दिल्लीत आता काय घडेल ? ( बदलुन )

Submitted by नितीनचंद्र on 8 December, 2013 - 23:44

दिल्लीचे बलाबल या प्रमाणे

एकुण जागा ७०

बहुमताला आवश्यक ३६

भाजप - ३२ ( बहुमताला चार कमी )
आआप - २९ ( बहुमताला ७ कमी )
काँग्रेस - ८ ( बहुमताला २८ कमी ) चंद्रशेखर यांच्या ४२ खासदारांना काँग्रेसने बाहेरुन पाठींबा देऊन केंद्र सरकार चार महिने चालले हा भारताचा इतिहास आहे.

अपक्ष २

पर्याय उपलब्ध्द

१) भाजप अपक्ष व अन्य पक्षातले आमदार फोडुन सरकार स्थापन करेल.

२) भाजप आआप किंवा काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करेल ( ही शक्यता कमी वाटते )

३) आआप - काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )

४) आआप - भाजपच्या पाठींब्याने सरकार बनवेल.

५) काँग्रेस - भाजप किंवा आआप च्या पाठींव्यावर सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )

६) अजुनही काही पर्याय

आपल्याला काय वाटते ? काय घडेल ?

वर लिहल्या प्रमाणे जसे चंद्र्शेखर यांचे सरकार चालले तसेही भारतीय राजकारणात घडु शकते. पण लगेचच निवडणुका हा पर्याय राजकारणी अवलंबत नाहीत. अल्पमतातल्या आणि बाहेरुन पाठींबा असलेल्या सरकार कडुन काही अपेक्षीत कामे करुन घेणारी एक लॉबी तेव्हा सक्रीय होते.

चर्चा करुयात. वितंडवात नको. अ‍ॅड्मीन चा हस्तक्षेप तर नकोच नको.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅट द सेम टाईम, केजरीवाल 'फेक' वाटतात.
बनावट आहेत असे 'आतून' वाटते. >>>>>>>>>>> असं का? अतिविनयम धुर्तम लक्षणाम (चुभुदेघे) ?

मला आधी वाटायचं पण आता असं वाटतं, की नाही काही तर इतर पक्षांना मात देण्यासाठी का होईना हा माणुस (इतरांपेक्षा) चांगलं काहीतरी करेल. बाकी गुण-दोष प्रत्येकात आहेतच.

आता दिल्लीत काय घडत आहे हे दररोज टीव्हीवर बघण मजेशीर आहे,

दररोजच्या केजरीवालच्या जनसभा,

त्यांनी सरकारी कार वापरायला दिलेला नकार,

सरकारी घर वापरायला दिलेला नकार,

आताच हाती आलेल्या बातमीनुसार सरकारी अधिकारी स्वता:च्या बदल्या करुन घेण्यासाठी
प्रयत्नात आहे तर काही कार्यालयात फाईली फाडल्या जाताहेत, जाळल्या जाताहेत.

केजरीवाल येणार ह्याचा जबरदस्त परीणाम होतोय.

