रैना, अस्चिग, अनुदोन, रूनी ह्यांना भेटण्यासाठी गटग

Submitted by Adm on 25 December, 2013 - 23:56
ठिकाण/पत्ता: 
द फेवरिट, द ग्रेट 'मल्टी स्पाईस' !

रैना, अस्चिग, अनुदोन, रूनी असे बरेच परदेशस्थ* मायबोलीकर सध्या पुण्यात आहेत.
तर त्यांना भेटण्यासाठी १ तारखेला संध्याकाळी ७:३० वाजता मल्टीस्पाईस इथे गटग करण्याचे ठरले आहे..
कोण कोण येणार त्यांनी हात वर करा (आणि नोंदही करा). म्हणजे मी त्याप्रमाणे टेबल बूक करेन..

* : टण्या आणि केदार ही सध्या पुण्यात आहेत.. ते गटगला येणार आहेत.. पण त्यांना परदेशस्थ म्हणावे का देशस्थ हा प्रश्न असल्याने त्यांची नावे हेडरात घालतेली नाहीत.. Wink

वेळ : १ जानेवारी संध्याकाळी ७:३०.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
Wednesday, January 1, 2014 - 09:00 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्ये बगा हितं हाय ते मल्टी स्पाईस

म्हात्रे पुलावरून राईट तर्न नाही पुलावरून दत्तवाडीकडच्या पुलाच्या टोकाला जाऊन यु टर्न हाणायचा. मंगेशकर हॉस्पिटल अथवा पटवर्धन बागेकडून सगळ्यात सोपे.....

डाव्या बाजूच्या वरच्या कोपर्‍यात 'नळ स्टॉप "आहे तो रेफरन्स पॉइन्ट धरावा. उजव्या बाजूच्या खालच्या कोपर्‍यात सिंहगड रोड दिसतो आहे....

multisp.jpg

घरचं नाहीये म्हणूनच होणार आहे खर्च ! Proud

मी टेबल बूक केलय.. माझ्याच नावाने.. मी वेळेवर पोचेनच.. पण ऑफिसमधून निघून उशीर झाला तर माझं नाव सांगून टेबल पकडा.. Happy

काल गटग मस्त झालं. नवीन-जुने बरेच लोक भेटले. भरपूर खाल्लं, संगीताविना संगीतखुर्ची खेळली, अमाप गप्पा मारल्या. अनेक दिवसांनी इतक्या मोठ्या गटगला हजेरी लावली आणि मजा आली.
पराग, संयोजनासाठी आणि केदार-मयूरेश खानपानसेवेसाठी धन्यवाद!

गटगला मस्त मजा आली.. खूप गप्पा आणि हसाहशी झाली..
अगो, तू ह्या गटगला टिपीकल गटग म्हणू शकतेस.. Proud

अनु आणि रैनाने आणलेली चॉकलेट्स मस्त होती..
अनुचं व्यक्तिमत्त्व अतिशय भारदस्त आहे आणि रैना खूप बारिक झाली आहे हे मी इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो.. Proud

संगीताविना संगीतखुर्ची खेळली >>> मला 'सरिविना' माहिती आहे.. 'संगीताविना' कोण ?? Proud

काल काही मोठ्या आवाजाच्या लोकांशी बोलताना, आवाजाची पातळी मॅच करायचा प्रयत्न केल्याचे पातक केल्याने आज माझा आवज बसलाय.. ! Sad

पण पराग म्हणे काल मोठ्या आवाजाच्या लोकांचा आवाज नेहेमी इतका मोठा नव्हताच म्हणे.. तरीही ही अवस्था अरेरे Wink

मी काल प्रथमच माबो गटगसाठी आले होते. मजा आली. नव्या वर्षाची पहिली संध्याकाळ अशी छान गेल्यामुळे सगळ वर्ष असच मजेत जाण्याची आशा आहे...

आजच विचारायला येणार होतो येथे हे झाले का म्हणून :). आत्तापर्यंतच्या वृ मधून काही सुगावा लागत नाही फारसा. जरा अनसेन्सॉर्ड वृ द्या.

xxxस्थ आले होते का?

