दिल्लीत आता काय घडेल ? ( बदलुन )

Submitted by नितीनचंद्र on 8 December, 2013 - 23:44

दिल्लीचे बलाबल या प्रमाणे

एकुण जागा ७०

बहुमताला आवश्यक ३६

भाजप - ३२ ( बहुमताला चार कमी )
आआप - २९ ( बहुमताला ७ कमी )
काँग्रेस - ८ ( बहुमताला २८ कमी ) चंद्रशेखर यांच्या ४२ खासदारांना काँग्रेसने बाहेरुन पाठींबा देऊन केंद्र सरकार चार महिने चालले हा भारताचा इतिहास आहे.

अपक्ष २

पर्याय उपलब्ध्द

१) भाजप अपक्ष व अन्य पक्षातले आमदार फोडुन सरकार स्थापन करेल.

२) भाजप आआप किंवा काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करेल ( ही शक्यता कमी वाटते )

३) आआप - काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )

४) आआप - भाजपच्या पाठींब्याने सरकार बनवेल.

५) काँग्रेस - भाजप किंवा आआप च्या पाठींव्यावर सरकार बनवेल ( अशक्य कोटीतील शक्यता )

६) अजुनही काही पर्याय

आपल्याला काय वाटते ? काय घडेल ?

वर लिहल्या प्रमाणे जसे चंद्र्शेखर यांचे सरकार चालले तसेही भारतीय राजकारणात घडु शकते. पण लगेचच निवडणुका हा पर्याय राजकारणी अवलंबत नाहीत. अल्पमतातल्या आणि बाहेरुन पाठींबा असलेल्या सरकार कडुन काही अपेक्षीत कामे करुन घेणारी एक लॉबी तेव्हा सक्रीय होते.

चर्चा करुयात. वितंडवात नको. अ‍ॅड्मीन चा हस्तक्षेप तर नकोच नको.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही नाही मी फक्त कपडे स्वखर्चाने धुवायला पाठवण्याबद्दल विचारत होतो :). मला मुळातच नेहरूंना जर तसे आवडत असेल तर त्यांनी करण्यात काही चूक वाटत नाही, अगदी सरकारी खर्चानेही. मला फक्त पंप्र स्वतःचे कपडे स्वतःच्या खर्चाने धुवायला पाठवणार हे आजकालच्या परिस्थितीत अजिबात शक्य वाटत नाही (तेव्हा कदाचित शक्य असेल) हे एक निरीक्षण सांगायचे होते.

कपडे धुवायला पॅरिसला पाठवण्याबाबतचा 'जोक' पंडित मोतीलाल नेहरूंशी संबंधित आहे. त्यांच्या ऐश्वर्याचे वर्णन करताना रचलेली आख्यायिका किंवा त्यावरचा विनोद यापेक्षा त्याला जास्त महत्त्व नाही.

नेहेरुंचे कपडे धुवायला पॅरिसला जात असत आणी गांधीजींची हत्या पंचावन्न कोटींसाठी झाली या दोन गोष्टी म्हणजे ...

बासच प्लिज, मुळ विषय धाग्याचा काय आणि हे काय चालू झाले ??
दिल्लीत काय घडायचे ते घडले आहे, पुढे पण काय काय घडत राहील याबाबत येथे चर्चा चालू रहावी असे वाटते.

बाकी किमान तो गुलाब घरच्या बागेतला असेल हो >>> फेसबुकवर फिरणारे फोटोज पाहुन तर मला तर तो वेगळाच गुलाब वाटतो Proud
कोणीतरी ते फोटोज अपलोड करा इथे . Wink

चला अखेर केजरिवालांचे सरकार तरले आणि त्यांचाच विधानसभा अध्यक्षही.
एक शंका :- बिधानसभेत कायदा पास करण्यासाठी केवळ >५०% बहुमत लागते की २/३?
२/३ असेल तर केजरीवालांना विधानसभेत कायदा/ प्रस्ताव मंजुर करुन घेणे अवघड जाईल ना? तसच विधानपरिषेदेचीही मंजुरी लागेल का? तिथे त्यांना बहुमत नाही तर ......... ?

बाकी मोठी घरं गाड्या, यांच्यापेक्षा जनतेची कामे होताय की नाही हे महत्त्वाचं नाही का?
केजरीवाल रोज मेट्रोने गेले तर कोणीही चॅनेलवाले त्यांच्या मागे जाणार नाही, हे नक्की, त्यामुळे सुरक्षा/ इतरांची गैरसोय मुद्दे गैरलागू आहेत.

इथे कोणीतरी विचारलेले.......... आप चे तिकिट कसे मिळवायचे........

