मुलगा/ मुलगी विवाह योग्य झाली कि आई वडिलांना सून / जावई यायचे वेध लागतात .
पण बर्याच वेळा लग्न ठरण्यास उशीर होत असतो .
लग्न लवकर न ठरण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यातील काही कारणे म्हणजे त्याच्या / तिच्या अपेक्षा खूप आहेत . दिसायला चांगला, चांगले करियर म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम असणाराच जोडीदार हवा आहे . वयात जास्त अंतर नको . अजून योग नाही वगेरे .
बाकी सगळे मुद्दे मान्य केले तरी वयातले अंतर ह्य मुद्द्यावर मात्र विचार करायला हवा असे वाटते .
हल्ली ५-६ वर्षाचे अंतर हे खूप वाटायला लागले आहे . खरेतर आजकाल मुली पण शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको आम्ही २-३ वर्ष अंतर असणारे स्थळच बघत आहोत आणि बाकी त्या स्थळाची कहिही चौकशी न करता ते नाकारतात तेव्हा साहजिकच असा प्रश्न पडतो कि खरेच एवढे अंतर खूप आहे का ? केवळ त्या एकमेव कारणासाठी स्थळ नाकारणे कितपत योग्य आहे ?
मला असे वाटते कि ५-६ वर्षाचे अंतर असले तर स्थळ बघायला काही हरकत नसावी . कधी कधी वयापेक्षा मुलगा दिसायला लहान वाटतो किंवा वयाने लहान असून मोठा पण वाटू शकतो . तेच त्याच्या maturity बद्दल पण म्हणता येईल . कितीतरी तेवढे किंवा जास्त अंतर असलेल्या जोडप्याचे सुखी संसार बघतच असतो . आत्ताचा काळ बदलला आहे. आता ५-६ वर्ष अंतर म्हणजे generation gap असते वगेरे पण एकू येते पण तरीही अशावेळेस मुलाला भेटून मगच मत बनवावे असे वाटते . अर्थात वयातील अंतर किती असावे ह्या बाबतीत वेगळी मते असू शकतात .
तसेच ज्या मुलींची / मुलांची लग्न काहीही कारण नसताना वेळेत ( म्हणजे बघायला लागल्या पासून लवकर ) ठरत नाहीत असे मुले/ मुली पण नाराज असतात . त्यांनीही लग्न ठरत नाही म्हणून नाराज होऊ नये . लग्न ठरेपर्यंत त्या काळात करियर कडे जास्त लक्ष द्यावे ,एखादा आवडणारा छंद जोपासावा . पुढे लग्न झाल्यावर जबादारी वाढते त्यावेळेस स्वत: साठी वेळ मिळतोच असे नाही . आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावे असे वाटते .त्यांच्या आई वडिलांनी (परिवाराने)पण लग्न ठरत नाही या विषयाचा फार मोठा issue करू नये .
हा लेख आधी माझ्या ब्लोगवर ( anaghabhade.blogspot.in ) लिहिला होता . परंतु माझा ब्लोग हा 'ज्योतिषशास्त्र ' विषयावर असल्याने त्या विषयात रस असणार्यांनीच फक्त हा लेख वाचला असावा असे वाटले हा जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या उद्देशाने इथे देत आहे .
आपली मते ह्या विषयी काय आहेत हे पण जाणून घ्याला आवडेल .
अच्छा अच्छा , म्हणजे ३५
अच्छा अच्छा , म्हणजे ३५ वयाच्या मुलीने तिच्याहून लहान मुलाशी लग्न केले पाहिजे असे होय >> असेच केले पाहिजे असे नाही. प्रत्येक स्त्रीची इच्छा वेगळी असते. कुणी मुले दत्तक घेईल, कुणी मुले नकोच म्हणेल, कुणी पार्टनरच्या मुलांना आपलेसे मानेल. थोडक्यात त्या मुलीचे आयुष्यातील काय 'फंडे' आहेत त्याला अनुसरून पार्टनर/नवरा शोधावा.///
अगदी अगदी.
फक्त फंडे clear असतील तर काहीच प्रोब्लेम नाही परंतु confusion असेल तर काही सांगितल्याने किंवा काहींचे अनुभव बघून (बरे/ वाईट )कदाचित फंडे clear व्हायला मदतच होईल असे वाटते.
