Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानल मामा....मानल
मानल मामा....मानल तुम्हाला!!! __/\__
ग्रेट....म्हणजे तुला पटलं ना
ग्रेट....म्हणजे तुला पटलं ना की मी किती काळजीपूर्वक या धाग्यावर वावरत असतो...!
मला एक मात्र मालिकेत खटकल बर
मला एक मात्र मालिकेत खटकल बर का....त्या चौघीपैकी एक-दोघी म्हणत होत्या कि 'शरू पळून तर गेली नसेल न?','तिन घरातून नक्की काय-काय नेलंय, हे अजून आपल्याला माहित नाहीये.' मग त्यांच्या दुसऱ्या वाक्यात अस का असेल कि 'शरू परत आल्यावर तिला जाब विचारूया....' जर ती घरातून पाळूनच जाणार असेल तर जाब कोणाला विचारणार?
आणि आधी सुद्धा शरयू डोकेदुखी चा बहाणा करून नवऱ्याला भेटायला गेली असेलं , मग इतक्या वर्षांनी त्यांच्या लक्षात यावं?
मला हे पटलच नाही.
असंख्य स्त्रियांनी ज्यांना
असंख्य स्त्रियांनी ज्यांना मामा बनवले ते आहात आपण अशोकराव, ग्रेट तर असणारच!
ग्रेट....म्हणजे तुला पटलं ना
ग्रेट....म्हणजे तुला पटलं ना की मी किती काळजीपूर्वक या धाग्यावर वावरत असतो...! >>>>>अगदी....१०० टक्के पटलय!!
.त्या चौघीपैकी एक-दोघी म्हणत
.त्या चौघीपैकी एक-दोघी म्हणत होत्या कि 'शरू पळून तर गेली नसेल न?','तिन घरातून नक्की काय-काय नेलंय, हे अजून आपल्याला माहित नाहीये.' मग त्यांच्या दुसऱ्या वाक्यात अस का असेल कि 'शरू परत आल्यावर तिला जाब विचारूया
जर ती घरातून पाळूनच जाणार असेल तर जाब कोणाला विचारणार? <<<
तुमचे नीट लक्ष नसते असे दिसत आहे.
अहो शरू पळून गेली असेल असे म्हणणारी बेबी असणार आणि तिला जाब विचारू असे म्हणणार्या इंदू वहिनी असणार! ह्याचे कारण इंदू वहिनींना मुळात 'काय चाललेले आहे' हेच कळत नसते, त्यामुळे त्या तोंडाला येईल ते बोलत असतात. त्यांना डायलॉग देण्याचे आता दिग्दर्शकानेही मनावर घेणे सोडून दिलेले आहे.
सुसंगत केव्हा बोलतो माणूस? जेव्हा त्याला कळते की आपल्या आजूबाजूला आत्ता ह्या क्षणी काय चाललेले आहे! तेच कळले नाही तर तो कसा सुसंगत बोलेल?
.
.
ठेवणीतला नको करूस दागिना
ठेवणीतला नको करूस दागिना मला
वापरातला तुझा रुमाल होत जाउदे
- ज्ञानेश पाटील
(आणि चारचौघात दिवे कसले देताय?)
.
.
तुमचे नीट लक्ष नसते असे दिसत
तुमचे नीट लक्ष नसते असे दिसत आहे.>>>>बेफिजी तुमचे नीटसे लक्ष नाही वाटत.... तिला जाब विचारू असे म्हणणारी र्श्री ची आई. पण श्रीची आई अस म्हणते तेव्हा बेबी तिला प्रत्युत्तर देते...'हो...जाब तर विचारावाच लागणार आहे." त्या बद्द्द्ल बोलतीये मी.
मधुरा, हा पिंट्या कोण आहे?
मधुरा, हा पिंट्या कोण आहे?
दिव्यश्री - आता सॉरी कोणाला
दिव्यश्री - आता सॉरी कोणाला उद्देशून आणि कशाबद्दल?
बेफी... स्कॉलरशिप पेक्षा अवघड
बेफी... स्कॉलरशिप पेक्षा अवघड आहे ही प्रश्नपत्रिका!!

चनस
चनस
मधुरा, हा पिंट्या कोण
मधुरा, हा पिंट्या कोण आहे?>>>>>बेरोजगार, अर्धवट शिक्षण झालेला, तरीही खूप पैसा कमावण्याची स्वप्न पाहणारा जान्हवीचा भाऊ.....