कालचं गटग छानच झालं.. काही जुन्या आणि बर्‍याच नविन लोकांशी ओळख झाली आणि मुख्य म्हणजे त्या सगळ्यांशी गप्पा झाल्या माझ्या.. नाहीतर नेहमी माझं कोणा नविन लोकांशी फारस बोलणं होत नाही.. आता त्यामुळे भेटलेल्यां पैकी रुमा कोण असं निदान पुढे कोणी विचारणार नाही Lol

बाकी त्यामुळे अनया म्हणतेय त्याप्रमाणे नव वर्षाची सुरूवात एकंदर छानच झाली.. अनयाशी मात्र ओळख तेव्हडी झाली नाही Happy

गटग यथासांग गप्पा+खिदळाखिदळी+आणखी गप्पा+सातत्याने चरण्याची व्यवस्था+संगीतखुर्ची+हसाहशी+गटागटाने गप्पा+वेटर्सची वाढायची आणि बसबॉईजची प्लेट्स उचलायची लगबग+आणखी गप्पा+ उभ्या - बैठ्या - अक्रॉस द टेबल गप्पा, वळचणीला उभे राहून गप्पा, कोंडाळं करून गप्पा, जाण्यायेण्याच्या मार्गावर गप्पा, पार्किंगमध्ये गप्पा अशा क्रमाने पार पडलं.

गप्पांच्या अविरत ओघात ज्या कोणी महाभागांनी खाण्याच्या ऑर्डरी दिल्या त्यांचे आभार. त्यामुळे गप्पा मारताना पोटात इंधनही आपसूक घातले / ढकलले जात होते!! लै मोठं काम केलंसा! Proud आणि पार्किंग मधल्या झाडांवर नक्की काय लटकलं/ लटकवलं होतं? Wink

वेटरने ऑर्डरी कोणत्या उपकरणावर नोंदवून घेतल्या...?? मला ते पाहायचे होते पण बडबडीच्या नादात राहूनच गेले.

नवे-जुने असे बरेच लोक काल गटगला उपस्थित होते. मजा आली. चॉकलेट्स छान होती. घरी आल्यावर खाल्लेल्या चॉकलेट्सचा पुरावा चेहर्‍यावर तसाच राहिल्याचे आरशात पाहिल्यावर लक्षात आले!! Lol

गटगच्या अगदी शेवटी जवळच्या एका टेबलावरची एक मुलगी 'हे मायबोलीचे गटग आहे का? मी पण मायबोलीची सभासद आहे' असे विचारत आली म्हणजे बघा, काय तो मायबोलीकरांच्या गप्पांचा व दंग्याचा प्रभाव!

मी तुमचा दंगा नाही तुम्हाला बघुन आले होते अकु Wink कारण मी बाकी कुणालाच ओळखत नाही Happy एकुणच तुमचे गटग मस्त झाले.

'हे मायबोलीचे गटग आहे का? मी पण मायबोलीची सभासद आहे' असे विचारत आली म्हणजे बघा>< ही वरची हर्षाच का? Lol

मायबोली टीशर्ट नव्हते का घातले कुणी?? खादाडी डीटेल्स फोटू टाका की.

हा हा हा अकु, हर्षा, हे भारीच. Lol

मला लोकलमध्ये मायबोली ब्राऊज करताना गर्दीत माझ्या मोबाईलात कोणी भोचकपणे डोकावले तर कधीकधी मनात येते की ती व्यक्तीही मायबोलीकर असेल तर तिथेच 'रमेश... सुरेश....' चालू होईल... Lol

गटगच्या अगदी शेवटी जवळच्या एका टेबलावरची एक मुलगी 'हे मायबोलीचे गटग आहे का? मी पण मायबोलीची सभासद आहे' असे विचारत आली म्हणजे बघा, काय तो मायबोलीकरांच्या गप्पांचा व दंग्याचा प्रभाव!
हायला हे असे खरंच झाले? आमच्या बाजूला असलेली रिकामी खुर्ची न्यायला शेजारच्या टेबलवरची एक मुलगी आली तेव्हा आम्ही मजेमजेत असे म्हणत होतो की ती मायबोलीकर तर नाहीये ना म्हणून

'हे मायबोलीचे गटग आहे का? मी पण मायबोलीची सभासद आहे' असे विचारत आली म्हणजे बघा> अरे हे सही आहे Happy ही हर्षाच होती का मग?

- नोंदवलेल्या लोकांच्या दीडपट (किंवा जास्त) लोक येणे ही क्वचित घडणारी घटना काल घडली. आलेले लोक- साजिरा, केदार, चिन्मय, रैना, टण्या, मयूरेश, रूमा, पूनम, मिल्या, अनुदोन, स्वराली, अनया, हर्पेन, आर्फी, अर्भाट, पराग, आशिश, सौ आशिष, अरूंधती, श्यामली, प्रकाश घाटपांडे, शैलजा, इन्ना, अगो. (कुणी राहिलं किंवा नावांत गोंधळ असेल तर लिहा प्लीज).