त्या ३५ वर्षाच्या मुलीला पण मी काही सल्ले दिले नाहीत ' तुझी इच्छा ' असेच म्हटले पण तिच्या निम्मिताने हा वयातील फरक हा मुद्दा डोक्यात आला .
किती काथ्याकूट ... बस ना
किती काथ्याकूट ... बस ना राव.....!!!
anvita yanni ek case study
anvita yanni ek case study mandala asata tar theek hota. pan tyanni generalised statement keli aahet. mhanun khatakale.
हो हे असंच होतं! लग्नाळू
हो हे असंच होतं! लग्नाळू मुलामुलींना इतके फुकटचे सल्ले मिळत असतात ना की मला लग्न आणि न देखला जोडीदार ह्यापलीकडच्या एक आयुष्य आहे याची आठवण करून द्यावी लागते! गायक जसा ताना वैगरे मारून समेवर येतो ना तशी ही मंडळी काय मग कसं चाललंय अशी एक दोन वाक्यं टाकून लगेच लग्नाच्या समेवर येतात!
लग्न ही एक छान गोष्ट असते हे जरी मान्य केलं तरी ती प्रत्येकाच्या आयुष्यात "वेळेवर" झाली पाहीजे ह्यासाठी आटापिटा कशाला! Leave it to the person!
आणि अन्विता ताई, तुम्ही पत्रिका वै. बघता ना मग योग असेल तर ३५ वर्षाच्या बाईचं लग्न २५ वर्षाच्या तरुणाशी होईलही! पण सल्ले मात्र मुलीलाच दिले जातील आणि ते ही तिच्यापेक्षा वयाने अधिक मोठ्या असलेल्या मुलाशी लग्न करण्याचे! तुम्ही लग्न जमत नसलेल्या एका २५ वर्षाच्या मुलाला ३० वर्षाच्या बाईशी लग्न कर असं पण सांगा! कारण ५ वर्षांचं अंतर काही फार नाही! अंतर दोन्ही कडून कमी होऊ शकतं नाही का?
yo Jidyasa!
yo Jidyasa!
anvita yanni ek case study
anvita yanni ek case study mandala asata tar theek hota. pan tyanni generalised statement keli aahet. mhanun khatakale.//
generalised statement keli नसून फक्त माझे त्याबाबत विचार मांडले आहेत. त्यात हेच बरोबर किंवा हेच करा असा आग्रह नाही तुमचे ह्याबाबत चे विचार तुम्ही पण मांडू शकता . शेवटी तीच ओळ आहे.
पण विचार मांडले ह्यावर हरकत घ्यला नको असे वाटते.
त्यामुळे खटकण्याचे काही कारण नाही.
जिज्ञासा , वर मी मुलगी मुलापेक्षा मोठी असली व दोघानाही चालणार असेल तर हरकत नाही असेच लिहिले आहे . तुम्ही बहुतेक वाचले नाही.
वयाची अट शिथिल केली की
वयाची अट शिथिल केली की available स्थळे वाढतील हे बेसिक मॅथ्स आहे ते तिला माहीत असेलच.(साधं सर्च इंजिन पण सांगतं आपल्याला की सर्च criteria कमी करा म्हणजे तुम्हाला जास्त रिझल्ट्स दाखवतो मी!)
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेली आणि नोकरी-व्यवसाय करणारी मुलगी असेल तर इतकी अक्कल असेलच. वयाचा मॅच्युरिटीशी संबंध असतोच असं नाही हे तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यातल्या निरिक्षणातून तिच्या लक्षात आलेले असेलच. ५-६ वर्षे अंतर असूनही सुखाने संसार करणारी जोडपी असतात हे त्या मुलीलाही तिच्या आजूबाजूला दिसत असतेच. हे सगळं तुम्ही नव्याने सांगायची काय गरज आहे? Obviously she knows this already. आणि आणखी ४० ऐवजी ४५ पर्यंत वय चालणार असेल तर आणखी पन्नास स्थळं येतील. हेही तिला कळत असेलच.
पण ज्या अर्थी हे माहीत असूनही ती तीनच वर्षांपर्यंत अंतर चालेल असं म्हणते त्याअर्थी तिच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचा आदर तुम्ही करायलाच हवा.