आपच्या साईटवर आता ती लिंक ओपन झालेली आहे......तुम्ही तुमच्या मतदार संघातील ५०० लोकांची सही त्यांच्या ओळखपत्रांसकट द्यायची आहे ... तसेच त्यांनी दिलेला फॉर्म भरुन द्यायचा आहे (विनामुल्य) .. तुमच्या सह्या आनि तुमची माहीती आपचे संघटनाप्रतिनिधी मतदार संघात व्हेरीफिकेशन करुन घेतील... त्यानंतर तुमच्या उमेदवारीवर विचार करतील.........

ही माहीती आहे बघु मायबोलीवाले किती आप मधे नेते होतात Wink

मीच विचारली होती माहिती. मी सद्ध्या आणि पुढचे काही महिने भारतात नाहीये. आलो तरी माझ्या शहरात नसणार आहे, त्यामुळे असा काही प्रयत्न करण्यासाठी वेळ लागेल, पण तोपर्यंत निवडणूका होऊन पण जातील असे वाटत आहे. जेव्हा जमेल तेव्हाच्या परिस्थितीनुसार विचार करावा लागेल.

५०० लोकांच्या म्हणजे माबोकरांच्या चालेल का? Happy
बाकी आप ची स्टाईल आवडली. बर्‍याच अंशी पारदर्शक आहे. पुढे काय होईल माहिती नाही, पण सहज जिंकता येईल अशी मोदींची लढाई आता आप मुळे थोडी कठीण दिसत आहे. कारण हरवणे सोपे आहे, जिंकण्यापेक्षा Happy

More tan 50% required to form government in India.
2/3 seats required to pass any amendment/Bill.
2/3 seats(Loksabha + Rajyasabha) required to impeach supreme court judge and president.

धन्यवाद रॉबीनहुड.
काल/ परवा बघितलेला व्हिडीओ.
आधी केजरीवालांनी एका सभेत शीला दिक्षित आणि इतरांनी राष्ट्रकुल स्पर्धेत काय काय घोटाळे केले, त्याची यादी वाचुन दाखवली. त्यात २००-३०० पानांचे कागदपत्रही त्यांच्याजवळ आहे, असे म्हटले होते.
आता भाजपाचे डॉ. हर्षवर्धन यांनी "घोटाळ्याची चौकशी कधी करणार" असं विचारलं तर त्यांच्याकडेच पुरावे मागीतले. Sad
तिकडे राखी बिडलावर हल्ला झाल्याची बातमी खोटी आहे, असं समजतय.
प्रशांत भुषण आप मध्ये आहेत, की आप विरुद्ध तेच कळत नाही. Wink
दरम्यान आप च्या पाठीराखांमध्ये जबरदस्त वाढही होत आहे.
एकुण हे दिल्लीचं राजकारण, इतरत्र प्रभाव पाडेल असा विश्वास्/आत्मविश्वास/ भिती आहे, त्यामुळे अनेकांचे रागरंग बदलले हे बरय.

लोकसभेच्या ४८ जागांसाठी महाराष्ट्रात ७५००० अर्ज उमेदवारी अर्ज आले आहेत म्हणे आप कडे. Uhoh
लोकांना नविन मार्ग सापडलेला आहे सत्तेकडे जाण्याचा तर गर्दी होणारच.

आम आदमी पार्टीत व्ही गोपीनाथ, इन्फोसिसचे माजी CFO व्ही बालकृष्णन, ABN AMRO च्या चेअर पर्शन मीरा सन्याल (यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक दक्षिण मुंबईतून अपक्ष म्हणून लढवली होती - मिलिंद देवरांच्या विरोधात) हे तितकेसे आम नसलेले लोक सामील झाले आहेत.
आम आदमी पार्टी,लोकसभेसाठीचे उमेदवार घोषित करून प्रचारालाही लागेल तोवर बाकीच्या पक्षांचे जागावाटपाचे गुर्‍हाळ सुरूही झालेले नसेल.

2/3 seats required to pass any amendment/Bill.
<<
उपस्थित सदस्यांपैकी २/३ असे आहे का?

तसंच असणार. काही सदस्य अ‍ॅब्स्टेनही करतात.

<आधी केजरीवालांनी एका सभेत शीला दिक्षित आणि इतरांनी राष्ट्रकुल स्पर्धेत काय काय घोटाळे केले, त्याची यादी वाचुन दाखवली. त्यात २००-३०० पानांचे कागदपत्रही त्यांच्याजवळ आहे, असे म्हटले होते. आता भाजपाचे डॉ. हर्षवर्धन यांनी "घोटाळ्याची चौकशी कधी करणार" असं विचारलं तर त्यांच्याकडेच पुरावे मागीतले. >
इतिहासाची पुनरावॄत्ती होते ते अशी. व्ही.पी.सिंग आठवले का कुणाला?

