रैना, अस्चिग, अनुदोन, रूनी ह्यांना भेटण्यासाठी गटग

Submitted by Adm on 25 December, 2013 - 23:56
ठिकाण/पत्ता: 
द फेवरिट, द ग्रेट 'मल्टी स्पाईस' !

रैना, अस्चिग, अनुदोन, रूनी असे बरेच परदेशस्थ* मायबोलीकर सध्या पुण्यात आहेत.
तर त्यांना भेटण्यासाठी १ तारखेला संध्याकाळी ७:३० वाजता मल्टीस्पाईस इथे गटग करण्याचे ठरले आहे..
कोण कोण येणार त्यांनी हात वर करा (आणि नोंदही करा). म्हणजे मी त्याप्रमाणे टेबल बूक करेन..

* : टण्या आणि केदार ही सध्या पुण्यात आहेत.. ते गटगला येणार आहेत.. पण त्यांना परदेशस्थ म्हणावे का देशस्थ हा प्रश्न असल्याने त्यांची नावे हेडरात घालतेली नाहीत.. Wink

वेळ : १ जानेवारी संध्याकाळी ७:३०.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
Wednesday, January 1, 2014 - 09:00 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहास्मारक खरं तर २०१० च्या ववि मध्येच बांधलं गेलं होतं. पण तरी तो भुतागत २०१३ च्या ववि पर्यंत भट्कत राहिला. शेवटी २०१३ च्या ववित त्याला मोक्ष मिळाला आणि चहाप्रकर्ण संपलं. काल काही लोकांनी गनिमी काव्याने माझ्यापुढे ग्लास, थाळ्या, चमचे इत्यादी मुद्दाम ठेऊन बघितलं. पण मी चतुराईने बिस्लेरीच्या बाटलीतूनच आणि पाणीच पीत राहिलो.

वेटरने ऑर्डरी कोणत्या उपकरणावर नोंदवून घेतल्या...?? >> ऑर्डर नोंदवून घ्यायच्या उपकर्णावर.
यावरूनही मस्पा आणि मस्पागटग पुरोगामी असल्याचं सिद्ध होतं बघा.

पराग, आपण शेवटी म्हणालेलं वाक्य सुरूवातीलाच म्हटलं असतं तर?- असा कल्पनाविलास करत मस्पामॅ झोपी गेले असतील काल.

'वो क्या हय, ऑर्डर देनेमे कोई हर्ज नही, लेकिन इदर बहुत सारोंका निर्जळी उपास हय.. >> हे मात्र केदारचं उत्तर कमाल होत Happy

होय ती हर्षाच होती! Happy

खादाडीचे फोटू >> कोणी काढले का? मला रैना आणि अस्चिग हे दोघे (च) आपापल्या मोबाईल कॅमेर्‍यातून फोटो काढत होते असं अंधुकसं आठवतंय! आणि त्यात सर्वांचे खिदळतानाचे फोटोच असणार आहेत असा कयास आहे.

साजिर्‍याने लिहिल्याप्रमाणे मला पडक्या व/ किंवा गोंधळलेल्या चेहर्‍याने वावरणारे वेटर्स व मॅनेजरबुवा आत्ता आठवले आणि त्यांच्या त्या मुद्रांमागचे भीषण रहस्य उलगडले!! Lol

मऽस्त झालं गटग ! संगीताविना संगीतखुर्ची भरपूर खेळले त्यामुळे ह्यावेळी बर्‍याचजणांशी गप्पा झाल्या. गटगची वेळ नक्की सहा होती की साडे-सात ? मी, इन्ना आणि स्वराली पोचलो तेव्हा पावणे-आठ(च) झाले होते तरी जवळजवळ सगळे आले होते. शिवाय आम्ही गेल्यावर पाचदहा मिनिटांतच प्रकाश घाटपांडे आणि शैलजा निघाले म्हणजे ते वीस-पंचवीस मिनिटांसाठीच आले होते ??