.
.
मला सॉरी म्हणण्याचा उगीच नवा
मला सॉरी म्हणण्याचा उगीच नवा पायंडा पाडू नका मायबोलीवर
मामा, तुमचे अपडेटस खूपच छान
मामा, तुमचे अपडेटस खूपच छान असतात.
फक्त ते वाचण्यासाठी मी हा धागा उघडते
पिंट्या इतकं मिस्टरी पात्र का
पिंट्या इतकं मिस्टरी पात्र का झालय तुझ्यासाठी दादा?
पिंट्या इतकं मिस्टरी पात्र का
पिंट्या इतकं मिस्टरी पात्र का झालय तुझ्यासाठी दादा<<< कोण पिंट्या?
(एका मिस्टरी पात्रासाठी दुसरे कोणी कसे मिस्टरी पात्र होऊ शकेल?)
बरेच दिवस ऐकतोय पिंट्या
बरेच दिवस ऐकतोय पिंट्या पिंट्या पिंट्या, हा पिंट्या कोण आहे?
who is john galt अस झालय का
who is john galt अस झालय का बेफिजी?
आपण यांना पाहिलंत का? हा आहे
आपण यांना पाहिलंत का? हा आहे पिंट्या (चूभू दे/घेणे )किती दिवस झाले वाचते कोण आहे पिंट्या ? पिंट्या आहे कोण ? आहे कोण पिंट्या ???????आणि हो फोटो फेसबुक वरून घेतेला आहे .आशा करते कोणाची हरकत वगेरे नसेल.
मामा, आजचे अपडेट्स कुठेत? काय
मामा,
आजचे अपडेट्स कुठेत? काय झालं?
आम्ही फक्त मजा करतोय. सिरीयसली घेऊ नका.
अगं मधुरा पोरी.... मला
अगं मधुरा पोरी.... मला इथल्याच अनेक भाच्यांनी [काही परदेशातही आहेत] मागे एकदा विनंती केली होती की रात्री ११.३० नंतरच अपडेट देत जाणे....कारण कित्येक सदस्य [स्त्री/पुरुष] ८.०० वाजता घरी पोहोचत नाहीत, त्यामुळे त्यावेळी प्रसारित होणारा भाग त्याना पाहता येत नाही....तोच भाग पुन्हा ११.०० वाजता पुनर्प्रसारित होतो, जो ११.३० ला संपतो, त्यावेळी पाहणे जमते. मुद्दा असा की त्या अगोदर माझे अपडेट इथे आले तर पाहाण्यातील मजा निघून जाते.
वेल...मलाही ते पटले....त्यामुळे मग मी तुम्हा सर्वांसाठी ११.३० पर्यंत जागा राहतो.....काय करणार ?
अहो अशोक मामा, तुम्ही कशाला
अहो अशोक मामा, तुम्ही कशाला जागता? ज्यांना रिपीट टेलीकास्ट पाहून मग अपडेट वाचायचा असेल ते 11:30 नंतरच हा धागा उघडतील त्या साठी तुम्ही खरच जागरण करू नका.
सोमवार दि. १० फेब्रुवारी २०१४
सोमवार दि. १० फेब्रुवारी २०१४ : अपडेट्स
~ जान्हवी अत्यंत स्तब्धपणे त्या व्यक्तीच्या आणि ड्रायव्हरच्या दरम्यान होणार्या बोलण्याकडे पाहात आहे. ती व्यक्ती बंद पडलेली गाडी सुरू करून देतो आणि गाडी सुरू झाल्यावर यशस्वीततेची पावती म्हणून हसत जान्हवीला "हॅल्लो...." म्हणतो....जान्हवी त्याच्याकडे पाहात असतानाच तो तिच्याजवळून चालत जातो. ड्रायव्हर जान्हवीला हाक मारत आहे....पण गोंधळलेली जान्हवी काय उत्तर द्यावे हे न समजल्याने कसेबसे म्हणते, "त्या माणसाच्या मागे....नको, नको...गाडी फिरवून घ्या आपण मागे जाऊ या....". मागे म्हणजे तिला श्री च्या फ्लॅटकडे असे म्हणायचे आहे कारण शरयूचा तिने पाहिलेला हा प्रसंग त्याला सांगणे तिला गरजेचे वाटते. इकडे श्री फ्लॅटवर आला आहे आणि तो परत त्या स्टॉपवरील गृहस्थाला १०० रुपये परत द्यायचे आहेत म्हणून फोन लावीत आहे, पण त्याचे ते प्रयत्न व्यर्थ जात आहेत. शेवटी स्वतःशीच बोलून तो ठरवितो की "आपण आता परत त्या बस स्टॉपवर जाऊ....कदाचित आलेही असतील ते गृहस्थ तिथे !"....तो बाहेर पडतो.