फेसबुकवरच्या एका चर्चेत डायरेक्ट डेमोक्रेसीवरच हे मत

डायरेक्ट डेमोक्रसी म्हणजे कारभारावर
लोकांचे प्रत्यक्ष नियंत्रण.
लोकशाही संकल्पनेच्या उद्याच्या काळात
ग्रीसमध्ये जेव्हा पोलीस (छोटी शहरे)
होती तेव्हा सगळे निर्णय सर्व पुरुष नागरिक
एकत्र येऊन घेत. जेव्हा ग्रीस मध्ये
शहरांचा आकार वाढून ती मेगापोलीस
झाली तेव्हा हळूहळू ही संकल्पना मागे पडत
गेली आणि लोकांनी त्यांचे
प्रतिनिधी निवडून द्यायचे
आणि त्यांनी लोकांचा कल जोखून कारभार
करायचा अशी रीप्रेझेन्तेतीव्ह
डेमोक्रसी अस्तित्वात आली. प्लुटो डायरेक्ट
देमोक्रसिला डेमोक्रसी म्हणतो आणि रीप्रेझेन्तेतीव्ह
देमोक्रसिला पोलिटी. त्यावरून पोलिटीक्स,
पोलिटिकल हे शब्द आले
प्लुटोने म्हणाले त्याप्रमाणे पोलिटी हा खरेच
देमोक्रसीचे भ्रष्ट रूप ठरत गेले. त्यामुळे आधुनिक
काळात विकेंद्रित
लोकशाही महत्वाची समजली जाते.
१९५०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून
किंबहुना राम मनोहर लोहिया, बी सी रॉय
यांच्या काळापासून लोकशाहीचे
विकेंद्रीकरण करावे अशी मागणी सिव्हील
सोसायटी म्हणजे जन आंदोलने करत आहेत.
त्यातून माहिती अधिकार, ग्रामसभा, पंचायत
राज, लोकपाल अशी अनेक विधेयके
करण्याची कल्पना पुढे आली.
अर्थातच हे सत्तेचे विकेंद्रीकरण
सत्ता ज्यांच्या हातात एकवटलेली आहे
अशा पक्ष आणि नेत्यांना मान्य होणे अवघड
होते. त्यांच्याशिवाय प्रातिनिधिक
लोकशाही देखील चालणार नाही. म्हणून
सिव्हील सोसायटीने कायम याबाबत
ब्लो हॉट ब्लो कोल्ड दृष्टीकोन स्वीकारला.
थोडक्यात म्हणजे कधी आंदोलने करून,
कधी धमक्या देऊन, कधी गोडीगुलाबीने जे
मिळेल ते पदरात पाडून घ्या आणि अधिक
सुधारणासाठी लढा सुरूच ठेवा.

हाय्ला! कस्ली अब्यासपुर्न फेसबुकी पोस्ट!
प्लूटो काय आन पोलिस काय आन मेट्रोपोलिस काय आन काय काय
काय अब्यास! काय अब्यास!! लै म्हायती भेटली.
शेयर्ल्याबद्दल धन्नेवाद.
>>
थोडक्यात म्हणजे कधी आंदोलने करून,
कधी धमक्या देऊन, कधी गोडीगुलाबीने जे
मिळेल ते पदरात पाडून घ्या आणि ...
<<
शिक्का मारण्यासाठी पैकं घेनारी जन्ता येग्ळं काय कर्तिये असं म्हंता? Wink

विजय तुला डायरेक्ट डेमोक्रेसी बद्दल माहिती हवी आहे अस वरच्या प्रतिसादात दिसल त्या बद्दल ही पोस्ट आहे
आय होप तुला कळ्ल असेल

थँक्स जाई. मी प्लेटोबद्दल बरच वाचलं होतं पण ते शिक्षण विषयाशी संबंधीत. लोकशाहीबद्दल त्याचं मत अगदी १००% पटलं.
बाकी आज दिल्लीत असायला हवं होतं असं वाटलं. Happy

हो विजय
म्हणून ती पोस्ट इथे टाकली .. बाकि काही नाही . आणि तुला अधिक माहिती हवी असेल तर प्रोफ़ेसर माहेश्वरी यांच एक पुस्तक आहे
राज्यशास्रातल बेसिक आहे ते ..
काहीना कळ्त नाही आक्रस्तळेपणाशिवाय
असो

बाकी आज दिल्लीत असायला हवं होतं
असं वाटलं.>>>>> तूला शपथविधिला उपस्थित राहायच होत की काय Lol

मलाही.
आज दिल्लीत असायला हवं असं वाटलं होतं.
मूळात मला केजरीवालांना शपथ घेण्यापूर्वीच लोक काहितरी घातपात करतील अशी भिती वाटत होती.
काल काँग्रेसच्या आमदारांची मोरॉनिश बडबड ऐकल्यावर मात्रं त्यांची लायकी आणि हिंमत कळून आली.
केजरीवाल मला तरी ग्रेट वाटतायत.
त्यांनी आश्वासन दिलेल्यातली किमान तीन चार कामे पूर्णं केली तरी खूप होईल.

अण्णांनी मात्रं हात दाखवून अवलक्षण करून घेतलंय.
जर ते या सगळ्यात केजरीवालांच्या साथीला असते तर त्यांचाही मान राहिला असता इतकेच नव्हे तर दिल्ली सोडून इतरत्रही आपला फायदा मिळाला असता.