प्लेट्स उचलून नेण्याची वेटर्सची घाई समजू शकते पण चहा यायच्या आधी त्यांनी चक्क माझ्या पुढ्यातले टेबलच उचलून नेले आणि शेवटी उभ्याने गप्पा मारत असताना मस्पामॅनी अतिशय नम्र भाव चेहेर्‍यावर आणून हाताने आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला Proud

साजिरा , Rofl
खादाडीचे फोटो कशाला, खादाडीला गटग मधे, मॉबसिनमधल्या फक्त टोपी दिसणार्या एक्ष्ट्रा इतकही महत्व नव्हत Wink

अगो, माझं ऑफिस होतं आज भल्या पहाटे त्यामुळे मला खूप वेळ थांबता येणं शक्य नव्हतं. फक्त भेटायला म्हणून मी आले होते Happy

<<गटग यथासांग गप्पा+खिदळाखिदळी+आणखी गप्पा+सातत्याने चरण्याची व्यवस्था+संगीतखुर्ची+हसाहशी+गटागटाने गप्पा+वेटर्सची वाढायची आणि बसबॉईजची प्लेट्स उचलायची लगबग+आणखी गप्पा+ उभ्या - बैठ्या - अक्रॉस द टेबल गप्पा, वळचणीला उभे राहून गप्पा, कोंडाळं करून गप्पा, जाण्यायेण्याच्या मार्गावर गप्पा, पार्किंगमध्ये गप्पा अशा क्रमाने पार पडलं.>> Happy
फोटो येऊ देत Happy

ऑस्सम गटग
अफाट मजा आली सर्वांना भेटून. साजिरा, पराग आणि मयूरेश यांचे विशेष आभार ! Happy
साडेतिन तास अखंड अव्याहत बडबड. एक व्हिडीयो आहे माझ्याकडे. त्यात इतकी बडबड आणि गोंगाट सुरु आहे की कमाल आहे खरोखर. टण्याने मला इजिप्शियन लेखकाचे नाव विचारले तर सांगता येईना येवढा गोंधळ !!
साजिरा म्हणिंग राईट. तेवढ्यातल्या तेवढ्यात दोनदोनतिनतिन जणांची बारकी गटग सुरु होती.
अनु, पराग आणि मी अशी आमची ऐतिहासिक भेट झाली अखेरीस.
आश्चिग ना काही लोकांनी तुम्ही जे लिहीता ते आम्हाला अजिबात कळत नाही' असे म्हणले. de ja vu फीलिन्ग होते ते.
हिम्या,केप्या आणि स्वाती- या टांग मारणार्‍यांचा 'झाईर' निषेध Happy
मल्टीस्पाईसवाल्यांची कीव आली अक्षरशः

अर्रे सह्हीच! पुण्यात नसल्याची आणि त्यामुळे मस्त गटग मिसल्याची खंत व्यक्त करत आहे. Sad

मिसेस आशिष म्हणजेच अनु! (असाच माझाही समज आहे :फिदी:)

जाहिर निशेद केल्याबद्दल धन्यवाद... पण येणे शक्य झाले नाही... दुसर्‍या दिवशी मुंबई ट्रीप होती त्यामुळे आदल्या दिवशी बरीच कामे उरकायची होती त्यामुळे जमले नाही...

अनु, पराग, रैना आणि मी अशी ऐतिहासिक भेट घडण्याचा चान्स त्यामुळे हुकला..

क्कॉय?? टण्याला प्रसिद्ध इजिप्शिअन लेखकाचं नाव माहित नाही????????????????? Uhoh

ऐकू आलं नाही तर मोबाईलवर लिहून दाखवायचं. हाकानाका. Proud Wink

नुकतीच मस्पावाल्यांनी नवी मेन्यूकार्डे छापायला टाकलेली आहेत असं कळलं. त्याच्या शीर्षकावर - म्हणजे मस्पा या नावाच्याही वरती आणि त्यापेक्षाही ठळक छाप्यात - 'माबोशी संबंधित कुठल्याही गटाला प्रवेश नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी - हुक्मावरून' असा मजकून आहे म्हणे!

साजिर्‍याचा वृत्तांत ... Rofl

अकु, हर्षा ... लै भारी!

इतकी गडबड करून आलात ना? शोधा आता नविन रेस्टॉरंट! Proud

Pages