बस स्टॉपवरील दृश्य. ते गूढ गृहस्थ आहेत बस स्टॉपवर....आणि मोबाईलवर कुणाशी तरी इंग्रजीमधून संवाद करीत आहेत....."इट्स अब्सोल्युटली रीडिक्यूलस...." म्हणत संवाद चालू ठेवतात, पण त्यांच्या आवाजावरून त्याना संताप आलेला आहे, ही बाब उघड होते. श्री तिथे येणार आणि या दोघांचा संवाद सुरू होणार अशी भावना मनी बाळगलेल्या प्रेक्षकांना एक धक्का बसतो....तो म्हणजे श्री ऐवजी तिथे अनिल आपटे येतो आणि त्या गृहस्थाच्या संवादाकडे कान देऊन ते ऐकत उभा राहतो. त्या गृहस्थाला संवादाद्वारे ताप चढत असल्याचे दिसते...खोकलाही येतो.... तो खोकला टाळण्यासाठी ते खिशातून रुमाल काढून तोंडावर धरतात तर त्यावर रक्ताचे थेंब सांडतात. वेदनाशामक गोळी खातात...कसेबसे पण शांतपणे उभे राहतात. आपटे ते पाहतो, तो बोलणार काहीतरी सल्ल्याचे हे उघड आहेच. तरीही अधूनमधून तोंडातील पानाच्या पिचकार्या बस स्टॉपसमोरील रस्त्यावर तो टाकत आहे....तो किळसवाणा प्रकार पाहून त्या गृहस्थाचा संताप अनावर होतो. ते चिडून आपटेला सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व सांगतात. पण निर्लज्ज असलेल्या आपटेवर काहीच परिणाम होत नाही. ते गृहस्थ वैतागून तिथून निघून जातात...फोन करत करत....आणि नेमका श्री त्याचवेळी त्याना फोन करताना दिसतो....तो अर्थातच एंगेज्ड लागतो. दोघेही रस्त्यात एकमेकाला क्रॉस होतात, पण लक्ष जात नाही. श्री बस स्टॉपवर येतो...तिथे आपटे त्याला पाहून जणू काही हर्षाने हाक मारतो....आपट्याचे ते पान खाऊन थुंकणे हा प्रकार श्री चा संताप वाढविणारी घटना असते. तोही त्याच्यावर चिडतो, पण आपटे जणूकाही झालेलेच नाही अशा थाटात त्याच्याशी बाता मारत उभा राहतो....श्री ने जास्त चिडू नये म्हणून "मी पाण्याची बाटली घेऊन येतो आणि हे सारे स्वच्छ करतो हां मी..." असे म्हणत तिथून निघून जातो. श्री हताशपणे "काय करावे या माणसाचे ?" असा स्वतःलाच प्रश्न विचारीत उभा राहतो. इकडे फ्लॅटवर जान्हवी पुन्हा आली आहे, पण श्री दिसत नसल्याचे पाहून ती त्याला फोन करते. फोनवरून ती त्याला शरयूसंदर्भात सांगणार असते, तरीही इतका महत्वाचा प्रसंग फोनवर न सांगता "आपण प्रत्यक्ष बोलू या..." असेच त्याला सांगतो. तो वारंवार आग्रह करून विचारतो पण ती कसाबसा नकार देते आणि "मला घरी गेले पाहिजे लवकर....मी तिथून फोन करते..." असे म्हणत बाहेर पडते.