मुळात बाईसाठी ’लग्न’ हीच आयुष्याची इतिकर्तव्यता- ते झालं नाही तर तिचं आयुष्य फुकट गेलं- त्यामुळे पस्तीसाव्या वर्षी आधीच उशीर झालेला असलेल्याने तिने आता तिच्या अटी शिथिल कराव्यात - या मेन्टॅलिटीतून कधी बाहेर येणार आपण? वर म्हटलं आहे तसं बायकोपेक्षा लहान वयाचा नवरा, सापत्य/विनापत्य घटस्फोटित बायको आणि प्रथमवर नवरा- अशी जोडपी आजकाल दिसतात आणि अगदी छान संसार चालले असतात त्यांचे. म्हणून मग तीस वर्षांच्या मुलाला देता का तुम्ही ’सल्ला’ की तू पाच-सहा वर्षांनी मोठी किंवा सापत्य घटस्फोटित मुलगी बघ म्हणून. मग मुलीलाच का दिले जातात असले सल्ले?
वेदिका, अगदी नेमकं!
वेदिका, अगदी नेमकं!
अन्विता, तुम्ही तुमचे विचार
अन्विता, तुम्ही तुमचे विचार मांडले, मत मांडले ठिक आहे.
पन खरे तर लग्न हा विषयच कोणाला समजावून सांगून होण्यासारखा विषयच नाही.
एखाद वेळेला , काही प्रश्ण विचारून(मुद्दा समजावून नाही, किम्वा गळ्यात मारून तर बिलकूल नाहीच) , प्रतिसंवाद घडवून आणला तर ठिक. किंवा त्या वर/वधूचे नुसते विचार आधी आपण जाणून घेतले तरी मदत होइल जर मदत करायचीच असेल तर.
त्याची/तिची 'ही' बाजू असते आणि जर ती त्याला बरोबर वाटत असेल तेव्हा तर आपले मुद्दे सांगूनही फायदा नाहीच.
(उदाहरणा दाखल ) समजा, बारावी शिकलेल्या मुलीला ईंजिनीयरच हवा असेल तर तिला सांगावं , बाई शोध तू ईंजिनियर... पण ईंजिनियर मुलगा तयार असेल का बारावी करायला हे तुच विचार स्वतःला? हे विचारून बघा तिला. नाहितरी तुझीच मर्जी.
बाकी, लग्न हा विषय आजकाल ओल्ड फॅशन्ड होतोय.
आजकाल लोकं गाजरं खाण्यापेक्षा पुंगी वाजवणं ज्यास्त पसंद करतात हेच दिसतेय. आम्ही आपले आधीच मुळा खावून बस्लोय.
मग मुलीलाच का दिले जातात असले
मग मुलीलाच का दिले जातात असले सल्ले? >> मुलांना बघू नको सांगायची वेळ येते
"नाकी-डोळी नीटस" असेल तर सोडतात का ते बघायची. मुली "बघत" हि नाहीत हा अन्विता यांचा मुख्य मुद्दा आहे.
पण ज्या अर्थी हे माहीत असूनही
पण ज्या अर्थी हे माहीत असूनही ती तीनच वर्षांपर्यंत अंतर चालेल असं म्हणते त्याअर्थी तिच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचा आदर तुम्ही करायलाच हवा.
// तिच्या मताचा आदर करूनच तिला काहीच सल्ला दिलेला नाही.
मुळात बाईसाठी ’लग्न’ हीच
मुळात बाईसाठी ’लग्न’ हीच आयुष्याची इतिकर्तव्यता- ते झालं नाही तर तिचं आयुष्य फुकट गेलं- त्यामुळे पस्तीसाव्या वर्षी आधीच उशीर झालेला असलेल्याने तिने आता तिच्या अटी शिथिल कराव्यात - या मेन्टॅलिटीतून कधी बाहेर येणार आपण?//
३५ वर्षाची मुलगी आहे म्हणून ४० चालेल . असे नव्हे कोणत्याही जोडप्यातील ५ वर्षे अंतराचा मुद्दा आहे.
फक्त पस्तिशितल्या नव्हे .
मुलीलाच का दिले जातात असले
मुलीलाच का दिले जातात असले सल्ले? >>> एकदम कर्रेक्ट...
आपल्या आई वडीलान्च्या काळातल्या मुली अणि आत्ताच्या मुलीन्च्या मानसिकतेत खूप फरक पड्ला आहे.
