणभुण सुरू झाली. कारण मुलगा २९चा! अजून उशीर केला तर मुलं मोठी होईपर्यंत तो रिटायर होईल, वगैरे! त्यात कुठेही तिच्या इच्छांचा विचारच नाही. लागोपाठची दोन मुलं झाल्यावर त्यांचं लहानपण वगैरेंत तिची उमेद कमीकमीच होत गेली. शेवटी करीयर वगैरेवर पाणी सोडून ती केवळ 'अनंतकाळची माता' मोडात राहते आहे.>>>>>>>>>
हाहा infact हेच मुख्य कारण असत नकाराचे.....अर्थात ज्याना फक्त चुल आणि मुल करण्यात interest असेल त्यानी जरूर मोठा मुलगा बघावा......आणि well settelled मोठ्या मुलानी पण कमी शिकलेली ५-६ अन्तर असलेली मुलगी बघितली तर ती होकार पण देइल ..कारण ती परावल्न्बीच असते.
पण व्यवस्थित शिकलेली आणि चान्गला पगार असलेली मुलगी फक्त ५-६ वर्श अन्तरासाठी नकार देते म्हणून तिला समजवायला जाउ नये..कारण एकतर ती स्वावलन्बी असल्याने तिला स्वतःचे विचार असतात. आणि तिला कुणाच्या आर्थिक आधाराची गरजही वाट्त नाही.. ज्या कारणासाठी mostly जास्त वयाची मुले बघतात..

वयात जास्त अंतर मुलींनी अरेंज्ड लग्नात नाकारायला अजून एक कारण आमच्या लांबच्या नातेवाइकांतच पाहिलंय. मुलगा मुलीच्या वयात सात वर्षांचं अंतर. लग्नाच्या वेळी मुलगा एकोणतीस वर्षांचा होता. त्या मुलीला लग्नानंतर का होईना करीयर सुरू करायचं होतं. पण तिच्यामागे लगेच मूल होऊ देण्याची भुणभुण सुरू झाली. कारण मुलगा २९चा! अजून उशीर केला तर मुलं मोठी होईपर्यंत तो रिटायर होईल, वगैरे! त्यात कुठेही तिच्या इच्छांचा विचारच नाही. लागोपाठची दोन मुलं झाल्यावर त्यांचं लहानपण वगैरेंत तिची उमेद कमीकमीच होत गेली. शेवटी करीयर वगैरेवर पाणी सोडून ती केवळ 'अनंतकाळची माता' मोडात राहते आहे.>>>>>>>>>

हे कारण असू शकते नकार देण्याचे. मलाही पटते. पण तरीही इतरांच्या दबावाला बळी का पडावे मुलीने. का तिने स्वतःचा हक्क स्वतःकडे राखून थेवू नये. लग्न ठरवताना मूल कधी हवे, किती काळ थांबायची तयारी आहे, मुलीला करीयर करायला हवे आहे का नही मिळणार का नाही हे सगळे मुद्दे तपासले जायला हवेत. आणि शिवाय मुलीनेही ठरवायला हवे ना किती आणी कोणत्या गोष्टीत तिने का अ‍ॅडजस्ट करायच?

पण तरीही मी एकच म्हणेन कोणी काही सल्ल देत असेल तर तो केवळ सल्ला आहे तुमच्यावर तसच वागण्याच कम्पल्शन नाहीये.

(मला दोन्ही बाजू पटताहेत म्हतल्यास हरकत नाही,...

पण तरीही मी एकच म्हणेन कोणी काही सल्ल देत असेल तर तो केवळ सल्ला आहे तुमच्यावर तसच वागण्याच कम्पल्शन नाहीये. >>>>> तुमच बरोबर आहे वेल.पण तो जरी फक्त सल्ला असला ना तरी सतत दिला तर त्या मुलीवर दड्पण येउ शकत आणि त्या ती होकार देउ शकते....
अस्से बरेच किस्से घडतात..
एका मुलीच लग्न तिने साख्ररपुड्याच्यादिवशी मोड्ल आणि कारण सान्गितले की मला विचार करायला वेळ हवाय आणि आता तरी माझा नकारच आहे. मी सततच्या द्ड्पणाने होकार दिला होता...(बर ही मुलगी फार शिकली होती तर तसही नाही..) आता हेच तिने लग्नानन्तर सान्गितले असत तर त्या मुलाच आयुष्य वाया गेले असत ना..
तसच एका मुलाने सुद्धा असाच नकार दिला होता लग्नाच्या ४ दिवस आधी कारण सेम (सततच्या द्ड्पणाने होकार दिला होता..) ..
मग अशा वेळे ला विचारल्याशिवाय सल्ले देउ नयेत ना निदान इतक्या नाजूक बाबतीत तरी,, तुम्ही दिलेल्या सल्ल्यावर कुणाच आयुष्य बरबाद ही होउ शकत..