- नाव न नोंदवताही तब्बल वीस मिनिटे आधी येण्याचा मी विक्रम केला. हा नवा पायंडा म्हणायला हरकत नाही. मस्पाच्या गटग ला लोक कितीही कर्मठ नि सनातनी म्हणत असले तरी मस्पागटग हे प्रकृतीने फार पुरोगामी असतं. इथं नवनवे पायंडे पडत असतात. असाच, एकेकाळी इथलं खाणं कुणालाच आवडत नसताना मिक्सभजी नावाचा सुंदर पदार्थ मागवण्याचा पायंडा मी पाडला होता.

-'कृपया सर्वांनी जरा खुर्चीवर बसता का?' असं गटग सुरू झाल्यानंतर पाऊण तासाने मल्टिस्पाईसमॅनेजरनी नाईलाजाने विचारलं तेव्हा त्यांची दया आली. त्याचं कुणीच ऐकलं नाही, हे बघून लाजेकाजेस्तव मी पाच मिनिटं बसून घेतलं. ऑर्डर घेणारे कॅप्टन वा वेटर हे कंप्लीट बावचळलेल्या अवस्थेत असल्याने स्वतः मस्पामॅ आले असावेत. तेही पूर्ण वेळ लांबलचक दोनचार टेबलभरून पसरलेल्या माबोकरांकडे आक्रित बघितल्यागत बघत होते.

- मला काहीच खायचं नसल्याने मी 'निर्जळी' असल्याचं खोटंच केदारला सांगत असतानाच मस्पामॅ पुन्हा गरीब चेहरा करून म्हणाले, 'कृपया ऑर्डर देता का?' केदारला पण दया आली असावी. तो म्हणाला, 'वो क्या हय, ऑर्डर देनेमे कोई हर्ज नही, लेकिन इदर बहुत सारोंका निर्जळी उपास हय..' मस्पामॅनी आणखी गरीब चेहरा केला, आणि केदारने आणखी दया येऊन शेवटी हार मानली. मग प्रत्येकाने आपापली ऑर्डर सांगायची टूम निघाली तेव्हा मस्पामॅनी धाबं दणाणून जोरजोरात मान हलवत 'असं नको, असं नको, मीच सांगतो तुमच्या ऑर्डर्स.' असं घाईघाईने म्हटलं. मग कार्याध्यक्षांशिवाय ऑर्डरधनुष्य कुणी पेलू शकत नाही हे सिद्ध झालं. नंतर सार्‍या ऑर्डर्स मयूरेशनेच दिल्या (असाव्यात).

- कमीत कमी अर्धा डझन लोक बारीक झाल्याची चर्चा टेबलावरचं हादडत चवीचवीने चाललेली. या चर्चेचे भाग्यवंत- पराग, चिन्मय, रैना, टण्या, मयूरेश. मलाही बारीक व्हायचं असल्याने मी एक घासभरही खाल्लं नाही. फक्त अगदीच निर्जळी होऊन पुण्य लागू नये म्हणून एक अख्खी बिस्लेरी संपवली.

- गटग एक असलं तरी १०-१५ तरी मिनिगटग कोपर्‍याकोपर्‍यांत सुखाने नांदत होते. कुरूक्षेत्रावर नक्की काय झालं असेल आणि नक्की कोण कुणाशी किती जागेत आणि नक्की कसं लढलं असेल, लढताना बोलणं कसं ऐकू येत असेल, आणि या गदारोळात यादवसाहेबांनी गीता नक्की कशी सांगितली असेल, आणि 'गाढवापुढे वाचली गीता...' ही म्हण नक्की कशी जन्मली असेल अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या उत्तरांचा थोडाफार अंदाज अशा वेळीच येतो. आपाप्ल्या शंका निस्तरून घेणं, उगाच रागे भरणं, रेवडी उडवणं, अतिरेकीपीजे करून हाहाहाहा करून हसणं अणि हसवणं- असं सारं सुखरूप चाललेलं. त्याचे डिटेल्स सार्‍यांनी लिहायला हवेत.

बघा. अर्धंमुर्धं गटग अ‍ॅटेंड करूनही मी इतकं लिहू शकलो. बाकीच्यांनी तर कितीतरी लिहायला हवं की नाही?

Lol साजिर्‍या भारी लिहिलय !

सौ आशिष म्हणजेच अनुदोन ना ? की आणखी कोणी वेगळ्या आल्या होत्या ? Uhoh Proud

रच्याकने.. गटग संपताना चला निघा करत करत सगळे नुसते उभे होते.. कोणी हालतच नव्हतं.. शेवटी मस्पामॅ म्हणाला.. बाहेर पण खुर्च्या ठेवल्यात.. हवं तर तिथे बसा.. !!

'हे मायबोलीचे गटग आहे का? मी पण मायबोलीची सभासद आहे' असे विचारत आली म्हणजे बघा >>> हे भारी आहे Proud

Pages