आजच्या मुलीला तिच्याबरोबरचा मुलगा नवरा म्हणून जास्त योग्य वाट्तो आणि ती जर स्वत: ईतका शिकलेला आणि त्याच वयाचा नवरयाची अपेक्शा ठेवत असेल. तर त्यात काहीच चुकीचे नाही.
पण झालय अस की मुलाचे पालक अजून जुन्या मानसिकेतून बाहेर पड्ले नाहीत. ते अजून त्याच काळात आहेत. म्हणून त्याना वाट्त की आपल्या मुलाला ५-६ varshe लहान मुलगी मिळावी.......
आणि नोकरी हा मुद्दा खुप सौम्य आहे. पण काही गोष्टी आधीच्या पिढीला खट्कत असतील तर आताच्या पिढीला विषेश वाट्णार नाहीत. E.g.- लग्नाआधी अफ्फेअर होते. यावर ५ -६ varsh फरक पडू शकतो.
आधिचा मुलगा/मुलगी विचार करेल.- हा मुलगा/मुलगी चान्गला नाही. आपण लग्न करून चूक केली.
आणि आतचा मुलगा/मुलगी विचार करेल.- तिचे/त्याचे अफ्फेअर होते , आता नाही. आणि आपण lucky अहोत की तिचे/त्याचे आपल्ल्याशी लग्न झाल. किवा एतक्या छ्योट्या कारणासाठी मी तिला कशाला नाकारू
अशा २ विचारान्च्या फरक असलेल्या मुलाचे आणि मुलीचे लग्न झाल तर त्याचा सन्सार सत्यजित- मन्जिरी( तु तिथे मी) पेक्शा वेगळा होणार नाही.(टिप - ईथ मन्जिरी काकूबाई असल्याने तिने ईतका varsh सन्सार चालू ठेवला आहे .....)
आणि आतचा मुलगा/मुलगी विचार
आणि आतचा मुलगा/मुलगी विचार करेल.- तिचे/त्याचे अफ्फेअर होते , आता नाही. आणि आपण lucky अहोत की तिचे/त्याचे आपल्ल्याशी लग्न झाल. किवा एतक्या छ्योट्या कारणासाठी मी तिला कशाला नाकारू///
असा विचार हल्लीची सगळी मुले करत आहेत/ असतील तर फारच छान आहे.
हा विचार आधीची म्हणजे ५ वर्षांनी मोठा मुलगा करणारच नाही हा विचार गृहीत धरत आहात तुम्ही .
किंवा कदाचित तसे असेल तर मुलीने तशी स्पष्ट कल्पना देऊन जर मुलाला / मुलीला चालणार असेल तर उत्तमच . पण त्यासाठी त्या मुलाला भेटायला तर हवे ना. सगळ्या त्या गटातील मुलांना / मुलीना एकदम आधीची पिढी म्हणून बाद करणे योग्य आहे का?
तेच लिहित आहे सारखे सारखे कि
तेच लिहित आहे सारखे सारखे कि विचारांना महत्व आहेच टोकाचे विचार असणाऱ्या व्यक्तींचे पटणार नाहीच .
फक्त वयातील अंतर म्हणून समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न पण न करणे हे बरोबर आहे का?
बाकी ज्याचा त्याचाच निर्णय आहे.
वयात अंतर असून संसार सुखाचे होतात आणि नसून घटस्फोट किंवा त्याच्या उलट पण .
मला वाटते आता मी माझा मुद्दा बर्यापेकी नीट समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
बीबी कुठल्याकुठे धावतोय. इथे
बीबी कुठल्याकुठे धावतोय.
इथे लिहिणारे बरेच जण 'लग्न आपल्या मर्जीनुसार करावे' ह्या मताचे आहेत आणि त्यांच्या जागी ते बरोबरही आहेत.
पण आजही समाजात मॅट्रिमोनियल्स ही संस्था आहे, त्यांचे भरभरुन मेंबर्स आहेत- ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीही. अन्विता अशा लोकांविषयी बोलताहेत जिथे सगळे काही मोजुन मापुन पाहिले जाते आणि सगळे अपेक्षेसारखे असेल तेव्हाच वधु वर एकमेकांना निवडतात. असे लोक पत्रिका पाहतात, जुळत नसेल तर बाकी सगळ्या दृष्टीने चांगले स्थळ अस्ले तरी ते सोडुन देतात. त्यांच्या अजुन काही अपेक्षा असतात त्या जर जुळल्या नाही तर असे स्थळ सोडुन दिले जाते. अशांसाठी अन्वितांचा सल्ला आहे की या भारंभार अपेक्षामध्ये वय ही अपेक्षा जरा शिथिल करा.