नोकरशहा आणि धुरंदर राजकारणी एका व्यक्तीत समावल्याचे आजपर्यत दिसले नाहीत. हे दोन वेगळे रोल आहेत. सर्वकाळ सर्वांना समाधान मिळेवुन देणे सर्वथा अशक्य असे आज पर्यंततरी दिसले आहे.

अरविंद केजरीवाल यांना सत्ता देऊन दिल्लीतच अडकवुन ठेवण्याचा डाव काँगेसने आखला आहे आणि त्याला भाजपाची मुक संमती आहे.

एका अर्थाने ते योग्यच आहे. घाई करण्यात अर्थ नाही. दिल्लीत बहुमत नसताना ते काही घडवु शकले तर लोक आआप आणि केजरीवाल यांना मानतील. संपुर्ण देशाच राजकारण करण्याआधी दिल्लीच्या प्रयोगशाळेत सत्तेचे प्रयोग करुन प्राविण्य मिळवणे आवश्यक आहे.

आआप ने .सध्याच स्वबळावर लोकसभा हे लक्ष ठरवण्याऐवजी काँगेस किंवा भाजपच्या आघाडीत सामील होऊन लोकसभा, त्याठिकाणचे राजकारण हाताळणे, हे देशभरातले उत्तम व्यक्तीमत्व असलेले लोकांना आआपच्या माध्यमातुन पुढे आणणे इतके मर्यादीत ध्येय आखल्यास अजुन १० -१५ वर्षांनी अंतीम घ्येय साध्य होऊ शकेल.

केजरीवाल व टीमला आणि दिल्लीवासियांना मनापासुन शुभेच्छा !!!
अण्णांनी मात्रं हात दाखवून अवलक्षण करून घेतलंय. >>> + १

आजच्या शपथविधीच्या कार्य क्रमातील लोकांची उपस्थीती पाहिली तर लोंकांची आस्था लक्ष्यात येईल.

जे काही टिव्हीवर बघितल त्यावरुन बराच मोठा जनसमुह पोहोचला होता ह्या कार्यक्रमासाठी, लोक काही केजरीवाल चमत्कार करतील अश्या अपेक्षेने नाहीत, केजरीवाल यांचा साधेपणा लोकांना भावला आहे.

>>केजरीवाल व टीमला आणि दिल्लीवासियांना मनापासुन शुभेच्छा !!!>> +१
------ केजरीवाल यान्ना शुभेच्छा...

अण्णांनी मात्रं हात दाखवून अवलक्षण करून घेतलंय.
------ अण्णा व्यक्ती प्रामाणिक आहे पण खुप धर सोड करतात.... त्यामुळे स्वत:ची विश्वासार्हता गमावुन बसलेत.

७०० लिटर मोफत पाणी आणि ३ महिने जुन्याच दरात वीज निर्णय झाले.
आता प्रश्न आहे कि लोकांपर्यंत (ज्यांच्याकडे नळ नाहीत) पाणी पोहचवणे. त्यात बहुतांशी मोहल्ला समिती मदत करेल असं वाटतं.

बाकी छिद्रान्वेशी लोकं "निर्णय घेतला, पुढे काय?" असं म्हणतीलच. त्याला इलाज नाही. जे दिक्षितबाईंना सहज करता आले असते, ते केलेच नाही, हे महत्त्वाचे. बाकी दिल्लीकर सांगतीलच.

आपच्या मंत्र्यांनी सरकारी निवासस्थाने व गाड्यांचा ताफा न घेण्याचे ठरवले आहे. हा एक वेगळा पायंडा आहे. दिल्लीसारख्या सिटी-स्टेटमध्ये मंत्र्यांना राजधानीच्या जागी वेगळ्या निवासस्थानाची गरज भासत नसेल. मात्र मंत्री आम आदमीच्याच वसाहतीत राहिल्याने त्यांच्या आम शेजार्‍यांना मंत्र्यांकडे येणार्‍या भीडचा त्रास होईल का?
बाकीच्या पक्षाच्या मंत्र्यांना घर-कार्यालयाच्या नूतनीकरणावर (वास्तु किंवा आपल्या अभिरुचीनुसार) होणारा खर्च टाळण्याचे सुचले तरी खूप झाले. मंत्रीपद गेल्यावरही निवासस्थाने न सोडणे सोडणे, एकाहून अधिक सरकारी निवासस्थाने बळकावणे हे प्रकार बंद व्हावेत.
मंत्र्यांनी अगदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनेच प्रवास करावा असे नाही पण लाल दिवे आणि मागेपुढे गाड्यांची गरज नाही.