Just recently my 2 nieces n 2 friend's daughters got married - after watching the entire drama I came to the conclusion that
1) These kids should be left to their choice because we don't really know their priorities/choices and expectations (sometimes we can't even guess!)
2) It is better if they fall in love n get married (which is not in anybody's hand)
3) Only one thing is in our hand is how much we should spend on them - wedding ceremonies etc
and we should be firm about that.

>>पण तरीही मी एकच म्हणेन कोणी काही सल्ल देत असेल तर तो केवळ सल्ला आहे तुमच्यावर तसच वागण्याच कम्पल्शन नाहीये. <<
खर आहे. बर्‍याचदा हितचिंतकांचा सल्ला हा न मागता मिळालेला असतो. हे सल्ले आग्रहवजा विनंती सारखे देखील असतात. कारण हितचिंतकांना ( हे बर्‍याचदा एकतर्फी हितचिंतक असतात) तसे केल्यावाचून राहवत नाही. कारण ती त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची गरज असते. तारुण्याच्या जोशात/उन्मादात/माजात तो ठोकरला जातो. कधी तरी असेही होते की भविष्यात त्या सल्ल्याची किंमत कळते पण तोपर्यंत अर्थातच वेळ निघून गेलेली असते.

ऑलमोस्ट सगळ्या पोस्ट्स मधे हाच सूर दिसतो आहे की केवळ मुलीच वयाचं कारण सांगून स्थळं नाकारतात. पण मुलं आणि त्यांचे पालक कमी अंतराबद्दल ही गोष्ट आवर्जून करतात हे मला इथे सांगावंसं वाटतं. म्हणजे समजा दोघांच्या वयात एका वर्षाचं अंतर आहे पण बाकी सगळी अनुरूपता वाटते आहे तरीही फोनवरतीच नकार कळवला जातो हे सांगून की 'आम्ही आमच्या माहीतीत स्पष्ट लिहीलं आहे की वयात ३ ते ५ वर्षांचं अंतर हवंच. तुम्ही माहीती नीट वाचली होती का?' त्यात आपल्याकडे अजूनही वरपक्ष वरचढ ही संकल्पना मूळ धरून आहे. त्यामुळे अश्या पालकांना कोणी हे सल्ले वगैरे देत असेल असं मला नाही वाटत.

मुलींना केवळ त्या मुली आहेत म्हणून कॉम्प्रोमाईजचे सल्ले देणं कितपत योग्य आहे? का करायचे त्यांनी दर वेळी कॉम्प्रोमाईज??

तो जरी फक्त सल्ला असला ना तरी सतत दिला तर त्या व्यक्तीवर दड्पण येउ शकत >> हे अगदी खरं आहे मी स्वतः अनेक उदहरणं पाहिली आहेत अशी. कसलं ना कसलं दडपण - विनंती आग्रहवजा दडपण सतत आणलं जातं मग ते लग्न करण्याबाबत असो की एक किंवा जास्त मुलांना जन्म देण्याबाबत असो. आणि सगळ्या मुली / मुलगे इतके स्ट्राँग नसतात की ते विनंती आग्रहवजा दडपणाला बळी पडणार नाहीत. आणि त्यात त्या व्यक्तीचं आणितिच्या पार्टनरचं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं.

त्यामुळे leave their matter to them and control the expenses एवढच मोठी माणसं करू शकतात.

पण मुलांना गाईड करणेही तितकेच महत्वाचे असते.