लोकसभेच्या ४८ जागांसाठी महाराष्ट्रात ७५००० अर्ज उमेदवारी अर्ज आले आहेत म्हणे आप कडे >>>>
खरं की काय? म्हणजे ७५००० * ५०० लोकांना आप हवय? इतके अर्ज लोकसभेच्या जागेसाठी आहेत की आप च्या सदसत्वासाठी? लोकं (पेपरवाले/ वेबसाईट्स) आजकाल काय लिहितील याचा भरवसा राहिला नाही Happy

आम आदमी पार्टी,लोकसभेसाठीचे उमेदवार घोषित करून प्रचारालाही लागेल तोवर बाकीच्या पक्षांचे जागावाटपाचे गुर्‍हाळ सुरूही झालेले नसेल.>>>>>>>>> अगदी अगदी.... कारण शेवटच्या क्षणी उमेदवार घोषित केला तर बंडखोर कमी होतील अशी भाबडी आशाही असेल, काय सांगावे. Happy
बाकी बारामतीत आप कडुन कोणी लढणार आहे का? थोरल्या साहेबांनी लोकसभेतुन निवृत्ती घ्यायचे ठरवले आहे बहुदा. Wink

आता येणार्‍या प्रतिक्रियांचा सुर दिल्ली ऐवजी लोकसभा निवडणुकीत काय घडेल असा आहे. हाच धागा सुरु ठेवायचा का ? सध्या सर्व हिंदी चॅनल्स सुध्दा दिल्ली म्हणजेच देश अश्या अर्थाने दिल्ली राज्य सरकार आणि त्याच्या आजुबाजुला बातम्या देत आहेत.

नेहरू खानदानाची वर्जिनल इस्टेट भरपूर होती व आहे. नेहेरूंनी भारत सरकार व पर्यायाने जर कुणा नितीनचंद्राच्या खिशातून धुण्याचे पैसे वा गुलाबाचे फूल काढले असेल, तर बोलावे स्मित

चर्चा साधेपणा बद्दल चालली आहे. पैसे स्वतःच्या खिशातुन की जनतेच्या याबद्दल नाही. लोकनेत्याने कसे रहावे, काय खावे याबद्दल जनतेच्या अपेक्षा आहे. नेहरु हे राजघराण्यातील होते याबद्दल शंका नाही. पटेलांनी संस्थाने उगाच खालसा केली बहुतेक.

थोरले / ल्हान असे साहेब नाहियेत हो.
साहेब एकच. Wink

ते राज्यसभेवर जाणार आहेत असं प्रफुल पटेल यांनी डिक्लेअर केलय की २-४ दिवसांमागेच.

महाराष्ट्रात (सध्याच्या परिस्थितीनुसार तरी) कॉन्ग्रेसला आदर्श प्रकरण जड जाणार असं चिन्ह आहे.

झकासराव Happy
ही निवडणुक सगळ्यांनाच जड जाणार दिसतय. असो. तिकडे दिल्लीत (आजतकचे स्टींग केलेले) ३ अधिकारी निलंबित झाले तर ८००च्या बदल्या.
अजुनही काही होईल असे नाही, पण स्टींग चा परिणाम थोडे दिवस का होईना झाला तर उत्तमच आहे. दिल्लीतली सफाई होणे गरजेचेच. पुर्वीचे दागी अधिकार्‍यांवर कारवाई होईल असं दिसतय. अनिल कपुरचा 'नायक' फारच मनावर घेतला की काय केजरीवालांनी Happy
पण काँग्रेस किती काळ सहन करते तेही महत्त्वाचे.

बाकी झकासराव 'साहेब' दादांना बढती देताय की पत्ता कापताय, ते निवडणुकांनंतरच कळेल की काय?
यासाठी वेगळा धागा हवा का?

चर्चा साधेपणा बद्दल चालली आहे. पैसे स्वतःच्या खिशातुन की जनतेच्या याबद्दल नाही
<<
हो? तुमच्या लिखाणातून असे वाटले होते की नेहेरू सरकारी विमानाने कपडे धुवायला पाठवत होते रोज.

**

लोकनेत्याने कसे रहावे, काय खावे याबद्दल जनतेच्या अपेक्षा आहे.
<<
याबद्दलच बोलायचे, तर शास्त्रीजींचे राजकीय गुरू परमपूजनीय वंदनिय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा साधेपणा दिसला नाही, की त्या साधेपणाबद्दलचा संघिष्ट कुजबुजी प्रचारकी उद्योग आठवून सांगावासा वाटला नाही? फक्त नेहरू कसे काय आठवले?

**

नेहरु हे राजघराण्यातील होते याबद्दल शंका नाही. पटेलांनी संस्थाने उगाच खालसा केली बहुतेक.
<<

सोडली का पिंगाणी परत?

