अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिका स्वतःला जगाचा बाप समजते

१०० टक्के सत्य. समजते हा शब्द महत्वाचा.

नेमकी त्या लायकीची अमेरिका नाही

आता हे कुणि ठरवायचे? भारताची लायकी अमेरिकेच्या मते काय
हे कित्येक इतर उदाहरणांवरून स्पष्ट होत आहे.

त्यावर भारतीय सरकारने एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून केलेल्या कारवाया ह्या सांकेतिक असून त्यांची कारणमीमांसा विचारण्याचा नैतिक अधिकार अनिवासी भारतीयांना तर नाहीच आहे पण खुद्द अमेरिकेलाही नाही आहे.

अनिवासी भारतीयांमधे भारताचे नागरिक नि अमेरिकेचे नागरिक असे दोन प्रकार आहेत. जे भारतीय नागरिक आहेत त्यांना भारतीय सरकारच्या कोणत्याहि कृतीबद्दल स्वतःचे मत व्यक्त करणे, कारण मीमांसा विचारणे हे अधिकार आहेतच! खरे तर ते अधिकार भारतीय लोक जर वारंवार बजावतील तर ते लोकशाही ला धरूनच होईल. नि देशाला चांगलेच होईल.

आता जे अनिवासी भारतीय पण अमेरिकन नागरिक आहेत, त्यांचे काय विचारता राव? जगाचे बाप, कधी कुणाच्या मताची पर्वा करतात का? जगात कुठेहि काहीहि झाले तरी त्याबद्दल लिहीणे हा त्यांचा हक्कच. मतस्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक बाबतीत मत दिलेच पाहिजे असा काहीतरी समज असतो बर्‍याच लोकांचा, भारतीय काय किंवा कुणीहि.

विजय - डिप्लॉमॅटिक इम्युनिटी होती/ नव्हती यावर खुप उलट सुलट बातम्या येत आहे. काही हेतुतः चुकीची माहिती पुरवत आहेत जेणे करुन गोन्धळ वाटेल.

सम्पुर्ण डिप्लोमॅटिक इम्युनिटी यासारखी अत्यन्त महत्वाची गोष्ट पासपोर्ट वर नोन्दवली गेली नव्हती आणि स्टेट डिपार्टमेन्टला अशा प्रकारची माहिती नव्हती यावर विश्वास बसत नाही.

प्रित बहारा कडे सज्जड पुरावे असल्याशिवाय तो कारवाई करत नाही असा त्याचा खाक्या आहे.

http://www.indianexpress.com/news/devyani-case-third-instance-of-maids-a...

प्रभू दयाळ , नीना मल्होत्रा केस मधे कधीच अ‍ॅरेस्ट झाली नाही. निव्वळ माफीवर प्रकरण मिटलं. केस मधे काहीच फकर नाही, डिप्लोमॅटीक इम्युनिटीमधे काहीच फरक नाही. मग आजच एव्हढी मोठी कारवाई का ?

भारतीय दूतावासातल्या एका अधिका-याच्या मुलीवर शिक्षकाला ईमेल केला म्हणून अटक केली. ते ही तिला डिप्लोमॅटीक इम्युनिटी असताना. कोर्टाने तिला सोडून दिले .....का ?
तो ईमेल पुढे चीनच्या अधिका-याच्या मुलीने लिहीला होता असं सिद्ध झालं. त्याच्यावर कारवाईच झाली नाही. असं का ? भराराचे समर्थक या प्रकरणाला सरळ इग्नोर मारतात. त्याच्यावर अब्रूनुकसानीचा खटला चालू आहे.

बाकि कोर्टात सिद्ध होईलच.
अमेरीकन अधिका-यांवर पण भारतात खटले जायला हवेत हा संदेश या प्रकरणात मिळाला. दोषी असतील त्यांची गय केली जाता कामा नये. दूतावास किंवा इतर स्टाफने अमेरीकेचे कायदे पाळावेत अशी स्वप्नं अमेरीका पाहत असेल आणि दांडगाई करत असेल तर त्यांच्या इतर देशातल्या कर्मचा-यांना त्या त्या देशाचे कायदे पाळायला सांगावेत. देवयानी केस लावून धरण्याचं हे मुख्य कारण.

जाऊ द्या. इथं डोकं देण्यात अर्थ नाही. परत परत आपल्याच अधिका-यांनी अमेरीकेचे कायदे का पाळायला हवेत यावरच खल करत राहतील.

गुरुवारी परतणार असं लिहिलय, पण तशी ठोस बातमी नाही दिसली.
अमेरिकेच्या उर्जा मंत्र्यांचा दौरा रद्द झालाय. एकुण काय संबंध सुरळीत होण्याच्या मार्गावर दिसत नाहीय Sad

ही बातमी http://abpmajha.newsbullet.in/world/59/39625
शेवटी अमेरिका सोडावी लागणार दिसतय.

