'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

चिनूक्स +१ Sad

ह्याच साठी सगळे जीव तोडून सांगतायत "समजून घ्या...समजून घ्या. खरोखर जे ह्यातून जात असतील त्यांची हेटाळणी करु नका." माणसाचा स्वभाव स्वतः निराधार असाल तरी जमलं तर दुसर्‍याचा आधार बनण्याचा असला पाहिजे. दुसर्‍याला दगड मारुन तुम्ही त्याचं आयुष्य बरबाद करत असाल तर........

समलैगिकता नैसर्गिक आहे, समलैगिक लोकांना समाजापासुन वेगळं न ठरवता त्यांना सामावून घ्यावं... मान्य.

स्किझोफ्रेनिया, न्युरोसिस, पर्सोनलिटि डिसोर्डर्स नैसर्गिक(चर्चेत ज्या ओघाने नैसर्गिक हा अर्थ आलाय--जीन्स मधुन येणारं ते नैसर्गिक असतात--अल्बिनो,) मग आपण काय करतो? अश्या विकारांना तसच सोडुन देतो का? का हे विकार ट्रीट करतो/करवून घेतो?
ते ट्रीट करवून घेण्यमागची आपली भूमिका काय असते?

नैसर्गिक असणं, आणि नैतिक असणं यात फरक आहे का?

समलैंगिकता बळावली तर ? फॅड निघालं तर? त्याचे परिणाम काय होतील?

या स्पीड ने येत्या काही वर्षात बेस्टिआलिटी, पिडोफिलिया आणि इतरही बरेच विकार विकृती, नैसर्गिक आहेत, त्यांना काय्देशिर मान्यता मिळावी असे "लढे" होतील !!

( बालविवाह विरोधी, विधवाविवाह हे कायदे समाजहिताचे होते असा माझा समज आहे, ३७७ कलम बदलून समाज हिताचं काय होणार आहे? )

अल्बिनोंवर काय ट्रिटमेंट आहे? ड्वार्फ्सची उंची ट्रिटमेंटने वाढवता येते का? दोघांना फक्त सायकिअ‍ॅट्रिस्टच्या ट्रिटमेंटची गरज पडत असेल लोकांनी हिणवून खचवून टाकल्यामुळे.

फॅड निघालं तर?>>> हे आयडेंटिफाय करुन रोखायला बघा. त्यासाठी वेळीच काउंसेलिंगच गरजेचे. ड्रग्ज घेणार्‍यांवरही उपाय केले जातात मग ह्यावरही असतीलच. पण हे फॅड म्हणून अंगिकारलं असेल तरच. जर जेन्युईन केस असेल तर जबरदस्ती करु नये. जेन्युईन देखिल जगाला उपद्रवी ठरले तर इतर उपद्रवी गोष्टींसारखं त्यालाही अटकाव करावाच.

हा लेख माहेरमधे वाचला होता. मायबोलीवर तो आणल्याबद्दल चिनूक्सचे आभार.
तसेच हा लेख आणि फोटो इथे देण्याची परवानगी दिल्याबद्दल मेनका प्रकाशन आणि चित्रा पालेकरांचेही आभार!

मला वैयक्तिक पातळीवर समलिंगी संबंध पटत नाहीत, त्यामुळे स्वीकारार्ह नाहीत. पण हा माझा नकार केवळ माझ्या जवळच्या/ रक्ताच्या नातेवाईकांपर्यंतच मर्यादित आहे, बाकी माझ्या मित्रमैत्रिणी, माझ्या आजूबाजूला सतत वावरणारे यात नाहीत. त्यांना जे पटतंय, योग्य वाटतंय, हवंय, तेच त्यांनी करावं.

इथे प्रतिसाद लिहिणार्‍यांना विनंती कराविशी वाटते, चर्चा, ऊहापोह ठीक आहे पण कोणीही कोणाची हेटाळणी करू नका. अल्याड, पल्याड दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकमेकांच्या मतांचा आदर करा. 'पटवून घ्यायलाच पाहिजे' असा दुराग्रह नको असे मला वाटते.