वीज कंपन्यांचे ऑडीट होणार.

लगेच इकडे निरुपम (काँग्रेसी) म्हणाले, महाराष्ट्रातही वीजदर कमी व्हायला हवे, नाहीतर आंदोलन करावे लागेल.

काँग्रेस आता भस्मासुरासारखी होऊ लागली की काय? स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवलाय Happy

सकाळची एन डी टी व्ही वरची पुन्हा प्रसारीत प्राईम टाईमची चर्चा ऐकत होतो. दिल्लीतील वीज कंपन्यांचे ऑडीट करायला उपराज्यपाल यांनी परवानगी दिलेली आहे जी कधी शीला दिक्षीत यांनी मनात आणली नाही.

वीज उत्पादन आणि वीज वितरण कंपन्या जर निर्धारीत खर्च रेखा च्या आसपास कार्यरत होतील तर वीज सबसीडी न देता स्वस्त होईल ही चर्चा आआप च्या प्रवक्ताच्या मते प्रथमच झाली.

प्रत्यक्षात अशी निर्धारीत खर्च रेखा अस्तीत्वात येऊन ज्या कंपन्या त्यानुसार कार्यरत होई पर्यंत सबसीडी देण्याची घाई करण्याचा निर्णय म्हणजे आमच्या जवळ फक्त ४८ तास आहेत म्हणणार्‍या अरविदजी केजरवाल यांनी बहुमत न आजमावले गेल्यास लोकप्रिय निर्णयाच्या आधारावर पुढच्या निवडणुकीची तयारी असेच म्हणावे लागेल.

केजरीवाल यांचे विश्वासदर्शक ठरावावरील भाषण ऐकले का ? कसे वाटले ?
"आम", "आम" जरा जास्त वाटत आहे. त्यात "र" मिळवायला हवा होता असे वाटते.

अरे वा... फ्लॅट गाडी घेणार नाही सरकारी..........पण अचानक १० रुम चा फ्लॅट

नया घर....... नयी गाडी...............बढीया है.................केजरी बाबु Happy

--------------

आताच केजरीवाल ने जाहीर केले की मी ५ रुम चा फ्लॅट घेणार नाही..... Biggrin

सर्वत्र टिका झाल्यावर उपरती सुचली Wink

विधानसभेत मिडियाला येऊ देणार नाही असे पण चालले होते म्हणे, पण तोही निर्णय मागे घ्यावा लागला.

काही तरी असे आहे की ज्यामुळे निर्विवाद हा माणुस योग्य आहे असे वाटत नाहीये अजुनही.
या आधी येथे किंवा अन्यत्र एक लिन्क देण्यात आली आहे. त्यातली माहिती कितपत खरी खोटी देव जाणे.

http://www.aadhiabadi.com/society/politics/867-who-is-arvind-kejriwal-in...

नाटक करु नये फक्त........... बाकी सगळ बरोबर आहे......

तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे........ घ्या.......(सुरक्षतेच्या दृष्टीने बरोबर आहे. कारण इतरत्र राहिले तर होणारा खर्च शासकिय निवासामधे येणार्या खर्चा पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे...)

तुम्हाला गाडी वापरायची आहे......वापरा..( उगाच नाटकी वागुन मेट्रो बस रिक्षा मधुन येताना तुमच्या मागे जी सुरक्षारक्षकांची हालत होते. आनि त्यांची तारांबळ उडते ...ती कमी होईल..)

ज्या ज्या सुखसोई त्या अवश्य घ्या.....पण घेताना .... नाटके करु नका... तुम्ही दिले म्हनुन घेतले अन्यथा आम्ही घेणारच नव्हतो........हा जो लबाड्पणा तोंडावर दाखवतात ना......तो अत्यंत निर्लज्ज दिसतोय...