<<समजा दोघांच्या वयात एका वर्षाचं अंतर आहे पण बाकी सगळी अनुरूपता वाटते आहे तरीही फोनवरतीच नकार कळवला जातो हे सांगून की 'आम्ही आमच्या माहीतीत स्पष्ट लिहीलं आहे की वयात ३ ते ५ वर्षांचं अंतर हवंच. तुम्ही माहीती नीट वाचली होती का?' >> माझ्या लग्नाच्या वेळी मला असे अनेक ठिकाणाहून ऐकावे लागले होते. सुरुवातीला खूप सुनवावेसे वाटे. पण मग एकच म्हटले, बरे झाले अशा कोत्या मनोवृत्तीच्या लोकांशी माझी गाठ नाही पडली. आता असे वाटते प्रत्येकाचे जे निकष त्यावर त्यांना सोडून द्यावे. कारण तसे निकष असण्यामागे त्यांचीही कारणे असतात आणि ती त्यांच्या दृष्टीने योग्य असतात.

पण तरीही केवळ हे मुद्दे वरपक्षाला वरचढ ठरवतो (वरपक्ष हा शब्द सुद्धा त्यातूनच आला का?) म्हणून वाद घालण्याची आणि तुम्ही कसे चूक आहात हे समजावून सांगायची उर्मी येते.

यापुढे मी नक्कीच लोकांना सांगात जाईन. अहो एक - दोन वर्षाने मोठी मुलगी पाहायला सुरुवात केलीत तर तुम्हाला चॉईस जास्त मिळेल...

वेल,
एक-दोन वर्षाने मोठी पण राहूदे... मी सांगते आहे ते मुलगी एकच वर्षाने लहान आहे म्हणून नकाराबद्दल आहे.

ऑलमोस्ट सगळ्या पोस्ट्स मधे हाच सूर दिसतो आहे की केवळ मुलीच वयाचं कारण सांगून स्थळं नाकारतात. पण मुलं आणि त्यांचे पालक कमी अंतराबद्दल ही गोष्ट आवर्जून करतात हे मला इथे सांगावंसं वाटतं. म्हणजे समजा दोघांच्या वयात एका वर्षाचं अंतर आहे पण बाकी सगळी अनुरूपता वाटते आहे तरीही फोनवरतीच नकार कळवला जातो हे सांगून की 'आम्ही आमच्या माहीतीत स्पष्ट लिहीलं आहे की वयात ३ ते ५ वर्षांचं अंतर हवंच. तुम्ही माहीती नीट वाचली होती का?' त्यात आपल्याकडे अजूनही वरपक्ष वरचढ ही संकल्पना मूळ धरून आहे. त्यामुळे अश्या पालकांना कोणी हे सल्ले वगैरे देत असेल असं मला नाही वाटत.

मुलींना केवळ त्या मुली आहेत म्हणून कॉम्प्रोमाईजचे सल्ले देणं कितपत योग्य आहे? का करायचे त्यांनी दर वेळी कॉम्प्रोमाईज??
>>>>>>>>>>>>>+१ ....जुन्या परम्पराना धरून ज्या गोश्टी असतात तसा सल्ला देणे जास्त सोपे असते ना कारण...त्यापेक्षा वेगळा सल्ला दिला तर लोक आपल्याला नाव ठेवतील अशी भिती वाट्ते.. अशा वेळेला त्यानी गप्प बसाव उगीच चुकिचे सल्ले देउन नये फुकटात.....आधीच्या पोस्ट्मधे मी सान्गितले आहे कि हा लेख एकान्गी वाट्तो.. तर असा Reply आहे "त्यामुळे तुम्हाला जर लेख एकांगी वगेरे वाटत असेल तर ते तुमचे मत आहे. त्यामुळे त्याच त्याच प्रकारचे प्रतिसाद देऊन आम्हाला असे वाटते म्हणून ते तसेच आहे असे नव्हे." थोड्क्यात काय आमच्याविरोधात बोलणार असाल तर तुम्ही चुक आहात....................

त्यामुळे leave their matter to them and control the expenses एवढच मोठी माणसं करू शकतात.>>> आहेच का!

Leave the matter and expenses both to them.

btw, If the bride/groom's parents are communicating (even in so-called "initial stages") it is better not to go ahead with that person. The problem with that is - you will end up dealing with more than one adult rest of your life when it comes to decision-making on important issues in life. In my view that is time-consuming, adds unnecessary emotional drama and takes away my right to craft my own mistakes.

Pages