मंजुडी साती किंवा असे अनेक ,झंपी यांनी जो मुदा मांदलाय तोच प्रश्न मी तुम्हाला विचारते.
जर उद्या तुमचा मुलगा किंवा मुलगी थ्रिल म्हनुन नाही पण प्रामणिकपणे तुमच्यपुढे आले आणि म्हणाले 'आइ/बाबा आम्हाला भिन्नलिंगी आकर्षण वाटत नाही तर समलिंगी वातते',तर तुम्ही काय त्यांना पटत नाही म्हणुन मारहाण करणार/हाकलुन देणार/जदी बुटी देणार/योगा शिकवणार/अरे देवा कुठे कमी पदले मी ह्याला वाधवण्यात म्हनून धाय मोक्लुन रडणार?
माझ्यापुरते सांगायचे तर मी माझ्या अपत्याला एव्ह्देच सांगेल homosexual असण्यात गैर कहीच नाही पण आधी आपली शैक्षणिक आणि आर्थिक बाजु भक्कम कर. या जगात खुप दुष्ट माणसे आहेत त्यांना दुसर्‍याम्ची हेटाळणी करव्यात विक्रुत आनम्द मिळतो. त्यांच्यापसुन सावध रहा.त्यांना/किंवा इतर कुठल्याही संकटांना तोंड देण्यासाठी मान्सिक रित्या कणखर झालास/झालीस तरच u will be enjoy ur sexuality.
बाकी sex education from health and hygine point of view should be independent of sexuality

I observed that most of the doctors are against homosexuality. Why?. I am also against this. Everytime we discuss same points. So it is better that we agree to disagree and close this issue.

उद्या काय होईल हे आत्ताच कसे सांगता येईल. लग्नापुर्वी बर्‍याच वल्गना करणारे/करणार्‍या बदलतात, मुलं झाल्यावर पालकांच्या स्वभावात बदल होतो, पण तो कसा होईल हे आत्ताच कसं सांगता येईल, तसच काहीसं

जर उद्या तुमचा मुलगा किंवा मुलगी थ्रिल म्हनुन नाही पण प्रामणिकपणे तुमच्यपुढे आले आणि म्हणाले 'आइ/बाबा आम्हाला भिन्नलिंगी आकर्षण वाटत नाही तर समलिंगी वातते',तर तुम्ही काय त्यांना पटत नाही म्हणुन मारहाण करणार/हाकलुन देणार/जदी बुटी देणार/योगा शिकवणार/अरे देवा कुठे कमी पदले मी ह्याला वाधवण्यात म्हनून धाय मोक्लुन रडणार?

या प्रश्नाच्या बाबतीत होईल. त्यावेळच्या परिस्थितीनुसार, वयानुसार, प्रश्न हाताळला जाईल. उगाच तुम्ही काय कराल, असं विचारुन काय उपयोग.

'पटवून घ्यायलाच पाहिजे' असा दुराग्रह नको असे मला वाटते. >>> मंजूडी +१

>>स्किझोफ्रेनिया, न्युरोसिस, पर्सोनलिटि डिसोर्डर्स नैसर्गिक(चर्चेत ज्या ओघाने नैसर्गिक हा अर्थ आलाय--जीन्स मधुन येणारं ते नैसर्गिक असतात--अल्बिनो,) मग आपण काय करतो? अश्या विकारांना तसच सोडुन देतो का? का हे विकार ट्रीट करतो/करवून घेतो?
ते ट्रीट करवून घेण्यमागची आपली भूमिका काय असते?

येस माझे हेच म्हणणे आहे, मी जे सतत विरोधी लिहित आहे त्यात या लोकांच्या प्रती हेटाळणीचा हेतू अजिबात नाहीये. उलट शारिरिक, मानसिक उपाय केले जावेत आणि या अशा असंतुलनासाठी वैद्यकीय क्षेत्राने भरीव संशोधन करावे असे मनापासुन वाटते.

अश्विनी के, arc आणि महेश यांचे मुद्दे पटले. अश्विनी के ह्यांचा हा मुद्दा तर एकदमच पटला.

फॅड निघालं तर?>>> हे आयडेंटिफाय करुन रोखायला बघा. त्यासाठी वेळीच काउंसेलिंगच गरजेचे. ड्रग्ज घेणार्‍यांवरही उपाय केले जातात मग ह्यावरही असतीलच. पण हे फॅड म्हणून अंगिकारलं असेल तरच. जर जेन्युईन केस असेल तर जबरदस्ती करु नये. जेन्युईन देखिल जगाला उपद्रवी ठरले तर इतर उपद्रवी गोष्टींसारखं त्यालाही अटकाव करावाच.