१० फ्लॅट मिडीया दाखवत आहे केजरीवाल मान्य करत आहे.. तरी आप आदमीचा जोकर.. कुमार विश्वास... म्हणतोय नाही २ रुमच आहे... बाकीचे वापरणार नाही..... वा रे वा जोकरा... उद्या महलात रहायला गेलात तर काय म्हणशील मी तर फक्त १ रुमच वापरतो ... बाकी महल नुसता असाच घेतला आहे ...

हास्यकवी स्वतःला म्हणतोय... त्याच्यावरच हसत आहेत आज लोक...

ह्म्म्म ला.ब.शास्त्री हे खरोखर आम आदमी प्रमाणे होते, ज्यांची आज कोणालाच (कॉन्ग्रेसला देखील) फारशी आठवण राहिली नाही. त्यांचे साधेपण नाटकी वाटत नसे असे म्हणतात.

ह्म्म्म ला.ब.शास्त्री हे खरोखर आम आदमी प्रमाणे होते, ज्यांची आज कोणालाच (कॉन्ग्रेसला देखील) फारशी आठवण राहिली नाही. त्यांचे साधेपण नाटकी वाटत नसे असे म्हणतात. + १

मला शाळेत ला.ब. शात्रींच्या साधेपणाचा धडा होता.

काँग्रेसमधे सुध्दा दोन प्रकारचे लोक होते. पॅरीसला कपडे धुवायला पाठवुन त्यावर काश्मीरी गुलाबाचे फुल लाऊन फिरणारे आणि ला. ब. शात्रीजी प्रमाणे अत्यंत साधे असणारे/रहाणारे.

काँग्रेसमधे सुध्दा दोन प्रकारचे लोक होते. पॅरीसला कपडे धुवायला पाठवुन त्यावर काश्मीरी गुलाबाचे फुल लाऊन फिरणारे आणि ला. ब. शात्रीजी प्रमाणे अत्यंत साधे असणारे/रहाणारे.>>> दोघेही लोकांना तितकेच आदरणीय होते व लोकांच्या प्रश्नांची दोघांनाही तितकीच काळजी होती हे महत्त्वाचे नाही का? (बाकी किमान तो गुलाब घरच्या बागेतला असेल हो Happy )

काँग्रेसमधे सुध्दा दोन प्रकारचे लोक होते. पॅरीसला कपडे धुवायला पाठवुन त्यावर काश्मीरी गुलाबाचे फुल लाऊन फिरणारे आणि ला. ब. शात्रीजी प्रमाणे अत्यंत साधे असणारे/रहाणारे.>
<<
जे करायचे, ते आपकमाई व बापकमाईच्या पैशाने करीत असत.
सर्कारी खर्चाने नव्हे.
नेहरू खानदानाची वर्जिनल इस्टेट भरपूर होती व आहे. नेहेरूंनी भारत सरकार व पर्यायाने जर कुणा नितीनचंद्राच्या खिशातून धुण्याचे पैसे वा गुलाबाचे फूल काढले असेल, तर बोलावे Happy

इब्लिस, त्याबाबतीत मात्र एक छोटी शंका आहे. पंप्रने उद्या स्वखर्चाने शर्ट धुवायला पाठवायचा ठरवला तरी प्रोटोकॉल, सर्कारी प्रोसीजर्स मुळे ते शक्य होणार नाही. अर्थात तेव्हाच्या इनोसंट टाईम मधे होत असेलही. पण मुळात मला तसे करण्यात काही चूक वाटत नाही. नेहरूंच्या आर्थिक सेन्स बद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही Happy

फारेन्डा,
व्यक्तिगत घाणेरड्या आरोपांबद्दल आक्षेप आहे.
नेहेरूंबद्दल या संघिष्ट लोकांनी जितक्या विकृत बाबी पसरवल्या आहेत, त्याला उत्तर दिले गेले पाहिजे असे वाटत नाही का?

काल की परवाही एक दिवटे असलाच विकृतपणा करीत होते. त्याला दिलेले उत्तर अ‍ॅडमिन यांनी झाडू मारऊन उडवले. फक्त विकीची लिंक दिली होती. बाकी काही नाही.

जाउ द्या. जास्त बोलायची इच्छा नाही.

Pages