प्रथमतः ३५ ची स्त्री बाई आहे
प्रथमतः ३५ ची स्त्री बाई आहे मुलगी नव्हे तिला जगाचे भान आहे व अनुभव आहे. कदाचित लग्नच नको असेल? पस्तिशी आणि चाळिशी ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. चाळिशीत जीवनाची सर्व समीकरणे बदलतात, रीकास्ट होतात. त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या हिच्या वेगळ्या असे होउन रोज नवे संघर्ष होउ शकतात. शक्यतो एक ते तीन वर्षाचे अंतर असले तर बरे. थोडे जास्त अंतर असले तर त्या वयाच्या जोडीदाराला आव्ड्णारी गाणी, सांस्कृतिक रेफरन्सेस सर्वच वेगळे असते. डिजिटल अॅनालॉग इतका फरक जाणवू शकतो. दोघे आपापल्याजागी चांगले असले तरी त्यांची युनिअन कितपत यशस्वी होईल त्याची खात्री देता येत नाही.
तसेच आजकाल हे वैयक्तिक निर्णय ज्याचे त्याच्यावरच सोपवावे. नाहीतर मायुओबी. ऐकायची तयारी हवी.
साधनाने अखेर करेक्ट प्रतीसाद
साधनाने अखेर करेक्ट प्रतीसाद दिलाय. ( माझ्या मनातले लिहीले) कदाचीत अन्विता जे सान्गु शकली नाही ते साधनाने अचूक सान्गीतले.:स्मित:
पण त्यासाठी त्या मुलाला
पण त्यासाठी त्या मुलाला भेटायला तर हवे ना.>>>> अरे! ज्या गावाला जायचेच नाही त्या गावचा पत्ता विचारून काय उपयोग? 'क्ष' चा वय हा क्रायटेरिया सुद्धा नॉन-अॅडजेस्टेबल आहे. काय हवं नको हे तरी निदान माहित आहे. हे म्हणजे उगीचच विन्डो- शॉपिंग केल्यासारखे नाही का? ... just looking and have no intention of purchasing.
एकदा जर अटी / अपेक्षा शिथिल करायचा मुद्दा आला तर ...
पाचच वर्ष का पंधरा का नको?
शिकलेला/ली - किती म्हणजे जास्त? किती म्हणजे कमी?
पगार / पैसा - किती म्हणजे जास्त? किती म्हणजे कमी? (प्रेम, (चांगली!) माणसं काय पैशांत मोजता येतात? लग्नांत शेवटी ते महत्त्वाचे - हा त्याचा उपमुद्दा) .
दिसायला छान - कसं ठरवणार? बेंचमार्क कोण?
चांगलं करियर - म्हणजे काय ? सध्याच्या ले-ऑफ, भांडवलशाही काळात सततच विद्यार्थी रहाव लागत आणि अपग्रेडेशनला पर्याय नाही.
सगळच बघण जर अंधारातल असेल तर 'क्ष' वयासारख्या टॅन्जिबल गोष्टीसाठी अडून बसली / ला तर काय चुकल?
पण त्यासाठी त्या मुलाला
पण त्यासाठी त्या मुलाला भेटायला तर हवे ना.>>>> अरे! ज्या गावाला जायचेच नाही त्या गावचा पत्ता विचारून काय उपयोग? 'क्ष' चा वय हा क्रायटेरिया सुद्धा नॉन-अॅडजेस्टेबल आहे. काय हवं नको हे तरी निदान माहित आहे. हे म्हणजे उगीचच विन्डो- शॉपिंग केल्यासारखे नाही का? ... just looking and have no intention of purchasing. >>>> हा मुद्दा योग्य मान्ड्ला आहे तुम्ही राजसी .
धोतर जोडीला नऊवारी शोभून दिसेल फारतर पाचवारी नीट दिसेल, Jeans and टॉप नाही चान्गली दिसणार..
मग Jeans and टॉप वाली ने न भेट्ता नकार दिला तर तिची मानसिकता चुकीची आहे अस म्हणन्यासारखे आहे. याउलट त्या धोतर जोडी वाल्याने नऊवारी किवा पाचवारी शोधाय्ला हवी... मगच जोडा छान दिसेल.