लोकांच्या प्रती हेटाळणीचा हेतू अजिबात नाहीये. उलट शारिरिक, मानसिक उपाय केले जावेत आणि या अशा असंतुलनासाठी वैद्यकीय क्षेत्राने भरीव संशोधन करावे असे मनापासुन वाटते. >> Lol Rofl अतिशय विनोदी वाक्य...

समलैंगिकता म्हणजे असंतुलन हे कोणत्या आधारावर ठरवलंत आदरणीय महेशजी?

वरती इब्लिस यांनी उभयलिंगी म्हणजे दोन्ही लिंगं एकाच शरिरात सापडणं असं लिहिलं आहे. Uhoh
माझ्या वाचनानुसार तर उभयलिंगी म्हणजे दोन्ही व्यक्तींबरोबर(स्त्री/पुरूष) समागम करू शकणारा पुरूष अथवा स्त्री म्हणजे उभयलिंगी.

गापै यांचा मागच्या पानावरचा प्रतिसाद पण अवास्तव वाटला.
ब्रायटनमधल्या आनंदवनात रोगांचा सुळसुळाट आहे, ड्रग्ज कन्झुम केले जातात. पार्टनर्स बदलले जातात. इ. मग बाहेरच्या जगात रोगांचा अजिबातच सुळसुळाट नाही किंवा कुणिच ड्रग्ज घेत नाही अथवा सर्वजण आपल्या पार्टनर्स बरोबर प्रामाणिक आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मी अशी उदा. देऊन ब्रायटनमधल्या आनंदवनात जे चालतं त्याचं समर्थन करत नाहिये. तर फक्त दोन्हीकडे कमी अधिक बाजू असतात असं सांगायचा प्रयत्न करतेय. तिथल्या गोष्टी पटकन समजून येत असतील कारण तो गृप तुलनेने कमी असेल. बाहेरच्या जगात हे असूनही पटकन दिसत नाही. ब्रायटनच्या आनंदवनातही आपल्या पार्टनरशी प्रामाणिक असलेले, ड्रग्ज न घेणारे, इ. लोक असतीलच की. त्याबद्दल उल्लेख नाही आला तुमच्या प्रतिसादात.

मला वाटते द्विलिंगी असे भाषांतर योग्य राहील. माझ्या डोक्यातला शब्द 'hermaphrodite' असा होता. @ दक्षिणा. तुम्ही वाचलेले bisexual शब्दाचे भाषांतर होते.

जिज्ञासा, धन्यवाद! स्पष्टीकरण पटले. Un-natural आणि abnormal मधला फरक या स्पष्टी करणापुरता पटला.
मग समलैंगिकता abnormal ठरली का?

माझ्या ओळखीच एक्-दोन जण straight -> same -> Bi बनलेत ते नैसर्गिक आहे हे पटत नाही.

माझे असे मत आहे ( खरे तर माझी अशी भिती आहे), की येत्या दशकांत समाजात जे जे आपण अयोग्य ठरवून मुलां पर्यंत कमीत कमी पोचेल अशी काळजी घेत होतो आणि योग्य वयात आल्यावर त्याना त्या त्या विषयाची योग्य व्यक्तींमार्फत ओळख करून देत होतो, ते ते सर्व नैसर्गिक आणि सामान्य आहे हे बिंबवले जाईल. "मुलं व्यवस्थित समजून घेतात, त्याना काही वेगळं सांगायची गरज नसते!" हे ज्याना वाटतं त्यानी आयुष्यात अजून अनुभव घ्यायची गरज आहे असेच मी म्हणीन.

एखाद्या औषधाचे side-effects जसे काही वर्षांनंतर दिसून येतात आणि तोपर्यंत ते औषध एखाद्या व्याधीवर एकदम 'रामबाण' असते तसे आहे हे!

मुलाना यातून योग्य काय आणि अयोग्य ( असे खरोखरीच काही असते का? हा प्रश्न पडू लागला आहे) काय ही सांगायची पालकांची कूवत नष्ट होईल.

मला अजून वाचन-आकलन करायची गरज आहे.