काँग्रेसचे गृहमंत्री असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांनी संस्थाने एकट्याने खालसा केली नाहीत. संस्थाने खालसा करणे ही कॉंग्रेसच्या सरकारची, डिसिजन होती. स्वतंत्र भारताच्या पहिल्या काँग्रेस सरकारातील गृहमंत्री या नात्याने त्यांनी ती डिसिजन इम्प्लिमेंट केली.

वरतून नेहेरू राजघराण्यातले असण्याचा संस्थाने खालसा करण्याशी काय संबंध? त्याच सरकारमधे नेहरू स्वतः पंतप्रधान होते हे विसरलात का? की गृहमंत्र्याला इंडिपेंडंट पॉवर्स असतात?

भगवे कपडे घालणारे योगासनांचे सेल्समन वैदू रामदेव बाबा तिकडे नेहेरूंना उद्देशून वाट्टेल ती विकृत विधाने करतात, अन तुम्ही इकडे. नशीब इथे भाषेवर लगाम ठेवावा लागतो. नैतर इथेही फेसबुकी अर्वाच्य पोस्टी आल्या असत्या असे वाटल्याशिवाय रहात नाही..

मुद्दा भरकटत आहे. मी लिहले की काँग्रेसमध्ये दोन संस्कृती होत्या. एक साधेपणाने रहाणारी. यात महात्मा गांधी आलेच. दुसरी संस्कृती साधे पणाने न रहाणार्‍यांची. जसे महात्मा गांधी किंवा ला.ब. शात्री साधे म्हणुन लक्षात रहातात तसे दुसरे टोक म्हणुन पॅरीस ला कपडे धुणे ही लक्षात रहाते.

दिल्ली मधे आआप ने साधेपणाची घोषणा केली त्याबाबत कोणीतरी ला.ब. शास्त्रींचे स्मरण केले आणि मला दुसर्‍या टोकाचे स्मरण झाले इतकेच.

पं. जवाहरलाल नेहरु यांनी स्वातंत्रसंग्रामाचे केलेले नेतृत्व आणि योगदान नाकारता येणारच नाही.

संस्थाने खालसा करताना राजेशाही संपावी व अपवादात्मक रित्या शिल्लक राहु नये या साठी पटेलांनी दिलेले योगदान आणि स्वतःच्या अधिकारात घेतलेले निर्णय इतिहासात प्रसिध्द आहेत. राजेशाही कधीच साधेपणाची पुरस्कर्ती राहिली नाही.

मी कोणत्याही विचारसरणीचा अधिकृत प्रवक्ता नाही त्यामुळे माझ्या विचारांवर प्रतिक्रिया देताना इतर गोष्टी आणणे अनावश्यक होते.

चिडुन चिडुन प्रतिक्रिया देण्याने मतपरिवर्तन होणार नाहीच पण प्रतिक्रिया देणार्‍या व्यक्तीबाबत आदर कमी होण्याची शक्यता जास्त आहे.

बरं. पॅरिसला कपडे धुणे ही आख्यायिका होती. पं मोतीलाल नेहरू यांच्या बाबत होती. (त्यांना साधेपणा अजिबात पसंत नव्हता), हे सांगितल्यावर पं. जवाहरलाल नेहरूंना ती चिकटवायचे कारण नाही. (अन्यथा पॅरिसला कपडे धुण्यासंबंधी माहितीचा स्रोत द्या). पुन्हा नेहरू घराण्याला संस्थानिकही/राजा म्हटले आहे. जे ते नव्हते. पं. मोतीलाल नेहरूंनी वकिलीच्या व्यवसायातून आपली संपत्ती उभी केली.
पं. जवाहरलाल नेहरूंना साधी राहणी पसंत होती आणि त्यामुळे पितापुत्रांत खटके उडत असे वाचल्याचे अंधुकसे आठवते. संदरभ शोधून देण्याचा प्रयत्न करेन.

जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू... बापरे... त्यावेळी आपल्यापैकी किती लोकं या जगात होते?
दिल्लीत काय घडलं? हा बाफ नसुन काय घडेल याबाबत ही चर्चा आहे ना? प्लिज थांबवा ही जुनी (पुराणी) कहाणी. आणि काय फरक पडतो, जुन्या काळात कोण कसं वागलं त्याच्याशी.
आज काय चाललय त्याबद्दल लिहुया ना... काय म्हणता.

विदे - १००% अनुमोदन !
छोडो कल की बातें, कल की बात पुरानी,
नये दौर में लिखेंगे मिलकर नयी कहानी,
हम हिंदुस्थानी (हे असेच आहे मुळ गाण्यात)

Pages