ईथे पोशाखाचे उदाहरण फक्त मुद्दा पट्वायला दिला आहे. उगीच ५-६ वर्श अधीची मुल धोतर जोडी वापरत नाहीत अस सान्गू नका.
असल्या मुलामुलींकरता खरंतर
असल्या मुलामुलींकरता खरंतर कौन्सेलिंगच सुरू करायला हवं. हे नको, ते नको, अस्सा नक्को आणि तश्शी नको. काय हे! चांगलं आपल्या आईवडिलांनी आणलेल्या पहिल्याच स्थळाला हो म्हणायचं आणि लग्न करून इतर चारचौघांसारखं सुखात रहायचं सोडून हे असले विचार कसे सुचतात म्हणते मी!
एकदा लग्न केलं की कसं 'अँड दे लिव्ह्ड हॅपिली एवर आफ्टर'च असतं हे ही त्यांना कळत नाही. उग्गाच नकार देत बसतात. बरं दिसता का ते!
मामि॑च्या मताशी सहमत.
फक्त एकच साचा डोळ्यासमोर ठेवुन पुढे चालत रहणे योग्य नाही. "मी कमवती आहे स्वताच्या पायावर उभी आहे, म्हणुन मला समजावयाची अथवा सल्ले देण्यची गरज नाही, आजचे जगा बद्दल जुन्या पिढीला कही माहीत नाही, आम्हाला कसा जोडीदार हवा ते आम्ही बघु" असे म्हणनारे बरेच असतात. पण त्या॑ना हे कळत नाही की घरचे काही गोष्टी आपल्या भल्याच्याच सा॑गत असतात. शेवटी निर्णय हा आपलाच असतो पण तो घेण्यासाठी आपल्याला त्या॑ची मदत होत असते.
"तुम्ही समजावता म्हणजे नेमकं काय करता तर तुझे विचार चुकीचे आहेत हे समोरच्याला पटवून देतात.
मी त्या बोटीत आहे म्हणून सांगतेय!"
काही गोष्टि॑चा विचार आपल्यापेक्षा वडिल म्॑डळी जास्त चा॑गला करतात. त्या॑च्या समजवण्यात तुझे विचार चुकीचे आहेत असे त्या॑ना सा॑गायचे नसते. त्या॑चे म्हणने केवळ एवढेच असते कि एकाच बाजुने विचार केला जाउ नये. त्याचे फायदे-तोटे लक्षात घेतले पाहीजे. ब-याअच वेळा आपल्या सगळ्या अटित बसणारा जोडीदार मिळाला की आपण काही गोष्टी॑कडे दुर्लक्ष करतो. घरची म्॑डळी आपले मार्गदर्शन करत असतात ,यात समोरचा चुकीचाच आहे हे दाखवुन देणे असा उद्देश नसतो.
मी अशी ऊदाहरण पाहीली आहेत कि सगळ॑ व्यवस्थित आहे पण निर्णय घेउ शकत नाहीत. अशा वेळी योग्य ते मार्गदर्शन अथवा सल्ला उपयोगी पडतो.
शक्यतो एक ते तीन वर्षाचे अंतर
शक्यतो एक ते तीन वर्षाचे अंतर असले तर बरे. थोडे जास्त अंतर असले तर त्या वयाच्या जोडीदाराला आव्ड्णारी गाणी, सांस्कृतिक रेफरन्सेस सर्वच वेगळे असते. डिजिटल अॅनालॉग इतका फरक जाणवू शकतो. दोघे आपापल्याजागी चांगले असले तरी त्यांची युनिअन कितपत यशस्वी होईल त्याची खात्री देता येत नाही. >>>>>>>> बापरे कैच्याकैच
एखाद्या मुलासाठी किंवा
एखाद्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जोडीदाराचा कोणता क्रायटेरीया नॉन-अॅडजेस्टेबल असेल हा संपुर्णपणे त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. उदा. माझ्या जावेला मुलगा दारु पिणारा चालणार होता पण नॉनवेज खाणारा नको. मला मुलगा नॉनवेज खाणारा चालणार होता पण दारू पिणारा नको. सो आमचे नॉन-अॅडजेस्टेबल क्रायटेरीयाज वेगवेगळे होते. त्याचप्रमाणे एखादीसाठी वय हा नॉन-अॅडजेस्टेबल क्रायटेरीया असु शकत नाही का?