सगळेच ज्यांचं म्हणणं आहे 'हे अनैसर्गिक, अनैतिक' आहे त्यांना सांगावसं वाटतंय की ठीक आहे we agree to disagree पण,
ऊद्या एखाद्या पौगंडा अवस्थेतल्या मुलाने/मुलीने तुम्हाला दादा/काका/बाबा/मामा हा/ही माझा मित्र/मैत्रिण/सेलेब्रिटी समलैंगिक आहे म्हणजे नेमकं काय आहे, हे चूक की बरोबर, त्यांच्याप्रती माझी भुमिका काय असायला हवी?
असे प्रश्न विचारले तर तुम्ही तुमचा तिरस्कार त्या मुलांकडे पास ऑन करणार की बायस्ड न होता सगळी माहिती देऊन त्यांची भुमिका त्यांनाच ठरवू देणार?

कायदा ही समाजाची चौकट आहे. ही चौकट असते आणि असावी, ती केवळ व्यक्तींच्या हक्कांच्या रक्षणासाठी. संस्कृती संवर्धन, संस्कृती रक्षण, परंपरांची जोपासणूक, फलाणा, डिकरा वगैरे हे महान आणि दैवी कार्य पार पाडण्याची जबाबदारी बिचाऱ्या कायद्यांवर टाकली जाऊ नये.
माझे एक व्यक्ती म्हणून काही जन्मजात अधिकार आहेत. जीवनाचा आणि "जगण्याचा" मला आणि प्रत्येक मनुष्यास समान हक्क आहे आणि या हक्कांसंदर्भात असणाऱ्या सर्व कायद्यांना माझा "गरज" (इतपतच) पाठिंबा आहे.
आपण कायद्याने कोणावरही धर्म, जात, व्यवसाय लादू शकत नाही इतपत आपण पुढारलो (!) आहोत आणि त्या अनुषंगानेच एक दिवस संपूर्ण व्यक्तीस्वातंत्र्य प्राप्त करू शकू अशी एक आशा आहे. पण तो आशेचा दिवस अजूनही फार दूर असावा...
समलैंगिकतेचा हा प्रश्न म्हणजे ऊगाच चालवलेला माकडचाळा नाही. सांखिक आणि बौद्धिक पाठिंबा असूनही प्रचंड गैरसमज आणि आंधळा लोकविरोध असणारा हा लढा यशस्वी झालाच तर ती पुढे जाऊन समाजातील सर्वात दुर्बल घटकाला (तृतीयपंथी) किमान व्यक्ती म्हणून कायदेशीर आणि आपल्याला कधी लाज वाटलीच (आपल्या असंवेदनशीलतेची) तर समाजमान्यता मिळण्याची पहिली पायरी असेल.

व्हायचे ते सगळे होऊन गेलेय आणि आपण माणूसपणाच्या परमोच्च शिखरावर आहोत असा माझा भ्रम नाही आणि कोणाचाही असू नये. आपल्याला खूप सुधरायचे आहे अजून. नुसत्या समजांनी भरलेल्या या मेंदूला अजून विस्तारायचे आहे आणि समजून घ्यायचे आहे. जगायला आणि जगू द्यायला शिकायचे आहे.

धडा पहिला.
"कायदा माणसासाठी असतो" "कायदा सगळ्या माणसांसाठी असतो" "कायदा सर्व माणसांच्या हक्कारक्षानासाठी असतो" " कायदा आणि माणूस यातील काही बदलायचे असेल तर कायदा बदलणे हे जास्त कायद्याचे आणि माणूसपणाचे असते"

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लोकहो,

मी जिथे राहतो ते इंग्लंडमधील ब्रायटन हे शहर 'आनंदी' राजधानी (गे कॅपिटल ऑफ ब्रिटन) आहे. या पार्श्वभूमीवर काही निरीक्षणं नोंदवतो.

१. ब्रायटनमध्ये आनंद्यांचा स्वत:चा समूह आहे. तो केम्पटाऊन नावाच्या विभागात वसलेला आहे. महेश यांनी गे साठी वेगळे आनंदवन काढावे असे सुचवले होते. तसं आनंदवन प्रत्यक्ष अस्तित्वात आहे. आपण त्याला आनंदीवन म्हणूया. हे कोणी मुद्दामून निर्माण केलेलं नाही तर आपोआप घडत आलं आहे.