भरत Biggrin

इथे आदर्श फेस करावे लागेल...
---- कायदा सर्वान्ना समान नसतो.... किती उदाहरणे हवीत? थोडी धुळ उडेल... पण अनेक मोठ्यान्चे पाय आदर्श मधे अडकलेले आहेत...

रेडिफवर सर्व प्रकरण आणि कागद्पत्रे (शेवटी ३ लिन्का आहेत) विस्तारितपणे दिलेले आहे.

http://www.rediff.com/news/report/devyani-maid-dont-let-anyone-exploit-y...

---- कायदा सर्वान्ना समान नसतो....
<<
गाळलेल्या जागा भरा

"अमेरिकेतही" कायदा सर्वान्ना समान नसतो.... Happy

भरत मयेकर | 10 January, 2014 - 10:08 नवीन

बसल्या विमानात.
<<<

मयेकर, निषेध! Sad

"अमेरिकेतही" कायदा सर्वान्ना समान नसतो....
अनुमोदन. आमच्या राज्यातले पोलीस गोरे नसलेल्या लोकांना उगाच थांबवून तिकीटे देण्यात प्रसिद्ध आहेत

बक्कळ पैसा देऊन कुणि गाजलेला वकील नेमला तर खुनाच्या आरोपातून सुद्धा माणूस सुटतो.

One question..

How can wife of american citizen work in indian high commission of united state . Such position has many important document. This is conflict of interest for India. No other country allow this kind of things.

How can wife of american citizen work in indian high commission of united state . Such position has many important document. This is conflict of interest for India. No other country allow this kind of things. >>>>>>>> माझ्याही डोक्यात हेच आले होते, पण बहुदा ते भारतीय-अमेरिकन आहेत.

"बसल्या विमानात" यातून दात दाखवण्यासारखा तसेच निषेध करण्यसारखा अर्थ काढायची काय गरज आहे?
काल सकाळी आकाशवाणीवरच्या बातम्यांत ऐकले तेच इथे लिहिले :
"और अभी-अभी प्राप्त समाचार के अनुसार अमरीका में भारतीय विदेश सेवा की अधिकारी देवयानी खोबरगड़ें भारत के लिए रवाना हो चुकी हैं"
"Devyani Khobragade has left for India. While boarding the plane back to India, she said that the charges against her are false and baseless and she looks forward to proving them wrong.:

आज दिल्लीत येऊन पोचल्याची बातमी आहे. भारतानेही अमेरिकेत वकिलातीतल खोब्रागडेंच्या पदाच्याच दर्जाच्या एका अधिकार्‍याला परत जायला सांगितले आहे- त्याचा या प्रकरणाशी सरळ संबंध असल्यामुळे.

मांडवली झाली असे म्हणायचे का?

>>पण बहुदा ते भारतीय-अमेरिकन आहेत. <<
अहो असं काय करताय? भारतीय-अमेरिकन हे मुळ अमेरीकनांपेक्शा कट्टर नसतात का? Wink

हा प्रकार एक प्रतिक्रिया म्हणुन उघड होतो आहे याचे वाईट वाटते... आता पर्यन्त शासन व्यावस्था करत काय होती? अमेरिकनान्नी फ्रॉड केला असेल तर गुन्हे दाखल करुन शिक्षा देण्याचा प्रयत्न व्हायला हवेत.

उदय, ही देवाण-घेवाण असते....पडद्याआडची...पण जेव्हा एकजण उगाचच काहीतरी खोडी काढतो की मग दुसर्‍यालाही गप्प बसून चालत नसतं...सगळीकडे हेच चालतं...आपण उगाचंच त्यावर इथे रवंथ करत बसतो. Happy
थोडक्यात...एरवी नैतिकतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी...हिंदीत जी म्हण आहे ना तीच खरी....हमामखानेमें सब नंगे होते है !

प्रमोद +१. आताशा हेच वाटू लागलय.
चॅनेलवाल्यांना किमान त्याचे पैसे तरी मिळतात, आपलं काय? Happy

बाईंनी भारतात येताच आरपीआयचा निळा स्कार्फ गळ्यात घालून मेडियाला पोज दिली तर वडलांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. शेवटी शासनाला बाईंनी मेडियाला मुलाखत देऊ नये असे आदेश द्यावे लागले एकूणच बाईंना नियम पाळ्याची सवय कमीच ...

रोबीहुड उत्तम खोब्रगडे स्वतःची दलित असण्यची टिमकी वजवने आणि त्याचा पुरेपुर फायदा घेणे ह्यासाठी प्रसिध्द आहेत.

Pages