हु आर यु टू फोर्स देम टू चेंज देअर प्रायॉरिटीज अँड नॉन-अॅडजेस्टेबल क्रायटेरीयाज?
अँड इफ दे डोंट लिसन, यु राईट अ बीबी ऑन मायबोली टू क्रिटीसाईझ देम.. हाऊ चीप.
हु आर यु टू फोर्स देम टू चेंज
हु आर यु टू फोर्स देम टू चेंज देअर प्रायॉरिटीज अँड नॉन-अॅडजेस्टेबल क्रायटेरीयाज?
अँड इफ दे डोंट लिसन, यु राईट अ बीबी ऑन मायबोली टू क्रिटीसाईझ देम.. हाऊ चीप.//
एकतर फोर्स करतच नाहीये आणि क्रिटीसाईझ पण नाही त्यामुळे लेखात मांडलेला विचार जर पटला नाही तर त्याविषयी त्रागा करून 'चीप' म्हणणे हे जास्त चीप वाटते.
निर्झरा, मामींचे पोस्ट
निर्झरा, मामींचे पोस्ट औपरोधिक असले तर?
कॉलिंग मामी...
jisaka darr tha bedardi wo
jisaka darr tha bedardi
wo hi baat ho gayee....
निर्झरा, मामींचे पोस्ट
निर्झरा, मामींचे पोस्ट औपरोधिक असले तर?
कॉलिंग मामी... फिदीफिदी
हो असु शकते. पण मी अशी काही मुले - मुली बघितली आहेत की खरच॑ त्या॑च्या बाबतित मामी म्हणतात तस॑ कौन्सेलि॑ग करायला लागत. प्रत्येकाला विचार स्वात्॑त्र्य आहे. पण काही त्याचा गैर फायदा घेतात. त्या वेळी त्या॑च्या घरच्या॑ची अवस्था अगदी अशीच असते: -पहिल॑ स्थळच उरकुन टाकायला हव होत, न्॑तर आपोआप जमल॑ असत॑ दोघा॑च.
सगळ्यात महत्वाचा क्रायटेरीया
सगळ्यात महत्वाचा क्रायटेरीया म्हणजे मुलगा किंवा मुलगी क्लिक होणे, व त्यांच्यात हजबंड किंवा वाईफ मटेरियल असणे. बाकी सब बकवास है!
"तुम्ही समजावता म्हणजे नेमकं
"तुम्ही समजावता म्हणजे नेमकं काय करता तर तुझे विचार चुकीचे आहेत हे समोरच्याला पटवून देतात.<<<<< अमुक वयापलीकडच्या वयाचा मुलगा नको, हे चूक कसं? किंवा कुणीही स्वतःपुरता ठरवलेला कुठलाही क्रायटेरिया चूक कसा?
प्रत्येकाला विचार स्वात्॑त्र्य आहे. पण काही त्याचा गैर फायदा घेतात.<<< गैरफायदा घेतला हे कसं ठरवणार?
" आणि आतचा मुलगा/मुलगी विचार
"
आणि आतचा मुलगा/मुलगी विचार करेल.- तिचे/त्याचे अफ्फेअर होते , आता नाही. आणि आपण lucky अहोत की तिचे/त्याचे आपल्ल्याशी लग्न झाल. किवा एतक्या छ्योट्या कारणासाठी मी तिला कशाला नाकारू///
असा विचार हल्लीची सगळी मुले करत आहेत/ असतील तर फारच छान आहे.
हा विचार आधीची म्हणजे ५ वर्षांनी मोठा मुलगा करणारच नाही हा विचार गृहीत धरत आहात तुम्ही .
किंवा कदाचित तसे असेल तर मुलीने तशी स्पष्ट कल्पना देऊन जर मुलाला / मुलीला चालणार असेल तर उत्तमच . पण त्यासाठी त्या मुलाला भेटायला तर हवे ना. सगळ्या त्या गटातील मुलांना / मुलीना एकदम आधीची पिढी म्हणून बाद करणे योग्य आहे का?">>>>>>>>>>>>>>
जो मुलगा आपल्या वयाला साजेल अशी मुलगी न शोधता ५-६ वर्षानी लहान वयाची मुलगी शोधत आहे त्याचे विचार किती आधुनिक आहे ते ईथेच दिसते. ते जाणायला भेटायला जायची गरज नाही
Pages