२. गे पुरुषाने घ्यायच्या खबरदार्‍या इथे सापडतील (इंग्रजी दुवा). अरेच्चा, या खबरदार्‍या तर वेश्येकडे जातांनापण घ्यायच्या असतात. होय मित्रांनो, गे बनणं हे वेश्येसारखंच आहे. का बरं? पुढचा मुद्दा पहा.

३. कारणकी गे पुरूष समूहात कपडे बदलावे इतक्या सहजपणे जोडीदार बदलले जातात. गे पुरूष इतके स्वैर का? एका गे नवयुवकाने हाच प्रश्न विचारला आहे. उत्तरांतून दिव्यज्ञान मिळेल (इंग्रजी दुवा).

ज्ञानी झालात? व्हेरी गुड. आता आनंदीवनाची सफर पुढे चालू ठेवूया.

४. आनंदीवनात रोगराईचा सुळसुळाट असतो. कुठली रोगराई ते कळलं असेलंच. बरेचसे गे पुरूष केवळ मजा मारावी म्हणून तसे झालेले असतात. अमेरिकन गे पुरुषांच्या आरोग्याची काय परिस्थिती आहे ते पहा (इंग्रजी दुवा).

५. गे लोकांबद्दल सहानुभूती दाखवायला म्हणून तोंडच्या वाफा दवडणं सोपं आहे. प्रत्यक्ष #वा#वीला सुरुवात झाली की रं#खान्यापेक्षा हालत खराब होते. का बरं? कारण की आनंदीवनात मुक्तहस्ते ड्रगचा वापर चालतो. कोणीही कोणाच्याही सुया वापरा. कसली सुई ते विचारू नका! आणि सुई म्हणजे काय हेही विचारू नका!!

ड्रगविरहित आनंदीवन हा केवळ कम्युनिस्ट युटोपिया आहे.

६. आनंदीवनाची अजून एक खासियत म्हणजे तिथली लोकसंख्या सतत कमी होत असते. जरा वय वाढलं की तुमची डिमांड आपोआप घसरते. त्यामुळे तिथे रिक्रूटमेंट ड्राईव्ह सतत ऑन असतो. शाळकरी मुलांच्या मनात आपल्या लिंगाविषयी गोंधळ उत्पन्न करण्यास जुने जाणते लोक एकदम तत्पर असतात. याच कारणापायी इंग्लंडमधल्या दोन शाळांत समरतींचे प्रवर्तन (प्रमोटिंग) करणे निषिद्ध ठरवले आहे (इंग्रजी दुवा).

कुण्या थेरड्या, थोराड, जरठ, निब्बर सांडसोट्यास गुदगुल्या व्हाव्या म्हणून तुमच्या गोजिरवाण्या मुलाचं शारीरिक, मानसिक, भावनिक भवितव्य उद्ध्वस्त करायचं का? मला या प्रश्नाचं उत्तर देण्यात अजिबात रस नाही. हा प्रश्न उद्भवू नये अशी परिस्थिती मात्र मला यायला हवीये.

७. एव्हढा सद्गुणसंपृक्त लोकसंग्रह ज्या कुणाला करायचा आहे त्याने खुशाल आनंदीवनी जावे. इतरांच्या उरावर गे आणून बसवू नयेत. भले त्यांच्या सवयी काहीही असोत.

पण म्हणून मी गे लोकांच्या विरुद्ध नाहीये. १९७३ साली अमेरिकन सायकीयाट्री असोसियेशनने गेगिरी हा प्रकार आजारांतून वगळला. तत्पूर्वी गे पणा मानसिक आजार होता, जो बरा करता येत असे अशी धारणा होती. अचानक १९७३ साली त्या विश्वस्तमंडळाने यात बदल केला. हा बदल करतांना कोणतीही वैज्ञानिक वा सांख्यिकीय पद्धतीद्वारे चर्चा केली गेली नव्हती. केवळ मतदानाने हा बदल केला.

म्हणून गेगिरी हा प्रकार पूर्वीप्रमाणेच आजार म्हणून समजला जावा. एक पीडित म्हणून माझी गे लोकांना सहानुभूती आहे. पण त्याकरिता त्यांना विशेष अधिकार वगैरे मिळणार नाहीत.