"गोकुळ" बंगल्यात आरोपीच्या पिंजर्यात शरयू आहे आणि तिच्याभोवती आजी, बेबी, नर्मदा, इंदू आणि सरस्वती या पाच स्त्रिया चौकशीसाठी उभ्या आहेत. आजी शरयूला जाब विचारते....शिस्तीबद्दल सांगते, नियमांचा उल्लेख होतो....सुरुवातीपासून खाली मान घालून कशीबशी उत्तरे....तीही खोटी...देणारी शरयू "नियमांचा उल्लेख" होता क्षणीच मान वर करून म्हणते, "तेच म्हणते मी...नियम मला एकटीलाच आहे का ?" आजी तिच्याकडे रोखून पाहतात....त्याच्याबद्दल त्याना जास्त जाणून घ्यायचे आहे. नियम सार्यांनाच आहे, पण तो कुणाला कोणत्या परिस्थितीत आणि कितपर्यंत याची मर्यादा स्पष्ट केली आहे. तो ओलांडून तू गेली आहेस का हे मला पाह्यचे आहे.....इथे शरयू गडबडते आणि "मी नवर्याला भेटायला गेले होते, पण जान्हवीच्या नवर्याला....श्री ला..." असे काहीबाही बरळते. तिचा हा खुलासा अर्थातच बेबीआत्याला पटत नाही....ती तिथेच म्हणते, "पटत नाही मला. श्री ला भेटायला जाताना कुणी इतके नटून जाईल का ?" पण का कोण जाणे आजी बेबीला थांबवितात आणि शरयूला "तू जा वर..." असे म्हणतात, त्या संधीचा फायदा घेऊन शरयू आपल्या खोलीत जाते. तिच्या एकूणच वर्तनावर आजी आणि बेबी यांच्यात संवाद होतो आणि शरयूचे म्हणणे खरे की खोटे यासाठी जान्हवी आल्यानंतरच खुलासा होईल यावर मात्र एकमत होते.
श्री घरी परतत आहे....अयशस्वी बस स्टॉप भेटीनंतर...आणि वाटेत त्याच विचारात असताना त्याचा एका व्यक्तीला धक्का लागतो...व्यक्तीच्या हातातील आईसकॅन्डी त्याच्या शर्टवर पडते....दोघेही एकमेकाजवळ दिलगिरी व्यक्त करतात....दोघेही "सॉरी मी विचारात होतो....त्यामुळे.." असा खुलासा करतात. ती व्यक्ती, जी शरयूसमवेत होती, हसत श्री कडे पाहते. श्री त्याना म्हणतो, "माझ्यामुळे तुमची आईसकॅन्डी पडली. मी तुम्हाला नवीन घेऊन देतो..." त्यावर त्याला उत्तर मिळते, "अहो अजिबात नको, अन्यथा मला तुम्हाला नवीन शर्ट घेऊन द्यावा लागेल..." दोघेही मनापासून हसतात....आणि विरूद्ध दिशेने निघून जातात....श्री मात्र मान वळवून त्या व्यक्तीकडे पाहातो.
जान्हवी घरी आली आहे आणि आजी तिला शरयूच्या भेटीसंदर्भात विचारीत आहेत.
जिज्ञासा.... थॅन्क्स.....
जिज्ञासा....
थॅन्क्स..... अगं, मला ११.३० पर्यंत जागे राहणे आवडते असेही तू म्हणू शकतेस. शेवटी ह्या वेळेला मी मान्यता दिली असल्याने त्रास जाणवत नाही....तरीही आपुलकीने तू सांगितलेस याबद्दल मला आनंद होत आहे.
मामा, सुंदर अपडेट्स. आपटे
मामा, सुंदर अपडेट्स. आपटे जिथे-तिथे कडमडतोय.
श्रीने कमीतकमी काकाला तरी लहानपणी पहिलेच असणार कारण काका तसं यंग दाखवलाय, तरी श्री ओळखत नाही? काहीही दाखवतात, पटत नाही.
अन्जू.... "... काहीही
अन्जू....
"... काहीही दाखवतात, पटत नाही...."
~ माझ्याही मनी नेमका हाच भाव आला होता. श्री ने वडिलांना न ओळखणे एक वेळ समजू शकते; पण त्याचे आणि शरयूचे संबंध अगदी बहीणभावासारखे दाखविले गेले आहेत, तेव्हा शरयूने केव्हातरी त्याला आपल्या नवर्याचा फोटो दाखविला असण्याची शक्यता मानलीच पाहिजे. शिवाय ज्यावेळी लक्ष्मीकांतला घराबाहेर काढले गेले त्यावेळी श्री चे वयही जाणतेपणाचेच होते, त्यामुळे त्यानी एकमेकांना पहिले पाहिले असणारच. तरीही आजची त्यांची भेट अगदी दोन अनोळखी लोक रस्त्यात भेटतात अशीच दाखविली आहे.
पटत नाही.....
Pages