असो.

गे चळवळीच्या मागे कोण आहे ते मी सांगत बसत नाही. वाचकांची इच्छा असल्यास लिहीन.

आ.न.,
-गा.पै.

>>>>>>>>>
अशा भिकारचोट मनोवृत्तीच्या माणसांविरोधात कायदे का नाहीत? कारण काही समाजविघातक असेल तर हे आहे.

श्रीमंत गामाचंद्ररावजी पैलवानसाहेब यांच्या पोस्टनंतर मी वरचा प्रतिसाद टाकला होता. मात्र नंतर पुढे वाचले आणि वरच्या पोस्टमध्ये मी "आशा" हा शब्दप्रयोग केला होता तो चुकीचा असून कृपया तिथे "दिवास्वप्न" असे वाचावे अशी विनंती करत आहे.

जिज्ञासा आपण फार कसोशीने आणि अत्यंत सोप्या भाषेत मौलिक माहिती देत आहात त्याबद्दल धन्यवाद.
मयेकर तुम्हाला कधीतरी या दगडावर डोके आपटण्याच्या युद्धात वीरमरण येईल अशी भीती वाटते मला. काळजी घ्या तब्येतीची.

अशा भिकारचोट मनोवृत्तीच्या माणसांविरोधात कायदे का नाहीत? कारण काही समाजविघातक असेल तर हे आहे.
<<
वेल्कम टू गापै फ्यानक्लब एक्स्टेन्शन काऊंटर क्र. बत्तेचाळीस Happy

लेख आवडला. माहेरमधे छापून आल्याचं कळलं होतं. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. बर्‍याच टायपो राहिल्यात त्या खटकताएत वाचताना.

मयेकर तुम्हाला कधीतरी या दगडावर डोके आपटण्याच्या युद्धात वीरमरण येईल अशी भीती वाटते मला. काळजी घ्या तब्येतीची.<<< Happy

सुलू ,
>>माझ्या ओळखीच एक्-दोन जण straight -> same -> Bi बनलेत ते नैसर्गिक आहे हे पटत नाही.>>

bi लोकांबाबत हे नॉर्मल ट्रान्झिशन आहे. सुरुवातीला जगरहाटीप्रमाणे हेटरो- मग जरा अनुभव आल्यावर स्वतःलाच स्वतःमधील ही दुसरी बाजू जाणवायला लागते म्हणून सम ( खरे तर बाय पण काही काळापुरते सम) मग पुन्हा काही काळाने सम जोडीदार असूनही हेटरो आकर्षणही वाटते याची जाणीव, आणि मग शेवटी आपण बाय आहोत या गोष्टीचा स्विकार.

समलैगिकतेवर शारीरिक, मानसिक उपाय केले जावेत असे सुचवणार्‍यांसाठी - साऊथ आफ्रिकेत लेसबियन्सवर करेक्टिव रेप केले जात आहेत. Sad

संदीप, अत्यंत चांगला प्रतिसाद.

मुळात दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच या सो कॉल्ड संस्कृतीरक्षकांचा पोटशुळ उठलेला. कधी नव्हे ते (दुर्दैवाने) सगळ्या धर्माचे रक्षक या विरोधात याचिका दाखल करीत होते अन् त्यांना यशही आले.
निर्णय इतका दुर्दैवी की प्रत्यक्ष 'निर्णय' नसतानाही आपली एक समाज म्हणून दांभिकता उघड करतो.

बरे ते नैसर्गीक्/अनैसर्गीक टुमणे का लावले जातेय तेही कळत नाही. मग त्या न्यायाने अंगात कपडे घालणे किंवा लग्न वगैरे संस्कारही अनैसर्गीकच की.
आदिमतेपासून 'सिव्हीलाईज्ड' होण्याच्या भानगडीत सगळीच भेसळ झाली मग नैसर्गीक वगैरे मुद्द्यांचे भांडवल कशाला?

ह्या चळवळीत काही करायचे असेल तर आंधळा लोकाविरोध मोडून काढणे. त्यासाठी आक्रमक होण्यापेक्षा सातत्य असणे गरजेचे.

लोकहो,

आपले प्रतिसाद वाचले. जमेल तसे निराकरण करतो.

१. vijaykulkarni,

१.१
>> गे पुरुष केवळ मजा मारण्यासाठी तसे झालेले असतात हे वाक्य तर प्रचंड अज्ञानमूलक आणी भयावह आहे.

हे माझं वाक्य नसून दिव्यज्ञानी प्रश्नोत्तरांतून उत्पन्न झालेले आहे. पृच्छक खराखुरा गे आहे, पण त्याला भेटणारे सगळे स्वैर व उथळ आहेत. यावरून काय निष्कर्ष काढायचा?

आणि हे विधान भयावह का बरं आहे?

असो.

२. जिज्ञासा,

२.१
>> त्यातही शेवटी गे लोकांबद्दल मला सहानुभूती वाटते वै. म्हणून स्वतःला redeem केलंय!

मला रीडीम्पशनची गरज नाही. धन्यवाद.

२.२
>> आपण भिन्नलिंगी संबंध देखील आजाराच्या यादीत टाकूया का? कशाला हवीय सहानुभूती अशा लोकांना?

भिन्नलिंगी संबंधांना आजारात कशाला ढकलताय? Uhoh पुरूष पुरुषासारखा वागला आणि बाई बाईसारखी वागली तर तो आजार नसतो. बहुतांश वेश्या बळजबरीने या व्यवसायात ढकलल्या जातात म्हणून वेश्यांना सहानुभूती हवी.

२.३
>> खरा साप आहे तो अज्ञानाचा, गैरसमजुतींचा आणि समाजाचा आणि कायद्याचा आधार नसल्याचा!

हे तुमचं मत झालं, आणि माझा त्यास आक्षेप नाही. भारतात गे समूह तितकासा उघड नाही. पण जगात जिथे उघड आहे तिथल्या अडचणी मांडल्या तर त्यामुळे भारतातल्या खर्‍या सापाला घेरायला मदत होईल ना?

२.४
>> तुमच्या sexual orientation चा जसा आणि जितका आदर राखला जावा असं तुम्हाला वाटतं तसाच
>> आणि तेवढाच आदर ह्या व्यक्तींना मिळावा ह्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

तुमचा ३७७ कलमावर आक्षेप असेल तर मला तो मान्य आहे. गे लोक सरसकट गुन्हेगार नाहीत. पण त्यांना खास अधिकार वगैरे मिळणार नाहीत.

असो.

३. चिनूक्स,

३.१
>> तुम्ही दिलेल्या लिंका स्वतःतरी वाचल्या का?

हो. म्हणूनच तर तो संदेश टाकायला उशीर झाला. खरंतर पहिल्या पानावरच टाकायचा होता, पण लोकांनी चर्चा खूप वाढवली. अशी चर्चा स्वागतार्ह आहे. Happy

असो.

४. मामी,

४.१
>> असेच घेट्टो समाजात, देशात, जगात बनले जावेत अशी तुमची इच्छा आहे का?
>> कारण ती सिस्टीम अनैसर्गिक आहे.

केम्पटाऊन हा घेटो नाही. खुली वस्ती आहे. ही वस्ती कोणीही बनवली नाही. गे लोकांकडून आपोआप बनत गेली आहे. गामा पैलवानाच्या इच्छेचा मुळी प्रश्नच येत नाही.

गे असणं म्हणजे केवळ ठराविक प्रकारचं वर्तन आणि प्राधान्ये बाळगणे नव्हे. त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. त्यासोबत त्यांची स्वत:ची अशी एक वेगळीच जीवनशैलीही येते. तिचे उर्वरित समाजावर घातक परिणाम होतात.

असो.

५. soha,

५.१
>> तरूण मुलांना समलैंगक असणं काहीतरी थ्रिल वाटू लागलयं. ह्याला कुठेतरी आवर घातला जावा असं वाटतं.

तुम्हाला १००% अनुमोदन!

असो.

६. दक्षिणा,

६.१
>> ... तर फक्त दोन्हीकडे कमी अधिक बाजू असतात असं सांगायचा प्रयत्न करतेय.

युक्तिवाद म्हणून मान्य. पण गे समूह किती चिमुकला? अवघा २ ते ३ %. त्यात ड्रग वापरायचं प्रमाण किती? तर उर्वरित समाजाच्या ७ पट (म्हणजे ७००%). तर ड्रग न वापरणारे गे कितीतरी नगण्य असतील, नाहीका? मग अशा नगण्यांचा हवाला देऊन समस्या दूर होणार आहे का?

असो.

७. संदीपसमीप,

७.१
>> अशा भिकारचोट मनोवृत्तीच्या माणसांविरोधात कायदे का नाहीत? कारण काही समाजविघातक असेल
>> तर हे आहे.

वस्तुस्थिती सांगितली तर ती समाजविघातक कशी होते बुवा? Uhoh

शिवाय तुमच्या तर्कटात आजून एक गंभीर त्रुटी आहे. तुम्हीच म्हणताय की कायदा असावा तो व्यक्तीच्या हक्कांच्या रक्षणासाठी. तर मग माझ्या संदेशाला समाजाशी जोडताय कशाला? माझ्या संदेशाने तुमच्या कुठल्या वैयक्तिक हक्कास कसली बाधा पोहोचली आहे?

आगोदर धडपणे विचार करायला शिका.

असो.

८. चिनूक्स आणि वाचकहो,

माझा इथला संदेश वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी होता. ती पुरेशी स्पष्ट झाल्याने आता मी थांबतो! Happy

आ.न.,
-गा.पै.

कायदेशीर मान्यता मिळालीच पाहीजे असा अट्टाहास का ?

उद्या, समलिंगी लोकांनी शिक्षण / नोकरीत रिझर्वेशन मागितलं तर सरकार देणार आहे का ? आणि त्यासाठी कितीजण समलिंगी नसताना असल्याचं सिध्द करायला धावणार आहेत ?

इथे विरोधी प्रतिक्रिया देण्याऱ्या प्रत्येकास मला भेटला आहे तसा एक अत्यंत हुशार, गोड, सुस्वभावी गे मित्र (अथवा लेस्बियन मैत्रीण) लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करेन! माझा समलैंगिकतेविषयीचा योग्य आणि निकोप दृष्टीकोन तयार होण्यात या माझ्या मित्राचा फार मोठा वाटा आहे! He has never done anything different, we have never discussed homosexuality. He is always just himself and he is so "normal" and that's what has helped me understand him and his likes. To me he is just like my any other friend!
हा माझा मित्र एका मध्यमवर्गीय अमेरिकन कुटुंबातून आला आहे पण महत्वाची गोष्ट ही आहे की त्याला त्याच्या सर्व कुटुंबाने त्याच्या वेगळेपणासकट स्वीकारलं आहे! मात्र जे त्याच्या इतके सुदैवी नाहीत त्यांनी काय करावं?

जगात कोणत्याही प्रकारे वेगळे असण्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते. असे वेगळेपण जे निसर्गदत्त आहे, जे तुम्ही बदलू शकत नाही आणि विशेषतः ज्या वेगळेपणाकडे समाज तुच्छतेने, पूर्वग्रहदूषित नजरेने बघतो ते कोणीही व्यक्ति सहज स्वीकारू शकतच नाही (हे फॅड वै. चे फंडे लावणाऱ्यांनी स्वतः ही असली फॅडं कराल का असा विचार करावा) स्वतः हातीपायी धडधाकट आणि सो कॉल्ड normal असलेल्यांनी दुसऱ्यांच्या वेगळेपणावर judgement pass करू नये!

On a very personal note: ह्या माझ्या मित्राशी नवीन नवीन ओळख झाली होती तेव्हा मी अनेकदा देवाचे आभार मानले आहेत की thank god for making me normal! I do not think I would have had the courage of coming out of closet! मी सहन केलं असतं आणि अगदीच सहन झालं नसतं तर आत्महत्या केली असती कदाचित (चिनूक्सच्या मित्रासारखी). एक normal व्यक्ति म्हणून विचार करताना मला हे सगळं भयंकर चूक वाटतं! पण मी काय करू शकते? मी माझ्यापरीने लोकांना ही जाणीव करून देऊ शकते की गे किंवा लेस्बियन असणं हे त्या व्यक्तीच्या हातात नसतं. ते नैसर्गिक आहे आणि जितक्या खुल्या दिलाने आपण याचा स्वीकार करू तितके आपण अधिक चांगले "माणूस" होऊ. That's it! I am done here.

Pages